Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील निरा येथील लोकशाही दिनाचे आयोजन सासवड प्रतिनिधी: सोमवार दि. 21 जुलै 2025 रोजी अकरा वाजता लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय निरा शिवतक्रार ता. पुरंदर जिल्हा पुणे येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आलेला आहे अशी, माहिती पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपूत यांनी दिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार पुरंदर तालुक्यामध्ये वेगवेगळे मंडळ स्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाच्या आयोजन करण्यात येत आहे, या लोकशाही दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमामध्ये नागरिकांना लाभार्थ्यांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिनल, वय, राष्ट्रीय अधिवास व प्रमाणपत्र पंधरा वर्षे वास्तव्याचा दाखला अशा विविध प्रकारच्या दाखलकल्यांचे वाटप उपविभागीय अधिकारी पुरंदर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच दुय्यम शिधापत्रिका, वारस नोंदी, फेरफार, निर्गती, आधार कार्ड, रजिस्ट्रेशन इत्यादीचे वाटप करण्यात येणार आहे, या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विक्रम राजपूत तहसिलदार पुरंदर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments