पुरंदर तालुक्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची सासवड या ठिकाणी मागणी सासवड प्रतिनिधी: सासवड (ता. पुरंदर) येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या तीन ते चार महिन्यापासून, पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने, शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या वंशी आणि लाळ्या खुरकूत यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावर तातडीने उपयोजना करावी अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक नंदकुमार जगताप व शेतकऱ्यांनी माजी आमदार संजय जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांच्याकडे दिले आहे. सध्या पुरंदर तालुक्यात लंमपी रोगाने अनेक जनावरांना ग्रासले आहे. त्यामुळे काही ठिकाणी जनावरे दगावली आहेत. त्यातच आता खुरकत रोगाचाही प्रादुर्भाव सुरू झाल्याने, शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा संकट काळात सरकारी दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्याने, शेतकऱ्याची मोठी गैरसोय होत असल्याचे जगताप यांनी सांगितले आहे. या निवेदनात सरकारी दवाखान्यात तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याची तसेच लंमपी आणि लाळ खुरकत या रोगावर आवश्यक औषधे व लसीचा साठाही दवाखान्यात उपलब्ध करून, देण्याची मागणी केली आहे. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस डॉ. संदीप नवले आणि सागर जगताप आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments