पुरंदर तालुक्यातील राजुरी या गावी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी ह.भ. प. अंकुश (बापू )भगत यांची निवड सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवडीसाठी नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली, यावेळी राजुरी गावचे भूषण जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच, पुरंदर तालुका संत सोपान काका महाराज भागवत संप्रदाय प्रसारक ट्रस्टचे सासवडचे अध्यक्ष ह.भ. प. अंकुश (बापू) भगत यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सरपंच इर्षा भगत यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. यावेळी ग्रामसेवक विश्वनाथ खंडाळे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. निवड झाल्यानंतर तंटामुक्तीचे अध्यक्ष अंकुश (बापू) भगत यांनी लगेच एक तंटा मिटवून अध्यक्ष पदाला साजेशी अशी कामगिरी करून, दाखवली. यावेळी उपसरपंच सुधाकर भगत, ग्रामपंचायत सदस्य, आजी, माजी पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. राजुरी गावचे गाव पण टिकून ठेवण्यासाठी नेहमीप्रमाणे सर्वांना विचारात घेऊन, गावातील तंटे गावातच मिटवून व परिसरातील गावाना राजुरीचा आदर्श घेतील असा नावलौकिक तयार करून, असा विश्वास अंकुश( बापू) भगत यांनी या निवडीनंतर व्यक्त केला .याची सर्व माहिती त्यांनी प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments