Hot Posts

6/recent/ticker-posts
Showing posts from March, 2026Show All
पुरंदर तालुक्यातील रिसे या गावातील पाणी प्रश्न पेटला असताना ;या संघर्षाला वाचा फोडताना उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांनी रिसे येथील विहीर अधिग्रहण केली                                                           सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                          रिसे ता. पुरंदर येथील अंतर्गत येणाऱ्या सर्व वाड्या वस्त्यावरती पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली होती ,त्या अनुषंगाने शासनाची 40 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची पाणीपुरवठा करणारी विहिरीचा पाणीपुरवठा संबंधित शेतकरी तुकाराम अंकुश भालेराव यांनी पाणीपुरवठा बंद केला होता, तरी आपत्कालीन परिस्थितीमध्ये गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर अधिग्रहण करण्यात यावी, तरी गट नंबर 255 मधील विहीर अधिग्रहण करून, गावासाठी पिण्याचे पाणी सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासक ग्रामपंचायत रिसे ता. पुरंदर येथील यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती पुरंदर यांना दि. 27 मार्च रोजी पत्राद्वारे कळविण्यात आले होते, क्रमांक तीन अन्वये गट विकास अधिकारी पंचायत समिती पुरंदर यांच्याकडून दि. 27 मार्चच्या पत्रानवे खाली नमूद केलेली विहीर अधिग्रहण करून, मिळण्याबाबत वरील क्रमांक चार अन्वये तहसीलदार कार्यालय पुरंदर यांच्याकडील पत्रानुसार दि. 27 मार्च रोजी या कार्यालयास कळवले होते, त्या अनुषंगाने पुरंदर तालुक्यातील मौजे रिसे येथील आपत्कालीन परिस्थितीमध्ये गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर अधिग्रहण करण्याची आवश्यकता असलेले मौजे रिसे गावातील खालील प्रमाणे गट नंबर मधील विहीर खाली नमूद केलेल्या अटीनुसार पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात येत असून, अनुक्रमांक गावाचे नाव रिसे गट नंबर 255 सर्व पुराव्याच्या आधारे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे,  अजय इंगळे जि. प सदस्य  बेलसर  माळशिरस गटातील,मंडल अधिकारी संजय बडधे, तलाठी सागर कुचेकर ,ग्रामसेविका नीलिमा चांदगुडे, गावातील माजी सरपंच, माजी उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील ,प्रशासक सरपंच, उपसरपंच, गावातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी बांधव ,महिला मंडळ आदी उपस्थित होते, याबाबतची सविस्तर माहिती अशी की रिसे या गावातील पेटलेला पाण्याचा प्रश्न अखेर त्या ठिकाणची विहीर अधिग्रहण करून, त्या ठिकाणी एक प्रकारे सर्वसामान्य नागरिकांना पाण्याच्या संदर्भात न्याय मिळवून दिलेला आहे, अशी सर्व माहिती उपविभागीय अधिकारी  तथा प्रांत वर्षा लांडगे यांनी ही सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची बुधवारपासून यात्रेला सुरुवात             सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव येथील नवसाला पावणारे व जागृत देवस्थान असलेले श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची यात्रा बुधवारपासून दिनांक सुरू होत आहे, त्यानिमित्त बुधवार दिनांक एक रोजी सायंकाळी सात वाजता श्रीचा हळदी समारंभाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी दिनांक दोन रोजी पहाटे पाच वाजता हरिभक्त परायण बापू महाराज टेंगले (राहू) यांचे हनुमंत जयंती निमित्त किर्तन होणार आहे ,सकाळी सहा वाजून 33 मिनिटांनी हनुमान जन्म होईल, सात वाजता स्त्रीचे महाआरती होईल, त्यानंतर साडेसात वाजता ते अकरा वाजता दरम्यान; स्त्रीच्या पालखीचे ग्राम प्रदक्षिणा होईल, बारा ते चार वाजता भक्ताचे नवसाचे दंडवाटाचे कार्यक्रम होतील, सायंकाळी सहा ते साडेसात वाजताच्या दरम्यान सासवड, पेरणे, एलकेभादे, पारगाव, सिंगापूर, एखतपुर, मुंजवडी, नावरे, भोंडवेवाडी, कोथळे इत्यादी मानाच्या कावडीचे स्वागताचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता श्रीची महारती होईल, त्यानंतर सात वाजून 45 वाजता काट्यांचे स्त्रीच्या शिखराला लावण्याचा कार्यक्रम होईल, त्यानंतर साडेआठ ते दहा वाजताच्या दरम्यान अन्नपूर्णा ट्रस्ट माळवदकर बंधू यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम होईल, रात्री दहा ते तीन वाजेपर्यंत स्त्रीच्या पालखी मिरवणूक व छबिण्याचा कार्यक्रम होणार आहे, शुक्रवार दिनांक तीन रोजी सकाळी नऊ ते दोन या वेळेमध्ये निलेश कुमार अहिरेकर सह रूपाली पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे, चार वाजता ते सात पर्यंत या वेळेमध्ये कुस्त्यांचा जंगी आखाडा होईल, रात्री नऊ वाजता नंतर निलेश कुमार अहिरेकर सह रूपाली पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती प्रशासक सरपंच यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यात भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक दिवस आज महावीर जयंती                                       सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                       सासवड ता. पुरंदर येथे आज भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक दिवस महावीर जयंती सकाळी आठ वाजता ध्वजारोहण व आरती श्री 1008 अजिनाथ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर साईनाथ हाऊसिंग सोसायटी पारगाव सासवड रोड येथे होणार आहे, पंचकल्याणक पूजा महिला मंडळ यांच्या वतीने श्री कथूननाथ जैन मंदिर सासवड या ठिकाणी आठ वाजून पंधरा वाजता संपन्न होणार आहे ,नऊ ते 11 मिरवणूक भारत मेडिकल, अमर चौक, राजेंद्र भवन जगताप, हॉस्पिटल, ताथवडकर घर ,मोहिनी हॉटेल, जयप्रकाश चौक ,सरळ मेन रोड अमर चौक, मारुती मंदिर चौक, उजवीकडून नामदेव मंदिर हॉल येथे पूर्ण होणार आहे .स्वागत व नवकार मंत्र बहुमान भाषणे आरती व मंगल देवो होणार आहेत, साडेअकरा ते एक पर्यंत ,तर नंतर आलेल्या पाहुण्यांना दुपारी भोजनाचा कार्यक्रम हा दुपारी एक ते तीन या वेळेत होणार आहे, यासाठी कपिल ओसवाल, बाबू शेठ सोळंकी, गिरीश कर्नावट, धनपाल पाटील, मुन्ना सोलंकी, अशोक ओसवाल, सुरेखा पालवे ,अनिता चोभे, अर्चना प्रभूकर शोभा शिंगारे ,जया जितेंद्र तर पूजेचा लाभ हेमलाता रमेश ओसवाल यांना मिळाला आहे अशी सविस्तर माहिती संयोजक सकल जैन समाज त्यांनी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर मधील कावडी कडून मुंगी घाट सर; तर श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे महादेवाला  करेच्या पाण्याने जलाभिषेक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         श्री शेत्र शिखर शिंगणापूर जिल्हा सातारा येथे प्रथम मानाच्या खळद, खानवडी, एखतपुर, मुंजवडी ,कुंभारवळण या पंचक्रोशीच्या श्री संत तेल्या भुत्याच्या कावडीने तेल्या भुत्याच्या वंशज कावडीचे मानकरी शिवयोगी संत भुतोजी नाना महाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'हर हर महादेवचा' जयघोष करत भक्ती आणि शक्तीच्या जोरावर अवघड असा मुंगी घाट मानवी साखळीच्या साह्याने सर केला, असून येथील स्वयंभू शंभू महादेवाला करेच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला, श्री शेत्र एखतपुर ता. पुरंदर येथील भुतोजी बुवा तेली यांच्या जळत्या घराची जागा व तेलाचा घाणा येथे प्रदक्षिणा घालून, समाधीचे दर्शन घेऊन खळद येथून शाही मिरवणुकीने राम नवमीला दि. 26 रोजी पायी निघालेल्या कावड 16 कोळविहीरे जोगवडी, मूर्टी ,वडगाव निंबाळकर, जिंती, फलटण, निंबाळकर नाका असा प्रवास करत द्वादशी सोमवारी दि. 30 रोजी पहाटे रणखिला येथून सकाळी कोथळे येथे पोहोचला येथे प्रशासनाच्या वतीने तसेच माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या वतीने कावडीचे स्वागत करण्यात आले, तर नानासाहेब तेली महाराज इस्लामपूर यांच्या कावडीची भेट तसेच लहान मोठ्या काठ्या, कावडी यांची भेट होऊन दुपारी दोन वाजून 30 मिनिटांनी कावडीचे मुंगी घाटाकडे प्रस्थान झाले, चार वाजून 45 वाजता घाट पायथ्याशी पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून कावडीचे स्वागत केले, त्यानंतर महाआरती होऊन पाच वाजून १५ मिनिटांनी कावडीच्या घाट चढण्यास प्रारंभ झाला ,नाना महाराज खळदकर व मागे ढोल ताशाच्या गजरामध्ये सनईच्या निनादांमध्ये मानवी साखळीच्या साह्याने 'हर हर महादेव चा जयघोष' करत एक एक टप्पा पार करत घाटाची चढण करणारा कावडीचा सोहळा मनोहारी दिसत होता, हा नेत्र दीपक सोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी लाखो भाविकांनी गाठ माथ्यावर गर्दी केलेली होती, गाठ माथ्यावर उपविभागीय महसूल अधिकारी उज्वला गाडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत, तहसीलदार विकास अहिर आदींनी कावडीचे स्वागत केले. पुढे कावड प्रथम अमृतेश्वर मंदिर व नंतर मुख्य मंदिरात नेहून श्री ना करा जलाचा जलाभिषेक केला, येथे शंभू महादेव देवस्थान समस्त शिखर शिंगणापूर बडवे मंडळी यांच्याकडून कावडीची पूजा करीत मानाचा ध्वज दिला. भक्ती -शक्तीचा अनोखा संगम मुंगी घाट भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम असून, चार दिवस रखरखत्या उन्हात प्रवास करून, आल्यावर मुंगी घाटाला सुरुवात करतात, वातावरणात बदल होऊन आभाळ झाकोळले जाते व गार वाऱ्याची झुळूक सुरू होते व भाविक भक्तिभावाने हा घाट लिलया पार करतात, असे प्रथम मानाच्या श्री संत तेल्या भुत्याच्या कावडीचे मानकरी शिवयोगी नाना महाराज खळदकर यांनी हे सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.
 पुरंदर  तालुक्यातील सुपे खुर्द येथे साई मच्छीमार सहकारी संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह                                                                सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           सुपे खुर्द (ता. पुरंदर, जि. पुणे):येथील घोरवडी जलाशयावर कार्यरत असलेल्या साई मच्छीमार सहकारी संस्थेच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी समोर येत आहेत. संस्थेची स्थापना सर्व सदस्यांना न्याय्य पद्धतीने रोजगार व उत्पन्न मिळवून देण्यासाठी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात संस्थेचे अध्यक्ष व त्यांच्या कुटुंबीयांकडून वैयक्तिक स्वार्थासाठी संस्थेचा वापर केला जात असल्याचा आरोप सदस्यांकडून करण्यात येत आहे. संस्थेतील अध्यक्ष यांचे भाऊ सुमित कैलास जगताप हे बाहेरील राज्यातील व तालुक्यातील सराईत रात्रीचे चोरीने मासे पकडून घेऊन जात आहेत व विचारणा केली असता त्यांना ते सदस्यांना दमदाटी करत आहेत संस्था सुरू होऊन सुमारे दोन वर्षे पूर्ण झाली असली तरी एकाही सदस्याला मासेमारीचा लाभ देण्यात आलेला नाही. तसेच संस्थेतील बहुतांश सदस्य हे मूळ मच्छीमार नसल्याचेही समोर येत आहे.दरम्यान, घोरवडी जलाशय परिसरात संस्थेच्या नावाखाली सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, त्याद्वारे सार्वजनिक तसेच खाजगी व्यक्तींचे चित्रीकरण केले जात असल्याची तक्रार आहे. याबाबत कोणतीही अधिकृत परवानगी किंवा ठराव नसल्याचेही सांगितले जात आहे.तसेच संस्थेच्या बैठका नियमित घेतल्या जात नसून, सदस्यांना त्याबाबत कोणतीही सूचना दिली जात नाही. काही सदस्यांच्या सह्या बनावट पद्धतीने करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.या सर्व प्रकारामुळे संस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित विभागाने याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांकडून होत आहे.संस्थेच्या उपविधीनुसार अध्यक्ष,  व सभासद हे संबंधित तलाव क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरातील असणे आवश्यक आहे. हा नियम स्थानिक मच्छीमारांना प्राधान्य देण्यासाठी व संस्थेचा कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी आहे.परंतु सदर संस्थेचे अध्यक्ष यांनी या नियमांचे स्पष्ट उल्लंघन करत तालुक्याबाहेरील एका व्यक्तीची सचिव पदावर नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती संस्थेच्या / उपविधींच्या  विरोधात असून पूर्णतः बेकायदेशीर आहे. हे उघडकीस आणून दिल्या कारणाने अध्यक्ष यांनी सचिव यांचा राजीनामा मागून घेतला आहे या प्रकारामुळे स्थानिक सदस्यांच्या हक्कांवर गदा येत असून संस्थेचा कारभार काही मोजक्या लोकांच्या स्वार्थासाठी चालवला जात असल्याची शंका निर्माण होते. संस्थेत सुमित कैलास जगताप व कैलास वसंत जगताप हे सदस्य किंवा संस्थेचा कोणताही भाग नसताना दखल घेतात व अध्यक्ष यांचा नावाखाली रात्रीचा वेळी मासे चोरी करतात अशी तक्रार संस्थेचे सदस्य यांनी केली आहे याबाबत सविस्तर माहिती प्रतिनिधीला  दिली आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेचे पाण्याच्या संदर्भात काटेकोरपणे नियोजन                                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                               सासवड ता. पुरंदर येथील शहराचा पाणीपुरवठा सध्या सुरळीत सुरू असून, यापुढेही नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सासवड नगरपरिषद प्रशासनाचे काटेकोरपणे नियोजन चालू आहेच, वीर आणि घोरवडी योजनेतून सध्या शहराला दररोज एक कोटी लिटर पाणी पुरवठा होत आहे, प्रशासनाच्या सतर्क नियोजनामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही अशी माहिती मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, पाणीपुरवठा सभापती ज्ञानेश्वर गिरमे यांनी दिलेली आहे. गराडे तलावाचे पाणी दूषित झाल्याने, 28 मार्चपासून त्याचा पुरवठा स्थगित केला असून ,आता वीर योजनेतून दररोज 75 लाख लिटर आणि घोरवडी योजनेतून 25 लाख लिटर पाणी उंचलण्यात येत आहे, वीर धरण योजनेच्या तांत्रिक अडचणीवरही तोडगा काढण्यात आलेला आहे, वादळी वारा आणि लोड शेडिंग मुळे खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा फटका बसू नये, म्हणून कांबळवाडी पंप हाऊसवर चारशे केवी क्षमतेची सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेली आहे, सध्याची मागणी आणि पुरवठा स्थिती 10 एमएलडी एक कोटी लिटर साठ हजार लोकसंख्या प्रतिव्यक्ती 140 लीटर पाण्याची दैनंदिन गरज एक दिवसाआड पाणीपुरवठा सध्या शहराला 50% भागाला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे, सौर ऊर्जेचा वापर वीज खंडित होण्यावर उपाय म्हणून 400 केवीचा सौर ऊर्जा प्रकल्प कांबळवाडी येथे कार्यान्वित करण्यात आलेला आहे, प्रमुख जलस्त्रोत आणि नियोजन वीर  धरणातून उपसात वाढ 50 लाख लिटर 75 लाख लिटर तांत्रिक अडचणी सोडून, उपसा वाढवला आहे, गराडे योजना सध्या बंद पाणी दूषित झाल्यामुळे, 28 मार्चपासून या योजनेचा पुरवठा स्थगित करण्यात आलेला आहे, नवीन प्रकल्प सासवडसाठी सुधारित वीर धरण पाणी पुरवठा योजनेला मंजुरी  मिळाली आहे, या योजनेसाठी 143 कोटी मंजूर झालेले आहेत, जलस्त्रोत साठा जलस्त्रोत आजचा साठा मागील वर्षाचा साठा वीर धरण 5,380 टीएमसी 5,110 टीएमसी गराडे तलाव 90 दशलक्ष घनफूट ९६%  घोरवडी तलाव 97 दशलक्ष घनफूट पंचवीस टक्के 97 दशलक्ष घनफूट.
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी चैत्री उत्सवास सुरुवात                         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                   सासवडचे ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी या देवतांचा उत्सव शुक्रवारी दि. 3 एप्रिल ते सोमवार दि. 6 एप्रिल या काळामध्ये होणार आहे, या निमित्ताने विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती काळभैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश  (कारभारी)जगताप, भैरवनाथ चैत्य उत्सव मंडळाचे अध्यक्ष अजय जगताप यांनी ही माहिती दिली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष पांडुरंग भोंगळे, गाव पाटील संग्राम पाटील, चैत्र उतस्वाहाचे उपाध्यक्ष नितीन भोंगळे, सचिव विठ्ठल शिंदे, रवींद्र (पंत) जगताप, संजय चव्हाण आदी उपस्थित होते. शुक्रवारी दि.3 रोजी पहाटे भैरवनाथाची महापूजा सकाळी सात वाजता, ध्वज बांधून बगाड फिरवणे कार्यक्रम, सायंकाळी 5 ते पहाटे तीन वाजेपर्यंत श्रीची पालखी मिरवणूक होणार आहे, छबिण्यासाठी बक्षीसे ठेवण्यात आलेली आहेत, शनिवारी दि.4  रोजी सायंकाळी कुस्ती आखाडा होणार असून, स्वर्गवाशी नामदार चंदूकाका निवृत्ती जगताप यांच्या स्मरणार्थ माजी आमदार संजय जगताप यांच्याकडून शेवटच्या कुस्तीसाठी एक लाखाचा इनाम घोषित करण्यात आलेला आहे, रविवारी दि. 5 रोजी सकाळी आठ वाजता भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यत किर्लोस्कर कंपनीच्या पाठीमागे वाघ डोंगरावर होणार आहेत, मंगळवारी दि. 7 रोजी शिखर शिंगणापूरहून येणाऱ्या तेल्या भुत्याच्या कावडीचे आगमन होणार आहे, अशी सविस्तर माहिती भैरवनाथ चैत्रीउत्सव मंडळाचे अध्यक्ष अजय जगताप यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील शिक्षक पतसंस्थेमध्ये अनेक घडामोडी ;तर जितेंद्र कुंजीर यांची पुरंदर तालुका शिक्षक संघटनेतून हकालपट्टी                                               सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         पुरंदर तालुका शिक्षक पतसंस्थेतील अलीकडे घडामोडीमुळे शिक्षक  संघटनाच्या वर्तुळामध्ये एक प्रकारे खळबळ उडाली असून, पसंतीच्या संचालक मंडळामध्ये शिक्षक संघाचे 9 तर समितीचे 6 संचालक आहेत ,संघाच्या संचालकाच्या टप्प्याटप्प्याने दोन जागा रिक्त झाल्यानंतर, शिक्षक संघाच्या वतीने जितेंद्र कुंजीर व गणपत मेमाणे यांची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, पूर्व रीत सर्व संचालक लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहेत, दरम्यान सभापती पद रिक्त झालेले शिक्षक संघाने सर्व सभासदांची बैठक घेऊन, सभापती पदासाठी चंद्रकांत जगताप तर उपसभापती पदासाठी गणपत मेमाणे यांची नावे अधिकृतरित्या निश्चित केली होती मात्र प्रत्यक्ष निवड प्रक्रिया दरम्यान ;जितेंद्र कुंजीर यांनी समिती सदस्यांच्या सूचक व अनुमोदकांच्या मदतीने सभापती पद मिळवले, या निवडीमध्ये शिक्षक संघाच्या अधिकृत उमेदवारांचा अवघ्या एका मताने पराभव झाला, या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तातडीची बैठक घेण्यात आली संघटनेच्या विरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत जितेंद्र कुंजीर यांची शिक्षक संघातून रीतसर पद्धतीने हाकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले, हा निर्णय कार्यकारी मंडळाच्या समितीने घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली, तसेच पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे नेते राजेंद्र जगताप यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटना ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची सलग्न असल्याने, संघटनेचे निर्णय सर्व संबंधितांसाठी बंधनकारक आहेत, त्यानुसार केंद्रप्रमुख संघटना व शिक्षक संघ या दोन्ही स्तरावरून जितेंद्र कुंजीर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे नेते राजेंद्र जगताप यांनी ही सर्व सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील राजुरी येथील श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सवास सुरुवात                                             सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                          पुरंदर तालुक्यातील राजुरी ता.पुरंदर येथील श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सवात सुरुवात रविवार दि. 29 मार्च रोजी रात्री 9:30 वाजता कावडीची सजावट करून, पांडेश्वरकडे प्रस्थान, चैत्रशुद्ध 12शके ते 1948 सोमवार दि. 30 मार्च रोजी भैरवनाथ जोगेश्वरी यांना अभिषेक करून, पोशाख, अलंकार करून, देवाची आरती होणार असून, दुपारी भजनी मंडळ राजुरी करांचे भजन होणार आहे, सायंकाळी महादेव मंदिर येथे धार घालून, कावड मिरवणूक होणार आहे, त्यानंतर महाआरती होणार आहे, दंडवत व शेरनीचा कार्यक्रम पार पडणार आहे,, रात्री आमल घुगऱ्यांचा कार्यक्रम होणार आहे, नाथमहाराज व आई जोगेश्वरी यांची पालखी मिरवणूक होणार आहे, आरती होऊन ,पुढील कार्यक्रम छबिने पारंपारिक ढोल, लेझीमचे खेळ होणार आहेत, मंगळवारी दि.31 मार्च रोजी सकाळी 9 वाजता रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे, तर कुस्त्यांचे जंगी मैदान आखाडा होणार आहे, राजुरी या ठिकाणी यामध्ये प्रामुख्याने कुस्त्यांचा 75 या पार पडणार आहेत, 69 ते 75 पर्यंत पाच हजार रुपयांची कुस्ती लागणार आहे, 66 ते 68 पर्यंत सात हजार रुपयाची कुस्ती लागणार आहे, 64 ते 65 पर्यंत दहा हजार रुपयाची कुस्ती लागणार आहे, 35 ते 63 पर्यंत 11,000 रुपयाची कुस्ती लागणार आहे, 24 ते 34 पर्यंत 15,000 रुपयाची कुस्ती लागणार आहे ,16 ते 23 पर्यंत 21 हजार रुपयाची कुस्ती लागणार आहे, 13 ते 15 पर्यंत 25 हजार रुपयाची कुस्ती लागणार आहे, 10 ते 12 पर्यंत 30,000 ची कुस्ती लागणार आहे, 9वी कुस्ती 35 हजार रुपये तर आठवी कुस्ती 41 हजार रुपये सौजन्य योगेश पां. भगत, सातवी कुस्ती 51 हजार रुपये सौजन्य विजय रा. भगत व आर्यन स. शिवरकर सहावी कुस्ती ६१ हजार रुपयांचे सौजन्य हनुमंत ज्ञा. भगत व सुधाकर भगत, पाचवी कुस्ती ६५ हजार रुपयांचे उद्धव भा. भगत, सत्यवान चोरघडे, सुधाकर भगत चौथी कुस्ती 75 हजार रुपयांची महेश ह. भगत व प्रमोद सं. भगत ,तिसरी कुस्ती ही गणेश कुंकुले व चंकी कुमार पंजाब यांच्यात होणार आहे, 81 हजार रुपयाची उद्धव भा. भगत व सत्यवान कि. चोरघडे, दुसरी कुस्ती रोहन पवार व जुबेर रशिया यांच्यात होणार आहे,  एक लाख, 11 हजार 111 रुपयाची कुस्तीसाठी सौजन्य नंदा ह. भगत व ईर्षा शा. भगत यांच्याकडून होणार आहे. पहिली व शेवटची कुस्ती ही2, 22, 222 ची महेंद्र गायकवाड उप महाराष्ट्र व कुणीव सर्वे सिंचन रशिया वर्ल्ड चॅम्पियन यांच्यातील राजुरी गावचे जशी की, सुरुवात झाली ती असून आत्तापर्यंत कुस्ती शौकिनासाठी मन मुरादे, इच्छा, आकांक्षा, कुस्तीगीर यांचे सांभाळणारे गावचे हरिभाऊ रामचंद्र भगत भैरवनाथ इंडस्ट्रीज व ग्रुप भैरवनाथ वडकी व कृष्णाजी नारायण भगत भैरवनाथ पोल्ट्री फार्म राजुरी यांच्या सौजन्याने राजुरीचा कुस्ती आखाडा दरवर्षी पार पडतो, यासाठी गावातील अनुभवी वासुदेव (अण्णा) बनकर पंच म्हणून व अंकुश (बापू) भगत हरिभक्त परायण यांचा मोलाचा सहभाग आतापर्यंत कुस्तीसाठी लाभलेला आहे, हे सर्व राजुरी करासाठी खूप दानशूर व्यक्तिमत्व असून, हलगी वादक रणवीर हलगी ग्रुप कोल्हापूर ,युटयुब ज्ञानेश्वर आसवले कुस्ती चॅनल पुरंदर पि.टी.सी  युटयुब चॅनेल दादा कोलते, कुस्ती निवेदक सागर चौधरी ,अनिकेत कदम, सागर चव्हाण. युट्युब साठी सौजन्य वासुदेव (अण्णा) बनकर व उद्धव भाऊसो भगत यासाठी संभाजी  (आबा) चव्हाण ,संजय ज्ञा. भगत, सुधाकर भगत, बाबुराव पां. गायकवाड, पै. आप्पा भांडवलकर, संजय वि. बोरकर ,सागर चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य कुस्ती आखाडा राजुरी साठी लाभते, आखाड्यासाठी सौजन्य दत्तात्रेय अं. भगत वि. का. सोसायटी संचालकतर जोडल्या गेलेल्या कुस्ती मधील एक पहिलवान न आल्यास समोरील पहिलवानास 40% इनाम हा देण्यात येणार आहे, अशी माहिती राजुरी करा कडून ही प्रतिनिधीला माहिती मिळाली.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्ष फार्मसी विद्यार्थ्यांसाठी पालक मेळावा उत्साहात                      सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       मेळावा दिनांक २८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी भूषविले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. सुमित मुसळे आणि प्रा. स्मिता देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.उपप्राचार्या डॉ. स्मिता पवार  तसेच शैक्षणिक प्रमुख डॉ.जयश्री जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.या मेळाव्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, शिस्त आणि करिअर संधी याबाबत पालकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. पालकांनीही आपल्या सूचना व अपेक्षा व्यक्त केल्या. महाविद्यालय आणि पालक यांच्यातील संवाद अधिक बळकट करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी मारहाण प्रकरणी आठ आरोपींना पोलीस कोठडी                                          सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                               आस्करवाडी ता. पुरंदर येथील तलावाजवळ मुस्लिम तरुणांना झालेल्या मारहाण प्रकरणी ,सासवड पोलिसांनी कारवाई करीत आठ आरोपींना अटक केली आहे, या सर्वांना आज सासवड न्यायालयामध्ये हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, शुक्रवारी दि. 13 मार्च रोजी सायंकाळी रमजानचा उपवास सोडण्यासाठी बसलेल्या तरुणावर टोलक्याने हल्ला केला होता, या घटनेनंतर कोंढवा येथील नागरिकासह काही सामाजिक संघटनांनी सासवड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते, पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे तपास करून, आरोपींना शोधून काढले, निखिल कटके, गणेश कटके, गणेश तळवी, युवराज कटके, सागर कटके, सुनील बोराडे, ऋषिकेश कटके, अजित कटके अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
प्रणय गुंजेची नवोदयमध्ये निवड, ९७.५०% गुणांसह यश          सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                     खळद (ता. पुरंदर) येथील होतकरू विद्यार्थी प्रणय चंद्रकांत गुंजे याची जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली आहे. या निवड परीक्षेत त्याने ९७.५० टक्के गुण मिळवत पुणे जिल्ह्यात १६ वा क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.या स्पर्धात्मक परीक्षेसाठी पुणे जिल्ह्यातील सुमारे १८,५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कठीण स्पर्धेत प्रणयने उत्कृष्ट कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.प्रणय हा खळद येथील सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल, इयत्ता ५ वी (CBSE पॅटर्न) मध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे वडील चंद्रकांत गुंजे हे सध्या सासवड ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आहेत.या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेत त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्राचार्या अनुराधा पोरे तसेच शिक्षिका शीतल खैरे यांनी प्रणयला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.प्रणयच्या या यशामुळे खळद गावासह परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख अभिजीत जगताप यांचा इशारागॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार                                                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्यात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस एजन्सीसमोर दररोज लांबच लांब रांगा लागत असून, कडक उन्हात तासन्तास उभे राहण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. या परिस्थितीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्ग विशेषतः त्रस्त झाला आहे.या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख अभिजीत जगताप यांनी तहसीलदारांना निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. गॅस वितरणासाठी ठोस व सुटसुटीत वेळापत्रक तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच गॅस एजन्सी, वितरक आणि ग्राहक यांच्यात योग्य समन्वय साधावा, असे त्यांनी नमूद केले.गॅस एजन्सीसमोरील प्रचंड गर्दीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. भर उन्हात दीर्घकाळ थांबल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, एका वयोवृद्ध व्यक्तीने रांगेतून मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर अभिजीत जगताप यांनी तत्काळ तहसील कार्यालयात धाव घेत प्रशासनाचे लक्ष वेधले.प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष न दिल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर उग्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख अभिजीत जगताप यांनी दिला आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये संत बुतोजीबुवा तेली यांच्या कावडीचे सासवड मधून प्रस्थान; ढोल ताशांचा गजर तर शिवभक्तांचा जयघोष फटाक्याची आतषबाजी                                 सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                  शिखर शिंगणापूर यात्रेमध्ये प्रथम मानाची कावड असलेल्या सासवड तालुका पुरंदर येथील संत भूतोजी बुवा तेली यांच्या मानाच्या कावडीचे गुरुवारी दिनांक 26 रोजी श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर प्रस्थान झाले, रात्री उशिरा हजारो शिवभक्तांच्या जयघोष यामध्ये फटाक्यांच्या आतसबाजी मध्ये पारंपारिक वाद्याच्या गजरांमध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये ही कावड  संध्याकाळी 7:30 वा प्रस्थान ठेवले. शेत्र शिखर शिंगणापूरकडे कैलास बुवा कावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना झाली .चैत्रशुद्ध बार्शीला शिखर शिंगणापूर येथे मोठी यात्रा भरत असते, यात्रेपूर्वी महाराष्ट्राच्या विविध भागातून कमीत कमी 800 ते 900 कावडी महादेवाला पाण्याची धार घालण्यासाठी येत असतात, यामध्ये सासवडच्या संत भुतोजी बुवा तेली यांच्या कावडीला प्रथम मान आहे, सासवडच्या कावडीतील करहेच्या पाण्याची धार शिवलिंगावर पडल्यानंतरच या यात्रेची सांगता होते, की कावड आकाराने सर्वात मोठी असून, अत्यंत अवघड असा मुंगी घाट केवळ मानवी हाताच्या साखळीने सर करणारी ही एकमेव कावड मानली जाते, प्रस्तावनापूर्वी बुधवारी रात्री गाव पाटील संग्राम जगताप यांच्या वाड्यावर व नियोजनाची बैठक पार पडली. गुरुवारी सकाळी पूजा अर्चा झाल्यानंतर धान्य बाजारातील शिवरायासमोरील श्री दत्त मंदिरासमोर कावड भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली होती, सायंकाळी 7:30 वाजता माजी आमदार संजय जगताप, गाव पाटील संग्राम जगताप, आणि शिवयोगी कैलास बुवा कावडे यांच्या हस्ते कावडीची आरती करण्यात आली. यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, कावड मंडळाचे अध्यक्ष संजय जगताप, काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश (कारभारी) जगताप, रवींद्रपंत जगताप, संजय चव्हाण, साकेत जगताप ,बंडूकाका जगताप ,बाळासाहेब भिताडे, उदय जगताप, विलास जगताप, गणेश कुदळे ,मंगेश कावडे,ऋषिकेश जगताप ,अनिकेत जगताप ,गौरव जगताप ,अभिजीत शिवरकर, आदी उपस्थित होते .रात्री उशिरा कावड वाजत गाजत जेजुरी नाक्यावर आली तेथून संत भुतोजी बुवा तेली यांच्या समाधीला पाच प्रदक्षिणा घालून कावड जेजुरी मार्गे कोळ विहिरीकडे ,मार्गस्थ झाली चार दिवसाच्या प्रवासानंतर सोमवारी दिनांक 30 रोजी ही कावड मुंगी घाटातून वर चढून शिंगणापूरच्या शिवलिंगाला पारंपरिक धार घालण्याच्या मुख्य सोहळा पार पडणार आहे, कावडीला निरोप देण्यासाठी सासवड शहरातील हजारो शिवभक्त व महिला यावेळी आदी नागरिक उपस्थित होते. सोमवारी दिनांक 30 रोजी उशिरा करा नदीच्या पवित्र जलाने महादेवाला जलधार अर्पण करून यात्रेचे सांगता होणार आहे, यावेळी श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या वतीने मंदार पत्की यांच्या हस्ते मानाची सवयी ,35 हात ध्वज, पागोटे ,बेल, दावणा, पाच नारळ व तोरण असा पारंपारिक मानपान देण्यात येणार असल्याची माहिती कावडीचे प्रमुख कैलास महाराज कावडे यांनी प्रतिनिधीला ही माहिती दिली.
पुरंदर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या बोपगाव अध्यक्षपदी संदीप सुधाकर फडतरे यांची बिनविरोध निवड सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्यातील बोपगाव विविध कार्यकारी विकास सहकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद फडतरे यांनी राजीनामा दिल्यामुळे, या पदासाठी निवडणूक होऊन अध्यक्षपदी संदीप सुधाकर फडतरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमरीन बागवान यांनी काम पाहिले ,पुरंदर नागरी सहकारी प तसंस्थाचे सर व्यवस्थापक अनिल उरवणे यांनी निवडणूक कामे सहकार्य केले. यावेळी उपाध्यक्ष सुरज जगदाळे, सोपान फडतरे, आपुल फडतरे, विजय फडतरे, बापू फडतरे, आदी सह बोपगावकर ग्रामस्थ आदी उपस्थित होते. ग्रामीण संस्थेचे अध्यक्ष राजवर्धिनी संजय जगताप, सुनिता कोलते ,भाजप नेते विठ्ठल मोकाशी, संभाजी काळाने, डॉक्टर मनोज शिंदे, पीडीसी बँकेचे विभागीय अधिकारी महेश खैरे आदींनी अध्यक्ष संदीप फडतरे यांचा सन्मान केला यावेळी सरपंच सारिका गुरव ,गाव कारभारी दयानंद फडतरे, योगेश फडतरे, प्रकाश फडतरे, जयवंत फडतरे, आधी बोपगावकर ग्रामस्थ आदी उपस्थित होते. संदीप फडतरे हे सध्या निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आहेत.
“आधुनिक जीवनातील अस्वस्थतेचा शोध, अंधश्रद्धेवर उपाय: बुद्धांचे तत्त्वज्ञान, मेसलोची गरजांची उतरंड आणि गीतेचा मार्ग”                                                                      सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                    आजच्या आधुनिक, वेगवान आणि स्पर्धात्मक युगात माणसाच्या जीवनात प्रगतीची अनेक साधने निर्माण झाली असली तरी मानसिक अस्वस्थता, तणाव, असुरक्षितता आणि समाधानाचा अभाव यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात. या पार्श्वभूमीवर गौतम बुद्ध यांनी मांडलेले दुःखाचे तत्त्वज्ञान, Abraham Maslow यांनी मांडलेली मानवी गरजांची उतरंड आणि भगवद्गीता मधील जीवनतत्त्वज्ञान यांचा एकत्रित विचार आज अधिकच महत्त्वाचा ठरतो.गौतम बुद्धांनी मानवी जीवनातील दुःखाचे स्वरूप आणि त्यामागील कारणे अत्यंत सूक्ष्मपणे समजावून सांगितली. त्यांनी सांगितलेल्या चार आर्यसत्यांनुसार जीवनात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, ते कारण दूर करता येते आणि त्यासाठी एक मार्ग आहे. या विचारांमध्ये त्यांनी “तृष्णा” किंवा “आसक्ती” हे दुःखाचे मूळ कारण असल्याचे स्पष्ट केले. आजच्या काळातही हे तत्त्वज्ञान तितकेच लागू पडते. आधुनिक जीवनात माणूस सतत अधिक मिळवण्याच्या प्रयत्नात असतो—अधिक पैसा, अधिक प्रतिष्ठा, अधिक सुविधा. पण या “अधिक” च्या मागे लागल्यामुळे त्याचे समाधान हरवत जाते आणि त्यातूनच मानसिक तणाव निर्माण होतो.याच संदर्भात भगवद्गीतेतील एक महत्त्वाचा विचार लक्षात येतो—“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” म्हणजेच आपला अधिकार कर्मावर आहे, फळावर नाही. या तत्त्वज्ञानातून “आसक्तीविरहित कर्म” (Nishkama Karma) ही संकल्पना स्पष्ट होते. जेव्हा माणूस फळाच्या अपेक्षेने काम करतो, तेव्हा त्याच्यात चिंता आणि तणाव वाढतो; पण जेव्हा तो केवळ कर्तव्य म्हणून कर्म करतो, तेव्हा त्याला मानसिक शांती मिळते. हा विचार बुद्धांच्या “आसक्ती कमी करण्याच्या” तत्त्वाशी अत्यंत सुसंगत आहे.दुसरीकडे, अब्राहम मेसलो यांनी मानवी गरजांची एक उतरंड मांडली आहे. या उतरंडीनुसार माणसाच्या गरजा पाच स्तरांमध्ये विभागल्या जातात—शारीरिक गरजा, सुरक्षिततेच्या गरजा, प्रेम व आपलेपणाच्या गरजा, सन्मानाची गरज आणि आत्मसिद्धीची गरज. या प्रत्येक स्तरावर माणूस स्वतःच्या आयुष्यात काहीतरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु या गरजा पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत जेव्हा अपेक्षा आणि वास्तव यामध्ये तफावत निर्माण होते, तेव्हा माणूस अस्वस्थ होतो.आजच्या समाजातील अनेक समस्या या मेसलोच्या उतरंडीशी थेट जोडलेल्या दिसतात. उदाहरणार्थ, बेरोजगारी किंवा आर्थिक अस्थिरता ही “सुरक्षिततेच्या गरजा” पूर्ण न होण्याचे उदाहरण आहे. कुटुंबातील तणाव, एकटेपणा किंवा नातेसंबंधातील तुटलेपणा हे “प्रेम आणि आपलेपणा” या स्तरावरील अपूर्णतेचे द्योतक आहे. सोशल मीडियावर सतत स्वतःची तुलना करणे, लाईक्स आणि फॉलोअर्सच्या माध्यमातून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करणे हे “सन्मान” या गरजेच्या अतिरेकाचे उदाहरण आहे.भगवद्गीतेत मनाच्या चंचलतेबद्दल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याबद्दलही सखोल मार्गदर्शन केले आहे. मन सतत इंद्रियांच्या मागे धावत राहते आणि त्यामुळे अस्थिरता निर्माण होते. गीतेनुसार “संयम” आणि “स्वअनुशासन” यांच्या मदतीने मनावर नियंत्रण मिळवता येते. हा विचार आजच्या “माइंडफुलनेस” या संकल्पनेशी जवळचा आहे, ज्याचे मूळ बुद्धांच्या ध्यान आणि जागरूकतेच्या तत्त्वज्ञानात आहे.या तिन्ही विचारसरणी एकत्र पाहिल्यास एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते—मेसलो आपल्याला “गरजा” समजावून सांगतो, बुद्ध त्या गरजांमधील “आसक्ती” कमी करण्याचा मार्ग दाखवतात, आणि भगवद्गीता आपल्याला “कर्तव्य करताना समत्व आणि संतुलन” कसे ठेवावे हे शिकवते. म्हणजेच, गरजा असणे नैसर्गिक आहे, पण त्यांच्याशी अतिरेकी जोडले जाणे हे दुःखाचे कारण ठरते.आजच्या आधुनिक युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने माणसाचे जीवन सुलभ केले आहे. तरीही मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. यामागे एक मोठे कारण म्हणजे माणसाने स्वतःच्या अपेक्षा आणि मर्यादा यांचा योग्य विचार न करणे. जेव्हा गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर जातात, तेव्हा माणूस असहाय्य होतो आणि त्यावेळी तो चमत्कार, अंधश्रद्धा किंवा अवैज्ञानिक उपायांकडे वळतो.अंधश्रद्धा ही माणसाच्या भीतीतून आणि असुरक्षिततेतून निर्माण होते. जेव्हा एखादी समस्या आपल्या कुवतीच्या पलीकडे जाते—उदा. गंभीर आजार, आर्थिक संकट, नातेसंबंधातील ताण—तेव्हा माणूस तर्क सोडून “काहीतरी चमत्कार होईल” या आशेवर अवलंबून राहतो. यामुळे काही वेळा त्याची दिशाभूल होते आणि तो चुकीचे निर्णय घेतो.परंतु जर आपण थोडा तार्किक आणि चिकित्सक विचार केला, तर अनेक समस्यांचे उत्तर आपल्यालाच सापडू शकते. बुद्धांनी सांगितलेला “मध्यम मार्ग” आणि भगवद्गीतेतील “समत्व योग” या दोन्ही संकल्पना याचाच आधार आहेत. अतिविचार किंवा अतिरेक टाळून संतुलित जीवन जगणे, हे या तत्त्वज्ञानांचे मुख्य सार आहे.आजच्या काळात “माइंडफुलनेस” (जाणीवपूर्वक जगणे) ही संकल्पना मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. वर्तमान क्षणात राहणे, आपल्या विचारांचे निरीक्षण करणे, आणि अनावश्यक ताण टाळणे—या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. हे तत्त्वज्ञान बुद्धांच्या ध्यानपद्धतीत आणि गीतेतील ध्यानयोगात स्पष्टपणे दिसून येते.तसेच, मेसलोच्या उतरंडीचा विचार करून आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो—माझ्या कोणत्या गरजा अपूर्ण आहेत? मी त्या पूर्ण करण्यासाठी योग्य मार्ग निवडत आहे का? माझ्या अपेक्षा वास्तववादी आहेत का? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधल्यास आपल्याला स्वतःच्या समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग सापडू शकतो.आजच्या शिक्षण पद्धतीतही या तिन्ही विचारसरणींचा समावेश होणे गरजेचे आहे. केवळ माहिती आणि कौशल्ये देणे पुरेसे नाही, तर विद्यार्थ्यांना जीवनाचे तत्त्वज्ञान समजावून सांगणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य, भावनिक संतुलन आणि तार्किक विचारसरणी यांचा विकास केल्याशिवाय खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकत नाही.याचप्रमाणे, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत, तर लोकांच्या विचारसरणीत बदल होणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण, संवाद आणि जागरूकता या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.एकूणच पाहता, आजच्या आधुनिक युगात मानवी जीवन अधिक सोयीस्कर झाले असले तरी मानसिक शांती मिळवणे अधिक कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान आपल्याला अंतर्मुख होण्याचा मार्ग दाखवते, मेसलोची गरजांची उतरंड आपल्याला स्वतःच्या जीवनातील प्राधान्यक्रम समजून घेण्यास मदत करते, आणि भगवद्गीता आपल्याला कर्तव्य, समत्व आणि संयम यांचा मार्ग दाखवते.शेवटी असे म्हणता येईल की, आपल्या अनेक समस्या बाह्य परिस्थितीत नसून आपल्या विचारांमध्ये, अपेक्षांमध्ये आणि दृष्टिकोनात दडलेल्या असतात. जर आपण बुद्धांनी सांगितलेला समतोल, मेसलोने सांगितलेली गरजांची जाणीव आणि गीतेने दिलेला कर्तव्ययोग यांचा योग्य समन्वय साधला, तर आपल्याला केवळ समस्या सोडवता येतील असे नाही, तर एक अधिक समाधानी, शांत आणि अर्थपूर्ण जीवन जगता येईल.– डॉ. ललिता भगत
छतावरील सौरऊर्जा : स्वच्छ, किफायतशीर आणि शाश्वत भविष्याचा मार्ग                                                          सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                    आजच्या युगात ऊर्जा ही केवळ गरज नसून ती विकासाची मूळ कडी बनली आहे. उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य, वाहतूक अशा प्रत्येक क्षेत्रात विजेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. मात्र पारंपरिक ऊर्जास्रोत जसे की कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू हे मर्यादित असून पर्यावरणाला हानी पोहोचवणारे आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन पर्याय म्हणून सौरऊर्जेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आहे. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात तर सौरऊर्जा हा अत्यंत उपयुक्त आणि व्यवहार्य पर्याय ठरतो.सौरऊर्जा म्हणजे सूर्यप्रकाशापासून थेट वीज निर्मिती करण्याची प्रक्रिया. यासाठी सोलार पॅनेल्सचा वापर केला जातो. छतावर बसवलेले हे पॅनेल्स सूर्यप्रकाश शोषून त्याचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात. या प्रक्रियेमुळे कोणताही धूर, प्रदूषण किंवा हानिकारक वायू निर्माण होत नाहीत. म्हणूनच सौरऊर्जा ही “ग्रीन एनर्जी” किंवा हरित ऊर्जा म्हणून ओळखली जाते.अलीकडील काळात घरगुती पातळीवर सोलार रूफटॉप सिस्टीम बसवण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते. उदाहरण म्हणून ४ kWp (किलोवॅट पीक) क्षमतेची सोलार सिस्टीम घेतली, तर ती साधारणतः दररोज प्रति kWp ४ युनिट्स वीज निर्माण करते. म्हणजेच ४ kWp सिस्टीममधून दररोज सुमारे १६ युनिट्स वीज निर्माण होते. याचा मासिक हिशेब केला असता सुमारे ४८० युनिट्स आणि वार्षिक अंदाजे ५७६० युनिट्स वीज निर्मिती होते.या उत्पादनाचा आर्थिक लाभही तितकाच महत्त्वाचा आहे. सध्याच्या दरानुसार प्रति युनिट सुमारे १२ रुपये बचत होत असल्यास, दर महिन्याला जवळपास ५७६० रुपयांची बचत होते. याच गणनेनुसार वर्षाला सुमारे ६९,००० रुपये आणि २५ वर्षांच्या कालावधीत सुमारे १७.२८ लाख रुपयांची बचत होऊ शकते. विशेष म्हणजे अशा सोलार प्रकल्पाची सुरुवातीची किंमत साधारणतः ४.५ लाख रुपये इतकी असते. म्हणजे काही वर्षांतच गुंतवणूक परत मिळते आणि त्यानंतरचा काळ हा नफ्याचा ठरतो.पर्यावरणीय दृष्टिकोनातून पाहिले असता सौरऊर्जेचे फायदे आणखी मोठे आहेत. उदाहरणार्थ, अशा एका सिस्टीमने आतापर्यंत ११ मेगावॅट-तास (MWh) वीज निर्मिती केली असेल, तर ती ऊर्जा एका दिवसासाठी सुमारे ३६४ घरांना पुरेशी ठरते. याचबरोबर १९४ झाडे लावल्याइतका पर्यावरणीय फायदा होतो आणि सुमारे ७.६ टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन टाळले जाते. या आकडेवारीवरून सौरऊर्जा ही केवळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नसून पर्यावरण रक्षणासाठीही अत्यंत प्रभावी साधन आहे, हे स्पष्ट होते.महाराष्ट्र राज्यात विशेषतः शहरी भागात वाढत्या विजेच्या मागणीमुळे विजेचे बिल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत सोलार रूफटॉप सिस्टीम हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकारदेखील सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आणि अनुदाने देत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठीही सोलार सिस्टीम बसवणे अधिक सुलभ झाले आहे.तथापि, सौरऊर्जा प्रणालीचा योग्य वापर आणि देखभाल करणेही तितकेच आवश्यक आहे. सोलार पॅनेल्सवर धूळ, माती किंवा पानांचा साठा झाला तर त्याची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे नियमित साफसफाई करणे गरजेचे आहे. साधारणपणे महिन्यातून एकदा पॅनेल्स स्वच्छ केल्यास वीज निर्मिती कायम उच्च पातळीवर राहते.सोलार सिस्टीम बसवताना तांत्रिक बाबींचाही विचार करणे आवश्यक आहे. छताची दिशा, सावलीची अडचण, पॅनेल्सचा दर्जा, इन्व्हर्टरची गुणवत्ता, तसेच वायरिंग आणि सुरक्षा यांचा योग्य विचार करूनच प्रकल्प राबवावा. अनुभवी आणि विश्वासार्ह कंपनीकडूनच सोलार सिस्टीम बसवणे फायदेशीर ठरते.आजच्या बदलत्या काळात “ऊर्जा स्वावलंबन” ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. प्रत्येक घराने स्वतःची वीज स्वतः तयार केली, तर केवळ विजेच्या बिलात बचत होणार नाही, तर देशाच्या ऊर्जा सुरक्षेलाही हातभार लागेल. ग्रामीण भागात तर सौरऊर्जा शेती, पाणीपुरवठा आणि लघुउद्योगांसाठी क्रांतिकारक ठरू शकते.शेवटी असे म्हणता येईल की, सौरऊर्जा ही केवळ पर्याय नसून भविष्याची गरज आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत ऊर्जेसाठी सोलार सिस्टीमचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. आर्थिक बचत, पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा स्वावलंबन या तिन्ही गोष्टी साध्य करण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे सौरऊर्जा होय.“आजचा निर्णय, उद्याचा उज्ज्वल भविष्य” या ध्येयाने प्रत्येकाने सौरऊर्जेकडे पाऊल टाकले, तर भारत निश्चितच ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर आणि पर्यावरणपूरक देश म्हणून जगासमोर उभा राहील.डॉ ललिता भगत
कचऱ्यापासून संपत्ती, जागतिक तणाव आणि भारताचा शाश्वत विकासमार्ग                                                   सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      आजचा काळ हा वेगवान बदलांचा आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था आणि सामाजिक वास्तव या सर्वांचा एकमेकांवर खोल परिणाम होत आहे. एका बाजूला  भारतात मोठ मोठ्या महानगरांमध्ये आणि आता तर गाव पातळीवरही कचऱ्याचे प्रचंड वाढते प्रमाण ही गंभीर समस्या बनली आहे, तर दुसऱ्या बाजूला इराण–इस्रायल–अमेरिका तणावासारखे आंतरराष्ट्रीय संघर्ष जागतिक अर्थव्यवस्थेला हादरे देत आहेत. आज आपण खूप मोठ्या ऊर्जा संकटाचा सामना करत आहोत.या सर्व पार्श्वभूमीवर भारताने कोणता विकासमार्ग स्वीकारावा, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपल्याला “कचरा ते संपत्ती”, “शांतता व सहअस्तित्व” आणि “शाश्वत विकास” या तीन मुख्य स्तंभांकडे पाहावे लागेल.प्रथम कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नाकडे पाहूया. भारतातील बहुतांश शहरांमध्ये तसेच गाव पातळीवर कचरा व्यवस्थापन ही अजूनही डोकेदुखी ठरलेली आहे. दररोज निर्माण होणारा हजारो टन कचरा डंपिंग ग्राउंडवर टाकला जातो. या प्रक्रियेमुळे हवा, पाणी आणि मातीचे प्रदूषण वाढते, तसेच आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. परंतु हा कचरा योग्य पद्धतीने व्यवस्थापित केला, तर तो एक मोठे आर्थिक आणि पर्यावरणीय साधन ठरू शकतो.कचऱ्याचे दोन मुख्य प्रकार आहेत—ओला (जैविक) आणि सुका (अजैविक). ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस आणि सेंद्रिय खत तयार करता येते, तर सुक्या कचऱ्याचे पुनर्वापर करून नवीन उत्पादने तयार करता येतात. मात्र, प्रत्यक्षात कचरा वेगळा केला जात नाही, ही सर्वात मोठी समस्या आहे. घराघरातून कचरा वेगळा न केल्यास कोणतीही प्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे 'कचऱ्याचे वर्गीकरण' ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते.घरगुती पातळीवर कंपोस्टिंग आणि लहान बायोगॅस प्लांट्स यांचा वापर करून आपण मोठा बदल घडवू शकतो. सोसायटी स्तरावर सामूहिक बायोगॅस युनिट्स उभारून स्वयंपाकासाठी गॅस तयार करता येतो. वॉर्ड आणि नगरपालिका स्तरावर विकेंद्रीकृत कचरा व्यवस्थापन प्रणाली उभारल्यास मोठ्या डंपिंग ग्राउंडची गरज कमी होते. स्वच्छ भारत अभियान सारख्या उपक्रमांना यामुळे प्रत्यक्ष बळ मिळू शकते.तथापि, या प्रक्रियेत काही अडचणीही आहेत. लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव, तांत्रिक कौशल्याची कमतरता, जागेची मर्यादा, आर्थिक अडचणी आणि काही ठिकाणी प्रशासनातील दुर्लक्ष ही प्रमुख कारणे आहेत. परंतु या अडचणी अडथळे नसून सुधारण्याच्या संधी आहेत. योग्य नियोजन, प्रशिक्षण आणि नागरिकांचा सहभाग यामुळे या समस्या सहज दूर होऊ शकतात.आता जागतिक तणावाच्या मुद्द्याकडे वळूया. इराण–इस्रायल–अमेरिका यांच्यातील संघर्ष हा केवळ प्रादेशिक प्रश्न नसून त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होतात. या तणावामागे धार्मिक मतभेद, अण्वस्त्र कार्यक्रम, आणि मध्यपूर्वेतील वर्चस्वाची स्पर्धा ही प्रमुख कारणे आहेत. या संघर्षामुळे तेलाच्या किमती वाढतात, व्यापारावर परिणाम होतो आणि सामान्य नागरिकांचे जीवन कठीण बनते.इतिहासात धार्मिक आणि सामाजिक संघर्ष अनेक वेळा झाले आहेत. मात्र, आजच्या काळात कोणत्याही एका धर्माला दोष देणे योग्य नाही. प्रत्येक देशाची परिस्थिती वेगळी असते. शांतता, संवाद आणि परस्पर आदर हेच दीर्घकालीन उपाय आहेत. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाने या बाबतीत संतुलित आणि सहिष्णू भूमिका घेणे आवश्यक आहे.भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचे संविधान आणि लोकशाही व्यवस्था. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांना समान अधिकार दिले आहेत. विविध भाषा, संस्कृती आणि परंपरा असलेल्या या देशात एकता टिकवणे हेच खरे आव्हान आहे. यासाठी संविधानावर विश्वास ठेवणे, शिक्षणाचा प्रसार करणे आणि सामाजिक सलोखा राखणे आवश्यक आहे.भारताच्या विकासमार्गाबद्दल विचार करताना इतर देशांकडून शिकण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, चीनने गेल्या काही दशकांत प्रचंड वेगाने प्रगती केली आहे. ऊर्जा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक, आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात त्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि मेट्रो नेटवर्क यामुळे त्यांनी तेलावरील अवलंबित्व कमी केले आहे. खाजगी वाहनांवर जास्त कर लावून सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणे ही त्यांची महत्त्वाची रणनीती आहे.शिक्षणाच्या क्षेत्रातही चीन आणि सिंगापूरने प्रभावी पद्धती अवलंबल्या आहेत. मातृभाषेत शिक्षण, तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम, आणि कौशल्य विकास यावर त्यांनी भर दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा आणि कलांना देखील प्रोत्साहन दिले जाते. भारतानेही या बाबतीत सुधारणा करण्याची गरज आहे.परिवहन क्षेत्रात रस्ते, रेल्वे आणि मेट्रो नेटवर्कचा विस्तार केल्यास आर्थिक विकासाला गती मिळू शकते. ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटी वाढवल्यास शहरांवरील ताण कमी होईल. वीज क्षेत्रात २४x७ पुरवठा आणि नवीकरणीय उर्जेचा वापर वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि जलसंधारण, शाश्वत कृषी व्यवस्थापन , वृक्षारोपण यावर भर दिल्यास ऊर्जा निर्मितीला आणि आपल्या लोकसंख्याला पुरेल अशा अन्न, वस्त्र, निवारा,रोजगार , शिक्षण आरोग्य यास चालना मिळू शकते.आजच्या डिजिटल युगात माहिती ही शक्ती आहे, पण त्याचवेळी ती धोकादायकही ठरू शकते. सोशल मीडियावर अनेकदा अपूर्ण किंवा चुकीची माहिती पसरवली जाते, ज्यामुळे समाजात गैरसमज आणि तणाव वाढतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने माहितीची पडताळणी करणे, द्वेषपूर्ण संदेश टाळणे आणि सकारात्मक संवाद वाढवणे आवश्यक आहे.कचरा व्यवस्थापन, जागतिक तणाव आणि विकास या तीनही मुद्द्यांचा विचार केला, तर एक गोष्ट स्पष्ट होते—समस्या कितीही मोठी असली तरी त्यावर उपाय शक्य आहे. त्यासाठी आवश्यक आहे ती योग्य दृष्टी, सामूहिक प्रयत्न आणि जबाबदारीची भावना. कचऱ्याचे रूपांतर संपत्तीत करणे, समाजात एकता राखणे आणि विकासाला प्राधान्य देणे—या तीन गोष्टी भारताला पुढे नेऊ शकतात.शेवटी, भारताचा विकास हा केवळ सरकारवर अवलंबून नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या सहभागावर अवलंबून आहे. जर आपण कचरा वेगळा केला, पर्यावरणाची काळजी घेतली, सामाजिक सलोखा राखला आणि सकारात्मक विचार केला, तर भारत केवळ शक्तिशाली राष्ट्रच नव्हे तर जगासाठी आदर्श ठरू शकतो. शाश्वत विकास, शांतता आणि सहअस्तित्व या मूल्यांवर आधारित भारताचा विकासमार्गच उज्ज्वल भविष्याची हमी देऊ शकतो.— डॉ. ललिता भगत
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 4,800दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर                         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक    मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                 पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.25 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 4,800 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4,800 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 3,300 तर सरासरी 4,050 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,200तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,600 तर सरासरी 2,900 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास  कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर, गुळाला 4,600रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 3,00 बॉक्स 75 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,400 कमाल दर 4,600रुपये तर साधारण4,500 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 3,300,4,800,4,050. बाजरी 2,300,3,100, 2,700. गहू 2,600,3,200,2,900. तांदूळ -4,700,5,600 ,5,150 हरभरा 4,800, 5,500,5,150.
पुरंदर तालुक्यातील पिसे येथील पीर बाबा साहेब यात्रा उत्साहात; तर रंगला कुस्त्यांचा जंगी आखाडा; नामवंत मल्लांची हजेरी                                                        सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या पिसे तालुका पुरंदर येथील पीर बाबासाहेब यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त जमा होणारी देणगी, सामाजिक कामासाठी तसेच सप्ताह, यात्रेच्या वेळी असणारा फंड पिसे गावाच्या लोकसंख्येचे नुसार 1200 ते 1500 असताना गावातील प्रत्येक उत्सवाला गेली पंधरा वर्षांपासून गौरवशाली परंपरा राखत, ऐतिहासिक असा यावर्षी यात्रा कमिटीने निर्णय घेऊन, परंपरा कायम राखली आहे. यात्रेच्या मुख्य पहिल्या दिवशी सोमवार या दिवशी दिनांक 23 रोजी किरण गाजरे निर्मित आर्केस्ट्रा रंगीला पाच यांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षककासह महिलांनीही उत्स्फूर्त अशी गर्दी केली होती. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री ढोल लेझीम पथकासह छबिने सुद्धा उत्साहात पार पडले, तर तिसऱ्या दिवशी विश्वासराव पहिलवान नांदवळकर निर्मित लोकशाहीर साहेबराव नांदवळकर तसेच वसंत नांदवळकर सह रवींद्र पिंगळे लोकनाट्य तमाशा सकाळी नऊ वाजता सुरू झाला, तर सायंकाळी पाच वाजता जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला होता ,यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी आपली कसब दाखवली, त्यांचा कुस्ती शौकिनांनी मनमुराद आनंद लुटला, या कुस्ती आखाड्यात पंच म्हणून प्रकाश आ. मुळीक, संतोष रा. मुळीक, रजनीकांत वि. मुळीक, दिपक ह. मुळीक तर शेवटची कुस्ती राजुरी गावचे अनुभवी पंच म्हणून वासुदेव (अण्णा) बनकर यांनी काम पाहिले ,एकूण कुस्त्या 76 झाल्या असून, सहा मुलींच्या पार पडल्या, तर नामवंत पहिलवानामध्ये 70 कुस्ती पार पडली. ₹100 पासून ते 65 हजारापर्यंत पिसे गावात कुस्त्या पार पडल्या. यामध्ये गावच्या पहिलवान असल्यामुळे सागर सणस व रितेश मुळीक यांच्यात सात हजार दोनशे रुपयाला कुस्ती लागलेली गावचा पहिलवानाने रितेश मुळीक यांनी कुस्ती चितपट करून, विजय मिळवला ,तर शेवटची कुस्ती कल्याण नाणेकर व नाथा चौगुले यांच्यात बरोबरीत रात्री अकरा वाजता पार पडली, तर पिसे गावच्या यात्रा कमिटी मध्ये निर्णय होऊन, दोन्ही पैलवानांना प्रत्येकी 11 हजार रुपये बक्षीस देऊन ,सन्मानित करण्यात आले ,बाकी 43 हजार रुपये रक्कम पीर बाबा यात्रा उत्सव साहेब दर्गा, मशीद साठी मंदिरासाठी अर्पण करण्यात आले, यामध्ये प्रामुख्याने 40 वर्ष परंपरेनुसार गणपत बापू मुळीक यांच्या उपस्थितीमध्ये आत्तापर्यंत चाललेल्या आखाड्यालाआज उपस्थित ते  राहु शकले नाही  त्यांनी बक्षीसासाठी विविध प्रकारची रक्कम, सुपूर्त करण्यात आली होती, नामवंत पहिलवानांचा, पंच ,मुख्य पत्रकार यांचा सुद्धा गावच्या यात्रा कमिटीकडून सत्कार करण्यात आला, यासाठी गणेश अ. मुळीक, रामदास (बाप्पू )मुळीक, रवींद्र ग. मुळीक, संतोष हरिभाऊ मुळीक, सोमनाथ अर्जुन मुळीक, शांताराम मारुती मुळीक, संतोष सुरेश मुळीक पत्रकार बाप्पू मुळीक, हनुमंत वाबळे, समीर भिंगारदिवे, विजय गायकवाड, प्रेमचंद कुटे, शौकत सय्यद, बशीर सय्यद, गणेश सांगळे ,प्रकाश आबा मुळीक, ज्ञानदेव शिदकर, संतोष किसन ठोंबरे, बाबुराव खळदकर, ऋषिकेश जहागीरदार, महेश रावसो मुळीक, रमेश नारायण मुळीक, रमेश नारायण शिंदे, गावातील युवक पिढी, शेतकरी बांधव ,यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य, वि.कायॅकारी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, गावातील इंगळे, बोरकर ,अत्रे ,जगताप, सांगळे, शिंदे, गुळंबे, सय्यद, कुटे, मुळीक सर्व  गावातील भरपूर प्रमाणामध्ये शेवटच्या कुस्तीला गर्दी करण्यात आली होती ,तर रात्री खास महिलांसाठी पुन्हा एकदा 11 वाजून 15 मिनिटांनी वसंतराव नांदवळकर व रवींद्र पिंगळे यांच्या लोकनाट्य तमाशाचा नारळ फोडून प्रशासकीय सरपंच रोहन नारायण मुळीक यांच्या हस्ते नारळ फोडून सुरुवात करण्यात आली, तर पूजन उद्योगपती संतोष हरिभाऊ मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.
पुरंदर तालुक्यातील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्तांची पालखी तळाची पाहणी; तर आवश्यक असणाऱ्या सुविधासाठी प्रशासनाला सूचना                                 सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                           संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने बुधवारी दि. 25 रोजी पालखी मार्गावरील पालखी तळ व विविध विसाव्यांच्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली. यावेळी कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पालखीतळावर भेट देत संबंधित यंत्रणांना आवश्यक अशा सूचना दिल्या. विविध शासकीय खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी सासवडच्या नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, तहसीलदार विक्रम राजपूत, मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक कुमार कदम, तालुका आरोग्य अधिकारी विक्रम काळे, राष्ट्रीय महामार्ग अभियंता अभिजीत औटी, बांधकाम उप अभियंता प्रकाश निगडे, नगरसेवक राजन जगताप, प्रदीप राऊत, ज्ञानेश्वर जगताप, अर्चना जगताप व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यामध्ये पालखी सोहळा प्रमुख एडवोकेट राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजनाथ, चैतन्य महाराज लोंढे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफलकर, चोपदार राजाभाऊ मारुतराव कोकाटे, माऊली महाराज मोरे, यांच्यासह सासवड नगर परिषदेस चंदन टेकडी ते सासवड पालखी तळापर्यंत आवश्यक ठिकाणी वीज व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला फुरसुंगी ते दिवेघाट रस्त्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करावे, महामार्गावर पुरेशा प्रमाणात प्रकाश असावा आणि मुकामापासून पालखी प्रस्थान करताना, वाहनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, अशा सूचना देण्यात आल्या, सार्वजनिक बांधकाम विभागाला वीर फाटा ते बोरावके मळा पालखी विसाव्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवण्याचीतर महावितरणला सेवा रस्त्यावर अडथळणारे, विजेचे काम तातडीने हलवण्याबाबत सूचना देण्यात आल्या, यंदा सोहळा जुलैमध्ये असल्याने, पावसाची दाट शक्यता आहे, त्यामुळे शासनाने वारकऱ्यासाठी गतवर्षीपेक्षा दुप्पट निवारा व्यवस्था उभारावा, अशी मागणी तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाला वीर फाटा ते बोरावके मळा पालखी विसावा या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवण्याची, तर महावितरणला सेवा रस्त्यावर अडथळा ठरणारे विजेचे खांब तातडीने रस्ता रुंदीकरणाचा पेज वीर फाटा ते बोरावके मळा या रस्त्याचे भूसंपादन करून रुंदीकरण करण्याची मागणी पालिकेने केली, त्यावर महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता अभिजीत औटी यांनी सासवड बाह्य वळण रस्ता सुरू झाल्याने, शहरातील रस्ता आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे असे स्पष्ट केले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रकाश निगडे यांनी नव्याने भूसंपादनासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता, मात्र निधी अभावी काम रखडल्याचे सांगितले यावेळी सोहळा कमिटीने तीव्र दखल घेत जिल्हाधिकाऱ्याकडे नव्याने प्रस्ताव सादर करून, या प्रश्न पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले.
पुरंदर तालुक्यातील जमीन एकत्रिकरण योजनेतील नकाशा दुरुस्ती बाबत अडवणूक                                            सासवड प्रतिनिधी: बापू मुळे मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      टेकवडी तालुका पुरंदर येथील जमीन एकत्रिकरण योजनेतील नकाशा दुरुस्ती बाबत जिल्हा अधीक्षकांनी आदेश देऊनही ,सासवड येथील भूमी अभिलेख पुरंदर कार्यालयाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकरी मनोहर गजरमल यांनी केला आहे. गजरमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेकवडी येथील सर्वे नंबर 24 मधील नकाशात दिशा चुकीच्या दर्शवण्यात आलेल्या आहेत ,ही चूक दुरुस्त करण्यासाठी गजरमल यांनी जुलै 2023 मध्ये दाद मागितली होती, त्यानुसार जिल्हा अधीक्षकांनी 31 जुलै 2023 रोजी दुरुस्तीचे आदेश दिले होते ,मात्र पुरंदरच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्यावर कोणताही कारवाई केलेली नाही ,आता दहा मार्च 2026 मध्ये सुनावणीसाठी बोलावले मात्र, स्थानिक कार्यालयाने दुरुस्तीबाबत कोणती चर्चा न करता, शासकीय मोजणीचे तोंडी आदेश देऊन, वेळ मारून नेल्याचा आरोप गजरमल यांनी केलेला आहे, नकाशा दुरुस्त केल्याशिवाय मोजणी करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचे गजरमल यांनी सांगितले. जमीन एकत्र करणाबाबत दर महिन्याला नियमित सुनावणी घेतली जाते, त्यामध्ये सरासरी 10 ते 20 प्रकरणातील त्रुटींची दुरुस्ती केली जाते, यासोबतच दर महा नवीन अर्जही दाखल केले जात असतात, त्यामुळे पारदर्शकता राखण्यासाठी प्राप्त अर्जाच्या नोंदणी क्रमांकानुसार यादी तयार करून, त्यांचे क्रमाने दुरुस्तीचा कार्यवाही पूर्ण केली जाईल. स्मिता गौड उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पुरंदर.
नाईकवस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांकडून कलाविष्कार                   सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                          सुपे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाईकवस्ती शाळेमध्ये सन 2025 -26 चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मागील तीन वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे मुख्याध्यापक आबासाहेब खवले यांनी सांगितले. शाळेतील सर्व विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सण परंपरांची ओळख, भारुड, शेतकरी गीते, लावणी, कोळी गीते वाघ्या मुरुळी, समाजप्रबोधनपर, कौटुंबिक, देशभक्तीपर, ऐतिहासिक तसेच हिंदी मराठी गीतांवर आपली कला सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली.          कार्यक्रमाची सुरुवात सरपंच सुरेखा जगताप, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, सीमा चव्हाण सर्व सदस्य आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष शिवतारे, संतोष जाधव, दिपाली चव्हाण, केंद्रप्रमुख धनाजी नाझीरकर, माजी विस्तार अधिकारी अनिल जगदाळे, सुनील लोणकर, मधुबाला कोल्हे, गणेश कामठे ,भाऊ बरकडे , विजय वाघमारे, गोरक्षनाथ चव्हाण उपस्थित होते. चंद्रकांत घारमळकर यांनी सूत्र संचालन केले तर आबासाहेब खवले यांनी आभार मानले.
पिसे गावातील पीर साहेब यात्रेला उत्साहात सुरुवात; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन                                              सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील शेवटचे पिसे गाव येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या पीर साहेब यात्रेला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थांसह पै-पाहुण्यांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन यात्रा समितीच्या वतीने तसेच माजी सरपंच गणेश मुळीक यांनी केले.पिसे गावात हिंदू आणि मुस्लिम बांधव सलोख्याने नांदत असून, पीर साहेब यात्रेला विशेष महत्त्व आहे. या गावात या यात्रेशिवाय इतर कोणतीही यात्रा भरत नाही, ही बाब गावाच्या एकात्मतेचे उदाहरण आहे.यात्रेच्या पहिल्या दिवशी मुळीक कुटुंबाच्या वतीने पारंपरिक काठीचा मान देण्यात आला.ही काठी कै. राजाराम गेनबा मुळीक  याच्या प्रितयथॅ सामाजिक कायॅकॅते शेतकरी संतोष राजाराम मुळीक  काठी उचलतात काठीची विधिवत पूजा करून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि ती पीरबाबा साहेब यांच्या दर्ग्यात दर्शनासाठी नेण्यात आली. या मिरवणुकीत संपूर्ण गावातील ग्रामस्थ व पाहुण्यांचा मोठा सहभाग होता.यावेळी मनोरंजनासाठी ‘रंगीला’ ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे यात्रेच्या उत्साहात अधिक भर पडली.कार्यक्रमास आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच यात्रा समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रशासकीय सरपंच रोहन नारायण मुळीक,  माजी सरपंच गणेश अशोक मुळीक,  उदयोजक संतोष हरिभाऊ मुळीक, माजी सरपंच शांताराम मारुती मुळीक,व्यापारी भाऊसो मुगुट मुळीक, माजी उपसरपंच सोमनाथ अर्जुन मुळीक,  माजी सरपंच दिपक हरिभाऊ मुळीक, , रवींद्र गणपत मुळीक, संतोष  सुरेश मुळीक, दिलीप उत्तम मुळीक,  पत्रकार बापू राजाराम मुळीक, पोलीस पाटील गोपीनाथ नारायण मुळीक  बशीर लालाभाई सय्यद नंदकुमार बबन कुटे, भाऊसो रामभाऊ ठोबरे ,  शिपाई विजय इगले यांच्यासह पीर साहेब दर्ग्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
स्त्री शक्ती सन्मान’ सोहळा उत्साहात संपन्न                 सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                               नगरपरिषद सासवड व कुशाग्र इनोव्हेशनस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तरी याकार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमासाठी सासवड नगर परिषदेचे नगराध्यक्ष - आनंदीकाकी चंदूकाका जगताप महिला बालकल्याण सभापती - प्रियांका जगताप महिला बाल कल्याण उपसभापती - लीना वढणे नगरसेविका -शीतल भोंडे, अर्चना जगताप, स्मिता सुहास जगताप, स्मिता उमेश जगताप या सर्वांची मान्यवर पदी उपस्तिती लाभली, या कवर्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत शिंदे यानी मांडले, तसेच कुशाग्र इनोवेशन फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाबद्दल व संस्थेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती विकास चव्हाण यांनी सांगितले तर सक्षम चे प्रकल्प व्यवस्थापक गीता फाटक मॅडम यांनी महिलांना घनकचरा व्यवस्थापनात असणाऱ्या व्यावसायिक संधी याबद्दल सविस्तर माहिती दिली व  महिला जागतिक महिला  दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व शहर स्वच्छतेमध्ये असणाऱ्या व्यावसायिक संधी बद्दल  महिलांना प्रोत्साहन देऊ व  शक्यते सहकार्य करू  असे आवाहन महिलांना करण्यात आले. तसेच या कार्यक्रमांमध्ये उपस्थित सर्व महिलांना व सफाई महिला कर्मचारी यांना कुशाग्र फाउंडेशनच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व एक भेटवस्तू  देऊन त्यांच्या सकारात्मक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या पूर्ण कार्यक्रमांमध्ये डे एन यू एल एम विभाग सासवड यांच्या प्रमुख जस्मिन मधाळे मॅडम व त्यांच्या सहकारी यांची या कार्यक्रम घडवून आणण्यासाठी विशेष मदत झाली, सोबत आरोग्य विभागाचे रामचंद्र कारंडे व त्यांच्या टीमचे ही सहकार्य लाभले. महिलांना व्यवसाय प्रदान करण्यासाठी असणाऱ्या संधी बाबत आम्हीही प्रयत्न करू जेणेकरून शहर स्वच्छतेला हातभार लागेल व शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होईल. या कार्यक्रमाच्या शेवटी विकास चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानण्यात आले व कार्यकर्माची सांगता करण्यात आली.
सासवड येथे तनिष्का अभियानच्या माध्यमातून गुढीपाडव्या निमित्त वाचन संस्कृती व पुस्तकांची गुढी एक उपक्रम सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     तनिष्का स्ञी प्रतिष्ठा अभियान हे फक्त अभियान नसून, सामाजिक चळवळ आहे. या माध्यमातून महिलांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि स्वावलंबन निर्माण करते. सासवड येथे वाचन संस्कृती व पुस्तकांची गुढी उभारुन महिला व विद्यार्थ्यांच्या वाचनाची गोडी निर्माण करण्याचा तनिष्का प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त  मुख्याध्यापक व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक  महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर यांनी केले..ते पुढे म्हणाले, “वाचाल तर वाचाल” ही आपल्या संतांची शिकवण आहे. वाचन हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नाही, तर ते आपल्या विचारांना दिशा देणारे, व्यक्तिमत्त्व घडवणारे आणि आयुष्य समृद्ध करणारे एक प्रभावी माध्यम आहे. तसेच तनिष्का स्ञी प्रतिष्ठा अभियान एक सामाजिक चळवळ असल्याचे नंदकुमार सागर यांनी सांगितले. सासवड ( ता पुरंदर ) येथील गुरुकुल करिअर अकॅडमीच्या सभागृहात 19 मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त  स्ञी तनिष्का व्यासपीठ व गुरुकुल करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यामाने पुस्तक गुढी वाचन संस्कृतीची कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नंदकुमार सागर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे यांच्या हस्ते पुस्तक गुढीचे पूजन करून याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सागर बोलत होते.     आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडिया यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माहिती मिळवणे सोपे झाले आहे, पण गंभीर विचार करण्याची क्षमता, एकाग्रता आणि सखोल ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तकांचे वाचन अत्यावश्यक आहे. पुस्तक हे आपले खरे मित्र आहेत. वाचनामुळे आपल्यामध्येविचार करण्याची क्षमता वाढते भाषेचे ज्ञान सुधारतेकल्पनाशक्ती विकसित होते. आत्मविश्वास वाढतो असे सागर यांनी सांगितले. गुरुकुल अकॅडमी येथे बीड, नगर, उस्मानाबाद, पुणे, पुरंदर अशा 10 तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील विद्यार्थी एमपीएससी व स्पर्धा परीक्षे पर्यंत पोहोचले आहेत. बारा हजार पुस्तकांची लायब्ररी येथे आहे. अभ्यासाबरोबर संस्काराचा पाया याठिकाणी दिला जातो. विद्यार्थ्याला चौफेर शिक्षण देणे हा संस्थेचा उद्देश असल्याचे प्राचार्य संदीप टिळेकर यांनी सांगितले. कुंडलिक मेमाणे व कला फडतरे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे, गुरुकुल करिअर अकॅडमीचे प्राचार्य संदीप टिळेकर, व्यवस्थापिका उषा टिळेकर, रतन टिळेकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक कुंडलिक मेमाणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड.दिलीप निरगुडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे, भाजपा माथाडी कामगार युनियनचे तालुका अध्यक्ष अमोल जगताप, माजी नगराध्यक्ष ॲड. कला फडतरे, शिवहार लहाणे, दत्तात्रेय रोकडे, बापु मुळीक, तनिष्का गौरी बारटक्के, सुवर्णा कामठे, छाया ताकवले, डॉ. जयश्री होले, शांता यादव, सुचेता कुदळे, माधुरी कुंजीर आदी उपस्थित होते. तनिष्का स्ञी प्रतिष्ठा व्यासपीठाच्या तालुकाप्रमुख कुमदिनी पांढरे यांनी मराठी भाषा आणि मराठी साहित्याचा सन्मान राखण्याची शपथ दिली. क्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संदीप टिळेकर यांनी केले. तर ऐश्वर्या भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. तर सकाळचे सासवड शहर बातमीदार दत्ता भोंगळे यांनी आभार मानले.फोटो : सासवड ( ता पुरंदर ) येथे गुढी पाडव्यानिमित्त तनिष्का स्ञी प्रतिष्ठा व्यासपीठाच्या वाचन संस्कृती व पुस्तकांची गुढीचे पुजन करीत असताना पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे शेजारी संदीप टिळेकर, ॲड.दिलिप निरगुडे, कुमुदिनी पांढरे, बापु मुळीक व इतर.
चेतन महाजन यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश​               सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       पुरंदर तालुका युवक काँग्रेसचे  माजी तालुकाध्यक्ष चेतन महाजन यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. पुरंदर-हवेलीचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस संजय जगताप तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा सासवड येथे संपन्न झाला.​याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी चेतन महाजन यांचे स्वागत केले. महाजन यांचा तळागाळातील दांडगा जनसंपर्क आणि युवकांमधील त्यांची पकड पाहता, आगामी काळात तालुक्यातील भाजपची पक्षसंघटना तसेच युवकांची फळी अधिक मजबूत होण्यासाठी मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी चेतन महाजन यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, विकासाच्या राजकारणाला साथ देत आपण आता पूर्ण ताकदीने पक्षसंघटना वाढविण्यासाठी कार्य करणार आहोत.​याप्रसंगी यामध्ये निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे, माजी पंचायत समिती सदस्या सुनिता कोलते, नगरसेवक प्रदीप राऊत, मयूर चौखंडे, माजी उपनगराध्यक्ष विजय वढणे, प्रवीण पवार, संदीप राऊत, मनोज म्हेत्रे, तुषार जगताप, तुषार ढुमे, ॲड. आशपाक बागवान, ॲड. अनुराग टिळेकर, धर्माजी गायकवाड, संपत जाधव, आबा महाजन, गणेश महाजन, मोबीन बागवान, सागर घाटगे, सौरभ जाळिंद्रे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी काळाणे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जयेंद्र निकम यांनी मानले.​फोटोओळ:​ सासवड : भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना चेतन महाजन. समवेत माजी आमदार संजय जगताप, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे, संदीप फडतरे, सुनिता कोलते, विजय वढणे व इतर मान्यवर.
सोनोरी सोसायटीच्या चेअरमनपदी रामभाऊ काळे यांची बिनविरोध निवड                                                     सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                 सोनोरी (ता.पुरंदर)विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामभाऊ कोंडीबा काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मागील अध्यक्ष दिलीप बळी काळे यांनी राजीनामा दिल्याने ही निवड प्रक्रिया पार पडली.      निवडणूक निर्णय अधिकारी अमरीन बागवान यांनी रामभाऊ काळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.       यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी नूतन अध्यक्षांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.     यावेळी सरपंच श्रद्धा काळे, माजी सरपंच बाळूनाना काळे, विलास काळे, भारत मोरे, नितीन काळे, रामदास काळे, सतीश काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते गणेश मोरे,व्हाईस चेअरमन कमल माकर,रमेश काळे, प्रकाश काळे, संजय काळे, तेजस कामथे, पंढरीनाथ माळवदकर, अशोक माकर आदीसह सोनोरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी विविध उपक्रमांनी रमजान ईद उत्साहात साजरी; ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज व दुआ                                                        सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड शहरांतील रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली, या ठिकाणी ईदगाह मैदानावर सकाळी सामुदायिक नमाज पठण, खुदबा आणि विश्वाच्या कल्याणासाठी अखेरच्या क्षणी ची दुवा मौलाना शमशाद आलम यांच्या अधिपत्याखाली पार पडली. या कार्यक्रमासाठी रफिक बागवान, हसन तांबोळी, इलाही बागवान, पापा बागवान, आरिफ आतार, शाकीर काजी, एडवोकेट अशफाक बागवान, रमजान आतार ,मुन्ना बागवान, जुबेर काजी,नासीर आतार,राजु तांबोळी, इसाकभाई आतार, अर्सलबाई बागवान, शकील बागवान, हरून बागवान आदी उपस्थित होते. आर्थिक गुन्हे शाखेचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने, पोलीस निरीक्षक कुमार कदम व शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत ताकवले यांनी यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सासवड पोलिसांनी सर्व मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन, ईद च्या शुभेच्छा दिल्या, येथील दर्गा मशीद मध्ये देखील जैनुल अबो दिल यांनी नमाज पठने केले ,हाजी हासनबाई तांबोळी, बुरानबाई इनामदार, हरून बागवान ,इब्राहिम भाई सय्यद, शमशुद्दीन आतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र तांदूळकर, अर्चना पाटील, रुपेश भगत, संदिप टिळेकर यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील पीर साहेबांच्या यात्रेनिमित्त पिसे येथील पीर यात्रेस सुरुवात                                                     सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         पुरंदर तालुक्यातील हिंदू मुस्लिम भाविकांच्या ऐकायचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या पिसे येथील तालुका पुरंदर या ठिकाणी पीर साहेब हजरत दावल मलिक पीर दर्गा शरीफ यात्रे निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून व राज्यातून आलेले हिंदू व मुस्लिम भाविकांनी सोमवार दि. 23 मार्च रोजी संदलचा कार्यक्रम होणार असून, भाविकांनी पारंपारिक पद्धतीने मुळीक मानकरी यांची काठी, संध्याकाळी आठ वाजता कै. राजाराम गेनबा मुळीक यांना काठी उचलण्याचा मान परंपरेनुसार असल्यामुळे, त्यांचे पुत्र सामाजिक कार्यकर्ते शेतकरी संतोष राजाराम मुळीक हे काठी उचलतात पारंपारिक वाद्याच्या गजरामध्ये संदलची मिरवणूक गावकरी काढत असून, ती काठी मुळीक परिवाराची देवाची काठी त्या ठिकाणी पीर साहेबांच्या मंदिरामध्ये विसावली जाते, तर नंतर नऊ वा सकाळपासून सोमवार या दिवशी या परिसरातील हिंदू मुस्लिम भाविकांनी देवाला अर्पण करण्यात येणाऱ्या नवसाच्या फुलाची चादर, तसेच मलिदा, नारळाचे तोरणहार, गोडभाताच्या नैवेद्याची सांज वाजत गाजत मिरवणूक काढून देवास अर्पण करण्यात येते, रात्री साडेदहा वाजता किरण गाजरे निर्मित आर्केस्ट्रा रंगीला  5 हा कार्यक्रम होणार आहे, मंगळवारी दि. 24 रोजी देवदर्शन होऊन दुपारी बारा वाजता पिराच्या मंदिरामध्ये बकरी मुस्लिम समाजाकडून कापून संध्याकाळी नैवद्य हा रात्री काठी सय्यद परिवाराची दोन काठी वाजत गाजत रात्री साडेसात वाजता निघून पिराच्या मंदिरामध्ये विसावते त्याचा सुद्धा मान हा सामाजिक कार्यकर्ते संतोष राजाराम मुळीक हे दोनही काठी उचलतात व नाचवतात प्रामुख्याने याविषयी सविस्तर माहिती माजी उपसरपंच शांताराम मुळीक, महादेव मुळीक , इब्राहिम सय्यद ,बशीर सय्यद यांनी ही माहिती दिली. रात्री अकरा नंतर गावात छबीने, ढोल लेझीम यांचे सामने रंगतात, बुधवार दि. 25 मार्च रोजी विश्वासराव पहेलवान नांदवळकर निर्मित लोकशाहीर साहेबराव नांदवळकर वसंत नांदवळकर सह रवींद्र पिंगळे लोकनाट्य तमाशा सकाळी नऊ वाजता सुरू होणार असून, सायंकाळी चार वाजता जंगी असा कुस्ती आखाडा जोमदार पद्धतीने रंगणार आहे, तर रात्री आठ वाजता श्रीनाथ म्हस्कोबाच्या मंदिरामध्ये गावच्या यात्रेच्या सर्व हिशोब तपासणी आठ वाजता मंदिरामध्ये पार पडणार आहे, तर रात्री नऊ वाजता खास महिलासाठी पुन्हा एकदा लोकशाहीर साहेबराव नांदवळकर वसंत नांदवळकर सह रवींद्र पिंगळे यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा कार्यक्रम होणार आहे ,अशी माहिती व्यावसायिक संतोष हरिभाऊ मुळीक यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथे बिबट्याचा चार शेळ्यावर हल्ला                                                                       सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       किल्ले पुरंदरच्या पायथ्याला असलेल्या श्री क्षेत्र नारायणपूर येथे कापूरहोळ रस्त्यालगतच्या बोरकर वस्तीतील डोंगराच्या बाजूच्या घराबाहेर बांधलेल्या चार शेळ्यावर पाडव्याच्याच दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक 19 रोजी रात्री बिबट्याने हल्ला केला त्यात, तीन शेळ्यांचा मृत्यू झाला असून, एक शेळी गायब असल्याची माहिती सासवड वन विभागाचे अधिकारी सागर ढोले यांना देण्यात आली होती, बोरकर वस्ती मधील आप्पा शंकर कोकरे यांनी आपल्या घरासमोर चार शेळ्या बांधल्या होत्या, त्यांच्यावर बिबट्याने गुरुवारी रात्री हल्ला केला ,त्या तीन शेळ्यांचा मृत्यू झाला असून, एक शेळी सापडत नाही, तिला बिबट्याने पळवल्याचा संशय आहे, याबाबतची माहिती शुक्रवारी दिनांक सकाळी त्यांनी वन विभागाला कळवली असून, त्यानुसार सासवडचे वन विभाग अधिकारी सागर ढोले यांनी आदेश दिल्यावर, वनपाल गणेश पवार, वनरक्षक नारायणपूर योगेश नजन यांनी घटनास्थळी जाऊन, चौकशी केली असता तसेच नुकसान भरपाई मिळण्याकरिता कागदपत्रे तयार केली. माजी सरपंच चंद्रकांत बोरकर व नारायणपूरचे ग्रामसेवक भाऊसाहेब भवर म्हणाले की, आम्ही रात्री रोज गस्त घालतो, परंतु परवा गारांचा पाऊस पडल्याने, गारा होता त्यामुळे कोणीही गस्तीला नव्हते, त्यांचाच फायदा घेऊन, बिबट्याकडून हा प्रकार झालेला आहे, याबाबत नारायणपूरचे प्रशासकीय सरपंच प्रदीप बोरकर यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, अचानक अशा घटना या बिबट्याकडून घडल्यामुळे  नारायणपूरचे नागरिक भयभीत झालेले आहेत, याबाबत ठोस अशी शासनाची या सामान्य शेतकऱ्याला मदत मिळावी, हीच एक कृतज्ञता आहे, अशी याबाबत माहिती देताना प्रशासकीय सरपंच प्रदीप बोरकर यांनी ही सर्व  माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील सासवडच्या मंडल कृषी अधिकारी हा जाळ्यामध्ये; तर लाच घेताना पकडले असून, त्यावर गुन्हा दाखल                                                                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                                सासवड येथील मंडल कृषी अधिकारी अमोल सुनील सुतार वय 31 यांच्या विरोधामध्ये लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, ही कारवाई सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेला आहे, याबाबत पोलीस निरीक्षक शैलजा शशिकांत शिंदे एसीबी पुणे यांनी फिर्याद दिलेली आहे, तक्रारदार दिलीप गंगाराम वाडकर राहणार वारवडी तालुका पुरंदर यांनी ट्रॅक्टर अनुदान प्रस्ताव मंजुरीसाठी संबंधित कार्यालयात पाठपुरावा केला होता, 29 डिसेंबर 2025 रोजी पंचायत समिती कार्यालयामध्ये आरोपी सुतारने पंच समक्ष तीन हजार रुपयाची लाच मागितल्याचे, निष्पन्न झाल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे, या प्रकरणात एसीबी कडून विविध टप्प्यावर पडताळणी करण्यात आली आहे, 21 जानेवारी 2026 व 26 फेब्रुवारी 2026 रोजी सापळा लावण्यात आला होता, मात्र आरोपीस संशय आल्याने त्याने प्रत्यक्ष लाच स्वीकारली नाही, पडताळणी पंचनाम्यातील निष्कर्ष तक्रारदाराचे जबाब आणि उपलब्ध पुराव्याच्या आधारे आरोपीने शासकीय पदाचा गैरवापर करून, लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने, गुन्हा हा नोंदवण्यात आलेला आहे, पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे या तपास अधिकारी म्हणून नियुक्त आहेत, ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक, अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
पुरंदर तालुक्यातील मस्कोबा मंदिरामध्ये पीक पाण्याचा अंदाज;तर गुढीपाडव्यानिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरांमधील जोगेश्वरी ची महापूजा                                                 सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                         श्री शेत्र वीर ता. पुरंदर येथे गुढीपाडव्याच्या निमित्त देवाचे मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये आणि अडीवाचन करण्यात आले. यावर्षी पिकाची परिस्थिती समाधानकारक असल्याचे सांगण्यात आले, नववर्षाच्या मुहूर्तावर श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना अलंकारिक पोशाख परिधान करण्यात आले, देवाचे अलंकारिक रूप पाहण्यासाठी, देऊळवाड्यामध्ये भाविकांनी गर्दी केली होती. बुधवारी दिनांक 18 रोजी अमावस्या निमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम करून, मानकरी यांच्या हस्ते आणि पूजन करून मराठी महिन्यानुसार खरीप व रब्बी हंगामातील घेतल्या जाणाऱ्या पिकाच्या बारा महिन्याच्या बारा व चार दिशांना चार आड्या लावल्या जातात, गुरुवारी दि. 19 रोजी गुढीपाडव्यानिमित्त पहाटे पाच वाजता महापूजा करून, मंदिर बंद करण्यात आले, सकाळी सहा वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले, व नववर्षानिमित्त भाविकांचे अभिषेक करण्यात आले, गावकरी व भाविकांच्या उपस्थितीमध्ये सकाळी सात वाजता मंदिरात गुढी उभारण्यात आली, सकाळी साडेआठ वाजता देवाचे मानकरी, शिंगाटे, तरटे, बुरंगुले, भवान, वहटकर, सालकरी, गुरव तसेच मुळीक, गावचे मुकादम पाटील चंद्रकांत धुमाळ यांच्या हस्ते अडीचे पूजन करून, अडी काढण्यात आली, अडी वाचनामध्ये चांगल्या मध्यम तसेच कोरडवाहू पिकांचा अहवाल सांगितला जातो, या वर्षी भुईमूग, हरभरा, गहू तसेच कडधान्य व मिरची कोथिंबीर ही पिके समाधानकारक, बाजरीचे पीक मध्यम तर ज्वारीचे पीक कोरडे असल्याचे सांगितले, यावेळी ग्राम पुरोहित थिटे बंधूंनी मंत्रोच्चार करून, आढीवाचन केल्याचे देवस्थान  ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मोहन धुमाळ यांनी सांगितले. गावच्या चावडीवर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये देवस्थान ट्रस्टच्या कामाचा वार्षिक अहवाल देवस्थान ट्रस्टचे वतीने अमोल आप्पासो धुमाळ यांनी मांडला. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते ,अशी माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली.
पुरंदर तालुक्यामध्ये 1,283 शेतकरी बाधित ;तर 3,89 हेक्टर वरील पिकांचे नुकसान, गारपीट अवकाळी पावसाचा तडाखा सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील दि. 18 रोजी सायंकाळच्या सुमारामध्ये वादळी वाऱ्यास मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली या अवकाळी नैसर्गिक आपत्तीमुळे उन्हाळी व रब्बी हंगामातील पिकांचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले 1,283 शेतकरी बाधित असून 3,89 हेक्टर वर पिकांचे नुकसान झाले, गारपीट व अवकाळी पावसाचा तडाका शेतकऱ्यांना बसल्यामुळे, शेतकऱ्यांचे अर्थकारणच पूर्णपणे कोलमडून पडलेले आहे ,या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे व सभापती अमित झेंडे यांनी गुरुवारी दि. 19 रोजी बाधित क्षेत्राची पाहणी केली माळशिरस,पिसर्वे,नायगाव, राजुरी, रिसेपिसे, पोंढे, मावडी, पिंपरी, मावडी सुपे, हंबरवाडी आणि शेड करमळा परिसरामध्ये बुधवारी दि. 18 रोजी जोरदार पाऊस आणि गारपीट झाली यामुळे होणारी पिके व फळबागांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले, शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते ,नुकसानी बाबत लोकप्रतिनिधींनी योग्य वेळी अशी दखल घेतली, यावेळी इंगळे व झेंडे यांनी तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याशी चर्चा करून नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळण्याची शक्यता आहे, नुकसानीचा आकडा वाढणार का? तालुका कृषी अधिकारीश्रीधर चव्हाण यांनी सांगितले की ,हा अहवाल प्राथमिक स्वरूपाचा असून, प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे ,सध्या कृषी विभागाच्या पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी व पंचनामे सुरू आहेत.
पुरंदर तालुक्यातील सासवड मधील ग्राहकांना घरपोच मिळणार सिलेंडर                                                     सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        सासवड ता. पुरंदर मधील प्रवीण गॅस एजन्सीने ग्राहकांच्या सुविधेसाठी गॅस केंद्रावर होणारी गर्दी आणि विस्कळीत होणारी वितरण व्यवस्था यामुळे, गुरुवारपासून दि. 19 पासून" गुढीपाडवा निमित्त "केंद्रावरील गॅस वितरण बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आता ग्राहकांना केवळ ऑनलाइन बुकिंग द्वारे घरपोच सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती व्यवस्थापक नितीन बोरा यांनी दिली आहे. शहरामध्ये 10,000 आणि परिसरामध्ये सुमारे 32,000 गॅस ग्राहक असून रोज सरासरी 6,00 सिलेंडरची मागणी होत आहे. एजन्सीकडे पुरेसा साठा उपलब्ध असूनही, ग्राहक केवळ भीतीपोटी केंद्रावर येऊन रांगा लावत आहेत, त्यामुळे विस्कळीत झालेल्या रांगा या त्या ठिकाणी गॅस मिळत नाही ,अशा भावना या पुरंदर तालुक्यात पसरवल्या जात आहेत, परंतु भीती पोटी ग्राहक हे सासवडच्या एचपी गॅस च्या ऑफिसवर येऊन रांगा लावल्याने ,त्या ठिकाणी गॅस मिळत नाही अशा भावना निर्माण झालेल्या आहेत, तर ही शंका असणारी या ठिकाणी त्यासाठी आज गुरुवारपासून "गुढीपाडवा निमित्त" गॅस वितरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी माहिती प्रतीक भंडारी मालक प्रवीण गॅस एजन्सीचे यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 4,390दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर                         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक    मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                            पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.18 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 4,390 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4,390 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 2,900 तर सरासरी 3,645 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,200तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,600 तर सरासरी 2,900 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास  कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर, गुळाला 4,600रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 4,11 बॉक्स 82 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,580 कमाल दर 4,600रुपये तर साधारण4,550 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 2,900,4,390,3,645. बाजरी 2,700,3,100, 2,900. गहू 2,600,3,200,2,900. तांदूळ -4,800,5,500 ,5,150 हरभरा 4,800, 5,000,4,900.
कराटे क्यु बेल्ट व ब्लॅक बेल्ट स्पर्धा  बक्षीस वितरण समारंभ संपन्न                                                                     सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                  यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन सासवड येथे  बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दि. 16 ते 20 ऑक्टोबर 2025 दरम्यान घेण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. याचबरोबर जानेवारी 2026 मध्ये पार पडलेल्या क्यू बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचेही विशेष कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.चंद्रशेखर वढणे(अध्यक्ष पुणे जिल्हा भाजपा) तसेच मा.संतोष जगताप(अध्यक्ष स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान,सासवड) उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.आपल्या मनोगतात  चंद्रशेखर वढणे यांनी कराटे या खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, कराटे हा केवळ एक खेळ नसून तो जीवनशैली आहे. नियमित सरावामुळे शरीर तंदुरुस्त राहते, तसेच मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, संयम आणि आत्मविश्वास या गुणांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. तसेच आजच्या काळात आत्मसंरक्षणाची गरज अधिक महत्त्वाची बनली असून, कराटेचे प्रशिक्षण हे प्रत्येकासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. पालकांनीही आपल्या मुलांना अशा क्रीडा प्रकारांकडे प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले.   खेळाडूंनी पराभवातून शिकत पुढे जाण्याची वृत्ती ठेवावी आणि देश-राज्य पातळीवर यश मिळवण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी, असा संदेश संतोष जगताप यांनी दिला.या यशामागे विद्यार्थ्यांना लाभलेले मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले असून ग्रँड मास्टर प्रदीप वाघोले तसेच सेन्साई तेजस वाघोले, ललित वाघोले, गणेश पापळ आणि पायल वाघोले यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाला पालक, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशामुळे परिसरात क्रीडा क्षेत्राबद्दल उत्साह वाढला असून अशा उपक्रमांमुळे भविष्यात अधिक खेळाडू घडतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे सुवर्णकलशाची मिरवणूक; तर भीमा  केशवर शंभू महादेव मूर्तीची प्रतिष्ठापना         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      भिवडी ता. पुरंदर येथे भीमाकेशवर शंभू महादेव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, तसेच सुवर्ण कलशाची मिरवणूक सुद्धा गावातून काढण्यात आली, त्यानंतर मिरवणुकीची ग्राम प्रदक्षिणा झाल्यावर मिरवणूक पुन्हा महादेव मंदिराजवळील त्या ठिकाणी पोचली. या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन, संत साहित्याची अभ्यासक राजेंद्र महाराज दहिभाते यांचे कीर्तन झाले, दुसऱ्या दिवशी 16 मार्च रोजी सकाळी मूर्तीचा मंदिरात प्रवेश करून, मूर्तींना अभिषेक घालण्यात आला, त्यानंतर तेजोनाथ महाराज राजाधिराज योगी 1008 श्री निर्मळ नाथजी श्री शेत्र नारायणपूर येथील पोपट महाराज टेंबे स्वामी संघ मनांत महाराज त्यागी महाराज यांच्या हस्ते मूर्ती स्थापना, कलशारोहण अधिक कार्यक्रम झाले, त्यानंतर प्रवचन व महाप्रसाद होऊन राष्ट्रीय पुरस्कार विजेते कीर्तनकार शिवाजी महाराज शेळके यांचे कीर्तन झाले, भिवडी ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे, तात्यासाहेब भिंताडे, बापूसो दिघे, बाळासो भिंताडे, बाबुराव दिघे, रमेश मोकाशी, शामराव भिंताडे, शहाजी गायकवाड, विठ्ठल मोगाशी, साधू दिघे, सयाजी वांढेकर,प्रशांत वांढेकर, डॉक्टर मनोज शिंदे, सायली शिंदे पंचायत समिती सदस्य, हरिभाऊ लोळे जिल्हा परिषद सदस्य, सुनील दिघे, विजय क्षीरसागर ,सागर मोकाशी, गावातील युवक पिढी, महिला मंडळ, पदाधिकारी, शेतकरी बांधव आदी उपस्थित होते.  भिवडीचया माहेर वाशीनेकडून मदत गावच्या माहेरवाशीन कडून स्वत: निर्णय घेऊन, मंदिराच्या सुवर्णकलशासाठी गावच्या  सहभागातून  व माहेरवाशीण कडून  मदत करण्यात  आली असून, या माहेरवाशींनी डोक्यावर कलश घेऊन, मिरवणूक सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. अशी माहिती सायली शिंदे पंचायत समिती सदस्य यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यामध्ये गॅस दरवाढी विरोधामध्ये सासवड या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचे आंदोलन         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                     सासवड तालुका पुरंदर येथील शिवतीर्थावर देशातील गॅस दरवाढ, महागाई आणि वितरण व्यवस्थेतील ढिसाळ नियोजनाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी दि. 16 रोजी निदर्शने करण्यात आली, यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करत घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली, सिलेंडरचे दर 900 रुपयांच्या पार गेल्याने, सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडलेले असून, व्यावसायिक सिलेंडरचे दरही 1900 रुपयावर पोहोचल्याचे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेले आहेत, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे, याशिवाय राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेवरही टीका करण्यात आली असून, शेतकऱ्यांची 7/12 कोरे करण्याचे आश्वासन सरकारने पाळलेले नाही, अशी टीका यावेळी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाची मर्यादा तीन वरून पाच लाखापर्यंत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली, असून विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, त्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आलेला आहे, सरकारकडून गॅस सिलेंडरची टंचाई नसल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात सामान्य नागरिकास व्यावसायिकांना सिलेंडर उपलब्ध होत नाही, सिलेंडरचे वितरण सुरळीत करावे अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे,) या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य  दत्ता झुरंगे, सुनील असवलीकर, साहेबराव फडतरे, राजेंद्र बरकडे ,सचिन दुर्गाडे, सविता बरकडे, संदीप जगताप, बापू मोकाशी, माऊली बोराडे ,भाऊसाहेब फडतरे आदी उपस्थित होते. तालुक्यात  प्रत्येक आठवडे बाजाराच्या दिवशी हे आंदोलन सुरूच राहील, अशी सुद्धा साहेबराव फडतरे यांनी स्पष्ट केले आहे, पुढील आंदोलनासाठी परिंचे, वीर ,निरा येथे सुद्धा आंदोलन करण्यात येणार आहे.अशी माहिती  माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे यंत्रामध्ये अडकून महिलेचा मृत्यू                                                         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                  शेतामधील ज्वारी भरडण्याचे काम सुरू असताना, यंत्राच्या शापमध्ये केस अडकल्याने, एका 64 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, या घटनेमध्ये त्यांचे शीर धडावेगळे झाले, ही भीषण घटना सोमवारी दि. 16 रोजी माळशिरस तालुका पुरंदर येथे घडली. मंगल तुकाराम कुंभारकर वय 64 राहणार वनपुरी असे मृत महिलेचे नाव आहे, मिळालेल्या माहितीनुसार कुंभारकर कुटुंब मूळचे वनपुरी येथील असले तरी ,माळशिरस येथे त्यांच्या माहेरी त्यांच्या शेती आहे ,आज मुलगा विकाससह त्या शेतात ज्वारी भरडण्याचे काम करत होत्या ,ट्रॅक्टर आणि यंत्राला जोडणाऱ्या शापजवळ पडलेली कणसे गोळा करत असताना, अचानक मंगल यांचे केशाफ्ट मध्ये  केस अडकले यंत्राचा वेग जास्त असल्याने, क्षणात त्यांना आत ओढले, गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे, जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी घटनास्थळी भेट देऊन, पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे.
सासवड येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त 171 रक्तदात्याने केले रक्तदान                        सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                        रविवार,15 मार्च रोजी कऱ्हामाई मंदिरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर विभागाच्या वतीने करण्यात आले होते. रक्तदान शिबिरास 171 रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये श्री छत्रपती संभाजी महाराज पायी पालखी सोहळ्याचे संस्थापक संदीप आप्पा भोंडवे,  गुप्त विभाग पोलीस अधिकारी रुपेश भगत, ह. भ. प स्वप्नील महाराज काळाने, आदींनी रक्तदान केले. रक्तदान करण्यासाठी महिला वर्गाचा मोठा सहभाग होता तसेच पुरंदर तालुक्यातील विविध खेडेगावातून सुद्धा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर विभागाचे धारकरी मंडळी आले होते. सुपे, पानवडी, कुंभोशी, झेंडेवाडी, पवारवाडी, दिवे, हिवरे, चांबळी,  आंबोडी धालेवाडी, शिवरी या भागातून भरपूर धारकर रक्तदान करण्यासाठी आले होते.प्रत्येक रक्तदात्यास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा व पुरंदरचे धुरंदर शिवाजी एक्के लिखित किल्ले पुरंदर व परिसर हा ग्रंथ भेट देण्यात आला.रक्तदान शिबिरास सासवडचे उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, नगरसेवक राजन (भैया) जगताप, मयूर चौखंडे व  यांनी रक्तदात्यांस येऊन  व रक्तदान शिबिराच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर विभागाचे धारकरी अमित पवार यांनी दिली.
पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे नागरिकांना शासकीय सेवेचा लाभ तर छत्रपती शिवाजी महाराज महाराजसव महसूल समाधान शिबिरास चांगला प्रतिसाद                             सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                      शिवरी ता. पुरंदर येथे नागरिकांना शासकीय सेवा सुलभ व जलद गतीने उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने, महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबिर शनिवार या दिवशी दि. 14 रोजी पार पडले. या वेळी विविध विभागाच्या सहभागातून नागरिकांना अनेक शासकीय सेवा व दाखल्यांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर हे शिबिर राबविण्यात येत असून, या शिबिरासाठी आमदार विजय शिवतारे ,तहसीलदार विक्रम राजपूत, गट विकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, सहाय्यक निबंधक रवींद्र फुलपगारे, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, सभापती पुरंदर पंचायत समिती अमित झेंडे, उपसभापती पुरंदर पंचायत समिती प्रवीण जगताप, जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे, हरिभाऊ लोळे, डॉक्टर प्राजक्ता दुर्गाडे, पंचायत समिती सदस्य माणिक निंबाळकर, स्मिता निगडे, मोनिका कांबळे इत्यादी मान्यवर आधी उपस्थित होते. तसेच संबंधित गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक सुद्धा उपस्थित होते, ग्राम महसूल अधिकारी, आधार केंद्र चालक, सीएमसी व महा-ई-सेवा केंद्र चालक, गॅस पुरवठादार आधी उपस्थित यावेळी होते,या शिबिरामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवांचा लाभ मिळाल्याने, ग्रामस्थांनी एक प्रकारे समाधान व्यक्त केले असून, तसेच अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हाने, आमदार विजय शिवतारे यांनी केले आहे, यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत ,निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील यांनी विविध शासकीय योजना या सेवा विषयी नागरिकांना सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविकामध्ये तहसीलदार विक्रम राजपूत यांनी अशी माहिती दिली की, प्रलंबित फेरफार 57, सातबारा दुरुस्ती प्रकरणे 29, जीवन सात बारा 127, डिजिटल सातबारा देणे 946, आठ वितरण करणे 355, तुकडे बंदी नियमतीकरण करणे 7, वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक प्रकरणे 2, भूसंपादन कमी जास्त पत्रक तयार 3, आकर्षित कमी जास्त पत्र तयार 0, अ कृषीक तरतुदीचा सुधारणाानुसार आधी मूल्य वसूल करणे 0, लोकसेवा हक्क कायदा.1) जात प्रमाणपत्र 27, 2) नॉन क्रिमीलेअर 15, 3) उत्पन्नाचा दाखला 47,   4) रहिवासी अधिवास प्रमाणपत्र 12, सामाजिक लाभाच्या योजना 1) संजय गांधी 69, 2) इंदिरा गांधी योजना 0,1) खिडकी योजना 1,2) ई मोजणी 3, 3) आयर गोष्टीक 186, 4) पीएम किसान 27,5) तक्रार निवारण 10.अशी तहसीलदार यांनी विस्तृतपणे माहिती दिली. आभार प्रदर्शन तलाठी प्रमोद झुरंगे यांनी मानले.
पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी येथे उपवास सोडण्यासाठी आलेल्या युवकावर हल्ला                                               सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                               आस्करवाडी तालुका पुरंदर येथील आमराई परिसरामधील तलावाजवळ उपवास सोडण्यासाठी बसलेल्या तरुणांना टोळक्याने मारहाण करण्यात आलेची घटना शुक्रवारी दिनांक 13 रोजी सायंकाळी घडली असून, शिवीगाळ करत लाठ्या ,काठ्याचा बुखयाचा आणि कोयत्याने  मारहाण केलेली आहे, हल्ल्यामध्ये काही प्रमाणामध्ये तरुण जखमी झाले असून, याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, याबाबत कोंढवा येथील रहिवाशी फिरोज जावेद सय्यद वय 36 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते आपल्या मित्रासह आसकरवाडी येथील तलावाजवळ उपवास सोडण्यासाठी बसले होते, यावेळी दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून आलेल्या सुमारे 100 ते 150 अज्ञात व्यक्तींनी कोणतीही चितावणी नसताना, त्यांना घेरले, टोळक्याने जातिवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, वादाचे रूपांतर भांडणात होऊन, जमावाणे दांडके, चाबूक व कोयत्याने फिर्यादी व त्यांच्या तीन मित्रांना बेदम मारहाण करण्यात आली, या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, फिरोज सय्यद यांच्या फिर्यादीवरून सासवड पोलिसांनी अज्ञात हल्लेखोर  विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, सध्या या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर आणि पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे करत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनांच्या नंबर वरून संशयाचा शोध घेतला जात आहे, चौकशीसाठी काही लोकांना ताब्यात घेतले असून ,दरम्यान मारहाण करणाऱ्या वर कारवाईच्या मागणीसाठी कों ढव्यातील 40 ते 50 नागरिकांनी तसेच काही संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी सासवड पोलीस ठाण्यासमोर रात्री उशिरा जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन केले होते, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत पोलीस प्रशासना विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली होती, पोलीस प्रशासन सखोल तपास करीत आहे, तांत्रिक पुराव्याच्या साह्याने आरोपी निष्पन्न करण्याचे काम सुरू असून, दोषींना सोडले जाणार नाही, नागरिकांनी कोणत्याही आफवावर विश्वास ठेवू नये, आणि जातीय तेढ निर्माण होईल, असे असे कृत्य करून हया परिसरामध्ये शांतता राखली पाहिजे .कुमार कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे विविध खेळांच्या स्पर्धा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड येथील कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्टच्या अर्जुन पार्कमध्ये विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, अर्जुन गोखले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी या स्पर्धा घेण्यात येतात, यामध्ये सिंधुताई अंबिके व सुहासिनी आटलेकर यांनी विविध गाणे मार्फत कवायतीचे प्रकार, देशभक्तीपर गीते सादर करत आनंदायी शिक्षण देण्यात आले, विद्यार्थ्यांनी खेळास, रांगोळी, चित्रकला, सांस्कृतिक कार्यक्रम, गायन, वादन नृत्य, भाषण यासारख्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत बक्षिसे जिंकली, या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताथेवाडी , म.य.सो इंग्लिश मीडियम स्कूल, शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कन्या प्रशाला आदी शाळांनी सहभाग घेतला होता, आयडीबीआय बँकेचे अक्षय कदम हे प्रमुख अतिथी होते, मुख्याध्यापक प्रकाश जगताप, कस्तुरबा ट्रस्टच्या प्रतिनिधी शेवंता चव्हाण उपस्थित होते, मीनल जाधव, ललिता कुंजीर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार झुरंगे यांनी केले ,तर प्रेरणा देशमुख यांनी आभार मानले.
सासवड नगरपरिषदेची कर वसुली मोहीम तीव्र; थकबाकीदारांच्या मालमत्तेवर करण्यात आली जप्तीची कारवाई​                                                                 सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                    सासवड शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरी सुविधा अखंडित ठेवण्यासाठी, सासवड नगरपरिषदेने घरपट्टी (मालमत्ता कर) आणि पाणीपट्टी वसुलीची मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर परिषदेच्या विशेष वसुली पथकामार्फत शनिवार दिनांक 14 मार्च रोजी सोपननगर हाडको भागातील 8 थकीत मिळकतधारकांवर नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई करण्यात आली.तसेच म्हाडा सोसायटी, आंबोडी रोड येथील 14 सदनिकांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.  वारंवार सूचना देऊन देखील कराचा भरणा न करणाऱ्या थकित मिळकतधारकांवर नळ कनेक्शन कापणे व मालमत्तेवर जप्तीची कारवाई करणे यासारख्या कारवाया अधिक तीव्र स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे सासवड नगर परिषद प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.थकबाकी वसुलीसाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. ज्या नागरिकांनी अद्याप आपला चालू वर्षाचा कर आणि मागील थकबाकी भरलेली नाही, त्यांनी ती त्वरित भरावी.थकित मिळकत धारकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा  असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले आहे.​"सासवडकर नागरिकांनी थकित व चालू मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा विहित मुदतीत करून नगरपरिषदेस सहकार्य करावे.तसेच शासनाच्या अभय योजनेचा थकित मिळकत धारकांनी अवश्य लाभ घ्यावा ही सुवर्णसंधी कोणी चुकवू नये." असे आवाहन सासवड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मा. आनंदीकाकी चंदुकाका जगताप यांनी केले.​सुटीच्या दिवशीही सुविधा: नागरिकांच्या सोयीसाठी नगरपरिषदेचे कर संकलन केंद्र शनिवार आणि रविवारी देखील सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहणार आहे.​ऑनलाईन पेमेंट: नागरिक घरबसल्या नगरपरिषदेच्या saswadnagarparishad.org या अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे 'डिजीटल पेमेंट' करू शकतात.
पुरंदर तालुक्यातील मांढर परिसरामधील वनव्यामुळे चारा जळून खाक तर लोकप्रतिनिधी व दानशूर यांच्या पुढाकाराने पशुपालकांना मोफत चारा वाटप                               सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                             मांढर तालुका पुरंदर येथील परिसरामध्ये गेल्या आठ दिवसापूर्वी डोंगर भागामध्ये जो वनवा लागला होता त्याच्यामध्ये पशुपालकांच्या गवताच्या गंजी चारा यांचे जळून प्रचंड असे चारा पिकांचे नुकसान झाले, शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवनमान पशुपालनावर अवलंबून असून, पुढील 4 ते 5 महिन्याचा चारा पूर्णपणे जळून गेल्यामुळे, पशुपालकांना जनावरांसाठी पूर्णपणे चारा संपलेला होता, तहसील कार्यालयाला सूचना करून पंचनामा करून घेण्यास सांगितले होते, पंचनामा सुद्धा झाला परंतु  शासकीय मदत मिळण्यासाठी वेळ लागणार दिसत असल्यामुळे, मांढर गावातील ग्रामस्थ दत्ताजी पापळ व एम. के. अण्णा पापळ यांच्या मागणीनुसार पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय चंदूकाका जगताप त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे हरिभाऊ  लोळे आणि पंचायत समिती सदस्य सायली  डॉ मनोज शिंदे यांच्या सहकार्याने व पाठपुराव्याने दानशूर व्यक्तिमत्व आनंदी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जेजुरी चे सर्वेसर्वा डॉ. सुमित  काकडे व बाळासाहेब लोळे त्याचबरोबर पानवडी गावचे माऊली बापू भिसे यांच्या सहकार्याने व हरिभाऊ लोळे व डॉक्टर शिंदे यांच्या प्रयत्नातून ऊस आणि वाड्याच्या गाड्या मागवून त्या या शेतकऱ्यांच्या नुकसान झाले आहे, त्यामध्ये नानासो शेळके यांच्या सात गंजी जळाल्या त्याचबरोबर राजेंद्र शिर्के ,विलास लक्ष्मण शिर्के, शिवाजी शिर्के , बापू खोमणे, दत्तू खोमणे, कमल खोमणे, धनाजी शेळके, बापू शेळके या सर्वांना मोफत चारा वाटप करण्यात आला, त्यावेळी मा सरपंच विश्वास तात्या शिर्के, दत्तात्रय आप्पासाहेब पापळ, दादा खोमणे, गोपाळ उत्तरकर ,सागर शिर्के, धनाजी शिर्के, उद्धव शिर्के, स्नेहल सोनू काशीद ,माजी सरपंच वंदना शिर्के, सदाशिव शिर्के, नामदेव शिर्के आणि दिपक पापल हे ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते. विश्वास तात्या शिर्के यांनी अत्यंत तातडीने दिलेल्या चाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल आणि यासाठी केलेल्या कार्याबद्दल संजयजी जगताप हरिभाऊ लोळे आणि सायली शिंदे  यांचे आभार मानले येणाऱ्या काळात अशीच भरीव मदत शेतकऱ्यांसाठी आणि पशुपालनासाठी करण्यात येईल, तसेच येणाऱ्या काळात काळदरी खोऱ्यातील पशुपालकांना मदत करण्यात यावी अशीही जाहीर आव्हान केले. आपली मदत 100% तळातील गरजवंत सर्वसामान्य  पशुपालकांना देण्यात येईल  असेही डॉक्टर मनोज शिंदे यांनी सांगितले व सहकार्य करणाऱ्यांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या 'बलिदान मास' निमित्त 'सहाव्या' भव्य 'रक्तदान महायज्ञा'चे आयोजन.     सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज  :                                                    स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या अतुलनीय बलिदानाचा स्मृतिप्रीत्यर्थ, 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पुरंदर' च्या वतीने गेल्या ५ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला 'रक्तदान महायज्ञ' यावर्षी आपल्या सहाव्या (६ व्या) वर्षात पदार्पण करत आहे. शंभूराजांनी स्वराज्यासाठी रक्ताचे बलिदान दिले, त्यांच्या चरणी कृतज्ञता म्हणून समाजातील गरजूंचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही या भव्य उपक्रमाचे आयोजन केले आहे.हा सहावा भव्य रक्तदान महायज्ञ येत्या रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सासवड येथील ऐतिहासिक कऱ्हामाई मंदिर येथे आयोजित केला आहे. सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:०० या वेळेत हे शिबिर संपन्न होईल.या उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:सातत्यपूर्ण सेवा: सलग सहाव्या वर्षी हा उपक्रम राबवून पुरंदरमधील शिवभक्तांनी रक्ताच्या नात्याची ही परंपरा जपली आहे.प्रेरणादायी बोधवाक्य: 'विसरू कसे बलिदान, चला करू रक्तदान' या भावनेतून हा उपक्रम राबविला जात आहे.रक्तदात्यांचा गौरव: सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने 'श्री शंभू महाराज प्रतिमा' आणि पुरंदरचे धुरंदर शिवाजीराव एक्के लिखित 'किल्ले पुरंदर' हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या पवित्र कार्यात सासवड शहर आणि पुरंदर तालुक्यातील जास्तीत जास्त तरुण आणि शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शंभूराजांना रक्ताची मानवंदना द्यावी, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पुरंदर यांच्या वतीने करण्यात आले आहे.या विधायक सामाजिक उपक्रमाला आपले सहकायॅ मिळावे.स्थळ: कन्हामाई मंदिर, सासवड.वेळ: सकाळी ९:३० ते सायं. ६:००आयोजक,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पुरंदर.
पुरंदर तालुक्यातील पीर साहेबांच्या यात्रेनिमित्त पिसे येथील पीर या ठिकाणी गर्दी                                                सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                       पुरंदर तालुक्यातील हिंदू मुस्लिम भाविकांच्या ऐकायचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या पिसे येथील तालुका पुरंदर या ठिकाणी पीर साहेब हजरत दावल मलिक पीर दर्गा शरीफ यात्रेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून व राज्यातून आलेल्या हिंदू व मुस्लिम भाविकांनी दर्शनासाठी गर्दी, अशी आलोट केली होती, सोमवार दि. 23 रोजी रात्री संदलचा कार्यक्रम झाला, भाविकांनी पारंपारिक पद्धतीने पारंपारिक वाद्याच्या गजरामध्ये संदलची मिरवणूक काढून, मुळीक परिवाराची देवाची काठी त्या ठिकाणी पीर साहेबांच्या मंदिरामध्ये विसावली, तर  नंतर 9 वाजेपर्यंत  सकाळपासून सोमवार या दिवशी या परिसरातील हिंदू मुस्लिम भाविकांनी देवाला अर्पण करण्यात येणाऱ्या नवसाच्या फुलांची चादर तसेच मलिदा व गोडभाताच्या नैवदयाची, वाजत गाजत मिरवणूक काढून देवास अर्पण केले.
यात्रा काळामध्ये भाविकांना सुविधा पुरवल्या जातील; तर शिखर शिंगणापूर येथे बैठकीत उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर यांची माहिती                                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                          श्री शेत्र शिखर शिंगणापूर तालुका माण जिल्हा सातारा येथील चैत्र यात्रेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात, अशावेळी भाविकांना रस्ता, आरोग्य, वीज, पाणी, एसटी बस यासारख्या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व सुविधा पुरविला जाणार असल्याचे, माण खटाव च्या उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर यांनी सांगितले. कावडधारक तथा भाविकांनी यात्रेवेळी येणारे समस्या मांडल्या, याबाबत सर्व समस्यांचे निराकरण करत सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीमध्ये 17 मार्च रोजी पुन्हा बैठक होणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले ,शिखर शिंगणापूर येथे होणाऱ्या चैत्र यात्रेनिमित्त ग्रामपंचायत सभागृहात यात्रेच्या विभागीय अधिकारी गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या, यात्रेमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य कावडी शंभू महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी येतात, याच परंपरेतून पुरंदर तालुक्यातील सासवड, खळद, पंचक्रोशी शिवरी, बेलसर, यांच्यासह अन्य गावांच्या कावडी यात्रेत सहभागी होतात, यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी रणजीत सावंत, तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी प्रदीप शेडगे, फलटण सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जगताप, दहिवडी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पंचायत समिती सदस्य राजाराम बोराटे, देव व्यवस्थापक मंदार पत्की, खळद पंचक्रोशीच्या कावडीचे मानकरी शिवयोगी संत भूतोजी नाना खळदकर, सासवड कावडीचे मानकरी कैलास बुवा कावडे, बबनराव कामठे, रवींद्र फुले, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे ,अन्नसुरक्षा अधिकारी कल्पना गायकवाड, सातारा यांच्यासह भाविक भक्त उपस्थित होते. सूत्रसंचालन आभार शिंगणापूर यात्रा कमिटीचे अध्यक्ष तथा उपसरपंच डॉक्टर अतुल बंदुके यांनी केले.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पायी पालखी सोहळा , 2026, वर्ष - 12 वे                                                  सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                दि.11माचॅ रोजी महालक्ष्मी लोन्स वनपुरी पुरंदर येथे पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठीची आढावा बैठक संपन्न झाली , आढावा बैठकीमध्ये गेल्या बारा वर्षांपासून अविरत चाललेल्या धर्मवीर छत्रपती श्री शंभूराजेंचा जन्मस्थळ दुर्ग पुरंदर ते समाधिस्थळ धर्मपंढरी श्री क्षेत्र तुळापूर- वढू बु. असा प्रवास नित्यवर्षीने होत असतो , या वर्षी हा सोहळा दि. 15 मार्च ते दिनांक 18 मार्च 2026 रोजी तुळापूर - वढू बु. येथे सांगता होणार आहे.  सकाळी 9.00 वाजता दत्त मंदिर नारायणपूर ( पुरंदर ) येथुन् प्रस्थान करून सासवड येथील कालभैरवनाथ मंदिर येथे 12 ते 4 वाजेपर्यंत विसाव्यासाठी थांबणार  असून, दुपारी 4 वाजता विसाव्याच्या ठिकाणाहून निघून संध्याकाळी 7 वाजता काळेवाडी येथील श्रीराम मंदिरात मुक्कामसाठी थांबणार असून, ह्या ठिकाणी गुरुवर्य श्री संदीपराज महिंद गुरुजी यांचे शंभूराजेंच्या जीवन चरित्रावर व्ह्याख्यान होणार आहे .दि. 16 मार्च रोजी सकाळी 8.30 पालखी सोहळ्याचे प्रस्थान काळेवाडी येथे होऊन दिवे घाट मार्गे वडकी, देवाची उरुळी या ठिकाणी हा सोहळा विसावा तसेच लोणीकाळभोर येथे दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामसाठी जाणार आहे.  दि. 17 मार्च रोजी पालखी सोहळा लोणी काळभोर येथून प्रस्थान करून, थेऊरगाव कोलवडी येथे विसाव्याला जाणार आहे, त्या दिवशी पालखी सोहळा लोणीकंद येथे मुक्कामास असणार आहे, तसेच दि. 18 मार्च म्हणजेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुण्यतिथी ( फाल्गुन अमावस्या ) दिवशी धर्मपंढरी श्री क्षेत्र तुळापूर - वढू बू येथे पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.या पालखी सोहळा आढावा बैठकीसाठी पालखी सोहळ्याचे अद्यक्ष  सचिन पलांडे , सरचिटणीस भाऊसो शिंदे, पालखी सोहळ्याचे पुरंदर तालुक्यातील  संचालक पै.सागर काळे, अमित पवार, प्रशांत वांढेकर, शिवतेज काळे, सदानंद बोरकर, विश्वास जगताप उपस्थित होते , तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य हरिभाऊ लोळे, अजय इगले, प्राजक्ता  दुर्गाडे, पंचायत समिती सदस्या अर्चनाताई कटके,सायली शिदे यांचे (पती मनोज शिदे) पत्रकार , शंभूराजे युवक कार्यकर्ते, अनेक मान्यवर ,पुरंदर तालुक्यातून उपस्थित होते.सर्व मार्गदर्शक वक्त्यांनी पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने पुरंदरकरांनी दिवे घाटापर्यंत या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.. शेवटी आभार प्रदर्शन निलेश काले यांनी मानले.
पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू                                                              सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:              भिवडी तालुका पुरंदर येथील शेवग्याच्या झाडाची फांदी तोडताना विजेच्या तारेचा करंट लागून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी असा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दिनांक 11 रोजी दुपारी 1:40 वाजता मिळालेल्या माहितीनुसार श्यामराव रघुनाथ काळे वय 60 राहणार भिवडी तालुका पुरंदर हे दुपारी दीड वाजायच्या सुमारास शेतातील शेवग्याच्या झाडाची फांदी तोडत होते, यावेळी तोडलेली फांदी शेतातून गेलेल्या वीज वाहिनीच्या तारेवर पडल्याने, त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला, करंट लागल्याने, ते झाडाखाली कोसळले घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून सासवड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची घोषित करण्यात आले या घटनेची माहिती नातेवाईक अरुण किसन चौधरी राहणार भिवडी यांनी सासवड.पोलिसांमध्ये ही खबर दिली असून, दरम्यान अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे भिवडी परिसरामध्ये हळू व्यक्त केली जात आहे.
जागतिक महिला दिन उत्साहात साजरा                       सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                         एम. ई. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल, सासवड येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. प्रास्ताविकामध्ये सरोज जांगडा यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर-नागनूर यांनी मुख्याध्यापकीय मनोगत व्यक्त करताना महिलांचे समाजातील योगदान आणि त्यांची विविध क्षेत्रांतील प्रगती याबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमात शिक्षिका नीता जगताप, रुचिरा गार्डी तसेच विद्यार्थिनी साजिरी माने यांनी आपले मनोगत व्यक्त करून महिला सशक्तीकरणाबद्दल विचार मांडले.या प्रसंगी शाळेतील सर्व महिला शिक्षिकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन भाऊसाहेब येळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन माननीय मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर- नागनूर यांच्या मार्गदर्शनाखाली अंकिता जगताप,अंकिता कुंजीर, नितीन ठोंबरे व भाऊसाहेब येळे यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी अंकिता जगताप यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 4,251दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर                         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक    मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                              पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.11 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 4,251 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4,251 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 2,700 तर सरासरी 3,457 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,300तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,700 तर सरासरी 3,000 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास  कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर, गुळाला 4,550रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 3,36 बॉक्स 67 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,500 कमाल दर 4,550रुपये तर साधारण4,505 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 2,700,4,251,3,457. बाजरी 2,500,3,100, 2,800. गहू 2,700,3,300,3,000. तांदूळ - ------------हरभरा 4,851, 5,200,5,025.
हॉटेलमध्ये घरगुती गॅस वापरल्यास थेट कारवाई : तहसिलदार विक्रम राजपूत यांचा इशारा                                       सासवड प्रतिनिधी: (दि-११):-  बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                     पुरंदर तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. पुरंदरचे  तहसिलदार विक्रम राजपूत यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की, हॉटेल, ढाबे, कॅन्टीन किंवा इतर व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा वापर आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.सर्वसामान्य नागरिकांना घरगुती गॅसचा सुरळीत पुरवठा मिळावा आणि काळाबाजार रोखण्यासाठी महसूल विभाग सतर्क झाला आहे. यासाठी तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.अचानक तपासणी मोहीम...तहसील कार्यालयाकडून भरारी पथक तयार करण्यात आले असून हॉटेल, ढाबे व व्यावसायिक आस्थापनांवर अचानक तपासणी केली जाणार आहे.तपासणी दरम्यान घरगुती गॅसचा वापर आढळल्यास सिलेंडर जप्त करून कायदेशीर कारवाई केली जाईल.गॅस एजन्सींना कडक सूचना... तहसिलदार विक्रम राजपूत यांनी सर्व गॅस एजन्सींना पारदर्शक वितरण करण्याचे आदेश दिले असून घरगुती गॅसचा व्यावसायिक वापरासाठी पुरवठा करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.नागरिकांना आवाहनघरगुती गॅसचा अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार आढळल्यास नागरिकांनी प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन  तहसिलदार विक्रम राजपूत यांनी केले आहे.
दक्षिण पुण्यात ‘जिवलग प्रतिष्ठान’तर्फे प्रथमच ‘मराठी शाहीर बाणा’ कार्यक्रमाचा जल्लोष                                       सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      दक्षिण पुणे परिसरात पारंपरिक कला, लोकसंस्कृती आणि शाहीर परंपरेचा जागर घडवून आणण्यासाठी जिवलग प्रतिष्ठानतर्फे ‘मराठी शाहीर बाणा’ या पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम ६ मार्च २०२६ रोजी Bharati Vidyapeeth महानगरपालिका मैदानावर उत्साहात पार पडला. दक्षिण पुण्यात प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. ६ मार्च रोजी रात्री १२ वाजता Sinhagad Fort येथून ज्योत आणून तिचे आगमन करण्यात आले. या ज्योतीच्या आगमनाने कार्यक्रमाला विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आणि वातावरणात उत्साहाची लहर पसरली.या कार्यक्रमात प्रसिद्ध शाहीर Chandrakant Mane यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली. त्यांच्या शाहीरी सादरीकरणाने उपस्थितांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आणि मराठी शाहीर परंपरेचा अभिमान पुन्हा जागृत झाला.कार्यक्रमाचे प्रभावी सादरीकरण (सालोचन) शुभम खेडेकर यांनी केले. त्यांच्या प्रभावी निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. मराठी शाहीर परंपरा, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.कार्यक्रमादरम्यान अजित दादा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहिली.कार्यक्रमाची सांगता भूमेश जाधव यांनी सादर केलेल्या शिवावंदनेने करण्यात आली. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अभिमानाची भावना निर्माण झाली आणि कार्यक्रमाला प्रेरणादायी शेवट मिळाला.या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन जिवलग प्रतिष्ठान या मंडळाने केले. तरुणांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरात लोकसंस्कृती जपण्याचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन साहिल मारणे, केतन घुले, अथर्व ढमाले, ऋषिकेश सूर्यवंशी, निशांत पवार, अभिषेक बगळे, निरंजन दाबेकर, राहुल सदुबत्तुला, निरंजन मांडरे, साहिल चिंधे, ओम पां. खेडेकर, साहिल गोगावले, उमेश राजपूत, अमेय शिंगटे, संग्राम थोरात, सुरज गोळे, ओम दि. खेडेकर, ओम खोजे, आर्यन गरुड, सोहम दानवले, श्री पांगारे, मनोज वाडकर, सार्थक काळे अजिंक्य कदम, रोहित चौगुले आणि श्री वाडकर यांनी केले.या उपक्रमामुळे दक्षिण पुणे परिसरात मराठी परंपरा आणि शाहीर संस्कृती जपण्यासाठी एक नवे व्यासपीठ निर्माण झाले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. भविष्यातही अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस जिवलग प्रतिष्ठानतर्फे व्यक्त करण्यात आला.
पुरंदर तालुक्यातील भैरवनाथ चैत्री उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अजय जगताप तर उपाध्यक्षपदी नितीन भोंगळे               सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                              सासवड तालुका पुरंदर येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर येथे चैत्री उत्सव कमिटीची वार्षिक बैठक होऊन, यात चैत्रिक उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी अजय गणपत जगताप यांची तर उपाध्यक्षपदी नितीन वसंतराव भोंगळे यांची बिनविरोध निवड झाली .या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी उद्योजक सुधाकर गिरमे हे होते, येथे श्री काळभैरवनाथ चैत्रि उत्सव मंडळाची रविवारी दिनांक आठ रोजी बैठक झाली, ही बैठक श्री काळभैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप व माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यात चैत्री यात्रेत होणाऱ्या कार्यक्रमाबरोबरच अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली ,तसेच मागील वर्षी झालेल्या उत्सवाचा आढावा घेण्यात आला, यावेळी माजी आमदार संजय जगताप , माजीअध्यक्ष रमेश जगताप, उपाध्यक्ष पांडुरंग भोंगळे, सुधाकर गिरमे, उत्सव कमिटीचे माजी अध्यक्ष रवींद्र शिरसागर, उपाध्यक्ष प्रकाश जगताप, कैलास कावडे बुवा, गिरी गोसावी महाराज,  उत्तम  जगताप,संग्राम जगताप, रामभाऊ इनामके आदी उपस्थित होते. नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी आमदार संजय जगताप व माजी पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला ,रविंद्र पंत जगताप यांनी सूत्रसंचालन केले, तर ट्रस्टचे सचिव विठ्ठल शिंदे यांनी आभार मानले.
महिलांचे सक्षमीकरण, कर्तुत्ववान, सन्मान, व्याख्याने, स्पर्धांनी महिला दिनांचा आनंदोत्सव सासवड मध्ये नगरपरिषद बालकल्याण समितीतर्फे स्वसंरक्षणाचे धडे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                   महिलांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या सोबतच स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे असून, चांगला आहार, पुरेशी झोप, मेडीस्टेशन आणि व्यायामाचा अवलंब करावा, तसेच दर सहा महिन्यांनी पोटाची सोनोग्राफी आणि छातीची तपासणी करून आपली जीवनशैली चांगली ठेवावी ,असे आवाहन प्रसिद्ध महिला रोगतज्ञ डॉक्टर सुचिता भालेराव यांनी केले आहे .सासवड नगर परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनांमध्ये हा कार्यक्रम झाला, कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनीताई जगताप, महिला रोग तज्ञ डॉक्टर सुचिता भालेराव, पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, महिला बालकल्याण समितीच्या सभापती प्रियांका जगताप, उपसभापती लीना वढणे यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलाने झाली. उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी स्त्रीला घर आणि समाजात योग्य असे स्थान असावे, एकमेकींचे ऐकून घ्यावे, आणि एकमेकींना पुढे घेऊन जा, हाच खरा महिला दिन आहे असे सांगितले.अर्चना पाटील यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करताना पालकांनी आपल्या किशोरवयीन मुलींशी मैत्रीचे नाते निर्माण करावे असा सल्ला दिला. यावेळी पायल वाघोले आणि दुर्गा थोपटे यांनी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. या सोहळ्यामध्ये महिला बचत गटांना उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यासाठी स्टॉल्स लावले होते, लकी ड्रॉ मध्ये दहा महिलांना पैठणी बक्षीस म्हणून दिली. याप्रसंगी मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण ,गोविंद लाखे, अजित जगताप, मंदार गिरमे, स्मिता जगताप आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन कार्यालयीन अधीक्षक नूतन जाधव, लिपिका प्राजक्ता राजगुरू ,अनुराधा भोकरे, एन. यु. एल. एम विभागाचे जस्मिन मंदाळे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपरिषद शाळेतील वर्षा राणी शिर्के, स्वाती देवकर, स्मिता जगदाळे व संतोष देवकर या शिक्षकांनी केले.
पुरंदर तालुक्यातील पुरंदर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे अमित झेंडे सभापती व शिवसेना (शिंदे गटाचे) प्रवीण जगताप उपसभापती यांची अनपेक्षित अशी युती          सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                     पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी, (शिवसेना शिंदे गटाची) अनपेक्षित अशी युती होऊन, राष्ट्रवादीचे अमित झेंडे सभापती व शिवसेना (शिंदे गटाचे) उपसभापती प्रवीण जगताप यांची अनपेक्षित  अशी युती होऊन, त्यांची निवड स्पष्ट करताना अमित झेंडे यांना सभापती पदासाठी फॉर्म भरला होता, तर भाजपकडून सायली शिंदे यांनी फॉर्म भरला होता, त्यामध्ये झेंडे यांना सहा मते तर शिंदे यांना दोन मते यामध्ये अमित झेंडे यांना सहा मते मिळाल्यामुळे, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अमित झेंडे तर उपसभापती पदासाठी (शिवसेना शिंदे गटाची) प्रवीण जगताप यांचा फॉर्म तर माऊली यादव यांनी उपसभापती पदासाठी फॉर्म भाजपतर्फे भरलेला होता यामध्ये जगताप यांना सहा मते तर यादव यांना दोन मते पडल्यामुळे, (शिवसेना शिंदे गटाचे) प्रवीण जगताप यांची उपसभापती पदी निवड झाल्याचे पिठासन अधिकारी उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रणोती श्रीमाळ, अति सहाय्यक निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील यांनी निवडणुकीच्या वेळी मदत करून, पिठासन अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांनी सभापती पदासाठी झेंडे व उपसभापती पदासाठी जगताप यांची निवड जाहीर केली, या मनोमिलनामुळे पुरंदर तालुक्यात राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलेली दिसून आली, पुरंदर पंचायत समितीमध्ये आठ जागांसाठी प्रामुख्याने, निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडे चार, शिवसेना शिंदे गटाकडे दोन, तर भाजपचे दोन सदस्य निवडून आले होते, सभापती पदासाठी आवश्यक असणारे पाच सदस्य कोणतेही पक्षासाठी नसल्याने, सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक प्रकारे किंगमेकर ची भूमिका होती, परंतु त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सह भाजपसोबत की,युती करणार याविषयी पुरंदरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पुढाऱ्यांनी आज सकाळी वेगळाच बदल घेऊन, अचानक शिवसेना शिंदे गटाशी सकाळी दहा वाजता झटका दिल्याने, नाट्यमय घडामोडी नंतर ,राष्ट्रवादी काँग्रेसनी शिवसेना शिंदे गट सोबत युती करत उपसभापती पद शिवसेनेला देण्याचा निर्णय घेतला, राजकीय दृष्ट्या भाजपशी युती होण्याची शक्यता जास्त अधिक मानली जात होती, परंतु राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर व विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्याशी साधलेले राजकीय समन्वय लक्षात घेऊन, अखेरशी शणी सोबत सत्ता स्थापनेसाठी निर्णय घेण्यात आला, यावेळी गटनेत्या राष्ट्रवादी स्मिता निगडे, अर्चना कटके, मोनिका कांबळे, माणिक निंबाळकर, सायली शिंदे ,माऊली यादव हे सदस्य ही तसेच जिल्हा परिषदेचे हरिभाऊ लोळे, रूपाली झेंडे, डॉक्टर प्राजक्ता दुर्गाडे, अजय इंगळे राष्ट्रवादीचे पुरंदर तालुक्यातील पदाधिकारी सदस्य, कार्यकर्ते, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सदस्य, युवक वर्ग, पत्रकार आदी उपस्थित होते. प्रामुख्याने या निवडीसाठी हात वर करून मतदान घेऊन निवड झाल्याचे निवडीसाठी पिठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांनी काम पाहिले, त्यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापती पदाची निवड जाहीर करण्यात आली, तसेच त्यांना निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती पिटासन अधिकारी उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांनी ही सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.
बोपगाव येथील श्रीक्षेञ कानिफनाथ गडावर "रंगपंचमी आनंदोत्सव याञा" उत्साहात साजरा                           सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                     लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोपगाव ( ता. पुरंदर ) येथील श्रीक्षेञ कानिफनाथ गडावर "रंगपंचमी आनंदोत्सव याञा" पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी झाली.      ८ मार्च रोजी पहाटे मंदिरात श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्टच्या वतीने पुजा, अभिषेक करण्यांत आला. दु. १२ वा. नाथांची आरती झाली. त्यानंतर १२.३० वा. पारंपारीक वाद्यांच्या गजरात प्रथम देवांच्या अंगावर रंग शिंपण्यांत आला. मंदिराच्या शिखरावरुन भाविकांच्या अंगावर रंगांची शिंपण करण्यांत आली. यावेळी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती. सर्व परिसर रंगांनी रंगून गेला होता. '' रंगपंचमी आनंदोत्सव यात्रा '' उत्साहात संपन्न झाली.    सकाळी ९ वा. बोपगाव येथून पालखी - काठी वाजत कानिफनाथ मंदिरावर गेली. त्यानंतर सासवड, भिवरी, गराडे, चांबळी, औताडवाडी, होळकरवाडी, वडकी, उरुळी देवाची येथील मानाच्या शिखर काठ्यांनी रंगपंचमी आनंदोत्सव यात्रेत सहभाग घेतला.     रंगपंचमी आनंदोत्सव यात्रेचे आयोजन श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानोबा फडतरे, उपाध्यक्ष दिपक फडतरे,सचिव जयवंत फडतरे, खजिनदार नागेश फडतरे, विश्वस्त शिवाजी जगदाळे , प्रकाशनाना का.फडतरे,सुरेश फडतरे, प्रकाशआप्पा का. फडतरे ,महादेव फडतरे, नितीन फडतरे,रमेश फडतरे, मंगेश फडतरे,सोनबा फडतरे व्यवस्थापक संतोष गोफणे, पांडुरंग बाठे , सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील विनायक गायकवाड उद्योजक उत्तम फडतरे आदीसह विविध पक्ष, संस्था, संघटना, मंडळे यांचे पदाधिकारी, बोपगावकर ग्रामस्थ यांनी केले.    कानिफनाथ गड पंचक्रोशीतील गावांनी गोपाळ जेवू घालण्याच्या कार्यक्रमात अन्नदान केले.बोपगाव ते कानिफनाथ मंदिरापर्यंत मोफत वाहनसेवा पुरविण्यात आली होती.बातमीसोबत फोटो पाठवीत आहे.फोटो ओळीः- बोपगाव ( ता. पुरंदर ) येथील श्रीक्षेञ कानिफनाथ गडावरील रंगपंचमी
पुरंदर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज महाराजसव अभियान 2026 शिबिर वाघापूर येथे उत्साहात संपन्न सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                ञ  मंडल स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज महाराजसव समाधान शिबिर अभियान वाघापूर तालुका पुरंदर येथील दुपारी एक वाजता गावातून बैलगाडीत मिरवणूक काढून, भैरवनाथ मंदिरापर्यंत आले, नंतर दिप प्रज्वलन करून, शिबिराचे विद्यमान आमदार विजय शिवतारे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत ,कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, स्मिता गौड भूमीअभिलेख अधिकारी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. शिबिरात बोलताना शिवतारे मनाले की, पुरंदर तालुक्यातील गणन्याय शिबिर घेतल्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांची असणारी प्रलंबित कामे त्वरित गतीने मार्गस्थ होतील, जिल्हा परिषद शाळेत शिकणारी मुले सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुले शाळा शिकत आहेत, चांगल्या अधिकारी पदी ग्रामीण भागातील मुलांची निवड झाल्यास, पुरंदरचा अभिमान जागरूक होतो, अशी शिवतारे यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी तथाप्रांत वर्षा लांडगे म्हणाल्या की, भोगावठादार, प्रलंबित वारस नोंद, सातबारा वाचन पूर्ण करून तुकडेबंदी कायदा रद्द करणे, जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व हस्तांतरण गावन्याय यादी करून व्यवहार हे नियमित करणार, असल्याचेही त्यांनी सांगितले. शाळेतील मुलांना शैक्षणिक दाखले, जन्म दाखला, मृत्यू दाखला, कुणबी दाखला, विविध असणाऱ्या दाखल्यांचा निपटारा सध्या होत असून, कोणतेही काम सर्वसामान्य शेतकऱ्यांचे अडवले जात नाही, असेही त्यांनी नमूद केले. तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सांगितले की, पाणंद रस्त्यांची दुरुस्ती, सर्वांसाठी घरे, अंतर्गत पट्टे वाटप प्रलंबित असणारे फेरफार निकाली काढण्याबाबत 1965  फेरफार रद्द झालेली आहेत, घरांचे प्रस्ताव जमा करून घरकुल सरकारची देणे आहेत.115 पाणंद रस्ते खुले करण्यात आलेले आहेत, 63 घरकुलांची यादी, तर 22000 रेशन कार्ड वाटप करण्यात आलेली आहेत, 31500 दाखले देण्यात आलेले आहेत, सातशे प्रकरणाचा निपटारा करण्यात आलेला आहे, 1154 फेरफार तर 785 दुरुस्तीची कामे ही प्रस्तावित कामे राजपूत यांनी नमूद केलेली आहेत, पंचायत समितीचे सदस्य माणिक निंबाळकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. पुढील शिबिर शनिवार दिनांक 14 मार्च रोजी शिवरी (वाल्हे) शिवरी येथे होईल, शुक्रवार 10 एप्रिल रोजी भिवडी नारायणपूर येथील नारायणपूर या ठिकाणी होणार आहे, शुक्रवार 17 एप्रिल रोजी परींचे येथे होणार आहे ,शुक्रवार आठ मे रोजी सासवड येथे होणार आहे, तर शुक्रवार या दिवशी पंधरा मे रोजी जेजुरी येथे या शिबिर संपन्न होणार आहेत. या शिबिरासाठी स्मिता गौड भूमी अभिलेख, कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, उमेश गायकवाड, प्रशासक व सरपंच वाघापूर येथील दिपाली कुंजीर, डॉक्टर विक्रम काळे, अनिल कांबळे महिला बालकल्याण पुरंदर पंचायत समिती, रूपाली झेंडे, माऊली यादव, रवींद्र फुल पगारे दुय्यम सहाय्यक निबंधक, सहाय्यक गट विकास अधिकारी अविनाश थोरात, अविनाश बडधे, गणेश मुळीक, मनोज कुंजीर, एडवोकेट गौरी कुंजीर, विजय कुंजीर ,बाळासो मगर, बाळासो कड, पत्रकार राजू शिंदे, राहुल शिंदे, हनुमंत वाबळे, दिपक कापरे, बापू मुळीक, समीर भिंगारदिवे, मंडल अधिकारी दुर्गादास शेळकंदे, तलाठी व विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, विद्युत मंडळ, आरोग्य विभाग सर्व प्रशासक विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते व वाघापूर गाव या ठिकाणचे सुद्धा प्रथम नागरिक, शेतकरी, बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन तलाठी प्रमोद झुरंगे यांनी केले, स्वागत एडवोकेट नितीन कुंजीर यांनी केले ,तर आभार प्रदर्शन निवासी नायब तहसीलदार संदिप पाटील यांनी मानले.
पुरंदर तालुक्यातील श्री शेत्र कोडीतला मस्कोबा महाराजांचा वजृलीप कार्यक्रमाचा शुभारंभ                                              सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      भाविक भक्त जना साठी पुरंदर तालुक्यातील कोडीत येथे वसलेले स्वयंभू आराध्य दैवत श्री नाथाचा पारंपारिक व धार्मिक विधीनुसार वज्रलेप विधीचा पवित्र असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, हा धार्मिक कार्यक्रम शनिवारी दिनांक सात मार्च 2026 ते रविवारी दिनांक 18 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये अत्यंत विधीवंत व शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न होणारा असून ,सदर कालावधीमध्ये वज्रलेप पाहिजे कामकाज अखंडितपणे सुरू राहणार असल्यामुळे मंदिराहतील गर्भगृह दहा-बारा  दिवस भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरता बंद ठेवण्यात येईल, मात्र भाविकांना सभा मंडपात दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी उत्सव मूर्तीचे दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे ,ज्यामुळे सर्व भक्तांना श्रीनाथ महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेता येईल, याबरोबरच मंदिरातील दैनंदिन पूजा आरती व इतर धार्मिक विधी नियमितपणे सुरू राहतील, उत्सव मूर्तींना अभिषेक रविवार व अमावस्या छबिना तसेच महाप्रसाद नेहमीप्रमाणे चालूच राहील, वज्रलेप विधी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर रविवारी दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी मंदिराचे घर बगृह, घाबरा पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुला करण्यात येईल, या पवित्र कार्यात सर्व भक्त भाविकांनी सहकार्य करण्याचे गरज आहे. पुढील कार्यक्रम साठी सविस्तर अशी रूपरेषा श्रीना देवस्थान ट्रस्ट व कोडित ग्रामस्थ यांच्या वतीने कळविण्यात आलेली आहे ,याबाबत सविस्तर माहिती श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ कोडीत यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
निधन वार्ता हौसाबाई कामठे                                      सासवड प्रतिनिधी :                                                        पुणे (कोंढवा बुद्रुक) येथील रहिवासी हौसाबाई सोपानराव कामठे (92 वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, एक मुलगी असा परिवार आहे.व्यवसायिक दशरथ कामठे, व्यवसायिक वसंत कामठे, व्यवसायिकशशिकांत कामठे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या त्या मातोश्री होत.फोटो : हौसाबाई कामठे
पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषदेची थकबाकी दारावर कडक कारवाई                                                        सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     शहराच्या विकासासाठी आणि नागरी सुविधा अखंडित ठेवण्यासाठी सासवड नगर परिषदेने घरपट्टी आणि पाणीपट्टीची मोठी थकबाकी असलेल्या मालमत्ता धारका विरुद्ध मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली धडक वसुली मोहीम हाती घेतलेली आहे. यामध्ये 25,000 पेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्यांची नळ जोड खंडित करण्यास सुरुवात झाली असून, बड्या थकबाकीदार यांचे गाळे सील करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे, नगर परिषदेकडून वसुलीसाठी पाच विशेष पथके कार्यरत करण्यात आलेली आहेत, शहरात सध्या 444 मालमत्ता धारक असे आहेत ,ज्याची थकबाकी २५ हजार रुपयांच्या वर आहेत, तर 64 जणांची थकबाकी एक लाख रुपयांच्या ही पुढे गेलेली आहे ,अशा सर्व बड्या थकबाकी दारावर पालिकेने कायदेशीर कारवाई सुरू केली असल्याचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी सांगितले आहे. वारंवार सूचना देऊन एक कर न भरणाऱ्या नागरिकांची नावे आता शहरातील मुख्य चौकातील डिजिटल फलकावर प्रसिद्ध केली जाणार आहेत, केवळ नळ जोडून कापून न थांबता मालमत्ता जप्त करणे सील ठोकणे आणि जप्त मालमत्तेची विक्री करणे अशी कठोर पावले पालिका उचलणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.सासवड नगर परिषदेची सुट्टीच्या दिवशीही कर भरणा सुरू नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार आणि रविवार देखील नगरपरिषद कार्यालयात कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, तसेच नागरिक ऑनलाईन पद्धतीने आपला थकीत कर भरू शकतात, शहराचा विकास हा नागरिकांच्या करावर अवलंबून असतो, त्यामुळे कायदेशीर कारवाई नळजोड खंडित करणे किंवा मालमत्ता सील करणे यासारखी कटू पावले उचलण्यापूर्वी नागरिकांनी स्वतःहून घरपट्टी व पाणीपट्टी भरून सहकार्य करावे डॉक्टर कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगर परिषद.
पुरंदर तालुक्यातील ऑस्करवाडी तलावा मधील दोन तरुणांचा मृत्यू                                                        सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्यातील ऑस्करवाडी येथील तलावा मध्ये पोहोण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, ही घटना बुधवारी घडली असून सायंकाळी घडलेली आहे ,पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश मोहित चौधरी वय 18 आणि हनुमंत बाबुराव पुजारी वय 19 दोघेही राहणार नगर होस्टेल चौक पुणे  आपल्या मित्रासोबत ऑस्करवाडी येथील तलावावर कोणासाठी गेले होते मात्र तिघांनाही पोहता येत नसल्याची माहिती समोर आली आहे, सायंकाळी तलावात आंघोळ करत असताना ,हनुमंत पुजारी याचा पाय घसरून पाण्यात पडला होता, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये प्रथमेश चौधरी पाण्यात उतरला मात्र तोही खोल पाण्यात पडल्याने बुडाला असून ,त्यावेळी त्याचा मित्र साहिल गणेश भवाळ वय 19 राहणार अप्पर इंदिरानगर काही अंतरावर गेला होता ,साहिलने आजूबाजूला मदतीसाठी धाव घेतली मात्र परिसरातील काही युवकांनाही पोहता येत नसल्याने, मदत मिळू शकली नाही त्यानंतर त्याने डायल 112 वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक कुमार कदम, उपनिरीक्षक आचॅना पाटील ,हवालदार सुहास लाटणे, सचिन किवळे ,तेजस शिवतारे यांनी तातडीने शोधमोहिम  सुरू केली असून ,सासवड पोलिसांनी भोर येथील रेकेनयु टीम व  पोलीस पाटील सचिन दळवी,ऑस्करवाडी चे मनोहर पायगुडे ,गणेश दळवी, परशुराम पायगुडे मदतीने दोन्ही तरुणांना तलावातून बाहेर काढले, असता त्यांना तातडीने सासवड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले ,या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये याबाबत नोंद करण्यात आली आहे.
पुरंदर तालुक्यातील माळशिरस गणामध्ये विजेचा जबरदस्त ताण;तर 22 ठिकाणी ट्रान्सफॉर्मर वाढवण्याची मागणी माऊली यादव यांचे विद्युत मंडळाला निवेदन                 सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस गणातील वाढत्या विविध ,लोड शेडिंग मुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना वारंवार अडचणीचा सामना करावा लागत असल्याकारणाने, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून 22 ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवावेत व विद्यमान यंत्रणा अशी सक्षम करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य माऊली यादव यांनी निवेदनाद्वारे केली आहे, यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता गवई यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. माळशिरस, राजुरी, पिंपरी ,मावडी, नाझरे सुपे ,नायगाव, रिसे, पिसे पोंढे, पांडेश्वर, नाझरे कडेपठार,  रानमळा ,कोथळे ,ढालेवाडी आदी गावांमध्ये वाढत्या विजेच्या तणावामुळे पुरवठा खंडित होणे, होल्टेज कमी जास्त होणे ,अशा समस्या निर्माण झाल्या आहेत, यावर सक्षम असा उपाय म्हणून 15 ठिकाणी 100 केवी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर वाढवणे आणि सात ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे आवश्यक असल्याचे यादव यांनी नमूद केले आहे ,तसेच अनेक ट्रान्सफॉर्मर चे पियुज बॉक्स खराब झाले असून, ते तातडीने बदलणे गरजेचे आहे अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांना झोळ आल्याने ,शेतामध्ये ऊस लागवड चालू असताना ,ठिणग्या पडून पिकांचे नुकसान होत आहेत, त्यामुळे तारांची दुरुस्ती करून, झोळ काढावेत अशी ही मागणी केली आहे ,नवीन ट्रान्सफॉर्मर आणि दुरुस्ती मुळे वीज पुरवठा अधिक सुरळीत होऊन सिंचन व्यवस्था सक्षम होईल व भविष्यातील वाढत्या मागणीची पूर्तता करणे शक्य होईल, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केलेला आहे, याबाबत सविस्तर सगळी माहिती त्यांनी प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील पिसे येथील पाणीटंचाई टँकरची मागणी पुरंदर पंचायत समितीकडे; तर चोपणाचा तलावा मधील शेतकरी वर्गाने परवानगी नसताना शेतीसाठी पूर्ण तलाव रिकामा केला                                                        सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                      पिसे तालुका पुरंदर येथील चोपणाचा तलाव येथील मागील फेब्रुवारी ते एप्रिल मे 2025 मध्ये गाळ काढून पूर्ण तलाव हा भरगच्च हा जुलै महिन्यात भरलेला होता, परंतु गाळ काढताना ग्रामसेविका व सरपंचांनी ग्रामसभा, शेतकरी गाव पातळीवर, सदस्य यांना कोणालाही न विचारता मनमानी कारभार करून, गावातील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी संतोष राजाराम मुळीक यांनी 16 ते 20 जणांचे तीन महिन्यामधील गाळ काढताना कंपनीच्या सदस्याच्या  नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचे जेवण तीन महिने पुरवली त्यातील, काही रक्कम निवडक शेतकऱ्यांनी रक्कम संतोष मुळीक यांची जमा केली, तर ग्रामपंचायतीने सुद्धा दहा हजार रुपयाचा चेक एकदा ग्रामसेविका व सरपंच यांनी काढला होता परंतु त्यानंतर 62 हजार रुपये बिल दहा महिने ते बारा महिने झाले अद्याप पर्यंत त्याचा व्यवहार पूर्ण केलेला  नाहीत,ग्रामसेविका व सरपंच यांच्याशी व्यवहार असताना सुद्धा आत्तापर्यंत 62 हजार रुपये बिल सर्वसामान्य शेतकरी संतोष मुळीक याचे बील जमा नाहीत. शेतकरी संदिप गणपत मुळीक, देवानंद कड, संजय निवृत्ती चव्हाण यांनी खाजगी मालमत्ता असताना माजी उपसरपंच शांताराम मारुती मुळीक या शेतकऱ्यांनी या व्यक्तीकडून रक्कम घेऊन परवानगी दिली, यामध्ये भूमी अभिलेखची मोजणी झाली नाही, लघुपाटबंधारे विभाग कोणतीही नोंदणी झालेली नाही, आता जी परिस्थिती पाण्याची झाली आहे त्या तीन विहिरी शेतकऱ्यांच्या आहेत, त्यात जास्त खोल असणारी वीर ही ग्रामपंचायतकडे वर्ग करण्यासाठी  लघुपाटबंधारे  विभाग, गट विकास अधिकारी, तहसीलदार यांनी अधिसूचना देऊन, विहिरी अधिकृत करावी, बाकी दोन विहिरी परवानगी घेतली नाही, त्यामुळे नोंद तलाठी व मंडल अधिकारी यांनी करू नये, तसेच भूमी अभिलेखने मोजणी करून ती जागा लघुपाटबंधारे विभागाकडे वगॅ  करावी, त्या ठिकाणी कारण तलाव पूर्ण भरलेल्या असताना, पाणी उपसा केल्यामुळे गावावरची परिस्थिती ओढवली आहे, ती तीन शेतकऱ्यांमुळे परिस्थिती झालेली आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार तीन विहिरी मालक आहेत, त्यासाठी 62 हजार रुपयाची बिल अदा करावे, लघु पाटबंधारे यांची परवानगी घेतल्याशिवाय पाणी उपसा करू नये, एक विहीर खोल असलेली पिसे ग्रामपंचायतकडे वर्ग करावी, तर राहिलेल्या दोन विहिरी नोंद करू नये, परंतु परवानगी असल्याशिवाय पाणी उपसा करू नये ,म्हणून यावर पाणीटंचाई असताना टँकरची जर पिसे गावाला गरज असताना, 23 ,24, 25 मार्च गावची जत्राच रोजी असताना गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद यांनी तीन विहिरीवर माजी उपसरपंच, ग्रामसेविका, सरपंच यावर कारवाई करून 62 हजार रुपयाची बिल काढून देण्यास सहकार्य करावे, व एक विहीर पिसे ग्रामपंचायतकडे वर्ग करून जो गावासाठी विहिरीचा निधी मंजूर झाला आहे तो खोल असणाऱ्या विहिरीवाल्याकडे वर्ग करून गावाची पाण्याची सोय करावी, जेणेकरून टँकरची मागणी होणार नाही ,याची दक्षता ही त्वरित गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही त्वरित करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे, अशी माहिती प्रतिनिधीला देण्यात आली.
पुरंदर तालुक्यातील कोडित येथे धर्मवीर बलिदान मास            सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      कोडित तालुका पुरंदर येथे धर्मवीर बलिदान मासादिनानिमित्त श्रद्धांजली जागृतीसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, यावेळी हर्षद बडधे,सागर खोमणे, जयदीप बडधे, अमित बडधे,प्रदीप बडधे,अक्षय बडधे,आकाश बडधे आधी उपस्थित होते. श्री देवस्थान म्हस्कोबा महाराष्ट्र कोडित पदाधिकारी व पुढील ग्रामस्थांची सहकार्य लाभले .सूत्रसंचालन मोहन तळेकर यांनी केले व आदेश सोनवणे यांनी आभार मानले.
पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्यावा ;तसेच सात बाधित गावातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भातील सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी विमानतळ संदर्भात योग्य असा निर्णय मुख्यमंत्री यांनी घ्यावा; असेपत्राद्वारे शेतकरी गणेश मोरे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी              सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी आर्थिक दृष्ट्या गंभीर संकटात सापडला असून, सर्वसमावेशक कर्ज माफीचा निर्णय हा तातडीने जाहीर करावा अशी मागणी पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गाव येथील शेतकरी गणेश काशिनाथ मोरे यांनी राज्य शासनाकडे केलेली आहे ,तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ होणाऱ्या ही शेतकऱ्यांच्या क्षेत्रातून असणाऱ्या सोयी सुविधांच्या मार्फत त्या ठिकाणी काही आणा ठाई गोष्टी या आतापर्यंत घडलेल्या आहेत, त्या संदर्भातील सुद्धा निवेदन हे मुख्यमंत्री यांना त्यांनी पत्राद्वारे दिले आहे, हे पत्र पाठवून शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणीकडे लक्ष वेधण्यासाठी या शेतकऱ्यांनी एक प्रकारे  पत्र लिहून मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहे. त्यांनी या पत्रात असे नमूद केले आहे की, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि शेतीमालाला सातत्याने मिळत नसलेला हमीभावामुळे, राज्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे अडचणीत आलेला आहे, अनेक वर्षापासून कर्जमाफीच्या आशेवर असणारा हा शेतकरी आजही शासनाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे, स्पष्ट धोरण जाहीर न झाल्यामुळे, ग्रामीण भागात संभ्रम अशी अवस्था निर्माण झालेली आहे, विमानतळाच्या संदर्भातील सुद्धा संभ्रमावस्था झाली असताना, त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय यांना चुकीची माहिती पुरवलेली आहे, त्यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवले आहे, तर त्या संदर्भातील मुख्यमंत्री यांनी दोन्ही गोष्टीच्या संदर्भात निर्णय त्वरित घ्यावा, दरवर्षीप्रमाणे मार्चपयॅत कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकांकडून वसुलीचा तगादा लावला जातो, मात्र कर्जमाफीबाबत शासनाकडून ठोस निर्णय नसल्याने, शेतकरी मोठ्या मानसिक तणावाखाली आहे, कोणते कर्ज माफ होणार ,आणि कोणते नाही, कर्जमाफीचे निकष काय असणार? याकडे स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अनिश्चितीचे वातावरण निर्माण झालेले आहे, तर मोरे यांनी विमानतळ संदर्भ व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात पत्रामध्ये नमूद असे केलेले आहे की, नियमित कर्ज पेड करणारे आणि थकबाकीदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच शासनाने सकारात्मक निर्णय जाहीर केला पाहिजे, 31 मार्च 2026 पर्यंत भराव्या लागणाऱ्या पीक कर्जाच्या दडपणातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य टिकून राहण्यास मदत होईल, विलंबाच्या कारणामुळे ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे, सध्या कर्ज वसुलीच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी कर्ज भरण्याच्या मानसिकतेत नसल्याचेही स्पष्ट झालेले आहे ,परिणामी विविध कार्यकारी सोसायटीवरील आर्थिक ताण वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे शून्य टक्के व्याज योजनेचा लाभ घेण्यातही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत, शासनाच्या निर्णयातील विलंबामुळे संपूर्ण ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याची चिंता एक प्रकारे व्यक्त केली जात आहे, राज्यातील शेतकऱ्यांमधील कर्जमाफी बद्दलचा संभ्रम हा दूर करावा तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भातील जी माहिती पुरवली गेली आहे जिल्हाधिकारी यांच्याकडून ती सुद्धा माहितीमध्ये मुख्यमंत्र्याकडे माहिती पुरवलेली खूप तपावत आहे, स्पष्टता उल्लेख करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी पुरंदर मध्ये सात गावांमध्ये विमानतळाच्या ठिकाणी येऊन, स्पष्ट वक्तव्य करावे! शासनाने केवळ आश्वासन न देता, कर्जमाफी बाबत स्पष्ट भूमिका जाहीर केली पाहिजे, निकष पारदर्शकपणे मांडावेत, आणि शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे ,राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून, लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतल्यासच, ग्रामीण भागातील आर्थिक अस्थिरता कमी होईल, असेही त्यांनी त्या ठिकाणी पत्रामध्ये नमूद केलेले आहे, राज्यातील शेतकरी आणि अनेक वर्षापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून ,आता शासनाने विलंब न करता ,ठोस असा निर्णय घ्यावा अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागलेली आहे, तशीच आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भातील सुद्धा त्या ठिकाणी विमानतळाच्या संदर्भातून शेतकरी जे भेटायला गेले होते त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना काही गावातील शेतकऱ्यांना अजिबात मुख्यमंत्री यांच्या संघ बोलून दिले नाही, कारण त्यांना पूर्णपणे दमदाटी केली होती, जर तुम्ही काही बोलले तर त्या ठिकाणी तुमच्यावर कायदेशीर पद्धतीने कारवाई करू? असे त्या ठिकाणी हुकूमशाही पद्धतीने त्या ठिकाणी बजावण्यात आले होते, व त्या ठिकाणी मुख्यमंत्री यांना सुद्धा खोटी माहिती देऊन विमानतळाच्या संदर्भातील त्या ठिकाणी सहमती एवढी आहे परंतु प्रत्यक्षात माहितीच्या अधिकारात जाऊन पाहिली असता तेवढी सहमती ही विमानतळाच्या संदर्भात झालेली नाही, मग खोटी माहिती मुख्यमंत्री यांना दिली का? या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भातील त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी दिलेली मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती पूर्णपणे तपासण्यासाठी सात बाधिततील गावातील पूर्णपणे विमानतळाच्या संदर्भात त्या ठिकाणी पूर्ण माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री पुरंदर तालुक्याचे आमदार व जिल्हाधिकारी यांनी सात गावांमधील कोणत्याही एका ठिकाणी प्रत्यक्ष येऊन, विमानतळाच्या संदर्भातील चर्चा करावी ,परंतु एजंट यांच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही? ह्या गोष्टी स्वत: जिल्हाधिकारी यांनी समजून घेतल्या पाहिजेत, असेही शेतकरी गणेश मोरे यांनी पत्रामध्ये नमूद केलेले आहे.
पुरंदर तालुक्यातील दत्तात्रय फडतरे संगीत गौरव पुरस्काराने सन्मानित                                                                               सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                          पुरंदर तालुक्यातील सासवड येथील सोपानगर येथे असलेल्या संगीत विद्यालयात दत्तात्रय (तात्या) दगडू फडतरे यांना मेघ मल्हार संगीत विद्यालयाच्या वतीने संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठी 'संगीत गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. मेघ मल्हार संगीत विद्यालय यांच्या वतीने दिलेल्या पुरस्कार प्रदान कार्यक्रम प्रसंगी ख्यातनाम तबलावादक पंडित उमेश मोघे, यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी पंडित उमेश मोघे, तसेच सिद्धेश्वर मारटकर, सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य प्रसाद खाडे, मेघ मल्हार विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अमोल बेलसरे, यशवंत महाराज भोसले, श्रीकांत जाधवराव, संगीत विशारद मच्छिंद्र दीक्षित चंदुलाल तांबोळी, अनिकेत भोसले, श्रीनाथ वनारे आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ म्हस्कोबाच्या मुखवट्यांना स्नान तर श्री शेत्र वीर येथे चंद्रग्रहण काळातील धार्मिक विधी पूर्ण गंगा नदीवर पूर्ण                                                     सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         श्री शेत्र वीर तालुका पुरंदर येथे चंद्रग्रहण काळामध्ये श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व आई देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना पूर्ण गंगा नदीमध्ये स्नान घालण्यात आले, यावेळी देवाचे मानकरी, साल करी ,दागीनदार ,ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित असल्याचे देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मोहन धुमाळ यांनी सांगितले .पहाटे महापूजा  होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला, सकाळी सहा वाजता भाविकासाठी दर्शनासाठी खुला करण्यात आला ग्रहण स्पर्श करून दुपारी तीन वाजून वीस वेद लागले होते ,वेद सुरू झाल्यानंतर देऊळ वाड्याच्या दक्षिण दरवाज्याने श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व आई देवी जोगेश्वरी यांचे मुखवटे पूर्ण गंगा नदीमध्ये स्नानासाठी नेण्यात आले, सायंकाळी 6:48 ग्रहण मोक्ष झाल्यावर ,पुन्हा देवाच्या मुखवट्यांना पूर्ण गंगा नदीमध्ये स्नान घालून विधिवत पूजा करण्यात आली ,ग्रहण स्पर्श झाल्यापासून ते ग्रहण मोक्ष होईपर्यंत दगडी कासवावर गोसावी मंडळीचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम चालू होता ग्रहण काळामध्ये मंदिराच्या मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद केला होता, ग्रहणाच्या पूर्व नियोजन बैठक आयोजित करूनच नियोजन केल्याचे विश्वस्त मंडळ यांनी यावेळी सांगितले.
पुरंदर तालुक्यातील बेकायदा हुक्का पार्लरचा सासवड या ठिकाणी सुळसुळाट                                                 सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील फोफावलेल्या बेकायदा हुका पार्लर मुळे तरुण पिढी उध्वस्त होत असून ,हे प्रकार तातडीने बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन हक्क परिषदेच्या वतीने देण्यात आलेला आहे ,या संदर्भात परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष डुबल,सचिव कैलास धिवार, अजिम आतार यांनी सासवड पोलीस स्टेशनला हे निवेदन दिलेले आहे ,निवेदनात नमूद केल्यानुसार सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील छुप्या पद्धतीने बेकायदा हुका पार्लर सुरू आहेत ,या ठिकाणी शाळकरी मुले व  college साठी तरुण जात असून व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे, यामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत असून, गोरगरीब पालकांचे संसार उघड्यावर येत आहेत ,या हुक्का पार्लरमुळे परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली असून ,'आम्हाला भीक नको तर राज्यघटने दिलेले हक्क हवेत 'अशी भूमिका मांडत बहुजन हक्क परिषदेने पोलिसाकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे संबंधित हुक्का पार्लरवर तातडीने छापे टाकून ते कायमचे बंद करावेत ,अशी मागणी केली आहे जर पोलिसांनी या बेकायदा धंद्यावर वेळीच लगाम घातला नाही तर ,स्थानिक नागरिकांच्या मदतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा ही इशारा बहुजन हक्क परिषदेच्या वतीने देण्यात आलेला आहे.
"कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात संपन्न"                                 सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय ( Cummins College of Engineering for Women) पुणे यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दि. २४ फेब्रुवारी २०२६ ते  २ मार्च २०२६ या कालावधीत पुरंदर तालुक्यातील मु. पो. एखतपूर–मुंजवडी येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले.शिबिराची सांगता उत्साहपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आली. स्वयंसेविकांनी गणेश वंदना, भक्ती नृत्य आणि पथनाट्य सादर करून कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले.समारोप प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. शुभांगी चौधरी यांनी शिबिरातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला. या साप्ताहिक शिबिरामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.स्वयंसेवकांनी गावच्या भंडाऱ्यात जेवण वाढण्याचे सेवा कार्य केले तसेच कावड यात्रेसाठी रांगोळी काढण्यात सहभाग नोंदवला. ग्रामस्वच्छता व श्रमदान, ग्राम कुटुंब सर्वेक्षण आणि शाळा परिसर स्वच्छता असे उपक्रम राबविण्यात आले. माध्यमिक शाळेत पाणी व्यवस्थापन व शाश्वत विकास विषयावर व्याख्यान देण्यात आले तसेच पाणी व्यवस्थापन व व्यसनमुक्ती जनजागृती फेरी काढण्यात आली. प्लास्टिक पुनर्वापर सत्रामध्ये कापडी पिशव्या व इको-ब्रिक यांची माहिती देण्यात आली. प्राथमिक शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन व बक्षीस वितरण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांसोबत झुंबा उपक्रमही घेण्यात आला. याशिवाय “गडकिल्ले – ऐतिहासिक वारसा” या विषयावर व्याख्यान,प्राथमिक शाळेत वैज्ञानिक प्रयोग, मराठी गौरव दिन साजरा करणे, झाडांना पाणी देणे तसेच आरोग्य शिबिरामध्ये ग्रामस्थांसाठी मधुमेह तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदाब तपासणी व इतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.तसेच ग्रामस्थांना “मेरी ग्रामपंचायत” अँप इंस्टॉल करण्याचे मार्गदर्शन करून त्याच्या वापराबाबत माहिती देण्यात आली. तसेच ममता बाल सदनास भेट व गावचा इतिहास जाणून घेतला. ज्यास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.समारोप कार्यक्रमासाठी एखतपूर–मुंजवडी गावाच्या सरपंच शितल टिळेकर, उपसरपंच  रेश्मा मुलानी, माजी उपसरपंच तुषार झुरंगे,सदस्य विद्या झुरंगे, कृषी बाजार समितीचे उपसभापती महादेव नाना टिळेकर, विद्या निंबाळकर ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक  कृष्णा देवकाते सर, शिवशंभो माध्यमिक शाळेचे शिक्षक ठोंबरे सर , डॉ .निनाद खळदकर तसेच ग्रामपंचायत कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.विद्यार्थी प्रतिनिधी कु. आर्या कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी खांबेटे यांनी आपल्या भाषणात निस्वार्थीपणा, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. शुभांगी चौधरी यांनी सर्व ग्रामस्थ, मान्यवर व सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.हे शिबिर प्राचार्या डॉ. माधुरी खांबेटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. शुभांगी चौधरी,  शशिकांत सोमण,  अजय पुरंदरे, समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने उत्तमरीत्या पार पडले. ग्रामविकास, सामाजिक बांधिलकी आणि शाश्वत जाणीव दृढ करणारे हे शिबिर विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरले.
पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे संगणक कक्षाचे उद्घाटन व विज्ञान दिन उत्साहात साजरा.                 ण   सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                  विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपले कौशल्य विकसित करावे  : अभयकुमार साळुंखे  सासवड येथील पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या विद्यमाने अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असा ५० संगणकांचा संगणक कक्ष उभारण्यात आला असून त्याचे उद्घाटन  मा.अभयकुमार साळुंखे कार्याध्यक्ष,  श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांच्या शुभहस्ते पार पडले. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय विज्ञान दिन देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर संगणक कक्षाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. नव्याने उभारण्यात आलेल्या या संगणक कक्षात ५० अत्याधुनिक संगणक, इंटरनेट सुविधा, प्रोजेक्टर तसेच आवश्यक तांत्रिक साधनसामग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी बोलताना अभयकुमार साळुंखे यांनी डिजिटल युगात संगणक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपले कौशल्य विकसित करावे, असे आवाहन त्यांनी केले. स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयक घोषवाक्ये देत वातावरण उत्साही केले. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून विज्ञान दिन साजरा केला. या उपक्रमामुळे परिसरात आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. मनोगत व्यक्त करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष  संतोष जगताप यांनी सांगितले की, आधुनिक शैक्षणिक सुविधा व वैज्ञानिक दृष्टीकोन या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत. संगणक कक्षामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळणार असून भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी त्यांना मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर संगणकीय शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठान मार्फत गरजू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य सुद्धा करण्यात येणार आहे.कार्यक्रमास  प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, प्राचार्य इस्माईल सय्यदसर,अरुणआप्पा  जगताप माजी संचालक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, रावसाहेबआण्णा पवार ज्येष्ठ साहित्यिक, सुयश इन्फोटेक चे चैतन्य भोसलेसर,साक्षी मेमाणे, शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी सुनेत्राा पवार; 85 वर्षांमध्ये पहिल्यांदाच महिला अध्यक्ष                            सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                         पुणे जिल्हा शिक्षण मंडळच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सर्वानुमती निवड करण्यात आली आहे, संस्थेच्या मुख्य कार्यालयात रविवारी दिनांक एक मार्च रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, संस्थेच्या 85 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला आहे , 2006 पासून अध्यक्ष पदाची  पवार सांभाळणारे अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातातील निधनानंतर हे पद रिक्त होते, सभेच्या प्रारंभी अजित पवार विमानातील अंगरक्षक व वैमानिक यांना श्रद्धांजली वाह्यात आली ,त्यानंतर मानदसचिव एडवोकेट संदीप कदम यांनी सुनेत्रा पवार यांच्या निवडीचा ठराव मांडला .उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली  सर्वानुमते मंजूर करण्यात आला मंडळाच्या अखत्यारीमध्ये 16 पर्व, प्राथमिक सोळा, प्राथमिक 56, माध्यमिक ,व 31 उच्च माध्यमिक शाळा कार्यरत आहेत ,23 ठिकाणी व्यावसायिक अभ्यासक्रम, 8 पारंपरिक महाविद्यालय तसेच फार्मसी ,एमबीएला आयुर्वेद ,अभियांत्रिकी व आर्किटेक्चर महाविद्यालय चालतात, सुमारे 84 हजार विद्यार्थी व 3697 शिक्षकीय तर कर्मचारी संस्थेत कार्यरत आहेत, अजित पवार यांच्या कार्यकाला मध्ये डिजिटल स्टुडिओ अट्टल टिकरींग लॅब संशोधन प्रोत्साहन कौशल्य विकास क्रीडा महोत्सव यासारखे उपक्रम राबवण्यात आले, दहावी बारावी निकालात संस्थेने सातत्याने आघाडी घेतली आहे आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीस नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे, यावेळी संस्थेचे खजिनदार एडवोकेट मोहनराव देशमुख, उपसचिव एल .एम. पवार ,सहसचिव ए .एम जाधव यांच्या संस्थेचे आजीव सभासद उपस्थित होते, एल एम पवार यांनी आभार मानले.
डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व वन विभाग जेजुरी नगरपरिषद तर्फे महास्वच्छता अभियान 70 ते 80 श्री सदस्यांच्या सहभागातून 100 .118 टन कचरा संकलन             सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           थोर समाजसेवक जेष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त एक मार्च पुणे शहर तसेच जिल्ह्यातून रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथील डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या हजारो सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवले पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री दत्तात्रय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी डॉक्टर सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली, श्री मार्तंड देवस्थान परिसरातून लागून असलेली वनक्षेत्र वनउद्यान यांची जुनागड ते कडे पठार जाणारा रस्ता या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले, सदर अभियाना 70 ते 80 स्वयंसेवक व वन विभाग अधिकारी, कर्मचारी, जेजुरी नगरपरिषद कर्मचारी, देवस्थान प्रतिनिधी, देवस्थान परिसरातील दुकानदार, आदींनी सहभाग घेतला होता, सदर अभियान अंतर्गत झिरो पाच ट्रॅक्टर एवढा कचरा गोळा करण्यात आला, त्यानुसार वन विभाग मार्फत जेजुरी गड परिसरात येणाऱ्या भाविकांना अशीही आव्हान करण्यात येत आहे की, वनक्षेत्र व परिसरात येत असताना, प्लास्टिक बॉटल ,प्लास्टिक पेपर मधील खाद्यपदार्थ याचा वापर सोय स्फूर्तीने टाळावा, तसेच कचरा हा कचरा पेटीमध्येच टाकावा, ज्या पद्धतीने मंदिराचे पावित्र्य राखले जाईल असे आव्हानही करण्यात आलेले आहे.
Load More That is All