पुरंदर तालुक्यामध्ये मतदानाला सुरुवात झाली असून 3:30 वाजता 50 .75% मतदान सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यामधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शनिवारी शांततेत मतदान सुरू झाले असून, सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे, पहिल्या दोन तासांमध्ये तालुक्यातील विविध गटामधील पुरुष 9,537 महिला 5,812 एकूण 15,349 तर 8.10% मतदान झाले असून, त्यानंतर साडेअकरा वाजता मतदानाला टक्का वाढून पुरुष 22,693 महिला 18,053 एकूण 40,746 असून 21.51 टक्क्यापर्यंत पुरुष 35,897 महिला 35,217 एकूण 71,114 असेल 1:30 वा 37.55 टक्केपयॅत तर पुरुष 49,092 महिला 47,038 एकूण 96,130 असून, 3:30 पयॅत 50.75 टक्के मतदान पोहोचल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांनी दिली. तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटांमधील मतदारांचा समिश्र प्रतिसाद असा दिसून येत आहे, गराडे गटामध्ये सर्वात अधिक 59.75% मतदान झाले आहे दिवे गटात 57.98% मतदानाची नोंद झाली असून, बेलसर गटात 48.22% माळशिरस गटात 49.7% वीर गटात 49.13% मतदान झाले आहे भिवडी गटात 46.82% नीरा गटात 46.09% तर कोळविहीरे गटात 48.13% मतदान झाले आहे. आजच्या सत्रामध्ये मतदान केंद्रावर मतदारांची हळूहळू वाढती गर्दी दिसून येत होती, विशेषत जेष्ठ नागरिक व महिला मतदारांनी सकाळच्या वेळेमध्ये मतदान करण्यास प्राधान्य दिल्याचे चित्र आहे, प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, दुपारनंतर मतदानाच्या टक्केवारी मध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, प्रशासनाने पात्र मतदारांनी निर्भयपणे व उत्साहाने मतदान करावे, असे आव्हान केले आहे, यावेळी अति सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, पोलीस वांजळे प्रियंका या सुद्धा उपस्थित होत्या, पुरंदर तालुक्यातील दिवे ,वनपुरी, कुंभारवळण, एखतपुर, मुंजवडी, पारगाव,हिवरे, बेलसर या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांनी प्रत्येक बूथ वर त्या ठिकाणी जाऊन भेट दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments