Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील देवस्थान जमिनीसाठी सासवडकर एकवटले सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ श्री भैरव देवाच्या मालकीच्या इनामी वर्ग तीनच्या सुमारे आठ एकर जमिनीच्या व्यवस्थापन देखभाल आणि संरक्षणासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी श्री काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टच्या ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभा आयोजित केली आहे, ही सभा गुरुवारी दि. सकाळी दहा वाजता श्री काळभैरवनाथ मंदिर येथे होणार आहे. या संदर्भात श्री काळभैरवनाथ मंडळ ट्रस्ट आणि पुजारी भैरवकर मंडळींनी सोमवारी दि. 13रोजी पत्रकार परिषद घेऊन, माहिती दिली. ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थानची इनाम जमीन बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला, देवस्थानच्या नियमासाठी मिळालेली ही जमीन ज्या टकले कुटुंबीयांकडे करण्यासाठी देण्यात आली होती, त्यांनी ती परत करण्यास नकार दिला असून, ताबा सोडण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप मोहन भैरवकर आणि देवस्थान ट्रस्टने केला आहे, यावेळी चैत्य उत्सव समितीचे उपाध्यक्ष प्रकाश जगताप ,गाव पाटील संग्राम जगताप, राजेंद्र जगताप यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या सामाजिक हितासाठी आणि सार्वजनिक धार्मिक संपत्तीचे संरक्षण सुनिचित करण्याच्या उद्देशाने हे सभा बोलाविण्यात आली होती. देवस्थानच्या जमिनीवरील वर्तमान स्थिती आणि कायदेशीर दर्जाची माहिती देणे, धार्मिक सांस्कृतिक परोपकारिक कार्य नियमित ठेवण्यासाठी ग्रामस्थांचे मत आणि सूचना संकलित करणे आणि जमिनीच्या सुरक्षतेसाठी व अतिक्रमण रोखण्यासाठी ग्रामस्थांचे मत घेणे हे सभेचे मुख्य उद्देश असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप यांनी सांगितले. याप्रसंगी माजी आमदार संजय जगताप, ट्रस्टचे उपाध्यक्ष पांडुरंग भोंगळे पुजारी राजेंद्र भैरवकर, चैत्य उत्सव कमिटीचे अध्यक्ष रविंद्र शिरसागर, मोहन जगताप, विजय जगताप, वैभव जगताप, सचिव विठ्ठल शिंदे यास ग्रामस्थ व भैरवकर मंडळी उपस्थित होते. रवींद्र पंत जगताप यांनी स्वागत करून, आभार मानले.

Post a Comment

0 Comments