Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पुरंदर साठी एकाच गावाचे व आडनावाचे उमेदवार असल्याने डोकेदुखी ठरणार सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: 7 फेब्रुवारी रोजी शनिवार या दिवशी होत असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी 19 पंचायत समितीच्या आठ जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात उतरलेले असून, 22 महिला व 30 पुरुष यात आपले भवितव्य आजमावत असून, या निवडणुकीमध्ये योगायोग म्हणजे एकाच गावातील आणि एकाच आडनावाचे उमेदवार निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, लढाई जिल्हा परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून ज्योती झेंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रुपाली झेंडे या दोन्ही दिवे गावच्या उमेदवार रिंगणामध्ये उभे आहेत, बेलसर जिल्हा परिषदेच्या जागेसाठी भाजपच्या अजय इंगळे, व शिवसेना रमेश इंगळे दोन्ही वाळूज गावचे तर राष्ट्रवादीचे गौरव कोलते राष्टवादीकडून लढणारे शहाजी कोलते दोघे पिसवॅ गावचे उमेदवार आहेत, वीर गटात देखील राष्ट्रवादीकडून पुष्कराज जाधव व शिवसेनाकडून समीर जाधव हे परिंचे गावचेच उमेदवार आहेत, जिल्हा परिषद गटासाठी जिल्हा परिषदेप्रमाणेच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा देखील अशी स्थिती असून, गराडे गणातून अर्चना कटके या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर ललिता कटके या भाजपच्या उमेदवार असून, दोघी भिवरी गावच्या आहेत, माळशिरस गणात अजिंक्य कड राष्ट्रवादीचे व संदीप चौंडकर हे अपक्ष उमेदवार नायगावचेच आहेत, तर याच गणात माऊली यादव भाजप तर शरद यादव शिवसेनेचे उमेदवार असून, दोघे माळशिरस गावचे रहिवासी आहेत, भिवडी गणात शिवसेनेच्या पूजा मोकाशी व भाजपाच्या सायली शिंदे या भिवडी गावच्या तर वीर गणातील काँग्रेस उमेदवार महेश धुमाळ व भाजपा उमेदवार सुधीर धुमाळ हे दोघेही वीर गावचे आहेत नीरा गणात देखील राष्ट्रवादीच्या मोनिका कांबळे व शिवसेनेच्या रेखा केदारी या निरा गावच्या उमेदवार आहेत, आडनावातील साधर्म्य व एकाच गावातील विविध पक्षांचे उमेदवार यामुळे, मतदार आणि उमेदवार यांची परंतू डोकेदुखी ठरणार असून, संभ्रम निर्माण होणार असल्याचेही चित्र पहावयास मिळत आहे.

Post a Comment

0 Comments