Hot Posts

6/recent/ticker-posts
Showing posts from February, 2026Show All
पंचायत समिती सभापती साठी 9 मार्चला निवडणुका सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                          पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी 9 मार्चला निवडणुका होणार असल्याचे जिल्ह्यामध्ये राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. जिल्ह्यातील 13 पंचायत समितीच्या दोन्ही 146 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक 90 जागा विजय मिळवलेला असून, भाजपचे 28 सदस्य विजयी झाले आहेत ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 12 ,शिवसेनेने 10 ,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने चार, तर दोन अपक्ष सदस्य निवडून आलेले आहेत. 13 पैकी आठ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून, त्यांच्या पक्षाची सभापती, उपसभापती होणार आहेत, आंबेगाव ,शिरूर, मावळ, मुळशी, हवेली, पुरंदर ,वेल्हे, बारामती आणि इंदापूर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे ,त्यामुळे या ठिकाणी सभापती व उपसभापती पदावर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील, मात्र जुन्नर ,खेड, दौंड आणि भोर येथील चित्र रंगतदार होणार आहे, जुन्नर मध्ये शिवसेना आघाडीवर असली तरी, राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत स्थितीमध्ये आहे, तर भोर मध्ये राष्ट्रवादी व भाजपचे समसमान सदस्य असल्याने, तेथे राजकीय समीकरणे निर्णयाक ठरणार आहेत, ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार 20 मार्चपूर्वी पहिली सभा घेणे बंधनकारक आहे, त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी 13 उपजिल्हाधिकाऱ्यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे, प्रशासनाने ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तयारी सुरू केली आहे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी लक्ष हे कायम! जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे, 17 मार्चला ही निवडणूक होण्याची शक्यता आहे, तर अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे ,त्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 73 पैकी 51 गटांमध्ये विजय मिळवलेला आहे ,मात्र पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने, अंतर्गत चुरस वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुरंदर तालुक्यातून सभापती पदासाठी अमित झेंडे हे प्रमुख राष्ट्रवादीचे दावेदार आहेत, तर उपसभापती पदासाठी या पुरंदर तालुक्यामधील भाजपची साथ घेणार असल्याचे सूत्राकडून माहिती मिळाली आहे, तर उपसभापती पदासाठी माळशिरस गणातून व भिवडी गणातून उमेदवारी उपसभापती साठी देणे हे औचितत्याचे ठरणार आहे, तर विरोधी बाकावर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बेलसर गणातील व वीर गणातील हे विरोधी बाकावर बसण्याची शक्यता दाट आहे,अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे पिसाळलेल्या कुत्र्यांचा पाच जणांना चावा; तर लहान मुलांचाही यामध्ये समावेश; मध्यरात्री श्वान जेरबद्ध: या घटनेमुळे सासवड परिसरामध्ये घबराटीचे वातावरण !                                                                      सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                                सासवड येथील तारा दत्त पार्क परिसरातील शुक्रवारी दि. 27 रोजी रात्री एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने एका लहान मुलासह चार महिलांना चावा घेऊन जखमी केले, या घटनेमुळे परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या हल्ल्यात तारा दत्त पार्क मधील तीन वर्षाचा आरव राकेश जगताप तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक कमल मारुती जगताप यासह अकॅडमीच्या मिनल शिरसागर ,आर्या शेलार, सिंधी भिंताडे या विद्यार्थ्यांनी जखमी झाल्या आहेत, याबरोबरच शंभूराजे बापू मुळीक या लहान मुलावर या कुत्र्याने झडप घेतली होती, मात्र त्याच्या वडिलांच्या प्रसंगावधानाने शंभूराजे  बचावला कुत्र्याने नागरिकावर हल्ले केलेचे समजताच, नगरसेवक प्रदीप राऊत, राजन जगताप तसेच साकेत जगताप आणि पालिकेचे आरोग्य समन्वयक राम कारंडे यांनी तातडीने हालचाली करत, नगरपालिकेच्या शवान पकडणाऱ्या पथकाला पाचरणे केले, स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध मोहीम राबवून रात्री साडेबाराच्या सुमारामध्ये या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यात यश आले, आरवचे वडील राकेश जगताप म्हणाले की, श्वानदंशानंतर उपचारासाठी आम्ही सासवड ग्रामीण रुग्णालयात गेलो असता, तेथे श्वान दंशाची लस देण्यात आली, मात्र पिसाळलेले कुत्रे चावल्यावर देण्यात येणारी सिरम लस देण्याची सुविधा नसल्याने, पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आले, त्या ठिकाणी सुद्धा पहाटे तीन वाजता सिरम लस मिळाली आता आरव आणि इतरांची प्रकृती स्थिर असून, सकाळीच घरी सोडल्याचे त्यांनी सांगितले असून ,इतर जखमी महिलावरही ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, सध्या सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नगरसेवक प्रदीप राऊत यांनी दिली असून, पालिकेकडून भटके कुत्री पकडण्याचे काम सध्या सुरू असल्याचेही ते म्हणाले. शंभूराजे बापू मुळीक या लहान मुलावर कुत्र्याने झडप घातली होती परंतु, पत्रकार बापू मुळीक  यांच्या प्रसंगावधानामुळे तो मुलगा बचावला असता पत्रकार महोदयांनी त्वरित नगरपालिकेची मुख्याधिकारी त्या ठिकाणी समन्वयक व नगरसेवक यांना फोन करून त्या ठिकाणी त्या घटनेची माहिती देऊन ,त्वरित त्या ठिकाणी स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध मोहीम राबवून रात्री साडेबाराच्या सुमारामध्ये या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यात त्या ठिकाणी यश मिळाले. सासवड ग्रामीण रुग्णालयामधील शवानदंष आणि सर्पदंशअंशांच्या लसी मुबलक प्रमाणामध्ये आहेत मात्र; पिसाळलेले कुत्र चावल्यावर शवानदंषाच्या लशी बरोबरच सिरम देणे आवश्यक असते, त्यासाठी अति दक्षता कक्ष सेवा गरजेची आहे, सासवड ग्रामीण रुग्णालयात अति दक्षता कक्ष नाही, सिरम दिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया लगेच लहान मुलावर तर भयानक प्रतिक्रिया येते, लहान मुलांना तर भयानक प्रतिक्रिया येते, त्यामुळे श्वान दंशाची लस देऊन, पुढील उपचारासाठी त्यांना ससून मध्ये जाण्यास सांगितले आहे. डॉक्टर यशवंत पाटील, वैद्यकीय अधिकारी सासवड ग्रामीण रुग्णालय सासवड. ग्रामीण रुग्णालयात शवानदंष आणि सर्पदंष यासारख्या आपत्तीकालीन लशी बरोबरच पिसाळलेल्या कुत्र्यांनी दंश केल्यावर आवश्यक असणारी सिरम व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या रुग्णालयांमध्ये अति दक्षता कक्ष सुविधाची उपलब्धता असणे आवश्यक आहे. जेणेकरून रुग्णांना पुण्याला धाव घ्यावी लागणार नाही, यासाठी ग्रामीण रुग्णालयात इथेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे. राजन जगताप नगरसेवक सासवड नगरपालिका आरोग्य विभाग.
मराठी भाषा गौरव दिन वीर बाजी पासलकर विद्यालय, सासवड येथे संपन्न                                                  सासवड  प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                          महाराष्ट्र साहित्य परिष द, सासवड शाखा  व सासवड नगरपालिका शिक्षण मंडळ  संचलित वीर बाजी पासलकर विद्यालय शाळा क्रमांक एक येथे मराठी भाषा गौरव दिन  साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांचे शाळेच्या वतीने श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त महान साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर हे मराठी भाषेला पडलेले स्वप्न होते. करेल जो मनोरंजन मुलांचे,जडेल नाते प्रभूशी तयाचे. या उक्तीनुसार कविवर्य  अनिल कदम यांनी मुलांना मनोरंजन पर गोष्टी सांगून स्वलिखित 'समेवर येताना ' या काव्यसंग्रहातील कविता  गेय गाऊन दाखविल्या व पुस्तक शाळेला भेट दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक केशव काकडे यांनी केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासो मुळीक, कार्याध्यक्ष सतीश पाटील, प्रमुख पाहुणे केशव काकडे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कोडीतकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुकाराम मुळीक यांनी मराठी भाषेला जागतिक अभिजात भाषेचा दर्जा मिळलेला असताना  मराठी भाषेचे महत्व   कशा प्रकारे वृद्धिंगत होईल या विषयाची सखोल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.याबरोबरच मराठी साहित्य परिषद सासवड शाखेचे कार्याध्यक्ष सतीश पाटील यांनी कुसुमाग्रजांची नावाजलेले नटसम्राट विशाखा हे पुस्तक मुख्याध्यापिका माधुरी मुळीक यांना शाळेसाठी भेट दिले . विशेष म्हणजे या विद्यालयात बरेचसे विद्यार्थी द्विभाषिक असून सुद्धा त्यांनी मराठीत सुंदर पद्धतीने भाषण केले हे वैशिष्ट्य ठरले. यावेळी मुलांची प्रभात फेरी, ग्रंथदिंडी काढून मराठी भाषेचा जागर करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे, कवितांचे प्रदर्शन भरवि ण्यात आले होते हे प्रशंसनीय होते. यावेळी वर्षा खळदकर, वासंती बडदे, मीना कांबळे, संगीता हराळे, विजयश्री घोगरे  पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका माधुरी मुळीक व सूत्रसंचालन संजीव कांबळे यांनी केले.
सासवड नगरपरिषदेचा ३९२ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर... कोणताही करवाढ नाही..                                          ​सासवड प्रतिनिधी  : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड शहराच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा स्पष्ट करणारा आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कोणताही फटका न देणारा सासवड नगरपरिषदेचा सन २०२६-२७ या वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (ता. २७) मंजूर करण्यात आला. नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ३९२ कोटी ६५ लाख रुपयांच्या खर्चाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाल्याचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी सांगितले. ​या अर्थसंकल्पात प्रशासनाने कोणतीही कर वाढ सुचवलेली नाही. सन २०२६-२७ मध्ये नगरपरिषदेला महसुली आणि भांडवली अशा दोन्ही स्वरूपात मिळून एकूण ४२६ कोटी १४ लाख रुपयांची जमा अपेक्षित धरण्यात आली आहे. तर दुसरीकडे, शहराच्या विकासासाठी आणि प्रशासकीय कामांसाठी ३९२ कोटी ६५ लाख रुपये खर्च होणार असल्याचे नियोजित करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सासवड शहराच्या सौंदर्यीकरणासोबतच पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणावर मोठा भर दिला जाणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी सांगितले. ​नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना या अर्थसंकल्पातून न्याय देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने नवीन पाणीपुरवठा योजना, नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी नमो उद्यान, सांडपाणी व्यवस्थापनासाठी 'भुयारी गटर २' आणि पर्यावरण संवर्धनासाठी 'माझी वसुंधरा' यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. केवळ भौतिक सुविधाच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत शासन नियमाप्रमाणे दिव्यांग कल्याण, महिला व बालकल्याण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येकी पाच टक्के निधीची विशेष तरतूद करण्यात आली आहे.​सभेच्या कामकाजादरम्यान नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्यासह सर्व उपस्थित नगरसेवक आणि नगरसेविकांनी शहराच्या प्रलंबित कामांबाबत आणि भविष्यातील नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली. सभेच्या शेवटी नगराध्यक्षांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत करत सर्वांचे आभार मानले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त केले. या विशेष सभेला सर्व नगरसेवक, विविध विभागांचे प्रमुख आणि नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
एम. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड येथे विज्ञान व कला प्रदर्शन उत्साहात संपन्न.....                                सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                              सासवड येथील एम. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. किरण रणदिवे व  नीता जगताप-रणदिवे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात पर्यवेक्षिका सरोज जांगडा यांनी केलेल्या प्रभावी प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर स्वाती पांढरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालनाची धुरा निकिता होले यांनी समर्थपणे सांभाळली.या विज्ञान प्रदर्शनात नर्सरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांच्या मदतीने व मार्गदर्शनाखाली उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विज्ञान व कला प्रदर्शन, विविध वैज्ञानिक प्रयोग, भाषणे आणि आकर्षक मॉडेल्स सादर केली. पर्यावरण संवर्धन, ऊर्जा बचत, पाणी व्यवस्थापन, अवकाश विज्ञान यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी कल्पकतेने प्रकल्प मांडले. कला व सर्वच शैक्षणिक विषयांवर आधारित विविध उपक्रम विद्यार्थ्यांनी तयार केले होते तसेच पालकांनी तयार केलेले प्रकल्प व शैक्षणिक साधने आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून विज्ञानाची आवड जोपासण्याचे व संशोधन वृत्ती विकसित करण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही.रामन यांच्या कार्याचा उल्लेख करून विज्ञान क्षेत्रातील प्रेरणादायी योगदानाबद्दल माहिती दिली,  मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर - नागनूर यांनी आपल्या मुख्याध्यापकीय मनोगतात विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाचे महत्त्व पटवून दिले.अश्विनी खळदकर यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रम विज्ञानमय आणि प्रेरणादायी वातावरणात उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सांगता प्रमुख पाहुण्यांनी सादर केलेल्या सुश्राव्य पसायदानाने झाली.
बाल विकास मंदिर शाळेत विज्ञान प्रदर्शन                     सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन आणि चित्रकला, हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.    याप्रसंगी, शाळेचे माजी विद्यार्थी  देवेंद्र तपस्वी,  पालक प्रतिनिधी बापू मुळीक यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. इ. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी हवा, पाणी, आहार , शेतीच्या आधुनिक पद्धती, ज्वालामुखी, जलचक्र अशा विविध विषयांवर  आधारित ५० प्रकल्प यावेळी सादर केले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा या प्रदर्शनामागाचा उद्देश होता.     तसेच, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर बनवलेल्या वस्तूंचे, चित्रांचे यावेळी प्रदर्शन भरवण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ अशा सुंदर वस्तू बनवलेल्या होत्या. या विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षिका राजगौरी जगताप यांनी मागदर्शन केले होते. या प्रदर्शनाला शाळेचे माजी विद्यार्थी, पालक यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रदर्शनाचे नियोजन मुख्याध्यापक भाऊसो बडधे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुषा चोरामले, शारदा यादव यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर रस्त्यावर झालेल्या नाश्ता हात गाड्यांच्या मुळे होणारे अतिक्रमण हे धोकादायक बनलेले  सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                    सासवड शहरात जिजामाता उदयांना समोर फळे भाजीपाला विक्री गेली सुमारे 25 ते 30 वर्षापासून उदयानाच्या भिंती लगत नगरपालिकेच्या नियोजन जागेत  बसून  व्यवसाय असा करीत आहेत गेली आठ ते नऊ महिन्यापासून  व्यवसायाचे दुकानं समोर ठीक ठिकाणी नाष्टा, पाणीपुरी, आईस्क्रीम, कच्ची दाबेली, शेव पावभाजी, ॲपल ज्यूस अशा विविध प्रकारच्या खाऊच्या हात गाड्या ही विक्रेते परंप्रातीय व सासवड शहराबाहेरील विक्रेते आहेत, तसेच नगरपालिकेच्या पीडब्ल्यूडी च्या जागेत अतिक्रमणे करून दुसऱ्या लोकांना जागा भाड्याने देत असतात, सध्या ही परिस्थिती अशी असताना जिजामाता फळेबाजी विक्री, मार्केट समोरच्या हातगाड्यावाल्यांनी मार्केटचा रस्ता काढून, दादागिरीने आपला व्यवसाय मांडलेला आहे, हे हात गाडीवाले व्यवसाय करीत असताना त्यांचा गिराईक हे दोन चाकी चार चाकी वाहन घेऊन रस्त्यावर उभे राहून नाष्टा करत असतात व पार्सल घेऊन जातात त्यावेळी फळे भाजीपाला घेऊन येणारा मालवाहतूक वाहन हे लावण्यास किंवा भाजीपाला फळे घेण्यासाठी आणण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाला जागा नसते तसे कोणी ग्राहक जर वाहन किंवा गाडी बाजूला घे असे जर सांगत असेल तर त्या ग्राहकालाही हातगाडी व्यवसायिक दादागिरी भांडणे हाणामाऱ्या करत असतात, या ठिकाणी फळे भाजीपाला विक्रेते व हात गाडीवाले यांना जर सांगायला गेलं असता, त्या ठिकाणी तयाबरोबर देखील भांडणे करत असतात, सर्व फळे भाजीपाला विक्री संघटनेने मार्केटने वेळोवेळी सासवड नगरपालिकेत लेखी अर्जाद्वारे सुमारे 14 ते 15 वेळा कळविलेले असताना देखील सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी , आरोग्य अधिकारी, पीडब्ल्यूडी चे रस्ता विभागीय अधिकारी हे काही  आत्तापर्यंत कारवाई करीत नाहीत, सदर नाष्टा हातगाडी अतिक्रमण व्यवसायामुळे पुणे पंढरपूर ,सासवड नारायणपूर, वीर, बालाजी कानिफनाथ, सोपान देव ,जेजुरी, मल्हारगड या विविध तीर्थक्षेत्रिय देवस्थानाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जात येत असतात, सकाळी पुरंदर तालुक्याच्या शेतीमाल घेऊन जाणारे शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात सासवडला येत असतो, त्या अनुषंगाने या रस्त्यावर वाहतूक जास्त असते, या नाष्ट्या हातगाड्यामुळे वाहतूक कोंडी वेळोवेळी होत असते, या रस्त्यालगत वाघिरे महाविद्यालय, शिवाजी मिडीयम न्यू इंग्लिश स्कूल, वाघिरे विद्यालय, आंबेडकर उद्यान ,जिजामाता उद्यान ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, आचार्य अत्रे भवन नगरपालिका  अशी शासकीय कार्यालय असून, ह्या रस्त्यावर अंगणवाडीत जाणारे लहान विद्यार्थी पालक, सायकलवर जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनींचे जेष्ठ किंवा महिला पालक हे आपल्या बाईकवर मुलांना शाळेत सोडण्याकरता जात असतात, तसेच जेष्ठ नागरिक हे बागेत फिरण्यासाठी येत असतात, त्या हातगाडी वाले यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून, वाहतुकीस अडथळा निर्माण करून सदरील विद्यार्थी, पालक, महिला, जेष्ठ नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत, तरी या ठिकाणी यांच्या या प्रकारामुळे रोज किंवा दिवसाड सारखे अपघात हे होत असतात, यावर नक्की कारवाई ही होणार का? अजून नगरपरिषद यासाठी अपघाताची मालिका पाहण्यासाठी नगरपरिषद वाट पाहत आहे ,अशीच एक प्रकारे शंका सामान्य नागरिकांना पडलेली आहे, यासंदर्भात पुरंदरचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी ,पोलीस अधीक्षक सासवड पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर उपविभाग, जिल्हाधिकारी पुणे त्यांना निवेदन ही उमेश राऊत, राजेंद्र होले, हरून बागवान ,उमेद बागवान, संभाजी लवांडे,  सुवर्णा होले, मालन पवार ,कल्पना काळे ,बुद्धिवंत गणेश, सुनिता होले, साहिल बागवान, मनोज होले, आप्पा भांडवलकर, प्रशांत टिळेकर, कलाबाई पवार, लिलाबाई धोत्रे ,जाधव समीक्षा आदी फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेते त्यांनी हे निवेदन सादर केले आहे तरी कारवाई या नाष्टे वाल्यांच्या वर कधी करणार आत्तापर्यंत नऊ ते दहा महिन्यात कारवाई केली नाही, तर फक्त अपघाताची मालिका व भांडणे होतानाच ही नगरपरिषद  पाहणार आहे का? असा प्रश्न हा सामान्य नागरिकांना पडलेला आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी 28 दुचाकी स्वारावर कारवाई                                                     सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                             रस्त्यावरून जात असताना सायलेन्सरचा मोठा आवाज काढून नागरिकांना त्रास देणाऱ्या 28  दुचाकी स्वरावर सासवड पोलिसांनी कारवाई केली असून, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये आरटीओ मार्फत या वाहनांना एकूण तीन लाख रुपयांचा दंड थोतावण्यात आला आहे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती, यावेळी सायलेन्सर मध्ये बदल करून कर्कश आवाज काढणाऱ्या बुलेट ,स्प्लेंडर, पल्सर सह 28 वाहनावर कारवाई करण्यात आली, या जप्त वाहनांची बुधवारी दिनांक 25 रोजी आरटीओ कोकडून आजच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून दंड आकारला विशेष म्हणजे जप्त केलेल्या गाड्यांमध्ये सहा वर्षांपूर्वी बारामतीतून चोरीला गेलेली एक बुलेटही पोलिसांना सापडली असून, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे व पथकाने ही कारवाई केली आहे ,विशिष्ट दुचाकी स्वरावरील या धडक कारवाईमुळे सासवडकरांनी एक प्रकारे समाधान व्यक्त केलेले आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड एसटी आगारात स्मार्ट कार्डच्या दोन्ही सुरुवात                                                          सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत सवलत घेणाऱ्या प्रवाशासाठी आता 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच स्मार्ट कार्ड' अनिवार्य केले असून ,या योजनेत एस. टी स्थानकातील स्मार्ट कार्डची नोंदणी आणि वितरणात सुरुवात झाली असून, त्याबाबत सविस्तर माहिती स्थानक प्रमुख मोहिनी ढेरे यांनी दिली आहे. सासवडच्या नगराध्यक्षा आनंदी (काकी )जगताप यांच्या हस्ते या योजनेस प्रारंभ करण्यात आला, यापुढे केवळ आधार कार्ड दाखवून प्रवासात सवलत मिळणार नाही, तर सर्व सवलत प्राप्त प्रवाशांनी स्मार्ट काढून घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे, मोहिनी ढेरे यांनी वितरण कक्षाला भेट दिली असता, यावेळी कार्ड वितरण करणारे सारंग लोणकर, गंगाराम जगदाळे ,सुनील लोणकर ,वाहतूक नियंत्रक महेश भोंगळे, कैलास जगताप ,सेवानिवृत्त लिपिक प्रकाश मोरे, पत्रकार बापू मुळीक आणि प्रवासी  आदी उपस्थित होते. एसटीच्या विविध सवलतीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला व ज्येष्ठांनी आधार कार्ड ,दिव्यांगांनी वैश्विक ओळखपत्र तर विद्यार्थ्यांनी सिरीयल क्रमांक घेऊन नोंदणी करणे आवश्यक आहे, नोंदणी केल्यानंतर एक महिन्यात हे कार्ड मिळणार आहे ,असेही मोहिनी ढेरे यांनी सांगितले आहे. स्मार्ट कार्डची नोंदणी करताना ,एजन्सीकडून बसण्यासाठी बाकड, जेष्ठ नागरिकांसाठी ठेवलेले नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सुविधा या उपलब्ध नाहीत ,यावर जर विघातक घटना घडल्यास यास  एजन्सी जबाबदार राहील अशा उपाययोजना कधी करणार यावर तर प्रश्नचिन्ह आहे ,नुसते आल्यावर स्मार्ट कार्ड साठी पाच ते दहा मिनिट एका व्यक्तीला लागत आहे, तर उभे राहून जर चक्कर आली तर काय करणार पाणी पिण्यासाठी सोय नाही हे दुर्भाग्यच आहे काय? काय उपाययोजना केलेल्या आहेत, हे एजन्सीकडून जाहीर करावे, तसेच  महिलांवरील  एजन्सीकडून  200रु जे घेऊन  जी परिस्थितीत चालले आहेच  ते त्वरित  एजन्सीकडून  बंद  करावेत  जेष्ठ  नागरिक   अपंग  याचे बरोबर  आहेच  परंतु  महिलांवरील  200 रु घेत  एजन्सीकडून  जो काय  परिस्थितीत  बरोबर  नाहीत  नाराजी आहेच  महिलांवरील  काडॅ देण्यात  येणार  त्वरित  बंद  एजन्सीकडून  करावेत असे ज्येष्ठ नागरिक व महिलांनी एक प्रकारे तक्रार ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
ग्राहक हक्क संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष महेश राऊत यांनी जाणीवपूर्वक सासवड व जेजुरी येथील डॉक्टर, प्रशासकीय महिला अधिकारी ,पत्रकार यांची बदनामी केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल                                                                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                 सासवड येथे डॉक्टर शिवतारे यांना सुपा गावातील जुन्या वादावरून व हॉस्पिटलच्या नाहा हरकतीच्या कारणावरून गेली चार ते पाच वर्ष जाणीवपूर्वक बदनामी करून, गेल्या आठवड्यामध्ये डॉक्टर घरी सुप्यात जात असताना, महेश मारुती राऊत यांनी व त्यांच्या सात ते आठ साथीदारांनी डॉक्टर शिवतारे यांना मारहाण केली होती, ग्रामीण रुग्णालयात सुद्धा उपचाराला गेले असता, डॉक्टर यांना नेले असतात त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टरांना त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली होती ,त्या पार्श्वभूमीवर त्या राऊत विरुद्ध सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता, त्या संदर्भात गुन्हा रजिस्टर नोंद असताना सर्व वर्तमानपत्रांमध्ये बातमी छापून आली असता ,पत्रकार, प्रशासकीय महिला अधिकारी, पुरंदर मधील सर्व स्तरावरील डॉक्टर अशा वेगवेगळ्या स्तरावरील सामान्य नागरिकांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना खंडीणी मागणी, दुसऱ्याला त्रास देणे, हे प्रकार या व्यक्तीकडून घडलेली आहेत सध्या तरी हा आरोपी व साथीदार फरार असून, राऊत विरुद्ध गुन्हा सासवड पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे, तरी पुरंदर मेडिकल असोसिएशन ,पत्रकार प्रशासकीय महिला अधिकारी, डॉक्टर यांनी पुन्हा तक्रारी अर्ज सासवड पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे. खोट्या, खोडसाळपणामुळे करत डॉक्टर यांना जाणीवपूर्वक आर्थिक व मानसिक त्रास देण्यासाठी वेळोवेळी आर्थिक लाभ मिळवण्यासाठी सर्व स्तरावर हा खंडणी मागत होता, खोट्या तक्रारी देऊन समाज माध्यमावर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करत होता ,तर 18 फेब्रुवारी रोजी डॉक्टर सुभाष दत्तात्रय शिवतारे यांना तर स्वत: व साथीदारांनी रस्त्यावरती अडवून त्यांचे मित्र यांनी संगणमत करून बेकायदेशीर जमाव जमून मारहाण करून समाज माध्यमावर बदनामी करण्याची धमकी दिल्याबद्दल त्याविरुद्ध गुन्हा दाखल असून, त्यासाठी या प्रकरणाची चौकशी करून महेश मारुती राऊत यांच्याविरुद्ध योग्य ती अशी कारवाई करावी अशी निवेदन हे प्रामुख्याने पुरंदर मेडिकल असोसिएशन सासवड याकडून डॉक्टर प्रवीण जगताप, डॉक्टर सचिन निरगुडे ,डॉक्टर उमाकांत ढवळे, डॉक्टर सुमित काकडे, डॉक्टर अनिल कदम, डॉक्टर राजेश दळवी, डॉक्टर सुभाष शिवतारे, डॉक्टर संदीप होले ,पत्रकार, प्रशासकीय महिला अधिकारी पुरंदर यांनी सासवड पोलीस स्टेशनला आरोपी महेश मारुती राऊत यांच्याविरुद्ध तक्रारी अर्ज दाखल केलेले आहेत, त्यावर खंडणी मागणी, पत्रकार, महिला अधिकारी पुरंदर मधील व डॉक्टर यांना त्रास देणे याबद्दल राऊत व त्यांच्या साथीदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी पुरंदर मधून होत आहे.
पुरंदर तालुक्यातील चिवहेवाडी घाटामध्ये भीषण वनवा वनसंपदेसह वन जीव्यांना फटका                              सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     ञ  पुरंदर तालुक्यातील चिवहेवाडी घाटांमधील मंगळवारी दिनांक 24 रोजी दुपारच्या एकच्या सुमारास भीषण वनवा लागला होता ,या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर वनातील वाढलेले गवत जळून खाक झाले असून, सरपटणारे प्राणी व पक्ष्यांच्या अधिवासाला मोठी जळ बसलेली आहे ,वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक मजुरांच्या मदतीने शर्तीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली असून ,सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील चिवहेवाडी घाटामध्ये वाळलेले गवत आणि वाढत्या उष्णतेमुळे आग वेगाने पसरली होती ,रस्त्याने प्रवास करणाऱ्यांनी टाकलेल्या जळत्या बिडी काडीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे ,या परिसरात ससे, तरस ,लांडगे ,मोर आणि विविध सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य आहे ,आगीमुळे या जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गणेश पवार ,वनरक्षक योगेश नजन, अक्षय लव्हाळे व वनमजुरांनी आग आटोक्यात आणण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले.
पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा संघाचा इशारा                                                         सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या ह्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असल्यामुळे, त्या शासनाने मान्यता देऊन आमची होणारी गैसोय ही दूर करावी आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, अन्यथा न्यायालयाचा असतो आंदोलनाचे पाऊल उचलावे लागेल ,अशी निवेदन व पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ सलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ यांच्या वतीने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले ,अशी माहिती संघाचे संस्थापक सरचिटणीस कॉ. ज्ञानोबा घोणे यांनी दिली .यावेळी पुरंदर तालुका अध्यक्ष मनोहर बारभाई, खंडू जाधव ,कोषाध्यक्ष विजय इंगळे, सचिव तुकाराम कांबळे, अजित खोमणे, राजू भगत ,अनिल भोसले आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पुढील प्रमाणे पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 18 फेब्रुवारीला पत्र काढून सर्व कर्मचाऱ्यांना एक जानेवारीपासून रुपये 3,750 मिळणाऱ्या वेतनाच्या व्यतिरिक्त राहणीमान भत्ता देण्याचा आदेश काढलेला असताना, तालुक्यात त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे झालेली पाहिजे, कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे थकीत पगार मिळणे गरजेचे असून, पुरंदर तालुक्यासाठी नोव्हेंबर व डिसेंबर या दोन्ही महिन्याची मिळून 22 लाख 47 हजार 210 एवढी रक्कम मंजूर होऊन ,आली असताना 93 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन वाटप होत नाही ,कर्मचाऱ्यांना रात्री अपरात्री पाऊस वाऱ्यामध्ये काम करावे लागते, त्यासाठी कर्मचाऱ्यांचा 15 लाख रुपयाचा विमा उतरवणे गरजेचे असून, राज्यपाल यांच्या मान्यतेने 31 मार्च 2020 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा उपसचिव यांनी आदेश काढून ,23 हजार रुपये कोरोना प्रोत्साहन भत्ता मिळावा ,अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे, याबाबत सर्व सविस्तर माहिती ही प्रतिनिधीला देण्यात आली आहे.
पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथे परप्रांतीयांचा अकस्मात असा मृत्यू                                                              सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील एका 45 वर्षीय व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाला असून, ही घटना घडलेली आहे .छोटू शर्मा राहणार जिल्हा उत्तर धीनाजपूर पश्चिम बंगाल असे मृताचे नाव असून, सासवड पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मात अशी मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे, मिळालेल्या माहितीनुसार 23 फेब्रुवारीला सिंगापूर येथील सुरेश गायकवाड यांच्या शेतात एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती पोलीस पाटील यादवेंद्र उरसळ यांना मिळाली त्यांनी तातडीने सासवड पोलिसांना नापासारण केले असता ,पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने संबंधित व्यक्तीला सासवड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले, मात्र उपचारा पूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते ,हॉटेल मालिक राजेंद्र मुळजे यांनी या घटनेची प्राथमिक माहिती दिली होती, सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्तात्रेय शेगर आणि सुनील चव्हाण पुढील तपास करत आहेत.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंचांचीच नेमणूक करावी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाबद्दल आजचे (फेब्रुवारी २०२६) ताजे अपडेट्स                                                                सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                             खालीलप्रमाणे आहेत:हायकोर्टाची सद्यस्थिती आणि निकालनुकत्याच झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने या विषयावर अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.या प्रकरणातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:  लोकशाही मूल्यांचे जतन: न्यायालयाने स्पष्ट केले की, ग्रामपंचायतीची पाच वर्षांची कायदेशीर मुदत संपल्यानंतर लोकप्रतिनिधींना (सरपंचांना) पदावर राहण्याचा कोणताही घटनात्मक अधिकार उरत नाही.  प्रशासकाची भूमिका: मुदत संपल्यानंतर सरकारी कर्मचारी किंवा विस्तार अधिकारी यांची 'प्रशासक' म्हणून नियुक्ती करणे हे कायद्याला धरून आहे. मुदत संपलेल्या व्यक्तीची पुन्हा त्याच पदावर 'प्रशासक' म्हणून वर्णी लावणे म्हणजे निवडणुका न घेता सत्ता लांबणीवर टाकण्यासारखे होईल.  निवडणुकांचे आदेश: न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला सूचना दिल्या आहेत की, ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे किंवा संपत आहे, तिथे लवकरात लवकर निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करावी.थोडक्यात निष्कर्ष| मुद्दा | न्यायालयाचा निर्णय |सरपंच प्रशासक होऊ शकतात का? | नाही. न्यायालयाने ही विनंती मान्य केलेली नाही. प्रशासक कोण असेल?  संबंधित गट विकास अधिकारी (BDO) यांनी नियुक्त केलेले सरकारी कर्मचारी (विस्तार अधिकारी). मुख्य कारण काय? - लोकशाहीत मुदत संपल्यावर सत्तेचे हस्तांतरण होणे आवश्यक आहे, जुन्याच व्यक्तीला प्रशासक बनवणे बेकायदेशीर ठरेल.
संतोष जगताप यांची भाजपा एनजीओ आघाडी जिल्हा संयोजकपदी नियुक्ती; पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्याला नवे बळ                                                                       सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           पुणे जिल्ह्यातील युवा व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते संतोष जगताप यांची भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण या कार्यकारणी मध्ये एनजीओ आघाडीच्या जिल्हा संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश जगताप, सासवड शहराध्यक्ष आनंद जगताप, साकेत जगताप, भानुकाका जगताप, माधव शिवरकर, सचिन पठारे उपस्थित होते.संतोष जगताप हे सासवड येथील स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून गेले १७ वर्ष सातत्याने ते शैक्षणिक आणि समाजकार्यात सक्रिय आहेत. ग्रामीण व शहरी भागातील गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठानच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सायकल वाटप, फिरती सायन्स लॅब, संगणक संचाचे वाटप,आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण मोहिम, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, युवकांना मार्गदर्शन शिबिरे तसेच आपत्तीग्रस्तांना मदत अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.कोरोना काळातही त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अन्नधान्य वाटप, औषधोपचार सहाय्य व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या सातत्यपूर्ण, निस्वार्थी आणि लोकाभिमुख कार्याची दखल घेत भाजपाकडून त्यांच्यावर  पुणे जिल्हाग्रामीण एनजीओ आघाडीच्या जिल्हा संयोजक पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना संतोष जगताप म्हणाले, “आजवर सामाजिक क्षेत्रात काम करताना सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास आणि सहकार्य लाभले. आता पक्षाच्या माध्यमातून जिल्हाभरातील विविध स्वयंसेवी संस्थांना एकत्रित करून अधिक व्यापक स्तरावर समाजहिताचे उपक्रम राबवण्याचा मानस आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, पर्यावरण आणि युवक सक्षमीकरण या क्षेत्रांना विशेष प्राधान्य दिले जाईल.”तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सामाजिक उपक्रम पोहोचवणे, स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय वाढवणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे उद्दिष्ट राहील.”त्यांच्या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातील विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. संतोष जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्य अधिक गतिमान व प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.आयकार्ड फोटो.. संतोष जगताप
एम. ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल सासवड प्रशालेत मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा उत्साहात संपन्न.....                                                  सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एम. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड प्रशालेत मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा उत्साहात व दिमाखात पार पडली. स्पर्धेस तालुक्यातील एकूण १५  शाळांमधील ४५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तिमत्व प्रतिभा मायभाटे मॅडम, स्नेहल देशपांडे मॅडम, स्वाती कटके मॅडम आणि मेघा अद्वैत मॅडम उपस्थित होत्या. वरील मान्यवरांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या कथनशैली, आवाजातील चढ-उतार, विषय निवड, आत्मविश्वास व सादरीकरण या विषयी मार्गदर्शन केले. व स्पर्धांचे  बारकाईने परीक्षण केले.  विद्यार्थ्यांनी वीर बाल साहस कथा, कथा गुरू - शिष्यांच्या, संस्कारक्षम बोधकथा तसेच प्रेरणादायी विषयांवरील कथा प्रभावीपणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.सुरुवातीस पर्यवेक्षिका सरोज जांगडा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. माननीय मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर - नागनूर यांनी मराठी दिनाचे महत्त्व पटवून दिले. गीता पुरंदरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :-*छोटा गट -( इयत्ता ३ री ते ५ वी )-* प्रथम - श्री गणेश राऊत - शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल,सासवड.द्वितीय - प्राप्ती संतोष कुंभारकर - सेंट जोसेफ स्कूल, खळद.तृतीय - अहान हेमंतकुमार बुधे - सेंट जोसेफ स्कूल, खळद.उत्तेजनार्थ - श्रेयस सचिन वाघोले - म.ए.सो.बालविकास मंदिर सासवड.उत्तेजनार्थ - वेदिका निलेश खळदकर - जिल्हा परिषद प्राथ.शाळा कुंभारवळण उत्तेजनार्थ - स्वराज्ञा आनंदराज हिंगणे - सेंट जोसेफ स्कूल, खळद.*मोठा गट -( इयत्ता ६ री ते ८ वी )*प्रथम - राजवर्धन सागर जगताप - शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल,सासवड.द्वितीय - अनुप्रिया जयदीप पांडकर - म.ए.सो.वाघीरे विद्यालय, सासवड.तृतीय - रितिका नवनाथ शिंदे - सेंट जोसेफ स्कूल, खळद.उत्तेजनार्थ - साहिल विकास जगताप - यशवंत विद्यालय मावडी क. प. भागशाळा पांडेश्वर उत्तेजनार्थ - सिद्धी संदीप पवार - संत नामदेव शाळा, सासवड.स्पर्धेचे सूत्रसंचालन स्पर्धा प्रमुख श्री. भाऊसाहेब येळे यांनी प्रभावीपणे केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी रुचिरा गार्डी यांनी उपस्थितांचे  आभार मानले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने स्पर्धा उत्तमरित्या पार पडली.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याला व कल्पनाशक्तीला उत्तम वाव मिळाला असून उपस्थित पालक व शिक्षकांनी कौतुकास्पद अभिप्राय दिले.
पुरंदर तालुक्यातील नवनियुक्त जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा पत्रकारांकडून सन्मान                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                               येत्या ३१ मार्च पर्यंत मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राबविण्यात येत असून स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांमधे सुधारणा होण्यासाठी नव्याने निवडूनआलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांनीसहभाग नोंदवत अभियान यशस्वी करावे असे आवाहन पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ यांनी केले आहे. सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने नवनियुक्त जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांच्या सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.    जिल्हा परिषद सदस्य प्राजक्ता दुर्गाडे, रुपाली झेंडे, हरिभाऊ लोळे व अजय इंगळे तसेच अमित झेंडे, माणिक निंबाळकर, अर्चना कटके, माऊली यादव, सायली शिंदे, स्मिता निगडे, मोनिका कांबळे या पंचायत समितीच्या सदस्यांचा शाल , गुलाबपुष्प व संत सोपानदेव यांची प्रतिमा देऊन पत्रकार बंधूंनी सत्कार केला. उपस्थित सर्व सदस्यांनी आपल्या मनोगतात पक्ष, गटतट बाजूला ठेवून पुरंदरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र काम करू अशी भावना व्यक्त केली. पत्रकारांनी चुकीच्या बाबी लक्षात आणाव्यात व चांगल्या गोष्टींना प्रसिध्दी द्यावी असेही आवाहन सर्वांनी केले. ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रोहित अभंग यांनीही यावेळी कार्यक्रमास मनोगत मांडून शुभेच्छा दिल्या. पत्रकार संभाजी महामुनी यांनी प्रास्ताविक तर सुधीर गुरव यांनी आभार मानले. संघाचे अध्यक्ष हेमंत ताकवले यांनी सूत्र संचालन केले. कार्यक्रमास शशांक सावंत, संतोष निगडे , डॉ मनोज शिंदे व अन्य मान्यवर उपस्थित होते.गणेश मुळीक, जीवन कड, बाळासाहेब कुलकर्णी, राजेंद्र बर्गे, जगदीश शिंदे, संदीप जगताप, सुनील वढणे या पत्रकार संघाच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले .
निधन वार्ता :                                                            पुष्पावती धुमाळ                                                                  सासवड प्रतिनिधी:                                                        वीर ता. पुरंदर येथील पुष्पावती आप्पासो धुमाळ यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अमोल आप्पासो धुमाळ यांच्या त्या मातोश्री होत.
श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूरमधील मानाची कावड असलेल्या      सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                    सासवड (ता. पुरंदर) मधील  तेल्या भुत्याच्या कावडीचे सासवड  ते पंढरपूर वारीचे नियोजन करण्यात आले. श्रीपांडुरंगाच्या भेटीनंतर कावडीचा सासवडकडे प्रवास सुरू झाल्याचे कैलास कावडे महाराज यांनी सांगितले. कावडीने मंगळवार वार (दि. 17) पंढरपूरकडे प्रस्थान केले. या वर्षी कावडी बरोबर महिलाचा ही सह भाग होता मार्गावर ठिकठिकाणी कावडीचे स्वागत करण्यात आले. नातेपुते ली येथील स्वागतानंतर माळशिरस तालुक्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. कावड सायंकाळी पंढरपूर येथे विसावली. या वेळी शिवयोगी कैलास कावडे महाराजांचा सत्कार करत मानाचा विडा देण्यात आला. पहाटे ४ वाजता कावडीला चंद्रभागा स्नान करण्यात आले. प्रथम श्रीहरीची भेट पाहण्यासाठी हजारो भाविक कावडीबरोबर संत श्रीनामदेव  पायरीजवळ आले. कावडीचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. श्रीविठ्ठल-रुक्मिणी देवस्थान पंढरपूरतर्फे कावडीस मानपान,  मानाचा विडा आणि कावडे महाराजांचा सत्कार करण्यात आला.  शिखर शिंगणापूरचा श्रीशंभू महादेव आणि पंढरीचा श्रीपांडुरंग यांचीसाक्षात भेट घडवून आणल्याबद्दल देवस्थान आणि समस्त पंढरपूर ग्रामस्थांच्या वतीने कावड संयोजकांचे आभार मानण्यात आले. तसेच. राजेंद्र चंद्रभागा गणपत शेळकेउप जिल्हाधिकारी तथा विशेष कार्यकारी  अधिकारी, पंढरपूर व शिव भक्त  मनीष राजेंद्र भोंगळे  श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पंढरपूर ( महाराष्ट्र )  यांचे कावड मंडळाच्या वतीने आभार मानले परतीच्या प्रवासात फलटणच्या गॅलेक्सी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉक्टर नवनाथ बंडगर यांनी कावडीचे स्वागत केले महापूजेनंतर  रात्री ११ वाजता सासवडकडे प्रस्थान झाले.
पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेचा 'माझी वसुंधरा 'अभियानामध्ये राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला; तर सासवड नगरपरिषदेचा आणखी एक मानाचा तुरा                  सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                  सासवड नगर परिषदेचे स्वच्छता आणि पर्यावरण जतनामध्ये नेहमीच आघाडीवर असलेल्या ,सासवड ता. पुरंदर येथील नगर परिषदेने आपल्या क्षेत्रांमध्ये मानाचा आणखी असा एक तुरा चांगलाच प्रकारे रोवला असून ,गतवर्षीच्या 'माझी वसुंधरा' अभियानामध्ये 4.0 अंतर्गत 25 ते 50 हजार लोकसंख्या गटामध्ये सासवड नगर परिषदेने राज्यांमधील दुतीय क्रमांक पटकावलेला आहे, शनिवारी दि. 21 रोजी मुंबई येथे झालेल्या या सोहळ्यामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सासवड नगरपरिषदेला हा बहुमान मिळाला असून, गतवर्षीच्या अभियानामध्ये राज्यातील 22 हजार 632 स्थानिक स्वराज्य संस्था मधून, सासवडने हे यश मिळवलेले असून, सासवड नगर परिषदेने राबवलेले वृक्षारोपण, कचरा, व्यवस्थापन आणि सौरऊर्जेचा वापर यासारख्या उपक्रमाची दखल या निमित्त राज्यस्तरावर घेतली आहे ,या पुरस्काराचे स्वरूप तीन कोटी रुपयांचे बक्षीस आणि सन्मानचिन्ह असे आहे, मागील वर्षी प्रशासकीय राजवट असल्यामुळे, यावर्षी हा गौरव सोहळा संपन्न झाला. सासवड नगर परिषदेसाठी यांनी स्वीकारला पुरस्कार माजी आमदार संजय जगताप, मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, गटनेते अजित जगताप, नगरसेविका प्रियांका जगताप, लीना वढणे, स्मिता जगताप ,अर्चना जगताप, नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप, राजन (भैय्या)  जगताप, प्रदीप राऊत, ज्ञानेश्वर गिरमे, सोपान रणपिसे, मयूर चौखंडे, सुहास लांडगे, विजय वढणे, संदीप राऊत, साकेत जगताप, सौरभ वढणे, सुहास जगताप, तुषार जगताप ,हिरामण हिवरकर, शहर स्वच्छता समन्वयक राम कारंडे, अमित बहिरट आदींनी पुरस्कार स्वीकारला. 'माझी वसुंधरा' अभियान 4.0 अंतर्गत पंचवीस ते पन्नास हजार लोकसंख्या गटांमध्ये, मागील वर्षी प्रशासकीय राज असल्यामुळे, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस यावर्षी संपन्न झाले असून, सातत्याने नियोजन, काटेकोरपणे अंमलबजावणी आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाची हे फलित आहे, पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ अधिक व्यापक करत पुढील सर्व स्पर्धेमध्येही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आमचा निर्धार आहे. डॉक्टर कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगर परिषद. हा पुरस्कार नगर परिषदेचा केवळ नसून, तर संपूर्ण सासवड करांचा पुरस्कार आहे, चंदूकाका जगताप यांनी पाहिलेल्या स्वच्छ व पर्यावरण पूरक सासवड शहराला एक अध्यावत स्वप्न नगरी साकर करण्याच्या दिशेने आपण एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकत आहोत ,पुढील काळातही यश टिकवून ठेवणार असून, सासवड राज्यातच नव्हे तर, देशातही आदर्श शहर बनवण्यासाठी आमचा कटिबद्ध प्रयत्न राहील. आनंदी (काकी) जगताप नगराध्यक्ष सासवड नगरपरिषद.
शरद ख्रिस्ती यांचे निधन                                                 सासवड प्रतिनिधी:                                                   सासवड शहरात 50 वर्षापेक्षा जास्त काळ सासवड शहरातील नागरिकांना भल्या पहाटे वृत्तपत्र वाचण्यासाठी देणारे शरद शांताराम ख्रिस्ती (वय ६७ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आजही सासवड मधील वाचकांना कोण व्यक्ती आपल्या घरापर्यंत नियमित ठराविक वेळी वृत्तपत्र देते हे माहिती नाही.  जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ख्रिस्ती यांना त्रास जाणवु लागल्याने, पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मेंदूची शस्त्रक्रिया करून त्यांना नुकत्यास घरी पाठवण्यात आले होते. मात्र त्यानंतर अल्पावधीत त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुली असा परिवार आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी प्रथमच महाराष्ट्र केसरीचा थरार होणार; मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आखाडा ; तर मातीतील कुस्ती स्पर्धा विजेत्याला मजबूत स्थिती मिळणार!                                                     सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड ता.पुरंदर येथील प्रथमच प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी, मातीतील कुस्ती स्पर्धा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आयोजित करण्यात येणार असून, याबाबतची माहिती कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस गौरव रोशनलाल दिल्ली यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. यावेळी संघटनेचे राज्य सचिव मोहन खोपडे ,राज्य अध्यक्ष नितीन बारणे, ऑलिंपिक पहिलवान व स्पर्धेचे तांत्रिक अध्यक्ष ज्ञान सिंग, आयोजक प्रकाश जगताप आदी उपस्थित होते. ही स्पर्धा महाराष्ट्र शैली कुस्ती संघटना यांच्या वतीने भरवण्यात येत असून ,गेल्या 60 वर्षापासून ही संघटना हिंदकेसरी, रुस्तुम हे हिंद भारत केसरी, यासारख्या नामांकित स्पर्धांचे आयोजन करिता आहे, सासवड येथील महाराष्ट्र केसरी स्पर्धा पहिलवान प्रकाश बापू जगताप प्रतिष्ठान आणि संघटनेचे सचिव पहिलवान मोहन खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असल्याचे गौरव रोशनलाल यांनी स्पष्ट केले आहे. दोन कोटीची बक्षिसे आयोजक प्रकाश जगताप यांनी जाहीर केले असून, की स्पर्धेमध्ये एक महाराष्ट्र केसरी गटासाठी प्रथम क्रमांक चार चारचाकी मोटर, द्वितीय क्रमांक सियारा चारचाकी मोटार, तृतीय क्रमांक बुलेट मोटारसायकल, चतुर्थ क्रमांक दुचाकी वाहन अशी सुमारे दोन कोटी रुपयांची बक्षिसे विजेत्या पहिलवानांना देण्यात येणार आहेत, सासवड मध्ये प्रथमच होणाऱ्या स्पर्धेमुळे कुस्तीप्रेमी मध्ये उत्साहाचे वातावरण असून, महाराष्ट्रातील नामांकित पहिलवानांची 'मादीयाळी' सासवड येथे पाहायला मिळणार आहे. भावनिक व ऐतिहासिक असे महत्त्व सासवडला आले आहे, महाराष्ट्र केसरी होणे हे प्रत्येक पैलवानाचे स्वप्न असून, हा किताब जिंकणारा पैलवान केवळ विजेता न राहता, संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान ठरत असतो, पहाटेचा सराव ,आखाड्यातील अथक मेहनत, शिस्तबद्ध, जीवन, संयम, अपयशावर मात करण्याची जिद्द या सर्वांची कसोटी स्पर्धेत लागत असते, त्यामुळे ही स्पर्धा केवळ ताकतीची नव्हे, तर मानसिक बळ अनुभव डावपेचांचाही परीक्षा आहे, राज्य अध्यक्ष नितीन बारणे, मनाले की, आमचा संघ ६० वर्षापासून सातत्याने कार्यरत आहे, लाल मातीतील कुस्तीची परंपरा ही आमची ओळख आहे, ज्यांनी संघटनेबाबत शंका उपस्थित केल्या आहेत ,त्यांनी अधिकृत परवानगी दाखवावी असा सवाल केला आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणचे काळभैरवनाथ मंदिर बंद राहणार                                                     सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        सासवड शहराचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ, श्री भैरवनाथ व श्री जोगेश्वरी माता या पुरातन देवस्थानच्या मालकीचा गट क्रमांक ३०१ मधील आठ एकर ,(तीन हेक्टर 19 आर पोट खराबा दोन आर बागायती )इनाम जमीन भकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देवस्थान ट्रस्टने केलेला आहे, ही जमीन एक श्री भैरवनाथ देव नावावर असल्याने, याबाबतचे प्रकरण सध्या महसूल न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, अतिक्रमणधारकांनी या जमिनीवरील ऊसतोड करून, ऊस गाळपासाठी सोमेश्वर कारखाना येथे पाठवलेला आहे, त्यामुळे जोपर्यंत महसूल न्यायालयातून स्थगितीचा आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत, श्री काळभैरवनाथ व इतर मंदिर भाविकासाठी बंद ठेवण्याचा निर्णय दृष्टीने घेतलेला आहे, देवस्थानच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांनी कायदेशीर लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे, यापूर्वीही याच मुद्द्यावर आंदोलन केले होते ,मात्र संबंधित वही वाटावदार जमीन परत देण्यास तयार नसून, प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे व संबंधित कुटुंब राजकीय पार्श्वभूमीचे असल्याने, वारंवार तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे सांगण्यात आलेले आहे, जमिनीवरील ऊसतोड मशागत किंवा वहिवाट थांबवावी, यासाठी ट्रस्ट व भैरवकर कुटुंबीयांनी सासवड पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल केलेला आहे, यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप, उपाध्यक्ष पांडुरंग भोंगळे, गाव पाटील संग्राम जगताप ,पुजारी मोहन भैरवकर ,राजेंद्र भैरवकर, चैत्री उत्सव कमिटीचे अध्यक्ष रवींद्र शिरसागर, उपाध्यक्ष प्रकाश जगताप, जयसिंग जगताप ,रवींद्र जगताप ,मोहन जगताप ,प्रवीण जगताप ,आनंद (भैय्या) जगताप सासवड मधील सर्वसामान्य नागरिक आदी उपस्थित होते.
कालकथित आबाजी रामचंद्र डुबल यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन                                      सासवड प्रतिनिधी:  बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                          खानवडी येथील रहिवासी तसेच बहुजन हक्क परिषद, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष संतोष डुबल यांचे वडील, कालकथित आबाजी रामचंद्र डुबल यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध धम्मानुसार त्रिशरण, पंचशील, धम्मपालन गाथा व धम्मदेशना कार्यक्रम पार पडला. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच कालकथित आबाजी रामचंद्र डुबल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बौद्ध विधीनुसार अभिवादन करण्यात आले.अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार हे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आबाजींच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर व कार्यावर प्रकाश टाकला. सर्व वक्त्यांनी नमूद केले की आबाजींचा स्वभाव रोखठोक, स्पष्टवक्ते आणि प्रामाणिक होता. “ओठात एक आणि पोटात एक” असा कपटी स्वभाव त्यांच्यात नव्हता. ते खानवडी गावातील एक आदर्श व सन्माननीय व्यक्तिमत्त्व होते.आबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये कृषी व संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय दादा कोलते, राष्ट्रवादीचे नेते जालिंदर भाऊ कामठे, बेलसर-माळशिरस गटाचे नवनिर्वाचित सदस्य अजय इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुदाम आप्पा इंगळे, पुरंदर तालुकाध्यक्ष माणिक झेंडे, सोमेश्वर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब आप्पा कामठे, श्री संत तेल्या भुत्याची प्रथम मानाची कावडीचे नाना महाराज खळदकर, परिवर्तन क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल लोंढे, युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीलजी लोणकर, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता नाना भोंगळे, भाजप युवा नेते अॅड. श्रीकांत ताम्हाणे, उपसरपंच तुषार झुरंगे, पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामठे, सचिव अमोल बनकर तसेच पत्रकार ए. टी. माने, अक्षय कोलते, चंद्रकांत चौंडकर, गुरुकुल अकॅडमीचे प्राचार्य संदीप टिळेकर, बहुजन हक्क परिषदेचे बारामती तालुकाध्यक्ष अनिल कदम, खानवडीचे माजी सरपंच रवींद्र फुले, चंद्रकांत फुले, नितीन होले, विद्यमान सदस्य योगेश रासकर, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता होले, अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आप्पा भांडवलकर, अध्यक्ष राहुल भोंडे, दत्तात्रय सुर्यवंशी, महात्मा फुले सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश होले, पोलीस पाटील सचिन होले, भिकाजी धिवार, अतुल धिवार, शरद नेटके, कृष्णा झोंडे, लक्ष्मण जाधव, धोंडीबा डुबल, सागर चव्हाण, सेफ नदाफ, सुरज कदम, परिवर्तन क्रांती सेनेचे तालुकाध्यक्ष अक्षय खवले यांसह नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी संतोष डुबल यांच्या कुटुंबियांच्या वतीने उपस्थितांसाठी अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी आबाजींना श्रद्धांजली अर्पण करून धम्मपालन गाथा घेण्यात आली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार पुणे जिल्हाध्यक्ष तथा कालकथित आबाजी रामचंद्र डुबल यांचे सुपुत्र संतोष डुबल यांनी मानले.
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी डॉक्टर मणिभाई देसाई पतसंस्थेचे 11 व्या शाखेचे उद्घाटन; सहकार आयुक्त दिपक तावरे                                                            सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                        डॉक्टर मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेची माजे संबंध हे जुने असून, त्यांचे कामकाज पारदर्शक व शिस्तबद्ध असून, व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी सतत ऑडिट'अ' वर्गात कामकाजाचा लेखाजोखा पारदर्शक पद्धतीने ठेवलेला आहे, तर सासवड या ठिकाणी अकराव्या शाखेचे उद्घाटन माझ्या हस्ते झाल्याचे, अशा शब्दांमध्ये गौरव उद्गागार सहकार आयुक्त व निबंधक दिपक तावरे यांनी संस्थेच्या कार्याचा गौरवोद्गार करताना केला. या सोहळ्याला माजी राज्यमंत्री दादा जाधवराव, माजी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, विजय कोलते, अतिरिक्त निबंधक शैलेश कोतमिरे, उपनिबंधक मिलिंद सोबले, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी आपले यावेळी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी प्रास्ताविक अहवालातून वाचन करताना सांगितले की, संस्थेची सभासद संख्या 21,000 असून,631 कोटी 26 लाखाचा व्यवसाय आहे, ठेवी 355 कोटी 97 लाखाच्या आहेत, 275 कोटी 29 लाख रुपयाचे कर्ज वाटप असून, दरवर्षी सहा कोटीचा नफा, तर पंधरा टक्के लाभांश हा 32 वर्षे सतत ऑडिट 'अ' वर्ग आहे, संस्थेचे कर्ज देणे त्याचे व्याज मिळवणे, या भावनेतूनच समाजातील सर्व स्तरातील कामकाज महाराष्ट्रभर सध्या चालू आहे, यावेळी आनंदी काकी जगताप सासवड नगराध्यक्षा, हरिभाऊ लोळे जिल्हा परिषद सदस्य ,सुदाम (आप्पा) इंगळे, माणिक झेंडे, बाळासो कामठे, न्यानोबा कांचन, शामकांत भिंताडे, संचालक शरद वनारसे, जीवन शिंदे, सारिका काळभोर, प्रवीण दरेकर ,भाऊसो कांचन, खेमचंद पुरुस वाणी, धनसिंग पोदकुले, कमल कांचन, लक्ष्मण वाल्हेकर सरव्यवस्थापक, कांतीलाल चौधरी, संजय टिळेकर, अनिकेत कांचन, रोहिदास उद्रे ,संजय कांचन ,शाखा व्यवस्थापक शिवाजी नवले, शाखा सल्लागार सुजित बडधे, सागर जगताप, रामदास कामधे, सुनील लांडगे, संतोष जगदाळे, मणिभाई संस्थेतील सर्व शाखा व्यवस्थापक, कॅशियर, क्लार्क ,कर्मचारी, पिग्मी एजंट ,सभासद आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रवी पवार यांनी केले, तर डॉक्टर मणिभाई पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी यांनी आभार मानले.
पुरंदर तालुक्यातील विमानतळाला पाच गावातून 72% संमती माघारी? तर जमीन मोजणीला संमती भूसंपादनाला नाही! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                          पुरंदर तालुक्यातील सात बाधित गावातील विमानतळ झाल्याची अशी चर्चा चालू असताना, दुसरीकडे मात्र स्थानिक पातळीवर वेगळीच परिस्थिती ती जाणवत आहे, प्रशासनाकडून पुरंदर विमानतळासाठी 94% शेतकऱ्यांनी दर्शवलेली  असलेली संमती असा दावा केला जात असल्याची पुण्याच्या जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांना तशाप्रकारे, चुकीची माहिती दिलेली आहे, असा आरोप बाधित शेतकऱ्यांनी बैठकीमध्ये कुंभारवळण येथे आरोप केला आहे, यामुळे जमीन मोजणीला दिलेल्या संमती पैकी 72% शेतकऱ्यांनी आपली प्रत्येकी पाच गावातून संमती जिल्हाधिकारी कार्यालयातून माघारी घेतलेली आहे, पारगाव 55% खानवडी 60% कुंभारवळण 70% वनपुरी 50% उदाची वाडी 45% अशी या गावातून बहुतांश शेतकऱ्यांनी अर्ज करून, संमती माघारी घेतलेली आहे, तर अजून बहुतांश शेतकरी हे संमती दिलेली माघारी घेण्याच्या पारदर्शकेमध्ये आहेत, आपली संमती माघारी घेतल्याचा पाच गावातील शेतकऱ्यांनी पुराव्या निशी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दाखवली  दिली असून, पारगाव मध्ये तर माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीमधून चक्क शेतकऱ्याच्या खोट्या संमती दाखवल्याची उघड झाले असून, त्या विरोधात आता शेतकरी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचीही प्रतिनिधीला माहिती देण्यात आली, पारगाव येथील विकास मेमाणे, पी.एस. मेमाणे यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकारातून प्रशासनाने खोटी माहिती मुख्यमंत्र्यांना पोहोचवली आहे ,असे सुद्धा निदर्शनास आणून दिले आहे, तर कुंभारवळण येथे 18 सप्टेंबर पर्यंत 75 टक्के संमती होती असे गावातील एजंट माहिती पुरवत होते, त्यावर 24 व 25 सप्टेंबर रोजी वकिलाचा सल्ला घेऊन, शेतकरी कुंभारवळण येथील यांनी 72 टक्के संमती करून दाखवली होती, परंतु पत्रकार यांनी माहितीच्या अधिकारातून ,माहिती घेतली असता, 18 सप्टेंबर पर्यंत संमती ही फक्त 22 टक्के निघाली, तर 24 व 25 सप्टेंबर रोजी 72 टक्के निघाली असून, एकूण 94% कुंभारवळण येथील संमती ही फक्त 72 टक्के असणारी जमीन मोजणीसाठी दिलेली होती, तर विमानतळाच्या भूसंपादनाला नाही? असे शेतकरी गणेश मोरे यांनी सांगितले. जमीन मोजणीला संमती दिली होती, 24 व 25 सप्टेंबर ची विमानतळ भूसंपादनाला नाही? जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत आहेत, असा आरोप विमानतळ प्रकल्प बाधितांच्या गावातील शेतकऱ्यांचा एकंदरीतील आहे, वस्तुस्थिती की, पुरंदर विमानतळ प्रकल्प हा दिशाभूल करून, सामान्य शेतकऱ्यावर हा प्रकल्प रेटला जातोय का? काय अशाच शंका, आत्तापर्यंत झालेल्या आहेत, शेतकऱ्याला विश्वासात अजिबात घेतली जात नाही. मंजुषा गायकवाड माजी सरपंच कुंभारवळण, मुख्यमंत्र्यांना विमानतळा संदर्भात तर भेटताना प्रत्येक सात गावातील सरपंच यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात यादी पाठवून दिली होती, त्यावर जिल्हाधिकारी यांनी बदल करून, एजंट यांची नावे करून, मुख्यमंत्र्यांना भेटताना तर होले खानवडी येथील युवकाला धमकावले होते मुख्यमंत्री यांच्यासमोर काही बोलायचे नाही ,जर बोलताल तर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी दडपशाही, हुकूमशाही पद्धतीने तर युवक महिलांना मुख्यमंत्री यांची विमानतळा संदर्भात यावेळी भेट सुद्धा घेऊन दिली नाही, लाडकी बहीण म्हणता ,आणि कसले पाप करता, विमानतळ संदर्भात महिलांना चर्चा सुद्धा करून दिली नाही, ही जिल्हाधिकारी यांची मनमानी,कारभार हुकूमशाही सतत आत्तापर्यंत चालू आहे, आत्ताची, ताजी आठ दिवसातील बातमी अशी की सात गावातील 25 एजंट हे प्रामुख्याने विमानतळ संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पडीक असतात, त्यावर खुद्द जिल्हाधिकारी ही या 25 एजंटांना फक्त विमानतळ संदर्भातील जमिनीचा भाव एक कोटी तीस लाख रुपये सांगत आहेत, तर जमिनीचे खुद्द मालक हा सामान्य शेतकरी सात बाधित गावातील आहे, एजंट हा आमच्या जमिनीचा मालक नाही आणि जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांनी सात गावातील कोणत्याही ठिकाणी एका ठिकाणी येऊन, शेतकऱ्यांशी समोरासमोर संवाद करावा ,पुरंदरच्या विद्यमान आमदारांनी सुद्धा समोरासमोर येऊन बोलावे, जमीन शेतकऱ्यांची तर मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार यांनी मुंबई, पुणे येथे शेतकऱ्याला बोलवायचे नाही, तर विमानतळ बाधित सात गावातील कोणत्याही एका ठिकाणी येऊन, शेतकऱ्याची लाडकी बहीण म्हणून महिलांची हेटाई केलेली, प्रत्यक्षात तीन व्यक्तींनी पुरंदर मध्ये येऊन चर्चा करायची, असा ठाम खडा सवाल सामान्य शेतकरी व महिलांनी सात बाधित गावातील विमानतळ संदर्भातील शेतकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. जिल्हाधिकारी सांगतात 10% संमती असली तरी, विमानतळ हे या सात गावात करून, दाखवणार असल्याची ग्वाही दिली आहे ना? तर सात गावातील बाधित शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितले आहे की, पुणे, मुंबई येथे शेतकऱ्याला न बोलवता, शेतजमीन आमची, शेतकऱ्यांची आहे, तुम्ही तीन व्यक्ती आमच्या शेतीचे मालक नाहीत व मालक व्हायला सुद्धा जाऊ नका? नाहीतर जशास तसे उत्तर दिले जाईल, यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी हे नेमून दिलेल्या विमानतळ संदर्भातील अधिकाऱ्यांना सुद्धा संमतीत घेत नाहीत, त्या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांच्या जमिनीचा बाजारभाव ठरलेला सांगता येत नाही, तर एजंटांना मात्र त्या ठिकाणी एक कोटी तीस लाख रुपयाचा बाजारभाव सांगण्यासाठी आनंदाने सांगतात, तर एजंट हा   आमच्या शेतीचा या जमिनीचा मालक नाही, तर शेतकरी हाच खुद्द शेतीचा मालक असून, या ठिकाणी तीन व्यक्ती या आमच्या शेतीच्या मालक नाहीत, असे शेतकरी व महिला यांनी ठणकावून सांगितलेले आहे ,अशी सर्व माहिती प्रतिनिधीला त्यांनी सात बाधिती गावातील महिला व शेतकरी बांधव यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली आहे.
सासवड येथे डॉक्टरवर प्राणघातक हल्ला व खंडणीचा प्रयत्नसात जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल               सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                           सासवड शहर परिसरात एका नामांकित डॉक्टरवर खंडणीसाठी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक व ग्रामपंचायत राजकारणातील वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सुभाष दत्तात्रय शिवतारे (वय ३६, व्यवसाय – डॉक्टर, जनहीतार्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोडीत नाका, सासवड–हिवरे रोड, रा. सुपे खुर्द, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीनुसार, आरोपी महेश मारुती राऊत हा गेल्या तीन वर्षांपासून डॉक्टर शिवतारे यांना मानसिक त्रास देत असून सोशल मीडियावर बदनामीही करत होता. दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास, डॉक्टर शिवतारे हे त्यांच्या पार्टनर गणेश किसन शेंडकर यांच्यासोबत दुचाकीवरून सासवडहून सुपे खुर्दकडे जात असताना मौजे सासवड हद्दीत दत्तात्रय भोंगळे यांच्या बंगल्याजवळ आरोपी महेश राऊत याने त्यांची दुचाकी अडवली.“तू ग्रामपंचायत राजकारणात माझे ऐकत नाहीस, त्यामुळे तुझे आयुष्य उद्ध्वस्त करीन. तू बोगस डॉक्टर आहेस. तुझ्या हॉस्पिटलची बदनामी करून तुझे करिअर संपवीन. मी केलेला अर्ज मागे घ्यायचा असेल तर ५ लाख रुपये दे,” अशी धमकी देत आरोपीने शिवीगाळ केली व डॉक्टर शिवतारे यांना मारहाण केली. रस्त्यावरील काठीने केलेल्या हल्ल्यात डॉक्टरांच्या डाव्या हाताच्या करंगळीला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले.भांडण सोडवण्यासाठी शुभम चंद्रकांत जाधव व आकाश चंद्रकांत जाधव हे दोघे मध्यस्थीला आले असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करून दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये शुभम जाधव यांच्या पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले.यानंतर फिर्यादी व जखमी सासवड पोलीस ठाण्याकडे जात असताना भोंगळे वस्ती परिसरात आरोपी स्वप्नील सुधाकर राऊत व लोकेश महेश राऊत हे चेतक दुचाकीवरून आले. लोकेश राऊत याने हातातील काठीने आकाश जाधव याला मारहाण करून जखमी केले.औषधोपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, सासवड येथे गेल्यानंतरही आरोपींचा धुडगूस सुरूच राहिला. तेथे अमोल नामदेव पवार, लोकेश महेश राऊत, आदित्य सुनील राऊत, सचिन सुधाकर राऊत, जितेंद्र मारुती राऊत व ओम जितेंद्र राऊत यांनी शुभम व आकाश जाधव यांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (२०२३) अंतर्गत खंडणी, मारहाण, प्राणघातक हल्ला, धमकी व दंगलसदृश प्रकाराबाबत विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस पुढील तपास करत असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सासवड येथील वाघीरे विद्यालयात दहावीच्या परीक्षार्थी  विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत                                सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज                                                                           सासवड ता. पुरंदर)इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा आज सुरू झाली. त्यानिमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयाच्या  परीक्षा केंद्रावर पेपर सुरू  होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सासवड नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी गोविंद लाखे , वाघीरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  श्रीम.पूजा जोग , उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे , पर्यवेक्षिका अर्चना लडकत, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुरंदर तालुका अध्यक्ष शिवहार लहाने, पत्रकार बापूसो मुळीक या सर्वांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी परीक्षार्थींचे औक्षण देखील करण्यात आले.
पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेच्या सफाई कामगारांचा सासवड नगर परिषदेच्या गेट समोर  आंदोलन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       सफाई कामगारांच्या प्रलंबित वेदनाच्या मागणीसाठी सासवड नगर परिषदेच्या समोर नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सुमारे 1,00 सफाई कर्मचाऱ्यांनी बुधवारी दि. 18 रोजी सकाळी काही वेळ पालिकेच्या गेट समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते, यावेळी नगराध्यक्षा आनंदी काकी जगताप आणि मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी मध्यस्थी करत तोडगा काढल्यानंतर, त्या कामासाठी सुरुवात केली होती ,सफाई कामगारांची वेतन निधीचे एंटरप्राईजेस या ठेकेदार कंपनीकडून पाच महिने पासून थकल्याने, कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता, यावेळी भाजप शहराध्यक्ष आनंद जगताप व विरोधी गटनेते मंदार गिरमे यांनी ठेकेदारावर कारवाईची मागणी केली असता, नगराध्यक्षा जगताप म्हणाल्या तातडीने एका महिन्याचा वेतनाचा धनादेश ठेकेदाराला पालिकेच्या नफा फंडातून दिलेला आहे, शासकीय कालखंडातील थकीत देणे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत आम्ही सकारात्मक आहोत मात्र शहर स्वच्छतेसाठी कामगारांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, गेल्या तीन वर्षापासून पंधराव्या वित्त आयोगाचा निधी शासनाकडून मिळत नसल्याकारणाने, वेतन लांबल्याचे मुख्य अधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी स्पष्ट केले असून, स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील साडेसात कोटी रुपयांचे बक्षीस सुद्धा रक्कम अद्याप मिळा लेली नाही, तरीही वीर योजनेचे दर महिन्याचे वीज बिल आणि कर्मचाऱ्यांचे पगार पालेखीच्या तुटपूजा नफा फंडातून केले जात आहेत, शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर ठेकेदाराची प्रलंबित देणी दिली जात आहेत, असे डॉक्टर चव्हाण यांनी सांगितले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष मनोहर जगताप,गटनेते अजित जगताप, नगरसेवक राजन जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, न्यानेश्वर जगताप, प्रदीप राऊत आदि नगरसेवक यावेळी उपस्थित होते व नागरिक सुद्धा  उपस्थित होते.
Load More That is All