पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा संघाचा इशारा सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या ह्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असल्यामुळे, त्या शासनाने मान्यता देऊन आमची होणारी गैसोय ही दूर करावी आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, अन्यथा न्यायालयाचा असतो आंदोलनाचे पाऊल उचलावे लागेल ,अशी निवेदन व पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ सलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ यांच्या वतीने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले ,अशी माहिती संघाचे संस्थापक सरचिटणीस कॉ. ज्ञानोबा घोणे यांनी दिली .यावेळी पुरंदर तालुका अध्यक्ष मनोहर बारभाई, खंडू जाधव ,कोषाध्यक्ष विजय इंगळे, सचिव तुकाराम कांबळे, अजित खोमणे, राजू भगत ,अनिल भोसले आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पुढील प्रमाणे पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 18 फेब्रुवारीला पत्र काढून सर्व कर्मचाऱ्यांना एक जानेवारीपासून रुपये 3,750 मिळणाऱ्या वेतनाच्या व्यतिरिक्त राहणीमान भत्ता देण्याचा आदेश काढलेला असताना, तालुक्यात त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे झालेली पाहिजे, कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे थकीत पगार मिळणे गरजेचे असून, पुरंदर तालुक्यासाठी नोव्हेंबर व डिसेंबर या दोन्ही महिन्याची मिळून 22 लाख 47 हजार 210 एवढी रक्कम मंजूर होऊन ,आली असताना 93 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन वाटप होत नाही ,कर्मचाऱ्यांना रात्री अपरात्री पाऊस वाऱ्यामध्ये काम करावे लागते, त्यासाठी कर्मचाऱ्यांचा 15 लाख रुपयाचा विमा उतरवणे गरजेचे असून, राज्यपाल यांच्या मान्यतेने 31 मार्च 2020 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा उपसचिव यांनी आदेश काढून ,23 हजार रुपये कोरोना प्रोत्साहन भत्ता मिळावा ,अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे, याबाबत सर्व सविस्तर माहिती ही प्रतिनिधीला देण्यात आली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments