पुरंदर तालुक्यातील गुळूंचे (कर्नल वाडी )येथे उघड्यावर सोडलेल्या केमिकल्स व रसायने मिश्रित पाण्यामुळे 98 बकरी व 60 शेळी मरण पावल्या सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: गोपनीय माहितीनुसार ,मौजे गुळूंचे (कर्नल वाडी) ता.पुरंदर येथील फॉरेस्ट .क. नंबर 520 मधील राखीव वन क्षेत्रामध्ये मोरगाव, निरा रस्त्यावर पश्चिम बाजूस क्रमांक एम एच 50 एन / 3862 भारत बेंज कंपनीचा टँकरने रसायन सोडताना स्थानिक नागरिकांनी त्याचा पाठलाग करून, पकडून जेजुरी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिला असून, आरोपी 1) रोहित अशोक साळुंखे राहणार कवठे तालुका कराड जिल्हा सातारा आरोपी 2) गौरव रामदास यादव रा. यादववाडी पारगाव ता. खंडाळा जिल्हा सातारा सदर आरोपींना, वन कर्मचारी व पोलिसांनी ताब्यात घेऊन, संयुक्तरीत्या पोलीस स्टेशन जेजुरी येथे चौकशी अंति बोलावले असता, आरोपींनी कर्नलवाडी येथे वन क्षेत्रात टॅंकरने रसायन सोडलेची कबुली दिली असून, टँकर क्रमांक एम एच 50/ 3862 भारत बेंज कंपनीचा व आरोपीला ताब्यात घेऊन भारतीय वन अधिनियम 1927 चे 26(1) ( 5 )26 (1) आय व महाराष्ट्र शासन व नियमाची 2014 मधील कलम 09 चे (अ) ह्या अन्वये वनपरिक्षेत्रामधील अधिकारी सासवड यांच्याकडे गुन्हा क्रमांक 21 रोजी गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास सुरू आहे, सदर कार्यवाही माननीय उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक शितल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले, वनपाल दिपाली शिंदे, वनरक्षक अशोक फरतडे, पोलीस कर्म चारी यांनी ही कार्यवाही केलेली आहे. तर रस्त्याच्या कडेलाच ओरिएंटल ईस्ट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि ग्राविस फुड्स प्रायव्हेट लिमिटेड केसुरडी जिल्हा सातारा यांच्यासह सोमेश्वर साखर कारखान्या यातील केमिस्ट वेस्ट व रसायनिक मिश्रित पाणी सोडल्यामुळे, या परिसरातील खड्डे किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीमध्ये ते साठून जमा झालेले आहे. सिंधु कांतीलाल टेंगले या धनगर समाजातील महिलेची या रसायन मिश्रित पाण्यामुळे, 98 बकरी व 60 शेळी मृत पावलेची भीषण घटना गेल्या महिन्यापासून घडलेली असून, जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येते, अजूनही खड्ड्यांमध्ये ते पाणी साचून राहिले आहे, याबाबतचे फोटो सोबत जोडलेले असून, तर हे केमिकल इतके घातक असून, या परिसरामधील झाडे जुळून गेलेली आहेत, तर यामध्ये प्रामुख्याने पत्रकार यांच्या सहकार्यानेच काही दिवसापूर्वी ही गाडी पकडली गेली होती, परंतु यामध्ये महसूलचे तलाठी शरद लोंढे हे उद्धट भाषा वापरतात, अरेरावी करतात, आचारसंहितेमध्ये पत्रकार यांना सुद्धा व्यवस्थित बोलत नाहीत, तसेच पोलीस प्रशासनाचे याबाबत गांभीर्याने कारवाई करीत नसल्याचे,सुद्धा संबंधित मेंढपाळ व ग्रामस्थांची तक्रार आहे, तरी यामध्ये महसूल व पोलीस प्रशासनाच्या वरती कडक कारवाई केली जावी. सर्व माहिती संकलित करून, सुद्धा पंचनामा व पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करावा परंतु ,तसे काही होताना दिसत नाही, याबाबत मेंढपाळ महिलेने शासकीय मदत मिळण्यासाठी महसूल विभागातून पंचनामा करून घेण्यासाठी, तलाठी यांनी पत्रकार व मेंढपाळ यांना बऱ्याच प्रमाणामध्ये अरेरावी ,उद्धट भाषा वापरलेली आहे ,तर त्यावर तलाठी यावर कडक कारवाई व्हावी, तसेच पोलीस प्रशासन जेजुरी या ठिकाणचे व महसूल विभागातील कर्मचारी यांचे त्या ठिकाणी कंपनीशी काही लागेबद्द संबंध असल्याचीही चर्चा पुरंदर तालुक्यात रंगत चाललेली आहे ,तरी या महसूल व पोलीस प्रशासन जेजुरी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी माहिती शिंदू कांतीलाल टेंगले यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments