Hot Posts

6/recent/ticker-posts

खोटा दस्त रद्द करण्यासाठी आठ लाखाच्या खंडणीची मागणी; पिस्तूल दाखवून धमकी पुरंदर मधील वकिलाची बातमी प्रसिद्ध न करण्यासाठी पत्रकारांनाच दमबाजी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्याचे जमिनीची खरेदी विक्री एजंट गिरीचा व्यवसाय, त्यातून सामान्य लोकांची फसवणूक हे नवीन नाही, बनावट दसत तयार करून, अनेकांना लाखो रुपयाचा गंडा घातल्याची अनेक प्रकरणी उघडकीस आल्याने या व्यवसायात केवळ पांढऱ्या कपड्यातील एजंट नाहीत तर कालया कोटातील वकिलांचाही सहभाग अनेक वेळा उघडकीस आला असून, अनेक पदव्या घेऊन, कोर्टातील केस न चालवता केवळ याच धंद्यामधून, कोट्यावधीचा माया जमवली आहे, तर एका घटनेत वडिलोपार्जित व महारवतन जमिनीची विसारपावती करून, साठे खत दस्त करताना, मात्र दुसऱ्याच्या गटाची नोंद करून खोटे,दस्थ तयार केला यामध्ये फसवणुकीच्या कारणावरून वकिलासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामुळे पुरंदर तालुक्यात मोठी खबर उडाली आहे, एडवोकेट सचिन जाधव (वय 43) आणि अनुष्का सचिन जाधव (वय 36) दोघेही राहणार सासवड अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पल्लवी आनंद सोनवणे (वय 28) रा. एस. व्ही. नगर फ्लॅट नंबर 264 ,बिल्डिंग नंबर 13, हडपसर पुणे यांनी सासवड पोलिसात फसवणूक बाबत गुन्हा दाखल केला आहे.पल्लवी सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सविस्तर वृत्त असे आहे की, आरोपी अनुष्का सचिन जाधव व सचिन जाधव यांनी संगम मताने त्यांच्या मालकीचे मोजे वाघापूर (ता. पुरंदर )येथील वडिलोपार्जित व महार वतन मिळकत गट क्रमांक १३०३ व १३१३ मधील 18.50 गुंठेची विसारपावती तयार करून, घेतली मात्र नोंदणीकृत साठे खत दस्थांमध्ये मात्र गट नंबर १३९६,१३०४,१३२२,१३२४, १३४६, १३५७,१३७२,१४०४,१४१५ चा उल्लेख व त्यामधील मिळकतीचा उल्लेख करून, त्याबाबतची कागदपत्रे जोडून खोटा व बनावट दस्त तयार केला, यामध्ये फिर्यादीची आर्थिक फसवणूक झाल्याची लक्षात आल्याचे, जगताप आरोपींना तयार करण्यात आलेल्या खोट्यात दसत रद्द करण्यासाठी विनंती केली त्यावर आरोपींनी दस्त रद्द करण्यासाठी आठ लाख रुपये ची खंडणीची मागणी केली. आरोपी सचिन जाधव यांनी फियॅदीस पिस्तुल अंगावर रोखून वारंवार, जातीवाचक शिव गाल केली. तसेच त्याच्या ऑफिस मधून ढकलून बाहेर काढले. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी पोलिस ठाणयात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments