Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड येथे वाहन चालक परवाना शिबिर व रस्ता सुरक्षा जनजागृती सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, चैतन्य बहुउद्देशीय कृषी संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भालेराव, संचालक हरिभाऊ कुदळे व पुरंदर तालुका मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 12/09/2025 रोजी सासवड येथे वाहन चालक परवाना शिबिराचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मोटार वाहन निरीक्षक कृष्णात बामणीकर, सहा. मोटार वाहन निरीक्षक प्रियांका गडेकर व सरला सूर्यवंशी यांनी उपस्थित अर्जदारांना रस्ता सुरक्षा जनजागृती केली. "राह वीर" (Good Samaritan) योजनेविषयी माहिती देत, या योजनेतील पुरस्कार रक्कम 5000 वरून 25000 पर्यंत वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतरच्या "गोल्डन अवर" मध्ये मदतीचे महत्त्व, वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, मोबाईलवर बोलत वाहन न चालविणे तसेच मद्यप्राशन करून वाहन न चालविण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी पुरंदर परिसरातील मोटार मालक, चालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बातमी सोबत फोटो पाठवीत आहे.

Post a Comment

0 Comments