NiBM पुणेच्या विद्यार्थ्याची इंडिया व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद*केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते गौरव सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टर (NiBM), पुणे येथील अॅडव्हान्स अॅबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्याने आपल्या विलक्षण बौद्धिक क्षमतेच्या जोरावर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मानाची नोंद करून संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित विशेष समारंभात केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला.पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील रहिवासी अर्णव रमेश वायकर याने केवळ एका मिनिटात २ अंकी × २ अंकी असे तब्बल २२ गुणाकार अचूकपणे सोडवून हा विक्रम प्रस्थापित केला. अर्णव हा कोरेगाव मूळ येथे MSEB मध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असलेले रमेश वायकर यांचा मुलगा आहे.अर्णवने ही उल्लेखनीय कामगिरी NiBM चे संस्थापक व मुख्य संचालक नवनाथ हंबीर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली साध्य केली. तसेच या यशामागे वडील रमेश वायकर आणि आई सविता वायकर यांची खंबीर साथ, प्रोत्साहन आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले असल्याचे सांगण्यात आले.सन्मान समारंभात बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले,“आजच्या स्पर्धात्मक युगात मेंदूचा विकास, गणितीय कौशल्ये आणि एकाग्रता वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. NiBM सारख्या संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत मोलाचे कार्य करत आहेत.”NiBM, पुणे ही संस्था अॅडव्हान्स अॅबॅकस, ब्रेन डेव्हलपमेंट आणि बौद्धिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असून विद्यार्थ्यांमध्ये स्मरणशक्ती, एकाग्रता, आत्मविश्वास आणि तर्कशक्ती वाढविण्यावर विशेष भर देते. अर्णवच्या या यशामुळे पालक, शिक्षक तसेच परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments