Hot Posts

6/recent/ticker-posts

देवस्थान ट्रस्ट विश्वस्तांची नेमणुकीसाठी कार्यक्रम जाहीर सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :- पांगारे (ता पुरंदर )येथील श्री निष्णाई देवस्थान ट्रस्टच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपुष्टात आल्यामुळे देवस्थानच्या वतिने सर्वसाधारण सभा शनिवार दि. 20 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती .यावेळी सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर नवीन विश्वस्त निवडीचा कार्यक्रम देवस्थानच्या सचिवांनी जाहीर केला . दि ६ जानेवारी २०२५ रोजी नवीन विश्वस्तांची निवड करण्यात येईल ,यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात येणार आहे .देवस्थान ट्रस्टवर काम करण्यासाठी पांगारे गावातील अनेक नागरिक इच्छुक असल्याचे यावेळी दिसून आले .त्या संदर्भात देवस्थान ट्रस्ट यांचेकडून असा खुलासा करण्यात आला .निवड / नेमणूक : श्री निष्णाई देवस्थान ट्रस्ट (रजि) पांगारेसन २०२६ - २०२७ ते २०३१ - २०३२ या कालावधीसाठीएकूण निवडावयाच्या विश्वस्तांची संख्या : कमीत कमी २५ जास्तीत जास्त ३१निवडावयाची पद्धत :शक्यतो सामंजस्याने बिनविरोध निवड व्हावी, नाहीच झाली तर सभेमध्ये उपस्थित असणारे सर्व सदस्यांच्या मतदानाने निवडणूक पद्धतीने .इच्छुकांनी विहित नमुन्यातील फॉर्म भरून घ्यावेत . ५जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता आलेल्या एकूण अर्जांची आणि उमेदवारांची नावाची यादी प्रसिद्ध केली जाईल .मुदतीनंतर आलेले व विहित नमुन्यात नसणारे फॉर्म बाद केले जातील आणि त्यानंतर कोणतीही तक्रार चालणार नाही .फॉर्म भरण्यासाठी सुरुवात : दिनांक २५ डिसेंबर २०२५अंतीम दिनांक ५ जानेवारी २०२६ संध्याकाळी ५ वाजे पर्यंत नोंदणी फी . १००० / - रू ( रु एक हजार फक्त ' ) इच्छुकांनी आपले विहित नमुन्यात असणारे अर्ज व त्यासोबत आधार कार्ड जोडून ट्रस्टचे सचिव यांचे कडे जमा करून त्याची पोच घ्यावी . असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments