सासवड सुपा रस्त्याच्या कामामध्ये चांगल्याच प्रकारची सुधारणा होत आहे सासवड प्रतिनिधी: सध्या रस्त्यावर सर्वत्र पसरलेल्या टोकदार, खडी, दगड, चिखलात घसरून पडण्याच्या भीतीमुळे सासवड सुपा रस्त्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याकारणाने, याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे त्या ठिकाणी ठेकेदाराचा हलगर्जीपणा, होणे बाबत आवाज उठवून पाठपुरावा केला होता, संबंधित कामाच्या व्यवस्थापकाकडे तक्रारीच्या सूचना केल्या होत्या, त्याप्रमाणे दक्षता घेतल्याने, बदल कामाच्या ठिकाणी दिसत आहेत,, केवळ दक्षता फलकाच्या अभावाने नाही, तर मातीचा आडवा बांध ना घातल्याने दुचाकी सह खड्ड्यात पडून युवकाला पारगाव राठी फार्म हाऊस या ठिकाणी जीव गमवावा लागला होता, यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता, या वृत्ताची दखल घेऊन लगेच राजपथ इन्फ्रा कंपनीने फलक लावण्याची दखल घेतली, पर्यायी रस्त्या जवळ मातीचा ढिगारा घालून, दुर्घटनेची सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला जात होता ,परंतु त्या ठिकाणी राजपथ इन्फ्रा कंपनीचे व्यवस्थापक रोहिदास पिसाळ यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी उनिवा तातडीने दूर करण्याचे आश्वासन दिले व त्वरित फलक लावण्यात आले. शासकीय अधिकारी प्रतिनिधी कामाच्या दर्जाबाबत पद्धती बाबत ठेकेदाराला जाब विचारत नाहीत, विमानतळाच्या जीव घेण्या संघटने अगोदरच आम्ही त्रस्त आहोत ,मृत युवकांच्या परिवाराला भरपाई द्यावी, आवश्यकता असेल तर ठेकेदारावर सदस्य मनुष्यवस्थाचा गुन्हा दाखल व्हावा, असे नागरिक मागणी करत आहेत. युवराज मेमाणे सामाजिक कार्यकर्ते पारगाव. उकडलेल्या रस्त्यावर माती ऐवजी मुरमाचे आवरण, क्विचित दिसणारा रोड रोलर सातत्याने फिरत आहे, कामाचा रेंगाळलेला वेग वाढतोय, दक्षता फलक ठळक व स्पष्ट लोक वस्तीतून नंबर द्वारे गौण खनिज व वस्तूची होणारी वाहतूक शिस्तबद्ध झाली, पर्यायी रस्त्यांचा दर्जा सुधारतोय. उद्योगपती संतोष हरिभाऊ मुळीक पिसे. काम करताना यंत्रणे कडून सुरक्षितेबाबत काही होणे ,उणीवा राहिल्या असतील त्यामुळे घडलेल्या दुर्दैवी घटनाबाबत खेद आहे, स्वत: लक्ष घालून सर्व खबरदारी घेतली आहे. काम पूर्ण होऊ शकेल, एवढाच रस्ता उघडला जाईल, असे राजपथ इन्फ्रा कंपनीचे व्यवस्थापक रोहिदास पिसाळ यांनी ही सविस्तर प्रतिनिधीला माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments