पुरंदर तालुक्यातील 77 वा प्रजासत्ताक दिन समारंभ 26 जानेवारी 2026 रोजीचा प्रशासकीय इमारत सासवड व पोलीस ग्राउंड, जुन्या तहसील कचेरी समोर: वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत पुरंदर यांच्या शुभहस्ते संपन्न सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन समारंभ निमित्त 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:15 वाजता प्रशासकीय इमारत सासवड या ठिकाणी वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत पुरंदर यांच्या शुभ हस्ते संपन्न. यावेळी महादेव जाधव नायब तहसीलदार, शुभांगी गोजारी नायब तहसीलदार निवडणूक, संदीप पाटील निवासी नायब तहसीलदार पुरंदर, विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर, मंडलअधिकारी, तलाठी, तहसील कार्यालयातील कर्मचारी वर्ग व उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातील कर्मचारी वर्ग, सासवड मधील सामान्य नागरिक, पत्रकार आदी उपस्थित होते. भारताचा 77 वा प्रजासत्तक दिन समारंभ 26 जानेवारी 2026 रोजी चा पोलीस ग्राउंड, जुन्या तहसील कचेरी समोर 9:15 वाजता वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत पुरंदर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर, राजेंद्रसिंह गौर भोर उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉक्टर कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगरपरिषद, पुरंदर तालुका हा मुख्य ठिकाण असल्यामुळे, सासवड मधील व तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, सामान्य नागरिक, जेष्ठ नागरिक, युवक वर्ग, विद्यार्थी, नगरसेवक /नगरसेविका सासवड, पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व पोलीस कॉन्स्टेबल, हवालदार, तसेच भोर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल, होमगार्ड ,पुरंदर कॉलेज, वाघेरे कॉलेज, म.ए.सो वाघिरे हायस्कूल, कन्या प्रशाला, शिवाजी इंग्लिश मीडियम आधी विविध शाळांनी आजच्या या 26 जानेवारी साठी संचलन करण्यात आले, सागर जगताप यांनी या ठिकाणी सूत्रसंचालन केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments