Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील पुरंदर नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आनंदी काकी जगताप सासवड प्रतिनिधी: सासवड येथील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदासाठी आनंदी काकी जगताप तर उपाध्यक्षपदी कृष्णा शेट्टी त्यांची निवड झाली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालय पुणे ग्रामीण येथे (2025 2030) या कालावधीसाठी प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडीनंतर पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप, प्रकाश जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी अध्यक्ष जगताप व उपाध्यक्ष शेट्टी यास नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करून, शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्र देसाई, सर व्यवस्थापक संजय शितोळे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक (वर्ग एक) संजय पाटील, जिल्हा उपनिबंधक कार्यालयीन अधीक्षक संजय ससाने, सहकारी अधिकारी (श्रेणी एक) सोनाली देसाई, सिद्धार्थ झांजे, यासह पतसंस्थेचे नवनिर्वाचित संचालक अंकुशराव जगताप, आनंदराव घोरपडे, या सह सर व्यवस्थापक अनिल उरवणे, सतीश शिंदे आदी उपस्थित होते. सर्व संचालकांना विश्वासात घेऊनच, पतसंस्थेचे कामकाज करणार असल्याचे, आनंदी काकी जगताप यांनी निवडीनंतर प्रतिनिधीला माहिती दिली.

Post a Comment

0 Comments