पुरंदर तालुक्यातील जितेंद्र कुंजीर यांची संचालक पदी बिनविरोध निवड शिक्षक संघातील स्वाभिमानी कार्यकर्त्याचा एक प्रकारचा विजय सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी यादववाडी केंद्राचे केंद्रप्रमुख तथाशिक्षक नेते जितेंद्र कुंजीर यांची बिनविरोध निवड झाली, या निवडीमुळे शिक्षक संघातील निष्ठावंत कट्टर व प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, सेवानिवृत्त संचालक राजेंद्र कुंजीर यांच्या रिक्त जागेवर विरोधी पॅनल मधून पराभूत उमेदवारांना संधी देण्याचे डावपेच सुरू होते, मात्र संघटनेतील स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न वेळीच हाणून पाडत जितेंद्र कुंजीर यांना पुढे करत संचालक पदासाठी अर्ज दाखल केला, शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील कुंजीर यांनीही अर्ज दाखल केला होता, परंतु पतसंस्था, ऐक्य, परंपरा व सहकार्याची भूमिका लक्षात घेत, त्यांनी अर्ज माघारी घेतल्याने, जितेंद्र कुंजीर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली, सध्या पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघात विलीनीकरणानंतर, काही निर्णय निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता, घेतले जात असल्याचा आरोप होत आहे, त्यामुळे संघटनेत अध्याप मनोमिलन न झाल्याची चर्चा आहे, या पार्श्वभूमीवर संघटनेतील मरगळ झटकून, निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी जितेंद्र कुंजीर यांचे नेतृत्व निर्णायक ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त होत आहे, सहकार व संघटन क्षेत्रातील त्यांचा अनुभव पतसंस्था व शिक्षक संघाला नवी दिशा देईल, अशी चर्चा सध्या तरी चालू आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments