भिवडी ग्रामस्थांकडून सासवड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक बाळासो भिंताडे यांचा सत्कार सन्मान सोहळा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भिवडी ता. पुरंदर येथील ग्रामस्थाकडून नवनिर्वाचित नगरसेवक बाळासो भिंताडे यांचा उत्स्फूर्त असा सत्कार सन्मान सोहळा उत्साहात साजरा करताना, सासवड नगरपालिकेच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये भिवडी गावचे सुपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासो बापूराव भिंताडे यांची नगरसेवक पदी बहुमताने निवड झाल्याबद्दल, भिवडी ग्रामस्थांच्या वतीने सासवड नगरी मधील मोठ्या उत्साहामध्ये सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या सत्कार समारंभाच्या निमित्त गावातील युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होती, याप्रसंगी हरिभक्त परायण बापू महाराज भिताडे, विठ्ठल आबा मोकाशी, छगन खिल्लारे, साधू भाऊ दिघे, प्रशांत वांढेकर, अशोक चव्हाण ,निलेश पवार, डॉ. मनोज शिंदे, राहुल मोकाशी, सुदाम भिंताडे, संजय दिघे, विजय भिंताडे, दिलीप भिंताडे ,बाळासो शेडगे, सूर्याजी मोकाशी यांच्यासहसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना, नगरसेवक बाळासो भिताडे म्हणाले की, भिवडी गावच्या पाठिंबामुळेच मला हे मोठे यश संपादित करता आले, यापुढेही मी सैधव्य ग्रामस्थांच्या सेवेसाठी उपलब्ध राहील, अशी ही ग्वाही त्यांनी दिली. या उपकारमुळे भिवडी गावात आनंद व उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते, अशी ही प्रतिक्रिया नवनिर्वाचित नगरसेवक सासवड नगर परिषदेचे बाळासो भिताडे यांनी ही सर्व माहिती भिवडी गावकऱ्यांनी जो उत्स्फूर्त असा सत्कार सन्मान सोहळा साजरा केला, याची सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments