पंचेचाळीस वर्षानंतर भेटले सवंगडी सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील म. ए. सो चे वाघिरे विद्यालयाच्या मार्च १९८१ या वर्षी दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांची आज सासवड येथील विद्यालयाच्या आचार्य अत्रे सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती .या कार्यक्रमासाठी या बॅचचे ४३माजी विद्यार्थी व १० विद्यार्थीनी उपस्थित होते .त्यावेळी विज्ञान विषय शिकवणारे शिक्षक श्रीकांत देशपांडे प्रमुख वक्ते म्हणून हजर होते पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता नाना भोंगळे , ए.टी माने ,कदम सर व तुंगार सर हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते .45 वर्षानंतर एकमेकांना भेटताना सर्वांनाच खूप मनापासून आनंद झाला प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त केल्या, सर्वांचेच गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .यापैकी प्रा . डॉ शिवाजी भिंताडे यांनी राष्ट्रीय पातळीवर दोन सुवर्णपदके मिळवली त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला . "साठीच्या दरम्यान असणाऱ्या या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी प्रत्येकाने स्वतःची स्वतः घ्यावी आणि आता पैसे कमावण्यापेक्षा माणसे अधिक जमवा व सुखी जीवनाचा मंत्र म्हणजे मैत्री आहे " असे उद्गार देशपांडे सरांनी याप्रसंगी काढले . संजय पवार, संतोषआबा काकडे, मोहन टिळेकर, विठ्ठल कोंडे, सुनिल काकडे, यांनी बैठकीसाठी परिश्रम घेतले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments