Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच महापालिका निवडणुका लांबण्याच्या मार्गामुळे इच्छुक असलेले उमेदवार पूर्णपणे गोंधळलेले ;आजची 25 नोव्हेंबर च्या सुनावणी कडे संपूर्णचे लक्ष ;तर साधारण चार ते पाच महिन्यांनी निवडणुका? सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच महापालिका निवडणुकीचे सध्या तरी जोरदार तयारी, इच्छुक असलेले उमेदवार यांनी सुरू केलेली असून ,मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे ,बहुतेक उमेदवार ही मतदारांना देवदर्शन घडून आणण्यासाठी, पूर्णपणे सपाटाच त्यांनी लावलेला आहे ,जानेवारी महिन्यामध्ये निवडणुका होणार असल्याकारणाने, जोरदार प्रचार सुरू आहे ,तरी राजकीय निवडणुकांचा आखाडा हा रंगत चाललेला आहे, पुन्हा एकदा निवडणुका लाभणार असल्याची चर्चा सध्या सुरू असल्याने, पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच महापालिकांच्या निवडणुका ह्या चार ते पाच महिन्यांनी पुढे जाण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवार हे चांगलेच गोंधळलेले आहेत, 4 नोव्हेंबरला जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, 2 डिसेंबरला २०४६ नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे, मात्र न्यायालयाने वारंवार दाखवलेल्या नाराजीमुळे नामांकन प्रक्रिया स्थगित होण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे ,सध्याच्या स्थितीमध्ये काही राजकीय पक्षातील उमेदवारांनी आपली चार उमेदवारांची पॅनल देखील तयार केलेली असून, त्यामुळे राजकीय निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगत चाललेला आहे ,तरी जानेवारी महिन्यात निवडणुका न होता, साधारण जून जुलै महिन्यामध्ये निवडणुका होतील ,असा अंदाज बांधला जात आहे ,यामुळे हिरमोड झालेला आहे ,उमेदवारांचा कधी लागणार निवडणुका असा उद्यायम सवाल ते करत आहेत,राज्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27% ओबीसी आरक्षणाबाबतचा वाद निकाली लागेपर्यंत, नामांकन प्रक्रिया पुढे ढकलण्यासाठी विचार का ?करत नाहीत अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला केलेली असून ,न्यायमूर्ती सूर्यकांत उज्वल पोह्यान आणि एन कोटी स्वर सिंग यांच्या खंडपीठाने या संबंधी पुढील सुनावणी म्हणजेच मंगळवारी 25 नोव्हेंबरला ठेवली असून ,यामुळे ही सुनावणी होईपर्यंत ,राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार नाहीत, हे स्पष्ट झालेली आहे ,या घोषणा झाल्याशिवाय महापालिकांच्याही निवडणुकांची घोषणा होणार नाही, त्यामुळे आरक्षण मर्यादा ओलांडली अन 17 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देऊ नका ,असा स्पष्ट इशारा राज्य सरकारला दिला असून, भाटिया आयोगाच्या 2022 च्या अहवालातील 27% आरक्षणाची शिफारस अध्याप न्यायालयीन विचारा येथील असल्याकारणाने, आयोगाने पूर्वस्थिती नुसारच निवडणूक घ्याव्यात असे, न्यायालयाने स्पष्ट केले आहे. काही स्थानिक संस्थात आरक्षण 70% पर्यंत पोहोचल्याचे दावे करणाऱ्या याचिका वरी न्यायालयाने राज्याला नोटीस बनवलेली असून, महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होणार नाही ,याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे.मात्र जर सुनामी झाली आणि त्यावर निर्णय झाला तरच ,31 जानेवारी पूर्वीच निवडणुका घेतल्या जातील, असाही दावा केला जात असल्याकारणाने ,या सर्व गोंधळामुळे इच्छुक असलेले उमेदवारांचा चांगलाच गोंधळ उडालेला आहे ,व राजे निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे, या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे ,त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि मग महापालिकांच्या निवडणुका होणारा आहेत ,जानेवारी महिन्याअखेर पर्यंत महापालिकेच्या निवडणुका घेण्याची आदेश न्यायालयाने दिले असून ,पुणे महापालिकेची निवडणूक लांबीणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात असून ,नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे, त्यानंतर राज्य विधिमंडळाची हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत होणार असून ,त्या कालावधीमध्ये कुठली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता नाही, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक 19 डिसेंबर नंतरच जाहीर होण्याची शक्यता आहे ,त्यामुळे पालिका निवडणूक लांबीणीवर पडेल ,असा दावाही केला जात असून ,आता पुन्हा न्यायालयाने विचारणा केल्यानंतर ,या कार्यक्रमांमध्ये मोठा बदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, तर त्यामुळे काहींच्या मते निवडणुका थेट जून किंवा जुलै महिन्यातच होईल, असे विश्वसनीय सूत्राकडून ही माहिती मिळाली.

Post a Comment

0 Comments