Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील लपतळवाडी येथील शाळेला गावकऱ्यांनी टाळे ठोकले सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: लपतळवाडी ता. पुरंदर येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या सात महिन्यापासून एक शिक्षक कमी असल्यामुळे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा खालवलेला असून, मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी शाळेला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतलेला आहे, जोपर्यंत नवीन कायमस्वरूपी शिक्षक येत नाही, तोपर्यंत शाळा बंद ठेवायचा असा निर्णय झालेला असून, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच गावचे सरपंच रवींद्र मोरे यांनी याबाबत ही सविस्तर माहिती दिली. लपतळवाडी शाळा इयत्ता चौथी पर्यंत असून, 42 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत, मे महिन्यामध्ये 2025 साली या ठिकाणी शिक्षण सेवानिवृत्त झाले असून, सात महिने उलटून गेले तरी 42 पटसंख्या असलेली शाळा एकाच शिक्षकावर सुरू आहे. शिक्षकांना इतर कामे, तसेच शासकीय कागदपत्र पुरवणे, प्रशिक्षण कार्यालयीन कामकाजासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची वेळ येत असते, शाळा बंद करावी लागते, एकच शिक्षक असल्याने, चार वर्गातील मुलांना शिकवणे अवघड जात आहे, यामुळे मुलांची शैक्षणिक नुकसान होत असून, शैक्षणिक दर्जा ढासळलेला असल्याचे पालकांनी सांगितले आहे. याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी बऱ्याच वेळा बैठका झालेल्या असून, तेवढ्यापुरती एक शिक्षक घेऊन येतात, आणि आठ चार दिवसानंतर पुन्हा शिक्षक शाळेत येत नाहीत, याबाबत अनेक वेळा गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन सुद्धा काही निर्णय होत नाही, असे सरपंच रवींद्र मोरे यांनी सांगितले. जोपर्यंत नवीन शिक्षक शाळेत रुजू होणार नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे, माजी अध्यक्ष महादेव पिलाने यांनी सांगितले. यावेळी संतोष कदम, महेश जाधव, सचिन पिलाने, तुळशीराम कदम, शिवाजी गाडेकर, सुशील लोळे, सोमनाथ कदम, गणेश जाधव, अनिल भांडवलकर, यशवंत पिलाने, संदीप मोरे, हरी पिलाने आदी उपस्थित होते. याबाबत वीर बीटच्या केंद्रप्रमुख मंगल कामठे यांच्याशी संपर्क साधला असता, या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणार असून, लवकरच पर्यायी शिक्षकाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments