पुरंदर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये 53 तर पंचायत समिती गणासाठी 98 अर्ज वैध तर दिवे 100 गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग तीन अर्ज अवैध सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जिल्हा परिषद पंचायत समितीच्या रणधुमाळीमध्ये जिल्हा परिषद साठी 53 तर पंचायत समितीसाठी 117 जणांनी अर्ज जमा केले होते, एकूण 170 जणांनी निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी दि. 22 रोजी झालेल्या छाननीमध्ये जिल्हा परिषद गटासाठी 53 तर पंचायत समिती गणासाठी 117 असताना, काही उमेदवारांचे अर्ज दोन वेळा असल्यामुळे, एकच गृहीत धरून 98 अर्ज कायम केले, तर दिवे 100 गणामधून नागरिकांचा मागास प्रवर्ग अवैध अर्ज तीन बाद झाले, बळीराम काळूराम सोनवणे (2) अर्ज पंढरीनाथ काळूराम आढाळगे 1 अर्ज असे तीन अर्ज बाद झालेले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली. दिवे -गराडे 50 जिल्हा परिषद गटातून वैध अर्ज 6, बेलसर- माळशिरस 51 जिल्हा परिषद गटातून वैध अर्ज 14 ,वीर -भिवडी 52 जिल्हा परिषद गटातून वैध अर्ज 20 निरा शिवतक्रार -कोळविहीरे 53 जिल्हा परिषद गटातून वैध अर्ज 13 एकूण जिल्हा परिषद गटासाठी 53 अर्ज वैध ठरले आहेत ,तर पंचायत समिती साठी गराडे गणासाठी 99 मध्ये 8 अर्ज वैध दिवे 100 गणासाठी 10 अर्ज वैध माळशिरस 101 गणासाठी 18 अर्ज वैध बेलसर 102 गणासाठी 14 अर्ज वैध भिवडी 103 गणासाठी 7 अर्ज वैध वीर 104 गणासाठी 10 अर्ज वैध कोळविहीरे 105 गणासाठी 21 अर्ज वैध निरा शिवतक्रार गणासाठी 10 अर्ज वैध एकूण पंचायत समिती गणासाठी 98 अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत ,तर मंगळवारी दि. 27 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्या पक्षाचे किती उमेदवार, तसेच अपक्ष माघार घेतात हे नक्की होईल, त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी ठरणार आहे ,अशी माहिती निवडणूक सहाय्यक अधिकारी विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर व प्रणोति श्रीश्रीमाळ अति सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गट विकास अधिकारी पुरंदर यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments