आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पहिल्या जिल्हा परिषद शाळेचे शनिवारी उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित; तर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाचे नवे दालन खुले सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव असलेल्या, खानवडी येथे त्यांच्या व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समताधिष्ठित व शिक्षणप्रधान विचारांना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा या महत्वकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी दि. 11 रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची राज्यातील जिल्हा परिषदेची शाळा म्हणून ही ओळखली जाणार असल्याचा दावा अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केला आहे. यावेळी अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक पाटील अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होणार आहेत, पुढे बोलताना पाटील म्हणाले की, विशेष म्हणजे महात्मा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त आणि त्यांच्या दोनशे वा जयंती वर्षाच्या प्रारंभ दिनी हा सोहळा होत असल्याने, या कार्यक्रमाला ऐतिहासिक व प्रेरणादायी महत्त्व प्राप्त झालेले आहे, पुणे जिल्हा परिषदेमार्फत उभारण्यात आलेली ही शाळा ग्रामीण भागातील वंचित गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता पूर्ण आधुनिक आणि मूल्याधिष्ठित शिक्षण उपलब्ध करून देणारा एक आदर्श उपक्रम ठरणार आहे, बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंत अभ्यासक्रमावर आधारित शिक्षणाची सुविधा येथे उपलब्ध असून ,डिजिटल शिक्षण पद्धती, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय ,क्रीडा सुविधा या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात येणार आहे, या प्रकल्पासाठी खानवडी येथील गट क्रमांक 43 मधील सुमारे 12 एकर गायरान जमीन महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा परिषदेस वर्ग करण्यात आली असून, त्याचबरोबर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निवासी व अनिवासी शाळा चालविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, शाळेच्या माध्यमातून खानवडी व परिसरातील दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना अनिवासी शिक्षणाची संधीला उपलब्ध होणार आहे, तर पुणे जिल्ह्यातून हुशार व गरजू विद्यार्थ्यांसाठी सहावीपासून निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, यामुळे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शहराप्रमाणेच दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे ,यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शाळेची प्रत्येक सुरुवात होत असून, सध्या बालवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येत आहेत ,या टप्प्यात सुमारे 260 विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यात आलेले असून, ही व्यवस्था पूर्णतः निवासी स्वरूपाची असेल तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीच्या निवासी शाळा सुरू करण्यात येणार असून ,प्रारंभी 40 विद्यार्थ्यांना निवासी सुविधा देण्यात येणार आहेत, यामुळे ग्रामीण व वंचित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत निवासाची ही सुविधा उपलब्ध होणार आहे, हा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. खानवडीतील हा प्रकल्प केवळ शाळा उभारण्यापुरता मर्यादित नसून, शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समता सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास साध्य करण्याचा एक व्यापक प्रयत्न मानला जात असून, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आधुनिक काळात प्रभावी अंमलबजावणी करणारा हा उपक्रम भविष्यात राज्यातील इतर भागासाठी आदर्श ठरेल शाळा पाहिल्यानंतर चांगल्या बाबीसमोर आल्या आहेत, तसे दरवर्षी या शाळेच्या कामकाजाचा अहवाल हा सर्वसाधारण सभेसमोर येणार आहे. वीरधवल जगदाळे अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments