Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील भिवडी या ठिकाणी ओव्हरटेकच्या नादामध्ये अपघात ;तर कारची बुलेटला धडक दोघांचा मृत्यू चालकावर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: निष्काळजी पणाने भरधावाने कार चालू असताना ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये भिवडी येथे दोन तरुणांचा मृत्यू झाला, ही घटना भिवडी ता. पुरंदर येथील या परिसरामध्ये घडली असून, याप्रकरणी कार चालका विरुद्ध सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .धनंजय दिलीप पवार वय 34 व रोहिदास अरुण गायकवाड वय 28 दोघेही राहणार भिवडी अशी त्यांची नावे असून, पवार व गायकवाड हे 4 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बुलेट एमएच 12 एस एस 5334 वरून भिवडी होऊन सासवड कडे जात होते, संगम हॉटेल जवळ समोरून येणाऱ्या कार एमएच झिरो एक बीजी 93 52 ओव्हरटेक करताना बुलेटला जोरदार धडक दिली असून, यामुळे दोघेही तरुण रस्त्यावर फेकले जाऊन, गंभीर जखमी झाले होते, स्थानिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ सासवड येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, प्राथमिक उपचारानंतर पवार यांना पुढील उपचारासाठी पुणे तर गायकवाड यांना हडपसर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आले होते, मात्र; उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला असून, दरम्यान अपघातानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटीची पाहणी केली असता, कारचालक आणि नियमाचे उल्लंघन करत ,निष्काळजी पणाने वाहन चालवण्याचे सपष्ट्ट झाले असून, ओव्हरटेकच्या प्रयत्नातच हा अपघात घडल्याचे समोर आले आहे ,याप्रकरणी फिर्यादी विनोद मोहन पवार राहणार भिवडी यांच्या तक्रारीवरून संकेत सुरेश म्हात्रे वय 38 राहणार सांताक्रुज मुंबई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशन कडून मिळालेली आहे ,पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचा चालू आहे, अशी माहिती सासवड पोलीस स्टेशन कडून मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments