पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी संत सेना महाराज यांची जयंती उत्साहात साजरी सासवड प्रतिनिधी: पुरंदर तालुक्यामधील सासवड येथे संत सेना महाराज सेवाभावी मंडळाच्या वतीने संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, हा कार्यक्रम श्री संत सोपानकाका महाराज मंदिर येथे भक्तिभावाने संपन्न झाला आहे. पुण्यतिथीच्या निमित्ताने सकाळी भजन, संत सेना महाराजांची महापूजा आणि प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गणेश महाराज वाघले यांनी कीर्तनाच्या माध्यमातून उपस्थित भाविकांचे प्रबोधन केले, तर भाविकांनी त्यांच्या प्रवचनाच्या मोठ्या भक्ती भावाने लाभ घेतला. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये अनेक भक्तांनी सहभाग घेतला, यावेळी पुणे जिल्हा नाभिक युवा अध्यक्ष भारत मोरे, सासवड शहर नाभिक संघटनेचे अध्यक्ष अमोल राऊत, उपाध्यक्ष संतोष इभाड, सचिव स्वप्नील शिंदे, तसेच संतोष पांडे, रामदास क्षीरसागर, विजय क्षीरसागर, राजू शिंदे, नवनाथ मोरे, रवींद्र राऊत, जगन्नाथ शिंदे, जगन्नाथ मोरे,दत्ता मोरे, पांडुरंग मोरे, अनिल शिरसागर ,संतोष बंड, विनायक शिंदे, सुरज क्षीरसागर, सुरेश शिंदे, मुन्ना शिंदे, पुरंदर तालुक्यातील नाभिक संघटनेचे सासवड शहर, तर तालुक्यातील नाभिक संघटनेचे सर्व सदस्य, बहुसंख्येने आधी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments