Hot Posts

6/recent/ticker-posts
Showing posts from April, 2026Show All
कोडीत येथील श्रीनाथ म्हस्कोबा यांची पुन: प्राणप्रतिष्ठा          सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           श्री शेत्र कोडीत मध्ये श्रीनाथ म्हस्कोबा याची पुन:प्राणप्रतिष्ठा केली जाणारा आहे, या निमित्ताने अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर रविवारपासून दिनांक 19 ब्रह्मा कलशोस्थव, महायज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह, किर्तन महोत्सव अशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीनाथ म्हस्कोबा प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिराच्या सुवर्णकलशाला 121 नद्यांच्या पाण्याने अभिषेक करून ,या सोहळ्यास प्रारंभ होईल, दिनांक एक मे रोजी महापूरणाहुती आणि महामंगल आरती करून, या सोहळ्याची सांगता होईल, याविषयी श्री देवस्थान म्हस्कोबा महाराज tracts यांनी माहिती कळवलेली आहे, महायज्ञ सोहळ्यामध्ये चार वेदांचे पारायण केले जाईल ,सहस्रचंडी यज्ञ अतिरुद्र सोहकार, लक्ष मोदक हवन गणेश याग, विष्णूयाग सुदर्शनयाग, शिव पंचायतन, होम, यज्ञ आणि शिवपार्वती विवाह सोहळा यांचे आयोजन केले आहे. यज्ञ सोहळ्यात 151 ब्राह्मण आणि तीन हजार यजमान सहभागी होणार आहेत. अखंड हरिनाम सप्ताह व भव्य कीर्तन महोत्सवामध्ये हरिभक्त परायण श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर ,हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली महाराज नामदास, हरिभक्त परायण आचार्य अमृता श्रम स्वामी महाराज, हरिभक्त परायण डॉक्टर जयवंत महाराज बोधले, हरिभक्त परायण आचार्य डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवितकर ,हरिभक्त परायण कान्होबा महाराज देहूकर, हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज देशमुख, हरिभक्त परायण बंडातात्या महाराज कराडकर, हरिभक्त परायण नामदेव महाराज लबडे, हरिभक्त परायण संजय नाना महाराज धोंडगे यांचे कीर्तन होणार आहेत, हा कीर्तन महोत्सवात मंदिरांमधील सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळात होणार आहेत या सोहळ्यासाठी श्री क्षेत्र कोडीत येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर आणि परिसरात जोरदार तयारी सुरू आहे, यज्ञ मंडप उभारण्यात आला असून, महाप्रसादासाठी देखील मंडप उभारला आहे ,या ठिकाणी प्रतिदिन तीस ते चाळीस हजार भक्तासाठी महाप्रसादाचे नियोजन केले जाणार आहे, मंदिराला रंगरंगोटी केली असून, सुवर्णकलश जलाभिषेक करण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था मंडपाच्या माध्यमातून केली आहे, याविषयीची श्री देवस्थान म्हस्कोबा महाराज tracts  व कोडीतकर येथील ग्रामस्थांनी ही माहिती दिली आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी व पॉलिटेक्निक संशोधन पद्धती या विषयावर एकदिवशीय राज्यस्तरीय वेबिनार उत्साहात संपन्न                    सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड (ता. पुरंदर) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी व पॉलीटेकनिक, सासवड येथे “संशोधन पद्धती” या विषयावर दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी एकदिवसीय राज्यस्तरीय वेबिनार उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने करण्यात आली. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. निलेश भोसले यांनी वेबिनारची रूपरेषा स्पष्ट करत संशोधन पद्धतीचे शैक्षणिक व औषधनिर्माण क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित केले. प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित करण्याची गरज व्यक्त केली.या वेबिनारमध्ये विविध मान्यवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात डॉ. दादासाहेब कोकारे (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) यांनी “संशोधन पद्धती: एक व्यावहारिक दृष्टिकोन” या विषयावर मार्गदर्शन करत संशोधनाची मूलभूत तत्त्वे, नियोजन व पद्धतशीर दृष्टिकोन यावर सविस्तर माहिती दिली. दुसऱ्या सत्रात डॉ. विक्रांत धमक (विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन कॉलेज ऑफ फार्मसी, अहमदनगर) यांनी “संशोधन डेटाचे सांख्यिकीय विश्लेषण: ग्राफपॅड प्रिझममधील प्रात्यक्षिक व अन्वयार्थ” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी संशोधनातील आधुनिक साधने व तंत्रज्ञान यावर प्रकाश टाकला. तिसऱ्या सत्रात डॉ. मोनिका राव (AISSMS कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे) यांनी “औषधनिर्माणशास्त्रातील संशोधन नीतीशास्त्र: नवोपक्रम व जबाबदारी यांचा दुवा” या विषयावर मार्गदर्शन करत शैक्षणिक संशोधनातील गुणवत्ता व डेटा विश्लेषणाचे महत्त्व स्पष्ट केले. चौथ्या सत्रात डॉ. समीर नदाफ (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, पलूस) यांनी “प्रत्यक्ष कार्यवाहीतील DOE: संशोधन कार्यक्षमता व उत्पादन विकास वृद्धी” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी फार्मास्युटिकल संशोधनातील प्रत्यक्ष अनुप्रयोग व संधी याविषयीही माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सृष्टी जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. सागर भिसे, प्रा. विशाखा गायकवाड, सुनीता बाठे तसेच डॉ. स्मिता पवार यांनी मोलाचे योगदान दिले. शेवटी प्रा. विशाखा गायकवाड (एचओडी, पॉलीटेकनिक) यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.या वेबिनारमध्ये राज्यभरातील विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमातून सहभागींच्या संशोधन पद्धतीविषयक ज्ञानात भर पडून भविष्यातील संशोधनासाठी त्यांना दिशा मिळाली.
पुरंदर तालुक्यातील वीर येथील चैत्र अमास्येनिमित्त श्रीक्षेत्र वीर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी                             सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                 श्री क्षेत्र वीर येथे आज शुक्रवार चैत्र वद्य अमावास्या 17एप्रिल रोजी अमावास्येनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. पहाटे ४.३० वाजता पूजा होऊन, मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी ६ वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी १० वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी, गोसावी मंडळींचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरु होता. दुपारी १२ वाजता धुपारती होऊन, गाभारा तासभर बंद करण्यात आला. दुपारी १.१५ मिनिटांनी गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला.   आज महाप्रसादाचे आयोजन राजेंद्र बुरुंगले व पोपट बुरुंगले, माळेगाव यांचेमार्फत करण्यात आले होते. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, उनाच्या दाहकतेपासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, लाईट व जनरेटर, दर्शनबारी, वाहनतळ व्यवस्था, परिसर स्वच्छता, जादा कर्मचारी, स्वयंसेवक, ट्रॅफिक पोलिस, इ. चे आयोजन करण्यात आल्याचे ट्रस्टचे मुख्य विश्वस्त  मोहन रावसो धुमाळ यांनी सांगितले. यावेळी संपूर्ण विश्वस्त, सल्लागार मंदिरात उपस्थित होते.
शिवहार लहाने यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा  कार्यवाह पदी बिनविरोध निवड                      सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       म.ए.सो वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड येथील सहा. शिक्षक शिवहार लहाने यांची  अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाशी संलग्न असलेल्या  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा  कार्यवाह पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पुणे जिल्हाध्यक्ष  निलेश काशीद यांनी शिवहार लहाने यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.                    महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही शिक्षकहित, शिक्षणहित व राष्ट्रहित या विचाराने कार्य करणारी शिक्षकांची अग्रगण्य राज्यव्यापी संघटना असून आजपर्यंत  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघातून  अनेकवेळा या शिक्षक संघटनेच्या व्यक्तींनी शिक्षकांचे प्रतिनिधित्व केलेले आहे. आगामी काळात पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संघटनात्मक काम प्रभावीपणे करून  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध शैक्षणिक समस्या सोडविणे तसेच  पुणे जिल्ह्यात शाळा तिथे शिक्षक परिषदेचा कार्यकर्ता हा उपक्रम राबविणार असल्याचा निर्धार सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला.                 पुणे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध शैक्षणिक व शासन स्तरावरील समस्यांची सोडवणूक व्हावी यासाठी दर महिन्याच्या  दुसऱ्या मंगळवारी पुणे येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी संवाद बैठक आयोजित केली जाईल, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी काम करणार असल्याचे  त्यांनी यावेळी आपल्या मनोगतातून सांगितले. आगामी नोव्हेंबर - डिसेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानपरिषद पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  शिवहार लहाने यांची झालेली निवड महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या  संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहे. लहाने यांचा पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शिक्षकांचा असलेला थेट संपर्क संघटनेच्या विस्तारासाठी महत्वपूर्ण  ठरणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, पुणे विभागाचे माजी  शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, नागपूर विभागाचे माजी शिक्षक आमदार नागो. गाणार, पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे, आमदार राहुल कुल, माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार  संग्राम थोपटे, माजी आमदार अशोक टेकवडे, राज्य कार्याध्यक्ष गुलाबराव गवळे, राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, पुणे विभागाचे संघटन मंत्री रामदास अभंग, संजीव मांढरे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे, प्राचार्य दत्ताराम रामदासी,प्राचार्य अशोक दहिफळे, भाऊसाहेब खोसे, प्राचार्या पूजा जोग, महेश शेलार, दिपक भोसले, राजेंद्र बडे,अरुण खेडकर, दत्तात्रय गायकवाड, विजय पिलाने  आदींनी अभिनंदन केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाबासाहेब पाटील, राजेंद्र दर्डा, मधुकर भावेयांच्या मुख्य उपस्थितीत 18 एप्रिल शनिवार रोजी परिषदेच्या अधिवेशनाचे भव्य उद्घाटनदेशभरातून 2500 पत्रकार उपस्थित राहणार..                                                       मुंबई  प्रतिनिधी :                                                      अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं 44 वं राष्ट्रीय अधिवेशन 18 आणि 19 एप्रिल 2026 रोजी रोजी उदगीर इथे होत आहे. उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहात असून लोकमतचे समुह संपादक मा. श्री. राजेंद्र दर्डा अधिवेशनाचे उद्घाटन करतील.आ. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.. बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री मा.  शिवेंद्रसिंहराजे भोसले अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत तर आमदार मा. संजय बनसोडे सह स्वागताध्यक्ष आहेत. परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.  एस.एम.देशमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तर मा. मिलिंद अष्टीवकर हे अधिवेशनाचे अध्यक्ष असतील. ज्येष्ठ पत्रकार मा. मधुकर भावे यांचे मार्गदर्शन पत्रकारांना लाभणार आहे.18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात अधिवेशनाचे उद्घाटन होईल. तत्पूर्वी उदगीर शहरातून प्रभात फेरी काढली जाणार असून त्यामध्ये शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी  सहभागी होतील. दुपारच्या सत्रात उदगीरमधून बाहेर पडून पत्रकारितेच्या क्षेत्रात देदीप्यमान यश मिळविणाऱ्या पत्रकारांचा सत्कार आणि त्यांच्या मनोगताचा कार्यक़म प्रा. जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली होईल.. दुपारी 4 ते 5.30 या वेळेत "लोकप्रतिनिधींच्या माध्यमांकडून अपेक्षा या विषयावर आमदार रोहीत पवार यांची मुलाखत घेतली जाणार आहे..रात्री 7 वाजता लोककलेचा जागर हा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल..19 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे याची मुलाखत होईल.. पुढारी न्यूज चे संपादक प्रसन्न जोशी ही मुलाखत घेतील.. सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत माध्यमं सत्ताधाऱ्यांना झुकतं माप देताहेत का? या विषयावरील परिसंवादात भाजप उपाध्यक्ष केशव उपाध्ये, कॉंग्रेसचे हनुमंत पवार, राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण, शिवसेनेचे राहूल लोंढे, उबाठाचे जयेश वाणी हे विविध राजकीय पक्षांचे प्रवक्ते सहभागी होतील.. पत्रकारांची बाजू मांडतील ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई..दुपारी 1.30 ते 3 या वेळेत "टीव्हीच्या पडद्यावरची दुनिया" या विषयावरील चर्चेत प्रसन्न जोशी, विशाल परदेशी, प्रज्ञा पोवळे, श्वेता दांडेकर, सौरभ कोरटकर, विशाल पाटील सहभागी होत आपले अनुभव सांगतील. ..दुपारी 3 ते 5 या वेळात अधिवेशनाचा समारोप समारंभ होईल..शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे आणि मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.. एस.एम.देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.. समारोप समारंभात लातूर जिल्ह्यातील काही मान्यवर पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.अधिवेशनास राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजिटल मिडिया परिषदेचे प्रमुख अनिल वाघमारे, विभागीय सचिव तसेच अधिवेशन मुख्य संयोजक सचिन शिवशेट्टे, रवी उबाळे, मराठवाड्याचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, उदगीर तालुका मराठी पत्रकार परिषदेचे  अध्यक्ष युवराज धोतरे , लातूर जिल्हा डिजिटल मिडीयाचे अध्यक्ष बिभीषन मद्देवाड , पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे  निमंत्रक अर्जुन जाधव ,जिल्हा डिजिटल मिडीयाचे सचिव सिद्धार्थ सुर्यवंशी तसेच परिषदेचे सर्व उपाध्यक्ष, विभागीय सचिव आणि कार्यकारिणी सदस्यांनी  केले आहे.......
पोलिसांच्या तत्परतेमुळे मायलेकींची कुटुंबाशी भेट                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                   सासवड पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि झारखंड पोलिसांच्या मदतीने बोपदेव घाटांमधील भरकटलेल्या 35 वर्षीय महिलेची तिच्या चिमुकल्या मुलीसह कुटुंबाशी सुखरूप भेट झाली असून, भाषेचा अडथळा आणि घरचा पत्ता सांगता येत नसतानासुद्धा पोलिसांनी हे कठीण कार्य यशस्वीपणे पार पाडले असून, 7 एप्रिल रोजी बोपदेव डोंगर रांगेतील एक महिला तिच्या मुलीसह फिरत असल्याची माहिती कानिफनाथ देवस्थान ट्रस्टने पोलिसांना दिली होती, या माहितीवरून हवालदार अविनाश होळकर व पथकाने मायलेकीला ताब्यात घेतले या महिलेला मराठी भाषा येत नसल्याने, ओळख पटवणे मोठे आव्हान होते ,ओळख पटेपर्यंत त्यांना आंबोडी येथील जिव्हाळा वृद्धाश्रमामध्ये ठेवले होते, तेथे डॉक्टर संजीव कुमार भाटे आणि कर्मचाऱ्यांनी तिची काळजी घेतली, ही महिला तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होती, मात्र कर्मचाऱ्यांनी तिला संयमाने सांभाळले, महिलेकडे असलेल्या आधार कार्डच्या आधारे पोलिसांनी झारखंड मधील पूर्व सिंहभूम पोलिसांशी संपर्क साधला तिथल्या पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांचा शोध घेण्यात यश आले, अखेर बुधवारी दि. 15 रोजी सविता सरदार आणि तिच्या मुलीला पती अजय सरदार व बहिण दिपाली सरदार यांच्या स्वाधीन करण्यात आले, सासवड पोलिसांची संवेदनशीलता आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे परराज्यातील ही महिला पुन्हा सुखरूप आपल्या कुटुंबात परतली आहे, या कौतुकास्पद कामगिरीबद्दल सासवड पोलीस दलाचे सर्व स्तरांमधून कौतुक केले जात आहे.
सासवड व जेजुरी येथे विशेष असे शिबिर                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने दि. 18 एप्रिल रोजी जेजुरी आणि 25 एप्रिल रोजी सासवड येथे विशेष असे शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, ज्या अर्जदारांची शिकवू अणुज्ञानाची मुदत संपलेली आहे, त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे ,याकरिता 17 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5:30 पर्यंत शिबिराची नियोजित वेळ घेऊन, पक्क्या अनुज्ञाती संदर्भातील आवश्यक व कामकाज पूर्ण करावे, असे आवाहन उपप्रादेशिक अधिकारी स्वप्नील भोसले यांनी केले आहे.
चुकीची माहिती प्रसारित केल्याप्रकरणी पुरंदरचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी निलंबित; खानवडी शाळेतील गैरवर्तन प्रकरण आदेशातील अटींचा भंग केल्यास सशस्त्र भंगाची कारवाई                                                                        पुणे प्रतिनिधी:                                                            पुरंदर तालुक्यातील खानवडी मधील ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा प्रकरणातील गैरवर्तन आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याचा ठपका ठेवत व जिल्हा परिषद प्रशासनाने विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणीतील गोविंद हरिभाऊ लाखे यांना निलंबित केले आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यासंदर्भातील आदेश जारी केलेले असून, महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा शिस्त व अपील नियम 1964 मधील नियम 3(1) अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे ,संबंधित अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिल्यानंतर, चुकीची माहिती बाहेर प्रसारित केली तसेच माध्यमांमध्ये प्रसिद्ध केल्यामुळे, जिल्हा परिषद संस्थेची बदनामी झाल्याचे, प्रशासनाच्या निदर्शनास आले असून, निलंबन कालावधीमध्ये लाखे यांचे मुख्यालय पंचायत समिती वेल्हा येथे निश्चित केले आहे, गटशिक्षण अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय, त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, तसेच निलंबन काळामध्ये कोणताही खाजगी व्यावसायिक किंवा नोकरी करण्यास त्यांना सक्त मनाई केली आहे, दरम्यान शासनाच्या नियमानुसार निलंबन काळामध्ये त्यांना निर्वाह भत्ता देण्यात येणार असून, आदेशातील अटींचा भंग केल्यास, पुढील शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे, यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली असताना यात प्रवेश क्षमता 260 असून, ज्युनिअर केजी पासून बारावीपर्यंत सीबीएसई मंडळ संलग्नित ही शाळा आहे, या शाळेला राज्य शासनाचे मान्यता असून, सीबीएसई बोर्डाकडून मान्यतेची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, या शाळेतील सर्व प्रवेश पारदर्शक  पद्धतीने झालेल्या असून, स्थानिक नागरिकांच्या मुलांना प्राधान्य देण्यात आले आहेत, याच पद्धतीने प्रत्येक तालुक्यात एक सीबीएसई शाळा सुरू करण्यास प्रशासनाने तयारी केल्याची माहिती मुख्यकार्यकारी धिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे.
पुरंदर तालुक्यातील वीर येथे ' तू आमचे वाटोळे केले असे' म्हणत असताना महिलेला काठीने मारहाण करत; सासवड पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल                                  सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                             'तू आमचे वाटोळे केले आहेस असे' म्हणत असताना, एका महिलेला डोक्यात काठीने मारहाण करून, जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, वीर ता. पुरंदर हद्दीमधील इंदिरानगर परिसरामध्ये मंगळवारी दि. 14 रोजी रात्री आठ ते बुधवारी दि. 15 रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारामध्ये हा प्रकार घडला आहे, लीला दिनेश सावंत (वय 45) धंदा मंजुरी राहणार इंदिरानगर वीर ता. पुरंदर असे मारहाण करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ताराबाई जालिंदर माळवे व जालिंदर रघुनाथ माळवे राहणार दोघेही इंदिरानगर वीर ता. पुरंदर यांच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी लिला सावंत या मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारामध्ये आपल्या घरी चुलीजवळ बसल्या होत्या, यावेळी त्यांच्या शेजारी राहणारी ताराबाई माळवे या फिर्यादीच्या घरासमोर आल्या' तू आमचे वाटोळे केले आहेस असे' म्हणत असशील शिवीगाळ आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली, वाद वाढत गेल्यानंतर आरोपी ताराबाई हिने आपल्या हातातील लाकडी काठीने लिला यांच्या डोक्यात उजव्या बाजूला जोराने प्रहार केला, यामध्ये लिला सावंत या जखमी झाल्या असून यावेळी लिला यांची बहीण सुनिता महेश शिंदे ही भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आली असता, आरोपींनी तिलाही मारहाण हाताने करून, शिवीगाळ व दमदाटी केली.दरम्यान; याप्रकरणी सासवड पोलिसांनी सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ताराबाई माळवे व जालिंदर माळवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास पोलीस हवालदार विशाल जाधव करीत आहेत.
पुरंदर तालुक्यातील परिंचे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान 2026 शुक्रवार या दिवशी संपन्न होणार                                                                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक मराअ- 2026 प्र. क्र. 09 समन्वय 1 दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजीचे शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील क्षेत्रीय स्तरावर सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारीत सत्वर निकाली काढणे, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मंडल स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्याकरिता निर्देश दिलेले आहेत, तरी पुरंदर तालुक्यामधील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे पहिला टप्पा शनिवारी दि. 7 मार्च 2026 रोजी कुंभारवळण व राजेवाडी यामंडला मधून वाघापूर या ठिकाणी संपन्न झाले, दुसरा टप्पा शनिवारी दि. 14 मार्च 2026 रोजी शिवरी व वाल्हे यामंडलामधून शिवरी या ठिकाणी संपन्न झाले, तिसरा टप्पा शुक्रवारी दि. 10 एप्रिल 2026 रोजी भिवडी या मंडला मधून नारायणपूर या ठिकाणी संपन्न झाले, चौथा टप्पा शुक्रवारी दि. 17 एप्रिल 2026 रोजी परिंचे मंडलांमधून परिंचे या ठिकाणी संपन्न होणार आहे, तर पुढील पाचवा टप्पा शुक्रवारी दि. 8 मे 2026 रोजी सासवड मंडलांमधून सासवड या ठिकाणी होणार आहे, तर सहावा टप्पा शुक्रवारी दि. 15 मे 2026 रोजी जेजुरी मंडलामधून जेजुरी या ठिकाणी संपन्न होणार आहे, तरी परिंचे मंडल भाग यांच्या कार्यक्षेत्रांमधून नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी  महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान कार्यक्रम हा शुक्रवारी दि. 17 एप्रिल रोजी मोजे परिंचे येथील श्री काळ भैरवनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या शिबिराच्या अभियानांतर्गत शिबिरामध्ये देण्यात येणाऱ्या योजना व घटक पुढीलप्रमाणे अ) भोगवटादार वर्ग दोन जमिनी भोगवटादार वर्ग एक व जिवंत सातबारा सर्व गावांमधील सातबारा वाचन पूर्ण करून,  ब)प्रलंबित वारस नोंदी करून, अधिकार अभिलेख अद्यावत करणे. क) सामाजिक अर्थसहाय्य योजना संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे शिबिरात लाभ देणे ड) तुकडेबंदी कायदा रद्द केल्यानुसार कार्यवाही प्रमाणभूत सीमेपेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व हस्तांतरित गाव न्याय यादी करून असे व्यवहार नियमतीकरण करणे, ही शाळेतील मुलांना शैक्षणिक दाखले वाटप करणे मंडल स्तरावरील सर्व शाळांचा आढावा घेऊन दाखले शैक्षणिक कामासाठी आवश्यक असणारे विविध दाखल्यांचे शाळेमध्ये कॉम्प्युटर मोड व विद्यार्थ्याकडून आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज भरून घेणे, शिबिराच्या दिवशी दाखल्यांचे वाटप करणे, पाणंद रस्त्याची दुरुस्ती करणे, उपविभागीय स्तरीय समितीचे दिनांक डिसेंबर 2025 नुसार शिबिर आयोजित करावयाच्या मंडळातील पाणंद रस्ते यांची प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतला उपलब्ध करून देणे,  सर्वासाठी घरे अंतर्गत पट्टे वाटप करणे, मंडळातील सर्वांसाठी घरी अंतर्गत पट्टे वाटपासाठी बाकी राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करणे, तसेच संबंधित शासन निर्णयातील तरतुदीनुसार पूर्व तयारीच्या कालावधीमध्ये प्रक्रिया पूर्ण करावी, व शिबिरातील पट्टे वाटप करावे, 2) समाधान शिबिरा अंतर्गत सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून द्यावयाच्या सेवा अप्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, विवाद ग्रस्त फेरफारांची संख्या निश्चित करून, संबंधितास आधीच नोटीस बजावून, शिबिराच्या दिवशी फेरफार निकाली काढण्यात यावेत, सबळ कारणाशिवाय फेरफार प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक व अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क मंडल स्तरावर सातबारा मधील चुका संदर्भातील अर्ज स्वीकारणे, कागदपत्राची तपासणे त्रुटी व पूर्तता करून दुरुस्तीची नोंद घेणे. क) लोकसेवा हक्क कायदा, तात्काळ सेवा पुरवणे,उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी आदिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र इत्यादी बाबत अर्ज स्वीकारणे व प्रमाणपत्र वितरित करणे. ड) आकर्षक तरतुदी संदर्भातील सुधारणा बाबत मार्गदर्शन करणे, अकृषिक रूपांतरणासाठी नागरिकांना मार्गदर्शन करणे, जुन्या कृषीक आकारणी व रुपांतरण कराच्या व्यवस्थेऐवजी आता एक वेळेचे आधी मूल्य भरण्याची सोपी व्यवस्था करण्यात आली असून, इ डिजिटल सातबारा कायदेशीर वैधता बाबत जनजागृती करणे, शासन निर्णय याच्यानुसार अधिसूचना 10 डिसेंबर 2025 नुसार महाभुमी पोर्टल वरून, डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्याची प्रात्यक्षिक देणे व नागरिकांना प्रोत्साहित करणे कमी-जास्त पत्रक तयार करणे, भूसंपादन केलेल्या व कृषी परवानगी दिलेल्या जमिनीचे कमी जास्त पत्रके तयार करून, गाव दप्तर अद्यावत करणे. इ सुधारणा व नागरी सुविधा एक खिडकीस व्यवस्था सिंगल विंडो कलर्स समाधान शिबिरामध्ये एक खिडकी प्रणाली राबवण्यासाठी एकाच खिडकीमध्ये सर्व प्रकारचे अर्ज स्वीकारणे, प्रक्रिया करणे व तात्काळ निकाली काढणे, शिबिरा दरम्यान; खालील नमूद इतर सेवा उपलब्ध करून देणे, ही मोजणी अग्रोस्टॅक, पी एम किसान योजना, तक्रार निवारण करणे यासाठी परिंचे मंडलातील ग्रामीण भागातील सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडलाधिकारी बसवंत बनसोडे   यांनी केले आहे.
पुरंदर तालुक्यातील सोनोरी श्री काळभैरवनाथ चैत्रि यात्रेनिमित्त भव्य दिव्य अशा कुस्ती आखाड्यामध्ये शेवटची कुस्ती तब्बल 75 हजार व गदा                                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      सोनोरी ता. पुरंदर येथील श्री काळभैरवनाथ चैत्रि अष्टमी यात्रा उत्साह मध्ये संपन्न झाली. सोनोरी येथे श्री काळभैरवनाथ चैत्र अष्टमी यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते, यात्रेच्या पहिल्याच दिवशी श्री काळभैरवनाथ माता जोगेश्वरी यांच्या मूर्तीला अभिषेक व विधिवत पूजा करण्यात आली, यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले ,यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या श्री काळभैरवनाथ कुस्ती आखाड्यामधील महाराष्ट्रातील अनेक नामांकित व अधिकच पैलवानांनी हजेरी लावली होती, सुमारे 250 मल्लांनी या आखड्यांमध्ये सहभाग घेतला होता, 3000 रुपयापासून ते 75 हजारापर्यंतच्या कुस्त्या रंगल्या ,महाराष्ट्र केसरी, पंजाब केसरी विविध मानांकित स्पर्धांमध्ये चमक दाखवलेल्या पैलवानांनी आपली ताकद आजमावली, माजी सरपंच बाळासाहेब( नाना) काळे यांच्या कुटुंबीयांच्या वतीने अंतिम कुस्तीसाठी 75 हजार रुपयांची  चांदीची गदा देण्यात आली ,ज्यामुळे या कुस्तीचा उत्साह अधिकच वाढला असून, समस्त सोनोरी ग्रामस्थांच्या वतीने या कुस्ती आखाड्याची उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले होते, यावेळी आजी- माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व गावातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .यात्रेमुळे संपूर्ण परिसरामध्ये उत्साह आणि भक्तीमय वातावरणामध्ये ही परिसर पाहायला मिळाला.
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 5,000दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर                         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक    मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                 पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.15 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 5,000 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 5,000 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 3,500 तर सरासरी 4,250 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,300तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,700 तर सरासरी 3,000 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास  कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर, गुळाला 4,600रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 3,00 बॉक्स 60क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,600 कमाल दर 4,4,000रुपये तर साधारण4,500 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 3,500,5,000,4,250. बाजरी 2,600,3,300, 2,950. गहू 2,700,3,300,3,000. तांदूळ ----‐------ हरभरा 4,800, 5,600,5,200.
पुरंदर तालुक्यातील गराडे परिसरामध्ये जमिनीच्या वादा मधून दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी; सासवड पोलीस स्टेशन या ठिकाणी महिला सह एकूण वीस जणाविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल                                        सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                          पुरंदर तालुक्यातील गराडे ढोणेवाडी येथील हद्दीतील जमिनीच्या हक्कावरून आणि कंपाऊंडच्या कामावरून दोन कुटुंबात जोरदार राडा रोड झाला या हाणामारी मध्ये दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले असून ,सासवड पोलिसांनी महिला सह एकूण वीस जणांविरुध्द सासवड पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल केलेले आहेत, ही घटना 14 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारामध्ये घडली असून, याप्रकरणी दोन्ही बाजूकडून परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आलेल्या आहेत, पहिल्या घटनेमध्ये फिर्यादी समीर गोकुळ ढोणे( वय 38) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी हे घराच्या पूर्व बाजूला असलेल्या जमिनीमध्ये आईसोबत कंपाऊंडचे काम करीत होते, यावेळी आरोपी प्रदीप दिनकर ढोणे, दिपक महादेव ढोणे, दिनकर द्वारका ढोणे, शंकर द्वारका ढोणे, अनिता संतोष ढोणे, रूपाली प्रदीप ढोणे, उत्कर्ष संतोष ढोणे सर्व राहणार गराडे तालुका पुरंदर यांनी ही जागा आमची आहे, असे म्हणत वाद घातला आरोपींनी पाण्याचे पाईप आणि कंपाउंड ची जाळी तोडली, तसेच समीर यांना लाथा बुक्क्यांनी आणि लाकडी काठीने मारहाण केली, यादरम्यान; कोणीतरी एकाने समीर याच्या डोक्यात दगडाने मारहाण करून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे, त्यानुसार वरील सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, दुसऱ्या घटनेमध्ये रूपाली प्रदीप ढोणे (वय 35) यांनी फिर्यादी आहे की, त्यांच्या तक्रारीनुसार गट नंबर 2131 मध्ये आरोपी विनोद गोकुळ ढोणे, समीर गोकुळ ढोणे, सुंदराबाई गोकुळ ढोणे, सुप्रिया विनोद ढोणे, रेश्मा समीर ढोणे सर्व राहणार गराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे रत्‍नाबाई मारुती ढोणे, राजेंद्र वसंत ढोणे, गुनाबाई वसंत ढोणे, सुभाष संजय ढोणे, वसंत भैरु ढोणे, गीतांजली विजय ढोणे, विजय मारुती ढोणे, शेडच्या कामाबद्दल विचारांना केली असता, आरोपींनी शिवीगाळ करत रूपाली यांच्या दिरांना दीपक ढोणे यांनी मारहाण केली, दरम्यान; मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या विनोद ढोणे याने काठीने दीपक याच्या पाठीवर, छातीवर आणि डोक्यात गंभीर मारहाण केली तसेच "पुन्हा जमिनीत याल तर जिवे मारून टाकू," अशी धमकी दिली. याप्रकरणी सासवड पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस नुसार खालील कलमान्वये गुन्हे नोंद केलेली आहेत, या दोन्ही प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार विनायक हाके करत आहेत.
12 जुलै रोजी सासवड यैथून श्री संत योगीराज चांगावटेश्वर पालखीचे प्रस्थान                                                     सासवड  प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                       श्री संत योगीराज चांगावटेश्वर देवस्थान क्षेत्र सासवड (ता. पुरंदर) जि. पुणे येथून आषाढीवारीसाठी 12 जुलै 2026 रोजी लक्ष्मी नारायण मंदीर येथून दुपारी 12 वाजता क्षेत्र पंढरपूरसाठी आषाढवारीसाठी प्रस्थान ठेवत आहे. परंपरेने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एकादशीला सासवडला मुक्कामी येतो, द्वादशीला प्रथम श्री संत सोपानकाका पंढरपूरला आषाठीवारीसाठी प्रथम प्रस्थान ठेवतात. त्यांच्या पाठोपाठ लगेचच श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराजांची पालखी सोहळा पंढरपूरच्या आषाठी वारीसाठी प्रस्थान ठेवल्यानंतर कुंभारवळण,  एखतपूर,  मुंजवडी, खानवडी मार्गे सोहळ्याचा पहिला मुक्काम पारगाव मेमाणे याठिकाणी असतो. दि 13 जुलै रोजी वाघापूर चौफुला, वाघापूर,  शिंदावणे घाटामधून अवघड उताराची वळणे घेवून शिंदावणे मार्गे विठ्ठल बन, डाळिंब मार्गे बोरीऐंदी मध्ये मुक्कामी असेल,दि 14 जुलै रोजी बोरीभडक ITI मार्गे पुणे सोलापूर रोडने सहजपूर मध्ये दुपारचा नैवद्य घेवून यवत गावामध्ये मुक्कामी असेल. दि 15 जुलै सकाळी भांडगाव, चौफुला, वरवंड कसबे पाटस भैरवनाथ मंदिरात मुक्काम. दि16 जुलैला MIDC, दत्तमंदिर, कुरकुंभ, मळद करून श्रींच्या पालखीला रावणगाव येथे अश्वाचे पहिले गोल रिंगण होईल व नंतर सोहळा मारुती मंदिरात मुक्कामी विसावेल, दिनांक 17 जुलैला खडकी काळभोर वस्ती, भिगवण मुक्काम,  18-जुलै तक्रारवाडी,पोंधवडी,कळस पाटी डाळज नंबर एक लाख मुक्काम, दिनांक 19 जुलैला डाळज नं.३ पळसदेव, लोणी देवकर, इंदापूर मुक्काम, दिनांक 20 जुलैला वडापुरी वकील वस्ती,निरा नदी मध्ये श्रींचे गंगास्नान करून अकलूज मुक्काम, दिनांक 21जुलैला कुलकर्णीवस्ती झगडेवस्ती, खंडाळी वेळापूर, तोंडले मुक्कामी.  22 जुलैला भंडीशेगांव मुक्काम, 23 जुलैला बाजीराव विहीर येथे श्रींच्या पालखीला अश्वाचे दुसरे गोल रिंगण होवून संतनगर वाखरी पालखी तळावर विसावेल. 24 जुलै दुपारी सर्व संताची  देवभेट होईल व अश्वाचे उभे रिंगण होवून पुढरपूर मुक्कामी विसावेल.25 जुलैला देवशयनी एकादशी 29 जुलैला गोपाळकाला करून देवभेट करून सोहळा सासवडकडे परतीचा प्रवासस दुपारी १२ वाजता प्रस्थान ठेवेल. बोंडले, पिठेवाडी, लासुर्णे, बारामती, मोरगाव, खळद, व 4 ऑगस्ट रोजी लक्ष्मी नारायण मंदिरात आषाढी वारी करून सांगता होईल. अशी माहिती संस्थानचे व सोहळ्याचे चोपदार शशिकांत जगताप तसेच अध्यक्ष हभप जनार्धन वाबळे यांनी दिली. या वर्षी सोहळ्याच्या रथ ओढण्याच्या बैलजोडी साठी इच्छूक बैलमालकांनी संस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी हिंदुत्वाची ललकार ; तर भव्य दिव्य हिंदू संमेलनाचे सासवड या ठिकाणी आयोजन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                              सासवड ता. पुरंदर या ठिकाणी हिंदुत्वाची ललकार एप्रिल महिन्यामध्ये भव्य दिव्य असे हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे सकल हिंदू समाज एकत्र येऊन आपल्या संस्कृतीच्या अभिमान जागृत करून भक्ती शक्ती आणि क्रांतीच्या त्रिवेणी संगमाच्या पुण्यभूमी मध्ये सासवड या ठिकाणी जातीपाती विसरून हिंदू एकतेच्या राष्ट्र निर्माण मानाच्या महाप्रवाहामध्ये सहभागी व्हावे यासाठी असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे या हिंदू संमेलनामध्ये प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक डॉक्टर रेवती, राहुल संत प्रवीण वसंत दबडगाव, हरिभक्त परायण सुरज महाराज आटवडीकर, राष्ट्रसंत डॉक्टर स्वामीदास गणेश आनंद महाराज उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, हे संमेलन शनिवारी दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत कन्हैया चौक धान्य बाजारपेठ सासवड येथे होणार आहे अशी माहिती प्रतिनिधीला देण्यात आली.
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी स्वच्छता महा अभियान                                                               सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       महात्मा ज्योतिराव फुले यांच्या दिव शताब्दी जयंती वर्षाची अवचित्य साधून सासवड नगर परिषदेने शहरात व्यापक अशी स्वच्छता अभियान सुरू केलेले आहे, रविवारी सासवड सोनोरी मार्गावर राबवलेल्या पहिल्या मोहिमेत चार तासात 12 टन कचरा उचलून परिसर चकाचक करण्यात आला, आता प्रत्येक कंपनीच्या पहिल्या रविवारी शहरातील एका भागात अशी मोहीम राबवली जाणार असल्याची यावेळी सांगण्यात आले, या मोहिमेमध्ये माजी आमदार संजय जगताप, नगराध्यक्ष आनंदी (काकी) जगताप, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्यासह लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष श्रमदान केले. सासवडने स्वच्छतेचा वारसा जपत सलग सहा वर्ष देशात अव्वल क्रमांक पटकावलेला असल्याचे आरोग्य सभापती राजन जगताप यांनी यावेळी सांगितले, याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप, लीना वढणे, प्रदीप राऊत, ज्ञानेश्वर गिरमे, सासवड नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते. नगरपालिकेचे 150 स्वच्छता दूत, 10 घंटा गाड्या 8 ट्रॅक्टर आणि 2 जेसीबीच्या सहाय्याने महामार्ग ते स्वामी समर्थ मठ परिसरातील कचरा हटवण्यात आला, सासवडने आजवर जे स्वच्छताच्या बाबतीत जे यश मिळवले आहे त्या मागे सासवडकर नागरिकांचे योगदान मोठे आहे, आणखी लोक सहभागातून वाढवत, प्रशासन नागरिक यांच्या सहयोगातून सासवड शहर स्वच्छतेच्या क्रमवारीमध्ये यापुढेही देशात अग्रस्थानी राहील. संजय जगताप माजी आमदार पुरंदर.
पुरंदर तालुक्यातील कोथळे येथील माजी सरपंच यांची आजारपणाला कंटाळून आत्महत्या                             सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           दीर्घ काळामध्ये आजाराला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना दुर्दैवी अशी घटना पुणे पंढरपूर महामार्गावरील बोरावके मळा परिसरामध्ये सोमवारी दि. 13 रोजी घडली या घटनेमुळे परिसरामधील हळहळ व्यक्त होत असून, शहाजी बापू जगताप राहणार कोथळे तालुका पुरंदर असे मृत व्यक्तीचे नाव आहे, मिळालेल्या माहितीनुसार सासवड पोलिसांनी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारामध्ये बोरावके मळा या परिसरातील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती मिळवली, त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, पोलीस तपासा दरम्यान मृताच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आढळून आली असून, त्यामध्ये आजारपणाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे, घटनास्थळी एक सायकल आढळून आली, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील प्रक्रिया करण्यासाठी तो सासवड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे, त्याचा पुढील तपास सासवड पोलीस स्टेशन करीत आहेत, अशी माहिती सासवड पोलीस स्टेशन कडून प्रतिनिधीला देण्यात आली आहे.
तहसीलदार व प्रांतांचे उत्खननाचे काढले अधिकार; राज्यामधील 500 ते 2000 ची परवानगी आता जिल्हाधिकारी देणार                                                सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                              राज्यात सध्या 500 ते 2000 ब्रास या कमी क्षमतेच्या उत्खननासाठी तहसीलदार किंवा प्रांत स्तरावर परवानगी दिली जाते, मात्र या परवानगी देताना मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितपणा आणि भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे प्राप्त झालेल्या आहेत, यावर तोडगा म्हणून हे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांची चौकशी करून, त्यांची वेतन वाढ रोखण्याचे प्रस्ताव सरकारला सादर करावेत असे सूचना महसूल मंत्री यांनी बैठकीमध्ये प्रशासनाला दिलेल्या आहेत, तसेच पुणे जिल्हा प्रशासनाने राबवलेली डिजिटल ट्रेकिंग प्रणाली जीपीएस राज्यभर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत गौण खनिज उत्खनन बाबत लक्षवेधी सूचना मांडली होती ,त्यानुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यासमवेत नुकतीच एक बैठक घेतली, त्यामध्ये कनिष्ठ स्तरावरील अधिकारी आणि खान व्यावसायिक यांच्यातील गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी हा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला अवैध उत्खनन आणि नियम बाहयस्ट्रोन क्रशरवर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी 500 ते 2000 ब्रास पर्यंतच्या खाणकामासाठी परवानग्यांचे अधिकार तहसीलदार यांच्याकडून काढून घेत, जिल्हाधिकारी स्तरावर सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे, त्यासाठी नियमात आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येईल, जो वर्षातून एकदाच अर्जाची छाननी करून, रीतसर परवानगी देईल.असेही या बैठकीमध्ये ठरलेले आहे.रात्री छुप्या पद्धतीने होणाऱ्या उत्खननामुळे सरकारच्या कोट्यावधीचा महसूल बुडतो, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष भरारी पथके तैनात करावीत ,अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिलेल्या आहेत ,तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, कागदपत्रे नसतानाही खाणी सुरू ठेवण्यास मदत केली गेली आहे अशा तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्या वेतन वाढी रोखण्याचे प्रस्ताव सरकारला सादर करावेत, अशा सूचना देखील महसूल मंत्री यांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत, तर टेकड्या फोडून निसर्गाची हानी करणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला परवानगी देऊ नका ,अशी आदेशही त्यांनी काढलेले आहेत ,तर ज्या ठिकाणी ईटीएस सर्वेक्षणात मान्यतेपेक्षा अधिक उत्खनन केले असल्याचे आढळून आल्यास, संबंधित खान मालकावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशाही सूचना या बैठकीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
पुरंदर तालुक्यातील दिवे येथे कातोबानाथ यात्रा उत्साहामध्ये ; कुस्ती आखाड्यामधील राज्यातील अनेक नामवंत मल्लांनी हजेरी लावली तर 200 मल्लांची हजेरी                           सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                 दिवे ता. पुरंदर येथील दोन दिवस श्री कातोबानाथ यात्रा उत्साहातमध्ये पार पडली. यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या भव्य निकली कुस्ती जंगी आखाड्यांमध्ये पै. यश काळे व पहिलवान शुभम थोरात यांच्या मल्लांची शेवटची कुस्ती झाली, कुस्ती अटीतटीची होऊन ,लढत बरोबरीत सुटली. निकाली कुस्ती आखाड्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक नामवंत मल्लांनी हजेरी लावली, यावेळी पुरंदर पंचायत समिती सभापती अमित झेंडे, सरपंच रुपेश राऊत, गाव कारभारी राजेंद्र काळे, गुलाब तात्या झेंडे, दिलीप झेंडे, राजेंद्र झेंडे, योगेश काळे, रामभाऊ झेंडे, प्रकाश पवार, अशोक टिळेकर ,रमेश झेंडे, पोपट झेंडे, सतीश झेंडे, एडवोकेट भगवान लडकत, गणपत शितकल, बाळासाहेब झेडे, बापूराव राऊत ,अमर झेंडे, अजित गोळे, सुरेश झेंडे, सुरेश पवार, रवींद्र पवार, सुभाष पवार, संजय पवार, अशोक कुंभार, अविनाश झेंडे, प्रमोद टिळेकर ,अतुल जाधव, निलेश झेंडे, प्रशांत टिळेकर, अशोक झेंडे, माऊली खटाटे ,निलेश काळे, शंकर झेंडे, संदीप झेंडे, गणीभाई  मुलांनी, सुधीर झेंडे, शिक्षक नेते तानाजी झेंडे, मनोज क्षीरसागर, माऊली घारे, शरद झेंडे, अमर झेंडे, शिवाजी खटाटे, दादासाहेब झेंडे, आधी दिवे पंचक्रोशीतील कुस्तीशौकीन उपस्थित होते .कुस्ती आखाड्यामधील पंच म्हणून पै. सागर काळे, पै. गोरख झेंडे ,पै. पप्पू काळे, पै. जगन्नाथ मोरे, पै. पांडुरंग झेंडे, पै. राजेंद्र गायकवाड पै. अमित काळे यांनी पंच म्हणून काम पाहिले. गणपत शितकल, रामभाऊ शेंडे यांनी निवेदन केले, प्रास्ताविक पै. सागर काळे यांनी केले आभार राजेंद्र मारुती झेंडे यांनी मानले मनोरंजनाच्या कार्यक्रमाने दिवे यात्रेची सांगता झाली, कातोबानाथाचा  जन्म सोहळा मोठ्या उत्साहातमध्ये साजरा करण्यात आला. जन्मप्रसंगी कीर्तन, भजनाचा कार्यक्रम, होऊन, फुलाची पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच सुटवडा वाटप करण्यात आला, पहाटे पाच वाजता पासुन स्वाद्य दंडवत कार्यक्रम सुरू झाला, खुशी शिंदे सरकार यांचा मनोरंजन कार्यक्रम होऊन, यात्रेची सांगता झाली.
पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये १ मे रोजी भव्य सामुदायिक विवाह सोहळा                                                         सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड (ता. पुरंदर) : आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने यावर्षीचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा शुक्रवार, दिनांक १ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सासवड येथे आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याचे यंदा विसावे वर्ष असून, गेल्या दोन दशकांपासून सर्व जाती-धर्मातील गरजू कुटुंबांसाठी ही परंपरा अखंडपणे सुरू आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय अण्णा जगताप यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे ६०० ते ७०० विवाह लावून देण्यात आले आहेत. या विवाहांमधून अनेक कुटुंबांचे संसार सुखाने सुरू असून, समाजात एक आदर्श निर्माण झाला आहे.या भव्य सोहळ्यास महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा  पवार, खासदार सुप्रिया  सुळे तसेच खासदार पार्थ  पवार उपस्थित राहणार आहेत.सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नववधू-वरांना मोफत कपडे, बूट, भव्य मिरवणूक, संसारोपयोगी साहित्य तसेच स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.या उपक्रमाबाबत माहिती देताना संस्थापक अध्यक्ष संजय अण्णा ज्ञानोबा जगताप, अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, कार्याध्यक्ष अभिषेक जगताप, उपाध्यक्ष विकास जगताप, सचिव राहुल इनामके, सहसचिव सुनील बापू जगताप, मार्गदर्शक हेमंत भोंगळे तसेच पदाधिकारी अभिजीत बारवकर, गिरीश कर्नावट, उमेश भैय्या जगताप, सचिन जगताप, गणेश मोरे, बळीराम सोनवणे यांनी अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.नाव नोंदणीसाठी इच्छुकांनी आदर्श क्रांती संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे यांनी केले आहे.
निधन वार्ता तान्हुबाई इंगळे                                       सासवड प्रतिनिधी:                                                     वाळूंज ता. पुरंदर येथील तान्हुबाई रामचंद्र इंगळे (वय 75) त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन दीर, दोन मुलगे, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र दत्तात्रेय इंगळे यांच्या त्या पत्नी होत, माजी उपसभापती पंचायत समिती पुरंदर रंजना कुंभारकर व शिवसेना उपजिल्हाप्रमुख व माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती डॉ. रमेश (आबा) इंगळे व अभिमन्यू फ्लेक्स प्रिंटिंग सासवड मस्कु (दादा )इंगळे यांच्या त्या मातोश्री होत.
ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा खानवडी येथील उद्घाटन शुभारंभ; महात्मा ज्योतिराम फुले यांच्या 200 वा जन्म शताब्दी वर्षाचा शुभारंभ हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी            सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       ज्योती सावित्रीबाई जिल्हा परिषद शाळा खानवडी येथील उद्घाटन शुभारंभ महात्मा ज्योतिराम फुले यांच्या २०० व्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ खानवडी ता. पुरंदर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालक मंत्री सुनेत्रा पवार यासोबत होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बोलताना म्हणाल्या की, ज्योती सावित्रीच्या रूपातूनच हे खानवडी येथे रूप असे निर्माण झालेले आहे, याला आंतरराष्ट्रीय दर्जेची शाळा उभारण्याचा अजित पवारांचा मानस होता ,याचे दादांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते, दादा आता असायला पाहिजे होते, त्यांना खूप आनंद झाला असता ,माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा दादांनी एक प्रकारे समाजात घडवून आणला आहे, ही वास्तू नसून महिलाशक्ती स्थळ आहे, असा सुद्धा त्यांनी उल्लेख केला, १००० शाळांमध्ये असे उपक्रम राबवण्याचे शासनाचे धोरण आहे, असे सूचक वक्तव्य पवार यांनी केले. वीरधवल जगदाळे जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे, जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री, छगन भुजबळ अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, शासनाच्या विविध उपक्रमातून जो योजना चालू आहेत, त्या तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे असून, फ्रान्स जर्मनीचे भाषा बोलून दाखवली त्या उपक्रमाचा 100 शाळांमधून उद्घाटन करण्यात आलेले आहे, त्या उत्कृष्ट असा आनंद आम्हाला त्याबद्दल आहे ,1000 केंद्र माणूस संशोधन साधन उभारण्याचा काम करत असून, जीवनात स्वतःच्या पायावर उभे राहून जो समाज घडविण्याचा प्रयोग केला त्याला महत्त्व आहे ,महात्मा ज्योतिराव फुले यांनी चांगलीच बाजारपेठ उभी करून, त्याची जागृती निर्माण केलेली आहे ,शेतकरी यावर लागणारे कर या संदर्भात चर्चा करून, कंपनी ही मोठी होती, बांधकामाची योजना साकारून समाज घडविण्याचा फुलेंनी जे कार्य केलेले आहे, त्याचे फळ हे समाजामध्ये दिसत आहे, पुणे जिल्ह्यातील विविध उद्योजकता फुलेंनी निर्माण केलेली आहे, नगर विकासाचे एक प्रकारचे मॉडेल बनवून दाखवले आहे, शेअर बाजार चालू केला, जोपर्यंत शिक्षण घेत नाही ,तोपर्यंत शिक्षण घेणे गरजेचे असून ,भिड्यावाड्याची पहिली शाळा पुणे येथे महात्मा फुले म्हणजे पहिले महात्मा ज्योतिराम फुले होय, विद्धे विनामती गेली, मतीविना नीती गेली, नितीविना गती गेली, गती विना वित्त गेले, इतके अनर्थ एका अविद्येने केले क्रांतीसुर्य थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराम फुले यांनी या प्रकारचे कार्य केले आहे ,असे फडणवीस यांनी सांगितले. खानवडी येथे संदीप पवार कृषी विभाग व ऋतुजा इंगोले आजच्या कार्यक्रमांमध्ये खानवडी येथील कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार पाहायला मिळाला ,तर जिल्हा परिषद पुणे यांनी खानवडी येथील ग्रामपंचायत याना सुद्धा अजिबात विचारात घेतले नाही, मनमानी कारभार केलेला आहे ,अशा कार्यक्रमाला कोणतेही गालबोट नको, म्हणून सर्व समाजामधून सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायत गप्प होते, विमानतळाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी  व मंत्री याकडून कोणत्याही प्रकारचा विमानतळाचा कोणताही उल्लेख झालेला नाही, शेतकऱ्यांसाठी ही मोठी जमेची बाजू ठरलेली आहे. यावेळी सुप्रिया सुळे खासदार, चंद्रकांत पाटील मंत्री, दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री, आदिती तटकरे महिला बालकल्याण मंत्री, दत्तात्रय भरणे कृषी मंत्री, अतुल सावे मंत्री, योगेश कदम  मंत्री, योगेश टिळेकर, राहुल कुल, शंकर मांडेकर, बापू पठारे आमदार, शेखर वढणे अध्यक्ष संजय जगताप माजी आमदार, विवेक वळसे पाटील उपाध्यक्ष पुणे, जितेंद्र बडेकर समाज कल्याण सभापती, दिपाली हुलावले महिला बालकल्याण सभापती, अजय इंगळे जिल्हा परिषद सदस्य, अमित झेंडे सभापती पंचायत समिती पुरंदर, माणिक निंबाळकर पंचायत समिती सदस्य, स्वप्नाली होले प्रशासक सरपंच खानवडी, जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी पुणे, वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत पुरंदर, संदीपसिंग गिल ग्रामीण अधीक्षक पोलीस खाते पुणे, पंचक्रोशीतील म्हणजेच विमानतळ बाधित गावातील सात गावातील  सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, सरपंच ,उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका ,अधिकारी कमॅचारी, पत्रकार बहुसंख्येने आधी उपस्थित होते. प्रास्ताविक गजानन पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद, तर आभार प्रदर्शन चंद्रकांत वाघमारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद यांनी मानले.
निधन वार्ता सिंधुबाई नाटकर                                         सासवड प्रतिनिधी: नाटकरवाडी भिवरी ( ता. पुरंदर) येथील सिंधुबाई मुरलीधर नाटकर (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.     त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.     भिवरी तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नाटकर ,भाजीपाला व्यावसायिक गंगाराम नाटकर , उद्योजक मच्छिंद्र नाटकर यांच्या त्या मातोश्री होत.
चांबळी येथील भैरवनाथ कुस्ती आखाड्याचा मानकरी ठरला अमित गायकवाडकुस्ती आखाड्यात ष १३६ मल्लांची हजेरी  सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       चांबळी (ता. पुरंदर) येथील कुलदैवत श्री भैरवनाथ महाराज व माता जोगेश्वरी देवांचा चैत्री उत्सव मंगळवार दि.७ व बुधवार दि.८ एप्रिल  रोजी उत्साहात पार पडला. या यात्रोत्सवाला भाविकांनी गर्दी केली होती           शुक्रवारी पहाटे ५ वाजता भैरवनाथ महाराज व माता जोगेश्वरी यांना अभिषेक व महापूजा करण्यात आला व दुपारी १२:१५ ते सायंकाळी ५ वाजता देवांना ग्रामस्थांचे वैयक्तिक नाथास हार अर्पण तसेच रात्री १० ते सकाळी ७ वाजता नाथांची मिरवणूक व छबिण्यांची हजेरी, ढोल लेझीम स्पर्धा उत्साहात साजरी झाली. त्यानंतर सायंकाळी पालखीची ग्रामप्रदक्षिणा झाली.         बुधवारी दु.४ वा.भैरवनाथ कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यांत आले होते. यात शेवटच्या कुस्ती  पुरंदर केसरी किताब विजेता पै. अमित गायकवाड विरुद्ध  पै. प्रसाद जगदाळे यांची लावण्यात आली. हि लढत अमित गायकवाड यांने जिंकली. या कुस्ती आखाड्यात राज्यातील विविध भागातील १३६ मल्लांनी हजेरी लावली तर अनेक महिला कुस्ती खेळाडूंनी  हजेरी लावली होती.       पंच म्हणून पै. वामनभाऊ कामठे, पै.रघुनाथ कामठे, मधुसूदन शेंडकर, कल्याण कामठे, संतोष कटके, शहाजी कामठे, शिरीष कामठे, विलास कामठे, शुभम कामठे यांनी काम पाहिले. तर कुस्त्यांचे निवेदन मारुती कामठे, मारुती शेंडकर यांनी केले.उत्सवात हिशोबाचे काम पोपट शेंडकर व एच्.टी.कामठे यांनी पाहिले.         यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, सरपंच गोपाळ कामठे, रामेश्वर मंडळाचे अध्यक्ष शहाजीराजे कामठे, सोमेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ शेंडकर, गावकारभारी वामनभाऊ कामठे, पोपटआबा शेंडकर, म्हस्कू कामठे,  जी.एस.शेंडकर, श, ,उद्योजक दादासाहेब पवार,  कैलास कामठे, शिवराम शेंडकर, प्रसाद कामठे, राहुल कामठे,माऊली घारे, भाऊसाहेब कामठे, संजय शेंडकर,प्रकाश भालेराव,सुरेश शेंडकर,सोपान कटके, कान्हू कटके, दिलीप कामठे, लक्ष्मण कणसे, सुरेश कामठे,संदिप कदम, रविंद्र पवार, नाना शेंडकर , संभाजी शेंडकर, गोकुळ भिसे, मधुकर कामठे,शिवाजी शेंडकर,श्रीरंग कामठे, हनुमंत कामठे, माऊली कामठे, नामदेव कामठे, गोरख शेंडकर,पोलीस पाटील विश्वनाथ शेंडकर, पोपट कामठे, अब्बास मुलाणी, मोहन शेंडकर , बापूसाहेब कामठे, सुनील कामठे आदीसह चांबळीकर ग्रामस्थ, कुस्तीप्रेमी उपस्थित होते.    बुधवार सकाळी १० ते दु.३ व रात्री ९ ते २ वाजेपर्यंत तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे करवडीकर सह नितीनकुमार बनसोडे लोकनाट्य तमाशाने चांबळी यात्रेची सांगता झाली.बातमी सोबत फोटो पाठवीत आहे. फोटो ओळी -चांबळी(ता.पुरंदर) येथील  भैरवनाथ  कुस्ती आखाड्यातील मानाची कुस्ती लावताना चांबळीकर मान्यवर पदाधिकारी व गावकारभारी
प्रामाणिकपणा बद्दल नंदा घाडगे यांचा स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान....                                     .सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                सासवडच्या चिंतामणी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मावशी नंदा घाडगे यांना झाडलोट करताना दोन तोळ्यांची सोन्याची चेन पार्किंग जवळ सापडली. त्यांनी ती व्यवस्थापनाकडे सुपूर्द केली व नंतर ती मूळ मालकाला सुपूर्द करण्यात आली.. घाडगे यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक म्हणुन सामाजिक कार्यात कायम अग्रभागी असणाऱ्या स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने घाडगे यांना साडी चोळी व पाण्याचा फिल्टर भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले..      मावशी नंदा घाडगे यांच्या या कौतुक सोहळ्यास स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, सचिव हेमंत ताकवले, चिंतामणी हॉस्पिटलचे संचालक डॉ बाळासाहेब वांढेकर, डॉ विनायक बांदेकर, डॉ संध्या खळदकर, डॉ भालचंद्र दीक्षित, कृष्णा शेट्टी,शहरपत्रकार संघाचे कार्याध्यक्ष जीवन कड, सदस्य जगदीश शिंदे, पथॉलॉजि लॅबचे पांडुरंग गायकवाड,परिचारिका राजश्री शिवरकर, नुतन गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.. सर्वच उपस्थितांनी घाडगे यांच्या या प्रामाणिक व स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत अभिनंदन केले...
सासवडच्या काळभैरवनाथ देवस्थानच्या वतीने सिद्धेश्वर महादेव यात्रेनिमित्त संपूर्ण पोशाख                                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           श्री सिद्धेश्वर महादेव देवस्थान सासवड चैत्र यात्रा व कावड आगमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी सहा वाजता महारुद्राअभिषेक करून यात्रेची सुरुवात झाली सकाळी आठ वाजता बालाजी मंदिर केतकावळे उत्तरादेवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अभिषेक व आरती करण्यात आली त्यांचे परैत्य गणेश काका सरनाईक यांनी केले तसेच सकाळी 11 वाजता प्रथम मानाची कावड सासवड शिखर शिंगणापूर चैत्र पायी यात्रा करून सासवडच्या श्री सिद्धेश्वर महादेवास जलाभिषेक करण्यासाठी सकाळी 11 वाजता पोच झाली सिद्धेश्वर महादेव पाच प्रदक्षिणा घालून श्री सिद्धेश्वर महादेवास जलाभिषेक करून दुपारी बारा वाजता महारती करण्यात आली व त्यानंतर सर्व शंभू भक्तांसाठी श्री सिद्धेश्वर महादेव देवस्थानच्या वतीने महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री कैलास महाराज कावडे यांच्या हस्ते जला अभिषेक करून महाआरती करण्यात आली याप्रसंगी भैरवनाथ देवस्थान सासवड येथील गिरी गोसावी महाराज हजर होते तसेच वेंकटेश बालाजी मंदिर केतकावळे येथील बाळासाहेब बाठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिर परिसरातील संपूर्ण साफसफाई करण्यात आली यावेळी शिवशंभो कावड मंडळाचे संजय जगताप विलास तात्या जगताप कावडीचे कारागीर काळू भाऊ जगताप गणेश कुदळे व इतर सर्व कावड नाचवणारे शंभू भक्त हजर होते तसेच श्री सिद्धेश्वर सुधार समिती व जगताप परिवाराच्या वतीने सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
पुरंदर तालुक्यातील सासवड बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी भारती शिवाजी जगताप (शिंदे) यांची बिनविरोध निवड ;तर सासवड बार असोशियन मध्ये महिलाराज         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                               पुरंदर तालुक्यातील सासवड बार असोसिएशनची 2026 व 2027 मधील निवडणूक बिनविरोध पार पडली असून, असोसिएशनच्या महिला पदाधिकाऱ्यांची निवड करीत एक आदर्श पायडा पाडलेला आहे, यावेळी नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांचा एक मुखाने निवड महिला राज म्हणून करण्यात आली ,मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी नितीन जाधव व सह निवडणूक निर्णय अधिकारी एडवोकेट मुन्ना उर्फ नाजनीन  सिकंदर आतार यांची बिनविरोध निवडणुकीचा निकाल त्यांनी जाहीर केला. यावेळी अध्यक्ष एडवोकेट भारती शिवाजी जगताप (शिंदे) रा. कोथळे उपाध्यक्ष एडवोकेट गीतांजली शिवाजी मेमाणे (ढोणे )रा. भिवरी ,एडवोकेट सरला देविप्रसाद तिवारी रा. वाल्हे, सचिव एडवोकेट ललिता सचिन झेंडे (पोमण) रा. भिवडी सहसचिव एडवोकेट श्वेता विकास कुंजीर( फडतरे) रा. बोपगाव खजिनदार एडवोकेट सानिया साजिद मनियार रा. शिवरी ,हिशोब तपासणीस एडवोकेट करिष्मा सलीम डांगे रा.सासवड यांची बिनविरोध निवडी झाल्या असून, महिला राज बार सासवड असोशियन मध्ये झालेला आहे. यावेळी माजी अध्यक्ष ऍडव्होकेट चंदन मेमाणे, ऍडव्होकेट बाळासाहेब जगताप, एडवोकेट प्रवीण शेंडकर, एडवोकेट भास्कर जगदाळे, एडवोकेट कलाताई फडतरे, एडवोकेट विशाल पोमण, एडवोकेट सुमित पवार, एडवोकेट अनिकेत जगताप, एडवोकेट हर्षद लांघी एडवोकेट अक्षय नाजिरकर, एडवोकेट सुरज भोसले, एडवोकेट वैष्णवी माने, यांचा विशेष असा सत्कार करण्यात आला ,नवनिर्वाचित कार्यकारिणींचा पदग्रहणाचा कार्यक्रम यावेळी पार पडला, यावेळी सर्व सभासद आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील भिवडी या ठिकाणी ओव्हरटेकच्या नादामध्ये अपघात ;तर कारची बुलेटला धडक दोघांचा मृत्यू चालकावर गुन्हा दाखल                                            सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                    निष्काळजी पणाने भरधावाने कार चालू  असताना ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये भिवडी येथे दोन तरुणांचा मृत्यू झाला, ही घटना भिवडी ता. पुरंदर येथील या परिसरामध्ये घडली असून, याप्रकरणी कार चालका विरुद्ध सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .धनंजय दिलीप पवार वय 34 व रोहिदास अरुण गायकवाड वय 28 दोघेही राहणार भिवडी अशी त्यांची नावे असून, पवार व गायकवाड हे 4 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बुलेट एमएच 12 एस एस 5334 वरून भिवडी होऊन सासवड कडे जात होते, संगम हॉटेल जवळ समोरून येणाऱ्या कार एमएच झिरो एक बीजी 93 52 ओव्हरटेक करताना बुलेटला जोरदार धडक दिली असून, यामुळे दोघेही तरुण रस्त्यावर फेकले जाऊन, गंभीर जखमी झाले होते, स्थानिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ सासवड येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, प्राथमिक उपचारानंतर पवार यांना पुढील उपचारासाठी पुणे तर गायकवाड यांना हडपसर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आले होते, मात्र; उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला असून, दरम्यान अपघातानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटीची पाहणी केली असता, कारचालक आणि नियमाचे उल्लंघन करत ,निष्काळजी पणाने वाहन चालवण्याचे सपष्ट्ट झाले असून, ओव्हरटेकच्या प्रयत्नातच हा अपघात घडल्याचे समोर आले आहे ,याप्रकरणी फिर्यादी विनोद मोहन पवार राहणार भिवडी यांच्या तक्रारीवरून संकेत सुरेश म्हात्रे वय 38 राहणार सांताक्रुज मुंबई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशन कडून मिळालेली आहे ,पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचा चालू आहे, अशी माहिती सासवड पोलीस स्टेशन कडून मिळाली आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पहिल्या जिल्हा परिषद शाळेचे शनिवारी उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित; तर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाचे नवे दालन खुले                                          सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                      महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव असलेल्या, खानवडी येथे त्यांच्या व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समताधिष्ठित व शिक्षणप्रधान विचारांना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा या महत्वकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी दि. 11 रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची राज्यातील जिल्हा परिषदेची शाळा म्हणून ही ओळखली जाणार असल्याचा दावा अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केला आहे. यावेळी अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक  पाटील अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होणार आहेत, पुढे बोलताना पाटील म्हणाले की, विशेष म्हणजे महात्मा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त आणि त्यांच्या दोनशे वा जयंती वर्षाच्या प्रारंभ दिनी हा सोहळा होत असल्याने, या कार्यक्रमाला ऐतिहासिक व प्रेरणादायी महत्त्व प्राप्त झालेले आहे, पुणे जिल्हा परिषदेमार्फत उभारण्यात आलेली ही शाळा ग्रामीण भागातील वंचित गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता पूर्ण आधुनिक आणि मूल्याधिष्ठित शिक्षण उपलब्ध करून देणारा एक आदर्श उपक्रम ठरणार आहे, बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंत अभ्यासक्रमावर आधारित शिक्षणाची सुविधा येथे उपलब्ध असून ,डिजिटल शिक्षण पद्धती, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय ,क्रीडा सुविधा या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात येणार आहे, या प्रकल्पासाठी खानवडी येथील गट क्रमांक 43 मधील सुमारे 12 एकर गायरान जमीन महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा परिषदेस वर्ग करण्यात आली असून, त्याचबरोबर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निवासी व अनिवासी शाळा चालविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, शाळेच्या माध्यमातून खानवडी व परिसरातील दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना अनिवासी शिक्षणाची संधीला उपलब्ध होणार आहे, तर पुणे जिल्ह्यातून हुशार व गरजू विद्यार्थ्यांसाठी सहावीपासून निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, यामुळे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शहराप्रमाणेच दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे ,यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शाळेची प्रत्येक सुरुवात होत असून, सध्या बालवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येत आहेत ,या टप्प्यात सुमारे 260 विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्यात आलेले असून, ही व्यवस्था पूर्णतः निवासी स्वरूपाची असेल तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीच्या निवासी शाळा सुरू करण्यात येणार असून ,प्रारंभी 40 विद्यार्थ्यांना निवासी सुविधा देण्यात येणार आहेत, यामुळे ग्रामीण व वंचित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत निवासाची ही सुविधा उपलब्ध होणार आहे, हा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. खानवडीतील हा प्रकल्प केवळ शाळा उभारण्यापुरता मर्यादित नसून, शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समता सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास साध्य करण्याचा एक व्यापक प्रयत्न मानला जात असून, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आधुनिक काळात प्रभावी अंमलबजावणी करणारा हा उपक्रम भविष्यात राज्यातील इतर भागासाठी आदर्श ठरेल शाळा पाहिल्यानंतर चांगल्या बाबीसमोर आल्या आहेत, तसे दरवर्षी या शाळेच्या कामकाजाचा अहवाल हा सर्वसाधारण सभेसमोर येणार आहे. वीरधवल जगदाळे अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे.
सासवड येथील वाघ डोंगर येथील पानवठा भरला         सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                  सासवडचे माजी नगराध्यक्ष कै राजेंद्र उर्फ आर्यनभाऊ जगताप यांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्त वाघ डोंगर या ठिकाणी अमोल जगताप मित्र परिवाराच्या वतीने वन्य प्राण्यांसाठी पाण्याचे पानवठे भरून दिले व धान्य उपलब्ध करुन दिले.हा कार्यक्रम गेली चार वर्षे उन्हाळ्यात सातत्याने सुरु आहे. यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाजपा साकेत जगताप, माथाडी कामगार व युनियन तालुका अध्यक्ष अमोल जगताप, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष दत्ता भोंगळे, कृष्णा फुलवरे तसेच वनरक्षक सचिन पाटील साहेब आरपीआय तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे, सासवड शहर सरचिटणीस प्रतीक म्हेञे,  हिवरेचे पंचायत सदस्य शब्बीरभाई शेख, कोडीतचे सरपंच सुरज अवचरे, सामाजिक कार्यकर्ते कालिदास उबाळे, उद्योजक अमोल मोरे, शरद नेटके, विनायक जरांडे आदी उपस्थित होते.  वाघ डोंगर परिसरात हरीण, ससे, मोर आदी लहान मोठे प्राणी आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या प्राण्यांना पाण्याची गरज असते ती आज भागले असल्याचे वनरक्षक सचिन पाटील त्यांनी सांगितले. फोटो : सासवड (ता. पुरंदर) येथील वाघ डोंगर येथे पानवठे पाण्याने भरून देत असताना शेजारी मान्यवर.
प्रा. संदीप चंद्रकांत टिळेकर यांची रोटरी क्लब ऑफ पुरंदर अध्यक्षपदी निवड                                                    सासवड प्रतिनिधी  :   बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                           शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्राचार्य प्रा. संदीप चंद्रकांत टिळेकर यांची रोटरी क्लब ऑफ पुरंदरच्या २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हनुमान भजनी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी सचिन वढणे, बाळासाहेब जगताप, राजेंद्र लांडगे, तुकाराम गिरमे, अशोक भोंगळे, राजेंद्र भैरवकर, नितीन भोंगळे बाप्पू कामठे, शंकर हिवरकर, बाजीराव पाटील, दत्ता भोंगळे आदी उपस्थित होते. प्रा. टिळेकर हे गुरुकुल करिअर अकॅडमी, सासवडचे संस्थापक अध्यक्ष असून गेल्या २२ वर्षांपासून विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य सातत्याने करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर हजारो विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, कृषी, फार्मसी व शिक्षण क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत.ते श्री हनुमान भजनी मंडळ या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे सहसचिव तसेच महात्मा फुले सार्वजनिक ग्रंथालय, खानवडीचे सचिव म्हणूनही कार्यरत आहेत. सामाजिक उपक्रमांतर्गत दिवाळी पहाट,निबंध व वक्तृत्व स्पर्धा, तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले आहे.स्वर्गीय चंद्रकांत नातूजी टिळेकर शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शिष्यवृत्ती मिळवून देणे तसेच सामान्य विद्यार्थ्यांना टॉपर्स बनविण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले आहे. शिस्त, संस्कार आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर आधारित निवासी गुरुकुल पद्धती त्यांनी संत सोपानकाकांच्या भूमीत यशस्वीपणे राबवली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल माजी आमदार संजयजी जगताप, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सागर नंदकुमार कुंडलिकआप्पा मेमाणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयदादा कोलते, डॉ. प्रवीण जगताप, प्रमोद धनवडे तसेच शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. सासवड येथे हनुमान भजनी मंडळाच्या वतीने संदीप टिळेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष दत्ता भोंगळे,  सचिन वढणे, बाळासाहेब जगताप, राजेंद्र लांडगे, तुकाराम गिरमे, अशोक भोंगळे, राजेंद्र भैरवकर, नितीन भोंगळे बाप्पू कामठे, शंकर हिवरकर, बाजीराव पाटील व इतर.फोटो : प्रा. संदीप टिळेकर यांच्या निवडीचा सत्कार करीत असताना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष दत्ता भोंगळे व अण्णा क्षीरसागर शेजारी इतर.
शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे उत्साही वातावरणात स्वागत.                    सुरेश म्हेत्रे अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधीअहिल्यानगर :- श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेले शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूल, श्रीगोंदा येथे नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे आनंदी वातावरणात व उत्साहात स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. रांगोळी तसेच प्रेरणादायी संदेशफलक, शैक्षणिक माहिती, सेल्फी स्टँड अश्या नाविन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी शिक्षकांचा उत्साह यामुळे विद्यार्थ्यांचा पहिला दिवस अधिक आनंद आहे ठरला असे मत पालकांनी देखील व्यक्त केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हसतमुखाने स्वागत करून त्यांना नवीन अभ्यासक्रम शालेय तसेच विविध उपक्रमांची माहिती दिली. नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजे नवी संधी नवीन स्वप्ने आणि नवीन ध्येय पूर्ण करण्याची सुरुवात आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, शिस्त सकारात्मक दृष्टीतून ठेवून शिक्षण घ्यावे तसेच शालेय कला क्रीडा अशा विविध उपक्रमांमध्ये देखील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे मत यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नीतू दुलांनी यांनी मांडले विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विज्ञान गणित प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा तसेच संपूर्ण वर्षात घेण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली शिवाजीराव नागवडे डॅफोडील्स स्कूल येथे आधुनिक तंत्रज्ञान च्या साह्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते तसेच अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो त्याचे फलित म्हणून 100% निकालाची परंपरा आम्ही राखली आहे. तसेच डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा अभ्यासक्रम आपण यावर्षीपासून सुरू करत आहोत. तसेच डिजिटल पॅनल बोर्ड देखील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहोत असे मत निरीक्षक एस. पी. गोलांडे यांनी मांडले. सुट्टीनंतर शाळेचा परिसर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या हास्याने आणि उत्साहाने गजबजून गेला होता. नव्या वर्गात प्रवेश करण्याची उत्सुकता, आपल्या जुन्या तसेच नवीन मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा आनंद आणि नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती.यावेळी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे यांनी देखील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड येथे “प्रोफेशनल एटीकेट, ग्रुप डिस्कशन व मॉक इंटरव्ह्यू” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात                                              सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                            दि. ६ एप्रिल २०२६ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान दररोज सकाळी १०.३० वाजता पार पडला.या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिष्टाचार, प्रभावी संवादकौशल्य, गटचर्चा तंत्र आणि मुलाखत कौशल्य विकसित करणे हा होता. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अजय मदाळे प्रशिक्षक, जीटीटी फाउंडेशन, पुणे यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कौशल्यांचे महत्त्व पटवून दिले.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सादरीकरण कौशल्य आणि योग्य व्यक्तिमत्त्व विकास याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान प्रत्यक्ष गटचर्चा (Group Discussion) व मॉक इंटरव्ह्यूचे प्रात्यक्षिक सत्र घेण्यात आले असून विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला.या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून अंकिता जवळकर व डॉ. गणेश निगडे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.  तसेच प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.महाविद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांनी या उपयुक्त प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले होते.
पुरंदर तालुक्यातील रिसे या गावातील पाणी प्रश्न अखेर मार्गस्थ                                                                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                  रिसे या गावांमधील मागील अनेक दिवसापासून सुरू असलेली पिण्याच्या पाण्याची समस्या ही मार्गी लावण्यामध्ये अखेर यश मिळाले असून ,रिसे गाव, खोपडेवाडी यांना पिण्याच्या पाणीपुरवठा होत असलेल्या विहिरीवर एकाने अतिक्रमण केल्याने, दहा दिवसापासून पुरवठा बंद झाला होता, ग्रामस्थांनी ही परिस्थिती जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे यांच्यासमोर मांडल्यानंतर, त्यांनी पाणी अडवणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत गट विकास अधिकारी प्रणोती  श्रीश्रीमाळ, तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या सहकार्याने उपाययोजना करण्यात आली. प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांच्या आदेशानुसार गट क्रमांक 255 मधील विहिरीचे अधिग्रहण करून, पाणीपुरवठा अखेर सुरळीत करण्यात आला. याविषयी सविस्तर माहिती अशी की, ग्रामस्थांनी ही परिस्थिती जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे यांच्यासमोर मांडली असताना, त्यावर अखेर त्या ठिकाणी अजय इंगळे यांच्या प्रयत्नांना जे यश मिळाले आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती स्वत: अजय इंगळे यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
महाराष्ट्रातील कर्जमाफी बाबत शेतकरी गोंधळामध्ये; तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रामाणिकपणाची एक प्रकारे शिक्षा की थट्टा                                                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       राज्य सरकारने 2026- 27 च्या अर्थसंकल्पामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज माफी योजनेची घोषणा केली, खरी पण यानंतर कर्जमाफी बाबत स्पष्टता नसल्याने, शेतकऱ्यांमध्ये संतापाचे आणि गोंधळाचे वातावरण आहे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रामाणिकपणाची शिक्षा की थट्टा? करणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा होताना दिसत आहेत, सरकारने घोषणा केल्याप्रमाणे दोन लाख स्वबळापर्यंतची कर्जमाफी आणि 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान नक्की मिळणार कधी आणि कोणाला? या प्रश्नाचे उत्तर शोधताना बळीराजा हा पूर्णपणे मेटाकुटीला आलेला आहे, एकूण शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी अद्याप अधिकृत शासन निर्णय, जीआर मधील तांत्रिक बाबी बाबत स्पष्टता नाही ,ती सप्टेंबर 2025 मर्यादा ठरवण्यात आली होती, सरकारने घोषणा आणि बँकेतील प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये मोठी दरी पाहायला मिळत असल्याचे दिसत आहे ,शेतकरी बँकांमध्ये विचारणा करायला गेल्यावर आमच्याकडे अद्याप पोर्टल सुरू झालेले नाही, किंवा शासनाकडून यादी आलेली नाही, अशी उत्तरे देऊन त्यांना परत पाठवले जात आहे, एकूणच शासनाच्या कर्जमाफी बाबत शेतकरी अद्याप गोंधळात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे, शेतकऱ्यांच्या नावाने योजना जाहीर करणे सोपे आहे, परंतु त्यातील अटी आणि पोर्टलच्या गुंतागुंतीमध्ये शेतकरी हा पूर्णपणे बरडला जातोय हे मात्र नक्की! प्रामाणिकपणाची शिक्षा की थट्टा ? थकबाकीदारांना माफी आणि प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यांना फक्त आश्वासने अशी काहीशी स्थिती राज्यातील शेतकरी वर्गात निर्माण झालेली आहे, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदानाची घोषणा केली खरी मात्र, वर्षींनु वर्ष उलटूनही अनेक शेतकरी या लाभापासून वंचित आहेत सरकारच्या या धरसोड वृत्तीमुळे प्रामाणिक राहून आम्ही चूक तर केली नाही ना ? अशा संतप्त सवाल नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याकडून केला जात आहे, आमची यामध्ये काय चूक ? आम्ही नियमित कर्ज फेडून आर्थिक शिस्त लावत आहोत, जरी आम्ही शासकीय सेवेत असो किंवा आयकर भरत असो शासनाने आमच्याकडे केवळ शेतकरी म्हणून पहावेत, जो आर्थिक शिस्त पाळून नियमित कर्ज फेडत आहे, अशावेळी शासन नाहक आणि जाचक अटी लावून नियमित कर्ज फेडणाऱ्यांना या प्रोत्साहन पर अनुदानापासून वंचित ठेवत असल्याने, नियमित कर्ज फेड करून, आम्ही चूक केली काय ?असा संतप्त सवाल नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांमधून केला जात आहे.
श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता ; तर संत तेल्या भुत्याची कावड सासवड मध्ये दाखल                            सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील यात्रेची जलाभिषेक आटोपून मानाची श्री संत तेल्या भुत्याची कावड सासवड मध्ये दाखल झाली, अवघड मुंगी घाट मानवी साखळीच्या साह्याने पार करत कावडीने करा नदीच्या पाण्याने शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आला, यानंतर कावडीचे सासवडमध्ये जंगी असे स्वागत करण्यात आले, मंगळवारी दि. 7 रोजी सायंकाळी जेजुरी नाका येथून ,निघालेल्या मिरवणुकीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती, रात्री शिवालय मंदिरामध्ये कावडीचे पूजन करण्यात आले, या पायी यात्रेची सांगता शुक्रवारी दि. 17 रोजी महादेव मंदिरात भंडाऱ्याने होईल ,अशी माहिती शिवयोगी कैलास महाराज कावडे यांनी दिली.याप्रसंगी गावचे पाटील संग्राम जगताप, शिवशंभू कावड मंडळाचे अध्यक्ष संजय द. जगताप, उदयराज जगताप, विलास (तात्या )जगताप, मंगेश कावडे, गणेश कुदळे, सौरभ जगताप, अनिकेत( आबा) जगताप, अभिजीत शिवरकर, प्रवीण भोंडे, माऊली (तात्या) काळे, रवी (नाना) जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
सासवड येवलेवाडी मार्गावर वाहतूक निर्बंध सकाळी साडेसात वाजल्यापासून आवश्यकतेनुसार बंद                            सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                    सासवड ते येवलेवाडी दरम्यान सकल हिंदू समाज यांच्या वतीने हिंदू जन आकोश मोर्चा आयोजित करण्यात आल्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेकडून विशेष अशी नियोजन करण्यात आलेले आहे वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोगदेव घाट मार्गाने सासवड कडे जाणारा रस्ता सकाळी सात वाजल्यापासून आवश्यकतेनुसार तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे ,यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो, दरम्यान पर्यायी मार्ग म्हणून खडीमशीन चौक, उंड्री चौक, मंतरवाडी फाटा ,दिवे घाट सासवड हा मार्ग खुला ठेवण्यात आलेला आहे, वाहतूक शाखेकडून वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याची वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याची तसेच शक्यतो ,गर्दीच्या वेळेत प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे ,पोलीस उपयुक्त वाहतूक शाखा पुणे शहर.
पुरंदर तालुक्यातील शिक्षक पतसंस्थेतील सत्ता संघर्ष उफाळला; तर बैठकीतील वाद हा थेट पोलीस ठाण्यापर्यंत; अध्यक्षांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल                             सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                               पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेतील सत्ता संघर्ष आणखी तीव्र होत असल्याचे चित्र दिसून आलेले आहे ,या वादाचे पडसाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले असून, सासवड येथील शंकराव उरसळ सभागृहामध्ये झालेल्या बैठकीदरम्यान, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तानाजी फडतरे यांनी पतसंस्थेच्या निवडणुकीचा राग मनात ठेवून, थेट धमकी दिल्याचा गंभीर आरोप उपसभापती गणपत मेमाणे यांनी केला आहे, याप्रकरणी मेमाणे यांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, तक्रारीनुसार यापूर्वीही राजीनामेसाठी दबाव टाकण्यात आल्याचे म्हटले आहे ,त्यामुळे हा वाद केवळ बैठकीपुरता मर्यादित नसून, पतसंस्थेच्या चेअरमन निवडी दरम्यान: निर्माण झालेल्या वर्चस्वाच्या मतभेदा मधूनच या संघर्षाला सुरुवात झाल्याची चर्चा आहे, चेअरमन पदी जितेंद्र कुंजीर यांची निवड झालेली चुरशीची आहे, आणि एका मताभोवती फिरणारे आरोप प्रत्यारोप यामुळे वातावरण आधीपासूनच तापले होते, विशेष म्हणजे हे मत नेमके कोणाचे? या प्रश्नावरून संशयाची सुई काही सत्ताधारी संचालकाकडे वळविल्याने, गटबाजी अधिकच तीव्र झाली आहे, एका मता भोवती फिरणारे आरोप- प्रत्यारोप यामुळे वातावरण आधीपासूनच तापलेले आहे, मागच्या दाराने प्रवेश केल्याची चर्चा पूर्वी शिक्षक समितीत मध्ये आरडाओरडा आणि वाद निर्माण करणारे तानाजी फडतरे यांनी शिक्षक संघात मागच्या दाराने प्रवेश केल्याची चर्चा जोर धरत आहे, संघाचे आजीव सभासद नसतानाही ते थेट अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत, विशेष म्हणजे अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ हा केवळ दीड वर्षाचा निश्चित असताना देखील त्यांनी तब्बल तीन वर्ष हे पद भूषवलेले आहे ,त्यामुळे ही बाब सरळ सरळ बेकायदेशीर असल्याचा ठाम मत सभापती जितेंद्र कुंजीर व उपसभापती गणपत मेमाणे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राजीनाम्याची मागणी, दबावाचे आरोप, अंतर्गत संघर्ष संघटना नेतृत्वावरील अविश्वास आणि विरोधकाकडून मिळालेली मदत यामुळे संघटनातील तणाव आणखी तीव्र होत असल्याचे दिसत आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी भाजपचा स्थापना दिन उत्साहमध्ये; तर माजी आमदार संजय जगताप यांचे कार्यकर्त्यांना संघटन मजबुतीकरण करण्याचे आवाहन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     भारतीय जनता पक्षाचा 46 वा स्थापना दिन सासवड येथील पक्ष कार्यालयामध्ये उत्साह पूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार संजय चंदूकाका जगताप यांनी कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा ही तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भाजप ध्वजारोहणा ने करण्यात आली, यावेळी संजय जगताप यांनी आपल्या भाषणांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून, भारतीय जनता पक्षापर्यंतच्या वैचारिक प्रवासाचा उल्लेख केला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत असल्याची सांगण्यात आले, विकास कामाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा असे त्यांनी नमूद केले महाराष्ट्रातही भाजपच्या माध्यमातून विकासाची गती वाढत असल्याचेही सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामकाजाचा त्यांनी उल्लेख केला पक्षाचे कार्यकर्ते हेच पक्षाची खरी ताकद असून, समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी संभाजी काळाणे, संजय निगडे, संदीप कटके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विठ्ठल मोकाशी, हरिभाऊ लोंले, अजय इंगळे_ सायली शिंदे, सुनीता कोलते ,मनीषा गायकवाड, सुनील देशपांडे, अजित जगताप ,डॉक्टर मनोज शिंदे ,प्रदीप राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी व कार्यकर्ते आधी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी उपस्थित यांचे आभार मानले. स्थापनेच्या दिनानिमित्त कार्यकर्त्यांना पक्ष विस्ताराचा निर्धार हा व्यक्त करण्यात आला
पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेकडून एप्रिल महिन्यापासून दोन दिवसाआड होणार सासवडला पाणीपुरवठा                                                           सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                             गराडे जलाशयातील पाणीसाठा संपल्यामुळे आणि घोरवडी धरणातील 13% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्या या कारणामुळे सासवड ता. पुरंदर येथील शहराला सहा एप्रिल पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे, नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आव्हान सासवड नगरपालिकेने केलेले असून, गराडे जलाशयात केवळ 9 % पाणीसाठा उरल्याने, तेथील स्त्रोत बंद झालेला आहे, घोरवडी जलाशयातही 20% पाणीसाठा आहे, अशी माहिती लघु पाट बंधारे विभागाचे शाखा अभियंता गणेश गायकवाड व विश्वास पवार यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली. त्यामुळे सासवड करांना ऐन उन्हाळ्यामध्ये दोन दिवसाआड पाणीपुरवठा सासवड साठी होत असल्याची माहिती सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी ही सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.
सासवड येथील बैलगाडा स्पर्धेत अमितशेठ भाडळे यांचा देवा व छत्रपती संभाजीनगरकरांचा देवा या बैलगाडीचा प्रथम क्रमांक. या बैलगाडीस एक 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.स्पर्धेत 230 बैलगाड्यांचा सहभाग सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                            सासवड येथे श्री काळभैरवनाथ मंडळ ट्रस्ट व श्री भैरवनाथ चैत्री उत्सव व सासवडकर ग्रामस्थ यांच्यावतीने चैत्री उत्सवानिमित्त पाच एप्रिल रोजी बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अमितशेठ भाडळे यांचा देवा व छत्रपती संभाजीनगरकरांचा देवा या बैलगाडीचा प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांकाच्या या बैलगाडीस एक 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेत 230 बैलगाड्यांचा सहभाग घेतला. तर विकासशेठ ठोंबरे उंबरगाव यांची रायफल आणी सुनील देसाई पालेगाव यांचा वादळ या बैलगाडीने द्वितीय क्रमांक पटकावला. या बैलगाडीस 1 लाख 11 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. तसेच तानाजीकाका झांबरे झांबरेवाडी यांचा राहुल्या आणी वडकी करांचा चॉकलेट या बैलगाडीने तृतीय क्रमांक पटकावला. या बैलगाडीस 71 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. तसेच हर्षल पायगुडे कुडजे यांचा रायफल आणी अमोल गायकवाड वडकी यांचा हरण्या या बैलगाडीने चतुर्थ क्रमांक तर ५ वा क्रमांक शौर्य दैवत गोवेकर लोणंद यांचा सुंदर व प्रेमशेठ जांभळे जांबुळवाडीकरांचा नंद्या आणि धीरज भांडवलकर सासवड यांचा बादल व राजे फार्म मुरूम कर्जतकरांचा शिवा या बैलगाडीने सहावा क्रमांक पटकाविला. या बैलगाडा स्पर्धेचे समालोचन सचिन जगताप यांनी केले. तर आभार बंडूकाका जगताप यांनी मानले.यावेळी स्पर्धेचे आयोजक श्री काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश वामनराव जगताप उपाध्यक्ष पांडुरंग वसंतराव भोंगळे, गाव पाटील संग्राम भिकाजी पाटील, तसेच श्री भैरवनाथ चैत्री उत्सव कमिटीचे अध्यक्ष अजय गणपत जगताप, उपाध्यक्ष नितीन वसंतराव भोंगळे, सचिव विठ्ठल महादेव शिंदे तसेच ट्रस्ट व उत्सव मंडळाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.फोटो : सासवड ( ता. पुरंदर ) येथे बैलगाडी स्पर्धेची ढाल वितरण करीत असताना स्पर्धक व पदाधिकारी.फोटो : सासवड ( ता. पुरंदर ) येथे बैलगाडा स्पर्धेत धावणाऱ्या बैलगाड्या.
पुरंदर तालुक्यातील श्री शेत्र वीर रस्त्यावर धोकादायक असणारी विहीर                                                      सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                                            श्री क्षेत्र वीर ता. पुरंदर येथे श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात, सासवड वरून वीर कडे जाताना रस्त्याच्या कडेला चार ठिकाणी धोकादायक विहिरी असून, रस्त्यालगत असलेल्या विहिरीवर सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विहीर मालकांनी तातडीने संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत, नाशिक येथील दिंडोरी शहरात विहिरीत चार चाकी वाहन पडून, एकाच कुटुंबातील नऊ जणांना प्राण गमवावे लागले असल्याकारणाने, या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र वीर तालुका पुरंदर येथील रस्त्याची पाहणी केली असता, रस्त्याच्या साईड पट्टी लगत चार विहिरी धोकादायक परिस्थितीमध्ये आढळून आलेल्या आहेत, त्यामध्ये तीन विहिरी  येथे असून, एक विहीर यादववाडी येथे आहे, वीरला जाताना नारळी बाग या ठिकाणी या विहिरी आहेत ,संबंधित शेतकऱ्यांनी या विहिरींना कठडे बांधणे गरजेचे आहे, या ठिकाणी कोणतेही प्रकारचे फलक नाहीत, विहिरीला संरक्षण कठडे अथवा धोका दर्शक फलक नाहीत, विहिरीच्या कडेने मोठी झुडपे असल्याकारणाने, विहिरीत कोणी पडले अथवा अपघात झाल्यास लवकर समजून येणार नाही, सगळ्या विहिरी पाण्याने काठोकाठ भरलेल्या आहेत, याबाबत वीर गावच्या सरपंच मंजुषा धुमाळ म्हणाल्या की, या विहिरी अत्यंत धोकादायक असून, तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन, या गोष्टी निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले आहे ,या रस्त्याची पहाणी करून याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून, उपाययोजना करण्यासाठी नियोजित आराखडा तयार करण्यात येणार आहे. प्रकाश निगडे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुरंदर तालुका.
डबल महाराष्ट्र केसरी पै.शिवराज राक्षे ठरलानवखंडेनाथ कुस्ती आखाडाचा मानकरी पै. सॅटी पंजाबी ठरला उपविजेता गराडे येथील कुस्ती आखाड्यात १४४ मल्लांचा सहभाग......         सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         डबल  महाराष्ट्र केसरी  शिवराज राक्षे व पंजाब नॅशनल चॅम्पियन सॅटी पंजाबी यांच्यात लढत होऊन शिवराज राक्षे याने कुस्ती चित्रपट करीत  एक लाख रुपयाचे विजयी इनाम जिंकले.एप्रिल रोजी कुस्त्यांचा आखाडा झाला. यात  १४४ मल्लांनी हजेरी लावली.आखाड्यातील शेवटची कुस्ती पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस गंगारामदादा जगदाळे यांचे हस्ते लावण्यात आली.पंच म्हणुन पै.पांडाभाऊ जगदाळे, पै.सोनबा जगदाळे, पै. दिलीप मुलाणी,पै.लक्ष्मण जगदाळे , पै.विजय जगदाळे,पै.विश्वनाथ ढोणे,पै. प्रदिप ढोणे,पै.कैलास वाडकर,पै.विकास जगताप,पै.शिवाजी जगदाळे,पै.सागर जगदाळे यांनी काम पाहिले.    या वेळी पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस गंगारामदादा जगदाळे, शिवसेना नेते विजय ढोणे, सरपंच नवनाथ गायकवाड,अमित दूरकर, दत्तात्रय जगदाळे,निलेश जगदाळे, समीर तरवडे, नितीन जगदाळे,सुनील जगदाळे ,संजय जगदाळे,मोहन जगदाळे ,अॅड. भास्कर जगदाळे,संतोष जगदाळे,विकास सागडे,चेतन जगदाळे,आबासाहेब जगदाळे, बंडुनाना जगदाळे,लहुनाना जगदाळे ,संजय रावडे ,बाळासाहेब रानडे, बाळासाहेब दुरकर, उत्तम ढोणे, बाळासाहेब यादव , दिपक जगदाळे, नारायण जगदाळे,मोहन घारे,धोंडीबा खवले, रोहित खवले,चेअरमन दत्तात्रय जगदाळे,पोलीस पाटील सुरेश जगदाळे , सदाशिव रावडे,अशोक जगदाळे, अविनाश जगदाळे,लक्ष्मण पांढरे,विजय राऊत ,आशू जगदाळे, विठ्ठल चौधरी, समीर जगदाळे, स्वप्निल जगदाळे, शिवाजी जगदाळे , अजित घारे, विनोद ढोणे, सचिन ढोणे, अमोल जगदाळे ,हनुमंत साळुंखे, सदाशिव रावडे संदीप जगदाळे, प्रथमेश अत्रे आदीसह गराडे पंचक्रोशीतील कुस्ती शौकीन उपस्थित होते.       तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश जगदाळे व कुस्ती निवेदक सागर चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.     अत्यंत शिस्तबद्ध व नियोजित पद्धतीने सुरू असलेल्या नवखंडेनाथ निकाली कुस्ती आखाड्यात   मनिष रायते ,विक्रम घोरपडे, मोहन पाटील, शंकर बंडगर ,प्रतिक जगताप, पृथ्वीराज खडके, यश वासवंड, रोहन जाधव प्रथमेश ढोणे, ओम शिळीमकर यांच्या देखील तुफानी लढती संपन्न झाल्या. त्याचबरोबर महान भारत केसरी विजय गावडे, महाराष्ट्र केसरी विकी बनकर, उपमहाराष्ट्र केसरी नामदेव भोसले ,फुलाजी लिम्हण,कुस्ती चॅम्पियन मारुती सातव यांनी हजेरी लावली.       गराडे येथील नवखंडेनाथ देवाचा उत्सव ३ एप्रिल रोजी सुरु झाला. या दिवशी पहाटे ५ वा. नवखंडेनाथांना अभिषेक घालुन महापुजा करण्यांत आली. सकाळी ग्रामस्थांची वैयक्तिक पुजा व विधी कार्यक्रम झाला. त्यानंतर ढोल, लेझिम छबिण्यांच्या हजेरीचा कार्यक्रम व नाथांच्या मिरवणुकीचा कार्यक्रम पार पडला. ४ एप्रिल  रोजी  आनंद लोकनाट्य मंडळ जळगाव यांच्या लोकनाट्याच्या कार्यक्रमानंतर यात्रेची सांगता झाली, अशी माहिती पोलिस पाटील सुरेश जगदाळे व नवखंडेनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष चेतनदादा जगदाळे यांनी दिली. ------------------------------   बातमीसोबत  फोटो पाठवित आहे.    फोटो ओळीः- गराडे ( ता. पुरंदर ) येथील कुस्ती आखाड्यात  पै. शिवराज राक्षे व पै.सॅटी पंजाबी यांची मानाची कुस्ती लावताना गंगारामदादा जगदाळे
पुरंदर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत येथील मूळ दस्तऐवज लपवून खोट्या कागदपत्रांचा समावेश; यामध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांची 2024 ची चौकशी करून, दोषी विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल त्वरित करावेत!                                                                 सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                  पुरंदर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत येथील मूळ दस्तऐवज लपवून खोट्या कागदपत्रांचा समावेश व फेरफार ठराव मंजूर करून, तसेच बेकायदेशीर मासिक सभा ठराव मंजूर करून, अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन, खाजगी शेत जमीन गट नंबर 1213 याची नोंद ग्रामपंचायतच्या मालकीची असल्याची चुकीची नोंद गाव नमुना आठ नोंदवही मध्ये केल्याने, संबंधित सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांची चौकशी करून दोषीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी आतापर्यंत विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी हे ग्रामसेवक यांना पाठीशी  का? घालत आहेत? कोणतीही चौकशी होत नाही, ग्रामसेवक उडवाउडवीची  उत्तरे देतो, विस्तार अधिकारी काही कारवाई करत नाहीत, तर गट विकास अधिकारी नुसते सांगतात की चौकशी करायला लावली आहे, परंतु गट विकास अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत नक्की हे कशासाठी?  कोणासाठी? पुणे जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश 2022/ 2023 जा. क्र. जिल्हा परिषद/ पंचायत समिती चौदा / 6/ 34/ 23, 10 जानेवारी 2023 च्या प्रशासकीय मान्यता आदेशातील मुद्दा क्रमांक एक नुसार प्रस्तावित काम नायगाव सिद्धेश्वर मंदिर परिसर रस्ता कॉंक्रीट रस्ता 20 लक्षच्या ग्रामपंचायती नमुना नंबर 23 ताब्यातील रस्त्याच्या नोंदवही मधील रस्त्याच्या नोंदी स मान्यता प्रशासकीय आदेश दिल्याचे दिसून येत आहे, सदर 6 मार्च 2024 मधील उप अभियंता बांधकाम विभाग पुणे यांना' क वर्ग 'तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत काँक्रीट रस्ता जागे करिता हरकत नसल्याबाबतचा पत्र दिसून येत आहे, सदर रस्त्याची नमुना ग्राम दप्तरी नोंद ही दिसून येत नाही, सदरील मुद्दा क्रमांक चार व पाच हा ग्रामपंचायतीच्या मासिक सभा 22 मार्च 2024 रोजी विषय क्रमांक एक ठराव क्रमांक एक नुसार गावठाण हद्दीतील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील परंतु ज्याची ग्रामपंचायत मध्ये दप्तरी नोंद नाही, मोकळी बक्कळ जागा आहे ,अशा जागेची नोंदणी ही सिद्धेश्वर मंदिर परिसरात सुशोभीकरण करणे, कामाकरिता नोंद केल्याची स्पष्ट दिसून येत आहे, या नोंदीमध्ये खूप अप्ररातफर ग्रामसेवक यांची आहेत. कार्यकारी अभियंता व उपअभियंता बांधकाम विभाग कडून जागेबाबत ग्रामपंचायत नायगावला पत्र व्यवहार केले बाबतची कागदपत्रे ग्रामपंचायत इकडून चौकशीमध्ये दिसून आलेली नाहीत, सदर बख्खल जागेची नोंद ग्रामपंचायत नमुना नंबर आठ अ क्रमांक नंबर 969 मिळकत 814 नोंद घेतल्याचे दिसत आहे, 28 नोव्हेंबर 2024 मध्ये दाखल्यानुसार नायगाव सिद्धेश्वर मंदिर परिसर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, लेखा शीर्ष 3604-0621' क वर्ग तीर्थक्षेत्र कार्यक्रमांतर्गत मंजूर काम ज्या ठिकाणी झाले आहे, त्या ठिकाणची दप्तरी नमुना नंबर 23 ला रस्त्याच्या नोंदीचे रजिस्टर यामधील नोंद नाही, असा सुद्धा दाखला दिसून येत असून ,यावर आदेश पारित झाल्यावर, तत्कालीन पंकज शेळके गट विकास अधिकारी यांनी त्वरित आदेश दिले होते की, फौजदारी गुन्हे यांच्यावरती दाखल करावेत, परंतु त्यांची त्यावेळी बदली झाली होती, त्यापासून ते आत्तापर्यंत आत्ताच्या विस्तार अधिकाऱ्यांनी व गटविकास अधिकारी यांनी प्रणोती श्रीमाळ यांनी ग्रामसेवकाला पाठीशी का? घातले आहे, फौजदारी गुन्हे का? दाखल केले नाहीत, व कशासाठी का? असा सवाल प्रत्यक्ष जागेचे मूळ मालक बबन रामभाऊ कड त्यांनी असे सांगितले आहे की, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी मला विश्वासात अजिबात घेतले नाही ,मनमानी कारभार केलेला आहे, यावर एक ते दोन वर्ष झाले विस्तार अधिकारी व गट विकास अधिकारी फक्त बग्याची भूमिका घेत आहेत ,तर या सर्वावर कठोरातील कठोर अशी कारवाई त्वरित करून, फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी कड यांनी केलेली आहे. बबन रामभाऊ कड यांनी याबद्दल सविस्तर माहिती ही प्रतिनिधीला दिलेली आहे.
पुरंदर तालुक्यातील  सासवड येथीलि शेठ गोविद रघुनाथ साबले निरोप समारंभ उत्साहात संपन्न                         सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड येथील शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी येथे दि. ०४ एप्रिल २०२६ रोजी निरोप समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी जाधव यांनी केले.अंतिम वर्ष फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. त्यानंतर प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच उपप्राचार्य डॉ. स्मिता पवार यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.प्रमुख पाहुणे डॉ. पंडित शेळके (प्राचार्य, वाघिरे कॉलेज, सासवड) यांनी विद्यार्थ्यांना भविष्याबाबत प्रेरणादायी संदेश दिला. यानंतर पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. प्रज्ञा जगताप, दीपाली जगताप व सुनिता भाटे यांनी उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला.कार्यक्रमाचा समारोप दीपाली जगताप  यांनी आभार प्रदर्शनाने केला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे प्रलंबित कामाबाबत चर्चा ;माजी आमदार संजय जगताप यांची अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक; उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकरणाचे प्रस्ताव मार्गी लावण्याच्या सूचना                                           सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         पुरंदर आणि हवेली तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाची प्रलंबित कामे, उड्डाणपूल आणि शहरांतर्गत रस्ते रुंदीकरण या विषयावर माजी आमदार संजय जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यासोबत पुण्यात सकारात्मक चर्चा केली ,सासवड, जेजुरी, निरा आणि फुरसुंगी या गावातील रखडलेली कामे, वाहतूक कोंडी, सोडवण्यासाठी विविध उपाय योजना करण्याच्या सूचना व मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत, पुणे येथील महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये प्राधिकरणाचे प्रबंधक  एस.एस. कदम आणि अभियंता अभिजीत औटी व इतर अधिकारी आदी उपस्थित होते .यावेळी संजय जगताप यांनी पुरंदर हवेलीतील महत्त्वाच्या शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मागण्या मांडलेल्या आहेत, यामध्ये सासवड बाह्य वळणाच्या चंदन टेकडी आणि बोरावके मळा या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल उभारणे, सासवड हद्दीतील चंदन टेकडी ते बोरावके मळा या शहरातून जाणाऱ्या रस्त्यांचा पालखी महामार्ग लगत, समावेश करून भूसंपादनासह चौपदरीकरण करणे, याबरोबरच पिसुर्डी फाटा ते लोणंद बाह्य वळण या दरम्यानच्या पिसुर्डी फाटा ते निराशहर आणि निराश शहर ते लोणंद या रस्त्याचे भूसंपादन करून, चोपदरीकरण करणे ,जेजुरी शहरात वाहतूक सुलभतेसाठी उड्डाणपूल उभारणे, दिवे घाटातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे नवीन बांधकाम करणे, फुरसुंगी भेकराईनगर येथे उड्डाणपुलाची निर्मिती करणे, तसेच फुरसुंगी भेकराई नगर येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुख्य डेनीज लाईन संदर्भात महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता व प्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व अभियंता यांनी एकत्रित कामाची पाहणी करून, येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याबाबत चर्चा झाली, अधिकाऱ्यांचे सकारात्मक आश्वासन या मागण्यावर बोलताना प्रबंधक एस.एस.  कदम आणि अभियंता अभिजीत औटी यांनी सांगितले की, सासवड आणि निरा शहरातील रस्ते भूसंपादनाबाबतचा प्रस्ताव वरिष्ठाकडे तात्काळ सादर केला जाईल, सासवड येथील चंदन टेकडी आणि बोरावके मळा येथील उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे, जेजुरीतील उड्डाणपुलाचा नकाशा तयार असून, फुरसुंगी भेकराई नगर येथील उड्डाणपूल भविष्यातील मेट्रोच्या मार्गा केला असून, अनुसरून मेट्रो मार्ग एकतेचा विचार करूनच तयार करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले, या बैठकीसाठी सासवडचे उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, गटनेते अजित जगताप,  ज्ञानेश्वर गिरमे, ज्ञानेश्वर माऊली (काका) जगताप ,राजन (भैय्या) जगताप, प्रदीप राऊत, सोपान रणपिसे,साकेत जगताप, जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे, वडकीतील सचिन गायकवाड, फुरसुंगीतील रणजीत रासकर यांच्यासह सर्व आजी, माजी नगरसेवक व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील शिखर शिंगणापूरच्या यात्रेची खानवडी येथे सांगता                                                                        सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                     खळद ,खानवडी, एखतपुर, मुंजवडी, कुंभारवळण या पंचक्रोशीतील कावडीचे शनिवारी दि. 4 रोजी खानवडीत आगमन झाले, कावडीचे स्वागत मिरवणुकीने करण्यात आले, त्यानंतर शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता झाली आणि पंचक्रोशीच्या वार्षिक यात्रोत्सवाला सुरुवात झाली, संत तेल्या भुत्याच्या कावडीचे मानकरी शिवयोगी संत भूतोजी नाना महाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला, गुढीपाडव्याच्या दिवशी शिखर शिंगणापूर यात्रे निमित्ताने कावडीची उभारणी केली होती, यानंतर अष्टमीला एकत्र येथे मिरवणुकीतून जळत्या घराची जागा, तेलाचा घाणा या ठिकाणी होम हवन केले, रामनवमीच्या दिवशी संत भूतोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन करेचे जल घेऊन, खळद येथे शाही मिरवणूक काढत कावडीने, शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान ठेवले होते की, यानंतर दोन ते तीन दिवसाचा प्रवास करत द्वादशीच्या दिवशी कावडीने अवघड मुंगी घाटाची चढण करत, येथील शंभू महादेवाला ज्यालाअभिषेक केला, एक दिवस येतील देवस्थानच्या वतीने मानपान स्वीकारून, कावडीने बुधवारी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पिंपळे पोमदनगर या गावाची कावड स्वागतासाठी आली असता.या दोन्ही कावडीच्या भेटीचा सोहळा पार पडला, त्यानंतरच शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता झाली.अशी माहिती  संत तेल्या भुतयाचया कावीचे मानकरी शिवयोगी संत भुतोजी नाना महाराज खलदकर यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे भैरवनाथ चैत्री उत्सवानिमित्त बगाडचा कार्यक्रम                                सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                  सासवड (ता. पुरंदर) येथे श्री काळभैरवनाथ मंडळ ट्रस्ट सासवड आयोजित श्री भैरवनाथ चैत्री उत्सव 2026 या उत्सवात आज शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी बगाड कार्यक्रमाने याञेची सुरुवात झाली. पहाटे मंदिरात ग्रामस्थ व ट्रस्ट व उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देवांना अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर वाजत गाजत जुने भैरवनाथ मंदिर या ठिकाणी ग्रामस्थ व पुजारी यांच्या हस्ते देवांना मानाचा पानाचा विडा ठेवण्यात येऊन तेथे आरती करण्यात आली. त्यानंतर वाजत गाजत ही मंडळी मुख्य भैरवनाथ मंदिरात आली. येथे भैरवनाथांचे अश्वाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कळस ते बगाड अशी धज बांधण्यात आली. त्यानंतर बापूगिरी गोसावी यांना बगाडावर स्वार करण्यात आले फुलांची  गुलालाची उधळण करीत व पारंपारिक हलगी ताशाच्या गजरात बगाडाला पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. यावेळी गुलाल खोबरे याची उधळण करीत "नाथ साहेबांचा चांगभलं" चा गजर करण्यात आला. नंतर मंदिरात आरती होऊन बगाड कार्यक्रमाची सांगता झाली . यावेळी श्री काळभैरवनाथ मंडळ ट्रस्ट व श्री काळभैरवनाथ चैत्री उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती रवींद्र पंत जगताप व सचिव विठ्ठल शिंदे यांनी दिली. फोटो : सासवड (ता. पुरंदर) येथील भैरवनाथ मंदिरासमोर पारंपारिक बगाड कार्यक्रम प्रसंगी भाविक.
पुरंदर तालुक्यातील माळशिरसमध्ये कडकडीत बंद; तर अंत्यविधी वरून गावात प्रचंड तणाव                                सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                 माळशिरस ता. पुरंदर येथील एका तरुणीवर अत्याचार करून, तिचा निर्गुण खून केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संताप जनक घटना घडल्याने, संपूर्ण परिसरामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे, या घटनेतील मुख्य आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी माळशिरस ग्रामस्थांनी शुक्रवारी दि. 3 रोजी गावात कडकडीत बंद पाळला शुक्रवारी सकाळपासूनच सर्व दुकाने आणि व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते, या भीषण घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण बनले असून, संतप्त ग्रामस्थांनी भैरवनाथ मंदिरमध्ये एकत्र येत एक मोठी विशेष ग्रामसभा घेतली या सभेत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बाहेरील व्यक्तींना गावातून हद्दपार करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला, माळशिरस येथे मागील काही दिवसापासून वास्तव्यास आलेल्या अनिकेत विष्णू जाधव या नराधमाने गावातील नीलम महिंद्र गायकवाड या तरुणीवर अत्याचार करून ,तिचा जीव घेतला यामुळे माळशिरस गावातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले होते, यावेळी ग्रामसभेमध्ये माऊली यादव, अरुण यादव, शरद यादव आणि राजेंद्र गद्रे यासह अनेक मान्यवरांनी आपली संतप्त भावना व्यक्त केल्या. आरोपीला फाशीच्या शिक्षेप्रमाणे अत्यंत कठोर शिक्षा करण्यात यावी ,याप्रमाणे बाहेरील व्यक्तींनी ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण केलेले आहे ते तातडीने काढण्याचा निर्णय घेण्यात आला, आरोपीच्या संपूर्ण कुटुंबावर कारवाई करून त्यांना सह आरोपी करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली असून, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी गावाला भेट देऊन, आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करेल ,अशी आश्वासन दिले, अंत्यविधी वरून गावात प्रचंड तणाव झाला दरम्यान: पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी संतप्त भावना व्यक्त करत आपल्या आरोपीच्या घरासमोरच अंत्यविधी करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता, यामुळे सासवड माळशिरस रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती आणि काही वेळ तणाव निर्माण झाला होता ,अखेर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर रात्री उशिरा गावातील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी पार पडले.गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी रात्रभर बंदोबस्त ठेवण्यात ठेवला होता, या प्रकरणातील गुन्हेगाराला फाशी व्हावी अशी तीव्र मागणी आता सर्व थरातून होत आहे, ग्रामस्थांचा हा निर्धार पाहून प्रशासनाने कडक कारवाई करण्याचे पाऊल उचललेले आहे.असे दिसून येत आहे.
सासवडमध्ये सरस्वती संगीत विद्यालयाची मासिक संगीत सभा उत्साहात संपन्न                                               सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                     सासवड येथील सरस्वती संगीत विद्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आलेली मासिक संगीत सभा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात स्वर्गीय एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, स्वरानंद चे अध्यक्ष रावसाहेबअण्णा पवार सचिव गिरीश मुरकुटे डॉ. संदीप होले, ऋषिकेश मुरकुटे यांच्या उपस्थितीत पार पडली . या कार्यक्रमाने केवळ संगीताचा आस्वादच दिला नाही, तर विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि कलाप्रेमाचा एक सुंदर आविष्कार साकारला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे शुभ हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. स्व. नानासाहेब महागावकर सभागृहात सुरेल स्वरांचे वातावरण निर्माण झाले होते.  पालक, शिक्षक आणि संगीतप्रेमी नागरिक मोठ्या उत्साहाने कार्यक्रमाला उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध संगीत प्रकारांनी कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. शास्त्रीय गायनातील गंभीरता, भजनांतील भक्तिरस, तसेच सुगम संगीताची माधुर्यपूर्ण लय—या सर्वांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. काही विद्यार्थ्यांनी वाद्यवृंदाद्वारे आपली कला सादर करत ताल-लय यांचा अप्रतिम संगम घडवून आणला. त्यांच्या प्रत्येक सुरात साधना, प्रत्येक तालात समर्पण आणि प्रत्येक सादरीकरणात आत्मविश्वास झळकत होता.या कार्यक्रमाचा सर्वात अभिमानास्पद क्षण म्हणजे अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा.   हसीना काझी ,सुरेखा जाधव,सुमन शिरवळकर ,मोनाली पाटणकर, मुस्कान काझी,किसन पोतदार.अनुष्का गळगे,सुषमा मुरकुटे,स्वरा नाळे,वरूण जगताप,गायत्री धुमाळ ,तनिष्का धुमाळ,आदेश ओचरे,ऋषिकेश शेंडकर,ज्योतीनाथ जाधव    या विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, चिकाटी आणि दत्ता जगताप व राजेंद्र बडे या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे यश संपादन केले आहे.  संतोष जगताप यांच्या शुभहस्ते ट्रॉफी व प्रशस्तिपत्र देऊन त्यांना  सन्मानित करण्यात आले. संतोष जगताप यांनीआपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, “संगीत ही केवळ कला नसून ती एक साधना आहे. या साधनेतूनच व्यक्तिमत्वाची घडण होते.” त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातही अशाच प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहण्याचे आवाहन केले.या संपूर्ण कार्यक्रमाने एक गोष्ट स्पष्टपणे अधोरेखित केली—की सरस्वती संगीत विद्यालय हे केवळ शिक्षण देणारे ठिकाण नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारे, त्यांच्या कलेला योग्य दिशा देणारे एक संस्कारकेंद्र आहे.एकूणच, ही मासिक संगीत सभा केवळ एक कार्यक्रम न ठरता, विद्यार्थ्यांच्या कलाजिवनातील एक प्रेरणादायी टप्पा ठरली. सासवडच्या सांस्कृतिक जीवनात या कार्यक्रमाने नवचैतन्य निर्माण केले असून, प्रत्येकाच्या मनात संगीताची गोड आठवण कायमची कोरली गेली आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड आगारांमध्ये स्वच्छतेचे एक प्रकारे कौतुक व मार्गदर्शन पर सदिच्छा भेट                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                           हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ अभियान अंतर्गत दि. 1 जानेवारी 2026 रोजी सासवड आगाराला प्रादेशिक अभियंता तसेच सांख्यिकी अधिकारी मिसळ नियंत्रण समिती क्रमांक पाच राव अमरावती प्रदेश यांनी यावेळी भेट दिली या भेटीच्या दरम्यान सासवड बस स्थानक परिसरातील स्वच्छता सुशोभित बगीचा तसेच बस स्थानकातील ठेवण्यात आलेल्या मोठ्या झाडांच्या कुंड्या याची पाहणी करण्यात आली परिसरातील स्वच्छता व प्रसन्न वातावरण पाहून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत एक प्रकारे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले तसेच बस स्थानकाच्या आणखी सुशोभीकरणासाठी आणि स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी काही ठिकाणी योग्य अशा प्रकारचे नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन ही करण्यात आली या भेटीमुळे सासवड आगारातील स्वच्छता मोहिमेला अधिक बळ मिळणार असं प्रवाशासाठी स्वच्छ व सुखद असे वातावरण या ठिकाणी राखण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेकडून थकीत मिळकत धारकाची अभय योजनेअंतर्गत शास्ती माफ; सासवड नगर परिषदेची 5 कोटी 70 लाखाची विक्रमी  अशी वसुली                                                                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                               सन 2025 -26 या आर्थिक वर्षाकरिता सासवड नगर परिषदेमार्फत विशेष वसुली मोहीम राबवण्यात आली होती, थकीत मिळकत धारकावर मालमत्ता वर महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 150 ते 156 अन्वये मालमत्ता सिल करणे, नळ कनेक्शन बंद करणे इत्यादी स्वरूपाची वसुली कामे कारवाई करण्यात आली ,सासवड नगर परिषदेतील सन 2025- 26 या आर्थिक वर्षाकरिता एकूण 5 कोटी 70 लाखाची वसुली करण्यात आली आहे, सासवड नगर परिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता कराची प्रभावी अशी वसुली करण्यासाठी 100% शास्ती माफी करिता अभय योजना लागू करण्यात मान्यता देण्याबाबत दि. 30 मार्च रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता, यानुसार सासवड नगरपरिषद क्षेत्रातील संपूर्ण थकीत मालमत्ता कराचा भरणा दि. 31 मार्च 2026 पर्यंत केलेल्या मिळकत धारकाची शासकीय माफी करण्यात आली. थकीत मिळकत धारकांचा अभय योजनेस मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला असून, थकीत करा वरील शासकीय माफ करण्यासाठी तब्बल 465 अर्ज सासवड नगरपरिषद कार्यालयात प्राप्त झाले असून, या थकित मिळकत धारकांच्या 65 लाख रुपयांचे शासकीय माफीचा थेट लाभ मिळाला राज्य शासनाने जाहीर केलेल्या 100% वसुली शास्ती माफी मुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली होती, सासवड नगरपरिषदेकडून नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी सुद्धा कर भरणा केंद्र सुरू ठेवण्यात आले होते, 31 मार्च रोजी मध्ये रात्रीपर्यंत नागरिक कर भरणा करण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात उपस्थित होते, अभय योजनेमुळे नगरपरिषदेच्या आर्थिक स्थितीला बळकटी मिळाली असून ,थकीत कर वसुलीत यश मिळाल्याचे मुख्याधिकारी dr कैलास चव्हाण यांच्याकडून असेही सांगण्यात आले. नगराध्यक्ष आनंदी (काकी) चंदुकाका जगताप यांनी असे सांगितले की, कमी कालावधीमध्ये झालेली वसुली समाधानकारक आहे, विविध कारणामुळे कर भरू न शकलेल्या थकबाकीदारासाठी योजनेची मुदत वाढवून मिळावी तसेच उर्वरित थकीत मिळकत धारकांनी अभय योजनेविषयीच्या अधिक माहितीसाठी सासवड नगर परिषद कार्यालयाशी संपर्क करावा अशी माहिती नगराध्यक्ष आनंदी (काकी) जगताप यांनी सविस्तर ही माहिती प्रतिनिधीला दिली.
पुरंदर तालुक्यातील खानवडी या ठिकाणी प्रियकराकडून प्रेयसीचा खून; आत्याचारानंतर गळा दाबून हत्या केल्याचा आरोप; तर आरोपी विरोधात 18 सिटीसह गंभीर असे गुन्हे दाखल                                                                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                सासवड ता. पुरंदर येथील माळशिरस येथील बावीस वर्षीय तरुणीचा निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये अत्याचार व अनु सुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे ,याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महेंद्र प्रल्हाद गायकवाड वय 50 राहणार माळशिरस ता. पुरंदर यांनी दिलेल्या तक्रारी वरून अनिकेत विष्णू जाधव वय 21 राहणार माळशिरस यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा सासवड पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोंदविण्यात आलेला आहे, फिर्यादीच्या तक्रारीनुसार मृत तरुणी निलम गायकवाड वय 22 ही सासवड येथील वाघीरे महाविद्यालयात टी. वाय. बी .ए चे शिक्षण घेत होती, सुमारे तीन वर्षांपूर्वी तिचे आरोपी अनिकेत जाधव यांच्याशी फोनवरून बोलणे होत असल्याचे निदर्शनास आले होते, त्यावेळी दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा होऊन, संपर्क तोडण्याची आश्वासन देण्यात आले होते, दि. 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी निलम ही नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली होती ,मात्र सायंकाळी घरी परतली नाही, कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही, रात्री उशिरा पोलिसांकडून फोन आल्यानंतर कुटुंबीय ग्रामीण रुग्णालय सासवड येथे पोहोचले असता, निलमचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे समजले, मृतदेह पाहिल्यानंतर तिच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा, गळा सुजलेला असल्याचे दिसून आले, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत आरोपीने अत्याचार करून गळा दाबून खुन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे, ही घटना दि. १ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजण्यापूर्वी खानवडी गावच्या हद्दीत घडल्याचे नमूद करण्यात आलेले आहे, सदर प्रकरणात आरोपी अनिकेत जाधव याला पीडीतीची जात माहिती असूनही, त्याने तिच्याशी सबंध ठेवून नंतर अज्ञात कारणावरून हा गुन्हा केल्याचा आरोप आहे, तसेच आरोपीच्या कुटुंबियाकडून धमकीची शक्यता असल्याचेही फिर्यादीने नमूद केलेले आहे ,या गुन्ह्याचा तपास राजेंद्र सिह गौर उपविभागीय  पोलीस  अधिकारी भोर याच्या अधिपत्याखालील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम तपास करीत आहेत, या घटनेमुळे पुरंदर तालुक्यात एक प्रकारे संताप व्यक्त होत असून ,आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी सामान्य नागरिकाकडून व पुरंदर तालुक्यातून होत आहे.
सर्वांगीण विकासासाठी सक्षम समाजरचना – खेळ, आरोग्य, शिक्षण आणि जबाबदार नागरिकत्व                          सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                    आजच्या आधुनिक युगात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ आर्थिक प्रगती पुरेशी नसून शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास तितकाच महत्त्वाचा आहे. गाव पातळीपासून शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी नागरिकांना योग्य सुविधा उपलब्ध असणे ही काळाची गरज बनली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ, आरोग्य, शिक्षण, संस्कार आणि योग्य जीवनशैली यांचा समतोल साधणे अत्यंत आवश्यक आहे.सर्वप्रथम, खेळाच्या सुविधा या प्रत्येक गाव, वस्ती आणि शहरात उपलब्ध असायला हव्यात. मैदान, जिम, तालीम, वॉकिंग ट्रॅक यांसारख्या मूलभूत सुविधा नसतील तर नागरिकांचे आरोग्य चांगले कसे राहील? कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, कुस्ती ,अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस, वॉलीबॉल, जिम्नॅस्टिक, कराटे , ज्युडो,बास्केटबॉल, योगासने तसेच मैदानी आणि इनडोअर खेळ, बुद्धिबळ इत्यादी तसेच ध्यान धारणा यासाठी स्वतंत्र जागा आणि प्रशिक्षक (coaching) उपलब्ध असणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर सुदृढ राहते, आत्मविश्वास वाढतो, टीमवर्कची भावना विकसित होते आणि तणाव कमी होतो. त्यामुळे प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि स्थानिक प्रशासनाने खेळाच्या सुविधा उभारण्यावर भर दिला पाहिजे.आरोग्यदायी जीवनशैलीसाठी स्वच्छता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जर रहिवासी भागात सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसेल, कचरा जागोजागी साचत असेल, तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. अशा परिस्थितीत रोगराई वाढते आणि जीवनमान खालावते. त्यामुळे स्वच्छता व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण आणि सांडपाणी निचरा यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. “स्वच्छ गाव – निरोगी गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.आज समाजासमोर एक गंभीर समस्या म्हणजे व्यसनाधीनता आहे. दारू, सिगारेट, तंबाखू आणि ड्रग्स यांचा वाढता वापर तरुण पिढीला दिशाहीन करत आहे. यावर कठोर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. उत्पादन, विक्री आणि वापर यावर कडक निर्बंध घालूनच आपण समाजाला या विळख्यातून बाहेर काढू शकतो. यासाठी शासनाने कठोर कायदे लागू करावेत आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर जनजागृती मोहिमा राबवून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल आणि स्क्रीन मीडिया हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. परंतु त्याचा अतिरेक हा धोकादायक ठरत आहे. मुलांच्या हातात मोबाईलचा जास्त वेळ वापर होत असल्याने त्यांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत, तसेच मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. स्क्रीनवर येणारा अयोग्य आणि धोकादायक कंटेंट त्यांच्या मनावर वाईट परिणाम करतो. त्यामुळे पालकांनी आणि शासनाने अशा कंटेंटवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. डिजिटल साक्षरता वाढवून योग्य वापराची जाणीव करून देणेही महत्त्वाचे आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम पुरेसा नसतो. वक्तृत्व, गायन ,पोवाडा , लोक गीत गायन,वादन, नाट्य, चित्रकला आणि इतर कला-कौशल्यांचा, व्यावसायिक कौशल्यांचा  विकास करणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, व्यक्तिमत्त्व खुलते आणि सर्जनशीलता विकसित होते. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात अशा उपक्रमांसाठी सुविधा आणि प्रशिक्षक उपलब्ध असायला हवेत.आज ग्रामीण भागात एक चिंताजनक चित्र दिसून येते. वयोवृद्ध लोक शेती आणि कष्टाची कामे करत आहेत, तर युवक आणि विद्यार्थी मोबाईलमध्ये, comfort मध्ये व्यस्त आहेत. ही परिस्थिती समाजासाठी धोकादायक आहे. विद्यार्थ्यांनी समाज विकासाच्या कामात सहभागी होणे आवश्यक आहे. ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, जलसंवर्धन, साक्षरता अभियान यांसारख्या उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे. अनेक कृषी, लघु व कुटीर उद्योग याचे प्रशिक्षण,विकास ,जोपासना यामुळे त्यांच्यात सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होईल.शिक्षणाच्या बाबतीत देखील गंभीर समस्या आहे. शाळेत अभ्यासक्रम पूर्ण केला जातो, परंतु विद्यार्थ्यांना त्यातील ज्ञान दीर्घकाळ लक्षात राहत नाही. सामान्य ज्ञानाची कमतरता दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे आत्मीयतेने पाहण्याचा अभाव. केवळ परीक्षेसाठी अभ्यास केला जातो, ज्ञानासाठी नाही. मार्क्स महत्वाचे आहेतच . पण फक्त मार्क्सनाच महत्व आले आहे.त्यामुळे शिक्षणपद्धतीत,आणखी सुधारण , बदल  करून अनुभवाधारित आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे.वेळेचे नियोजन ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक विद्यार्थ्यांना वेळेचे योग्य नियोजन करता येत नाही. त्यामुळे अभ्यास, खेळ आणि इतर उपक्रम यामध्ये समतोल राखता येत नाही. शाळा आणि पालकांनी विद्यार्थ्यांना वेळ व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक आहे.कुटुंब नियोजन हा देखील समाजाच्या विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. एका कुटुंबात एक किंवा दोन मुले असणे हे आदर्श मानले जाते. यामुळे पालकांना मुलांकडे अधिक लक्ष देता येते आणि त्यांचा विकास योग्य पद्धतीने करता येतो. यामुळे समाजात संसाधनांचे योग्य वाटप होऊन जीवनमान सुधारते.वरील सर्व बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन आणि नेतृत्वाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. स्थानिक नेते, शासकीय अधिकारी आणि धोरणकर्त्यांनी या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. योग्य नियोजन, निधी आणि अंमलबजावणी यामुळेच या सुविधा प्रत्यक्षात येऊ शकतात. नागरिकांचा सहभाग आणि सहकार्य याशिवाय हे शक्य नाही.शेवटी, एक सक्षम, निरोगी आणि प्रगत समाज निर्माण करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. खेळ, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, संस्कार आणि जबाबदार नागरिकत्व यांचा समतोल साधूनच आपण उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून समाजाच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने “सर्वांगीण विकास” साध्य होईल.@ डॉ ललिता भगत
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 5,000दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर                         सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक    मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                 पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.1 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 5,000 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 5,000 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 3,500 तर सरासरी 4,250 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,300तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,700 तर सरासरी 3,000 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास  कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर, गुळाला 4,400रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 2,50 बॉक्स 50क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,400 कमाल दर 4,000रुपये तर साधारण4,300 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 3,500,5,000,4,250. बाजरी 2,600,3,300, 2,950. गहू 2,700,3,300,3,000. तांदूळ ----‐------ हरभरा 4,800, 5,600,5,200.
पै. महेंद्र गायकवाड श्री भैरवनाथ जोगेश्वरी चा मानकरी राजुरी ग्रामदैवत श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा उत्साहात; आखाड्यात 350 मल्लांचा सहभाग                            सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                      राजुरी ता.पुरंदर येथील श्री भैरवनाथ जोगेश्वरी ची यात्रा आयोजित भव्य कुस्ती आखाड्यामध्ये पै. महेंद्र गायकवाड उप महाराष्ट्र केसरी सोलापूर येथील असून, पै. गौरव शर्मा इंदोर (मध्य प्रदेश केसरी) यांच्यात कुस्ती होऊन,  पै.महेंद्र गायकवाड यांनी घुटण्यावर डाव टाकून,  पै. गौरव शर्मा यांच्यावर मात करून कुस्ती चितपट करत, श्री भैरवनाथ जोगेश्वरी चा किताब पटकावला याबद्दल ही कुस्ती 5 लाख 81 हजार रुपयाचा इनाम शेवटचा कुस्तीला ठेवण्यात आला होता, राजुरी ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केसरी कुस्ती स्पर्धेसाठी 350 पैलवानांनी हजेरी लावली होती, तर या आखाड्यामध्ये कुस्त्या या 180 पार पडल्या असून ,आखाड्याचे पूजन कृष्णाजी भगत माजी सरपंच (उद्योगपती) व हरिभाऊ भगत श्री भैरवनाथ उद्योग समूह (उद्योगपती) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अंकुश (बापू) भगत, उद्धव भगत, शाम भगत ,महेश भगत ,योगेश भगत, प्रमोद भगत, विजय भगत, संपत भगत, मनोहर भगत, संतोष भगत, संपत चोरघडे, सुधाकर भगत, कैलास भगत ,बाबुराव गायकवाड,राहुल गायकवाड,  मनोहर उगले, विपुल भगत, सचिन मुळीक, पंचक्रोशीतील नागरिक, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्य सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तंटामुक्ती अध्यक्ष ,आजी ,माजी, पदाधिकारी, यात्रा कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, नियामक मंडळ, गावातील शेतकरी बांधव ,युवक पिढी, शेतकरी ,ग्रामस्थ आदी उपस्थित होते. माजी सरपंच कृष्णाजी भगत व हरिभाऊ भगत (उद्योगपती) यांच्या हस्ते 5 लाख 81 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले ,पंच म्हणून सागर चव्हाण, संभाजी चव्हाण, संजय बोरकर, वासुदेव (अण्णा) बनकर, आप्पा भांडवलकर, महादेव भगत, दिलीप शिवरकर यांनी उत्कृष्ट पद्धतीने पंच म्हणून काम केले. राजुरी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच व विद्यमान सरपंच कडून दोन लाख 50 हजार रुपयाचा इनाम होता, तिसरी कुस्तीसाठी दोन लाख 11 हजार रुपयाचा, चौथ्या कुस्तीसाठी एक लाख 75 हजार रुपयाचा, पाचवी एक लाख, सहावी 90 हजार, सातवी 80 हजार, आठवी 70 हजार नववी व दहावी 50 हजार रुपयापर्यंत कुस्त्यांच्या चितपट करूनच कुस्त्या या राजुरी या ठिकाणी जिंकण्यात आल्या होत्या. ही तर राजुरी करांची सर्वात श्रेष्ठ कुस्ती आखाडा पुरंदर तालुक्यातील राजुरी गावासारखा आत्तापर्यंत कुस्ती आखाडा हा एवढा दिव्य असा झालेला नाही ,त्यामुळे राजुरीचे पूर्ण देशात व परदेशांमध्ये नावलौकिक झालेले आहे, ही एक राजुरी करांची खासियत आहे, हा आखाडा सायंकाळी चार वाजता ते रात्री साडेबारापर्यंत चालला होता, स्पर्धेसाठी 350 पहिलवानांनी सहभाग नोंदवला होता ,या लढती पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी राजुरी येथे तुफान अशी गर्दी केली होती, पुणे जिल्ह्यातील (खोर ता. दौंड )येथील प्रसिद्ध कुस्ती निवेदक प्रा. सागर चौधरी व अनिकेत कदम यांनी समालोचन केले होते, या कुस्तीसाठी आखाड्यासाठी सुद्धा पत्रकार बहुसंख्येने आधी उपस्थित होते.
Load More That is All