सासवडच्या काळभैरवनाथ देवस्थानच्या वतीने सिद्धेश्वर महादेव यात्रेनिमित्त संपूर्ण पोशाख सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री सिद्धेश्वर महादेव देवस्थान सासवड चैत्र यात्रा व कावड आगमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी सहा वाजता महारुद्राअभिषेक करून यात्रेची सुरुवात झाली सकाळी आठ वाजता बालाजी मंदिर केतकावळे उत्तरादेवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अभिषेक व आरती करण्यात आली त्यांचे परैत्य गणेश काका सरनाईक यांनी केले तसेच सकाळी 11 वाजता प्रथम मानाची कावड सासवड शिखर शिंगणापूर चैत्र पायी यात्रा करून सासवडच्या श्री सिद्धेश्वर महादेवास जलाभिषेक करण्यासाठी सकाळी 11 वाजता पोच झाली सिद्धेश्वर महादेव पाच प्रदक्षिणा घालून श्री सिद्धेश्वर महादेवास जलाभिषेक करून दुपारी बारा वाजता महारती करण्यात आली व त्यानंतर सर्व शंभू भक्तांसाठी श्री सिद्धेश्वर महादेव देवस्थानच्या वतीने महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री कैलास महाराज कावडे यांच्या हस्ते जला अभिषेक करून महाआरती करण्यात आली याप्रसंगी भैरवनाथ देवस्थान सासवड येथील गिरी गोसावी महाराज हजर होते तसेच वेंकटेश बालाजी मंदिर केतकावळे येथील बाळासाहेब बाठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिर परिसरातील संपूर्ण साफसफाई करण्यात आली यावेळी शिवशंभो कावड मंडळाचे संजय जगताप विलास तात्या जगताप कावडीचे कारागीर काळू भाऊ जगताप गणेश कुदळे व इतर सर्व कावड नाचवणारे शंभू भक्त हजर होते तसेच श्री सिद्धेश्वर सुधार समिती व जगताप परिवाराच्या वतीने सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments