प्रामाणिकपणा बद्दल नंदा घाडगे यांचा स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान.... .सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवडच्या चिंतामणी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मावशी नंदा घाडगे यांना झाडलोट करताना दोन तोळ्यांची सोन्याची चेन पार्किंग जवळ सापडली. त्यांनी ती व्यवस्थापनाकडे सुपूर्द केली व नंतर ती मूळ मालकाला सुपूर्द करण्यात आली.. घाडगे यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक म्हणुन सामाजिक कार्यात कायम अग्रभागी असणाऱ्या स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने घाडगे यांना साडी चोळी व पाण्याचा फिल्टर भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.. मावशी नंदा घाडगे यांच्या या कौतुक सोहळ्यास स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, सचिव हेमंत ताकवले, चिंतामणी हॉस्पिटलचे संचालक डॉ बाळासाहेब वांढेकर, डॉ विनायक बांदेकर, डॉ संध्या खळदकर, डॉ भालचंद्र दीक्षित, कृष्णा शेट्टी,शहरपत्रकार संघाचे कार्याध्यक्ष जीवन कड, सदस्य जगदीश शिंदे, पथॉलॉजि लॅबचे पांडुरंग गायकवाड,परिचारिका राजश्री शिवरकर, नुतन गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.. सर्वच उपस्थितांनी घाडगे यांच्या या प्रामाणिक व स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत अभिनंदन केले...
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments