Hot Posts

6/recent/ticker-posts

चांबळी येथील भैरवनाथ कुस्ती आखाड्याचा मानकरी ठरला अमित गायकवाडकुस्ती आखाड्यात ष १३६ मल्लांची हजेरी सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: चांबळी (ता. पुरंदर) येथील कुलदैवत श्री भैरवनाथ महाराज व माता जोगेश्वरी देवांचा चैत्री उत्सव मंगळवार दि.७ व बुधवार दि.८ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला. या यात्रोत्सवाला भाविकांनी गर्दी केली होती शुक्रवारी पहाटे ५ वाजता भैरवनाथ महाराज व माता जोगेश्वरी यांना अभिषेक व महापूजा करण्यात आला व दुपारी १२:१५ ते सायंकाळी ५ वाजता देवांना ग्रामस्थांचे वैयक्तिक नाथास हार अर्पण तसेच रात्री १० ते सकाळी ७ वाजता नाथांची मिरवणूक व छबिण्यांची हजेरी, ढोल लेझीम स्पर्धा उत्साहात साजरी झाली. त्यानंतर सायंकाळी पालखीची ग्रामप्रदक्षिणा झाली. बुधवारी दु.४ वा.भैरवनाथ कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यांत आले होते. यात शेवटच्या कुस्ती पुरंदर केसरी किताब विजेता पै. अमित गायकवाड विरुद्ध पै. प्रसाद जगदाळे यांची लावण्यात आली. हि लढत अमित गायकवाड यांने जिंकली. या कुस्ती आखाड्यात राज्यातील विविध भागातील १३६ मल्लांनी हजेरी लावली तर अनेक महिला कुस्ती खेळाडूंनी हजेरी लावली होती. पंच म्हणून पै. वामनभाऊ कामठे, पै.रघुनाथ कामठे, मधुसूदन शेंडकर, कल्याण कामठे, संतोष कटके, शहाजी कामठे, शिरीष कामठे, विलास कामठे, शुभम कामठे यांनी काम पाहिले. तर कुस्त्यांचे निवेदन मारुती कामठे, मारुती शेंडकर यांनी केले.उत्सवात हिशोबाचे काम पोपट शेंडकर व एच्.टी.कामठे यांनी पाहिले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, सरपंच गोपाळ कामठे, रामेश्वर मंडळाचे अध्यक्ष शहाजीराजे कामठे, सोमेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ शेंडकर, गावकारभारी वामनभाऊ कामठे, पोपटआबा शेंडकर, म्हस्कू कामठे, जी.एस.शेंडकर, श, ,उद्योजक दादासाहेब पवार, कैलास कामठे, शिवराम शेंडकर, प्रसाद कामठे, राहुल कामठे,माऊली घारे, भाऊसाहेब कामठे, संजय शेंडकर,प्रकाश भालेराव,सुरेश शेंडकर,सोपान कटके, कान्हू कटके, दिलीप कामठे, लक्ष्मण कणसे, सुरेश कामठे,संदिप कदम, रविंद्र पवार, नाना शेंडकर , संभाजी शेंडकर, गोकुळ भिसे, मधुकर कामठे,शिवाजी शेंडकर,श्रीरंग कामठे, हनुमंत कामठे, माऊली कामठे, नामदेव कामठे, गोरख शेंडकर,पोलीस पाटील विश्वनाथ शेंडकर, पोपट कामठे, अब्बास मुलाणी, मोहन शेंडकर , बापूसाहेब कामठे, सुनील कामठे आदीसह चांबळीकर ग्रामस्थ, कुस्तीप्रेमी उपस्थित होते. बुधवार सकाळी १० ते दु.३ व रात्री ९ ते २ वाजेपर्यंत तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे करवडीकर सह नितीनकुमार बनसोडे लोकनाट्य तमाशाने चांबळी यात्रेची सांगता झाली.बातमी सोबत फोटो पाठवीत आहे. फोटो ओळी -चांबळी(ता.पुरंदर) येथील भैरवनाथ कुस्ती आखाड्यातील मानाची कुस्ती लावताना चांबळीकर मान्यवर पदाधिकारी व गावकारभारी

Post a Comment

0 Comments