Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामधून कुंभारव ळण गावाचे भूसंपादन रद्द करून गाव वगळण्याबाबत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: समस्त कुंभारवळण शेतकरी संघर्ष समितीच्या तर्फे पुढील बाजू मांडलेल्या कुंभारवळण हे गाव पुरंदर तालुक्यातील सर्वाधिक उत्पादनक्षम बागायत क्षेत्र आहे, शेती ही केवळ उपजीविका नसून, ग्रामीण अर्थव्यवस्थेची एक कणा आहे, विहिरी बोरवेल व लघु सिंचन योजना मुळे या ठिकाणी वर्षभर पीक घेतले जाते, गावाचे क्षेत्रफळानुसार शेती सुमारे 1,225 एकर बागायत शेत्र हे 90% पेक्षा जास्त असून, ऊस, डाळी, ज्वारी, भाजीपाला,कांदा, लसूण, टोमॅटो, वांगी, फळबाग, डाळिंब, पेरू, लिंबू, आंबा, सिताफळ, पूरक व्यवसाय दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री, शेळीपालन, सिंचनाचे स्त्रोत 120 विहिरी, 230 बोरवेल, ठिबक सिंचन प्रणाली यासाठी वार्षिक उत्पादन 600 ते 700 कोटी स्थानिक बाजारभावानुसार त्यासाठी गावातील सुमारे 95% कुटुंब शेतीवर अवलंबून आहेत, शेती उत्पादनावर आधारित 300ते 400 कुटुंबियांच्या अधिक पूरक असे रोजगार ही निर्माण झालेली आहेत, सेंद्रिय शेती व ठिबक सिंचन वापरात आहे, जर भूसंपादन झाल्यास गावाची स्थानिक अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल, कारण या ठिकाणी इथपर्यंत रोजगार व्यवस्था नाही, कुंभारवळण गाव हे उच्च उत्पादनक्षम बागायत क्षेत्र असल्याने, या जमिनीचा उपयोग विमानतळ प्रकल्पासाठी केल्यास, राज्याच्या कृषी उत्पादनात घट होईल, आणि शेकडो कुटुंबाचा उपजैविकेचा पाया नष्ट होईल, त्यामुळे गावाला भूसंपादनातून वगळणे हे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे, कुंभारवळण गावातील लोकसंख्या सुमारे 3500 असून, ती प्रामुख्याने शेतकरी शेतमजूर व लघु व्यावसायिकांच्या आहे, या सर्व कुटुंबाचे उत्पन्न हे शेती पशुपालन व भाजीपाला फळे उत्पादन वर अवलंबून आहे, भूसंपादन झाल्यास शेती, पोल्ट्री, दुग्ध व्यवसाय आणि स्थानिक बाजार पूर्णपणे बंद पडेल, यासाठी वार्षिक उत्पन्न 600 ते 700 कोटी वरून ते शून्यावर येईल, त्यासाठी 300 ते 400 कुटुंबांना विस्थापित व्हावे लागेल ,गावात जुने मंदिर, ग्रामदैवस्थाने आणि देवळा भोवती पारंपरिक सण उत्सव चालतात, विस्थापनामुळे ग्राम संस्कृती नष्ट होईल, शाळा, बालवाडी, वाचनालय इत्यादी सुविधा पासून कुटुंबे वंचित राहतील, वृक्षतोड, भूमिगत पाने स्तर घट जैवविविधतावर परिणाम होईल, कलम 38 /2 नुसार सोसीईल इम्पॅक्ट असेसेएमेंट मधील मिनियम डिस्प्लेसमेंट युनिटबल लाईव्ह लिहुड या तत्त्वाचे पालन आवश्यक आहे, कुंभारवळणच्या बाबतीत पर्याय उपजीविका किंवा पुनर्वसन योजना उपलब्ध नाही, त्यामुळे प्रकल्प सामाजिक दृष्ट्या गैरव्यवहाराच्या मूलभूत तत्वांना धरून होणार नाही, तरी कुंभारवळण गाव हे उत्पादनक्षम स्थानिक व सांस्कृतिक दृष्ट्या एकात्मक गाव असून, त्याचे विस्थापन हे सामाजिक आर्थिक व पर्यावरणीय दृष्ट्या अन्यायकारक ठरवू शकते, म्हणून सोसीयल इम्पॅक्ट नुसार हे गाव भूसंपादनातून कायमस्वरूपी वगळण्यात यावे, सरकारने पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये विमानतळ प्रकल्पासाठी प्राथमिक भूसंपादन जाहीर केले आहे, या गावांपैकी कुंभारवळण हे गाव पूर्णपणे बागायत शेत्र आहे, ऊस, डाळिंब, फळबागा, कांदा, लसूण, भाजीपाला, तसेच दुग्ध व्यवसाय पोल्ट्री व मोठे मोठे जास्त प्रमाणात गोठे आहेत, त्यामुळे आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण व उत्पादनक्षम आहे, हे गाव भूसंपादनाच्या प्राथमिक सर्वे व पाहणी दरम्यान; गावातील शेत कर्यांनी कोणतीही अडवणूक न करता, सर्व सहकायॅ केले आहे, नागरी उड्डाण महासंचालनालय यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विमानतळाच्या आवश्यक क्षेत्रा पुरते संपादन करणे अपेक्षित आहे, तर यांनी गावातील बहुतांश भाग हे ओएलसी क्षेत्राबाहेर आहेत आणि नॉन सर्कल झोन मध्ये येतो, त्यामुळे या भागाचे संपादन तांत्रिकदृष्ट्या अनावश्यक आहे रिसीटीलेअर कायदा 2013च्या कलम 38/2 नुसार सोसायटी इम्पॅक्ट असोसिएटमेंट सिया अहवालातील मिनिमम डिसेंबर हे तत्व हे पाळलेच पाहिजे, कुंभारवळण हे गाव पूर्ण वस्तीदार असून, येथे अनेक पिढ्यापासून स्थायी कुटुंबे आहेत, संपूर्ण गाव संपादनात घेतल्यास, शेकडो कुटुंबाचे विस्थापन होईल ,जे या कायद्याच्या तरतुदींना विरोधात आहे, गावात सिंचनाची व्यवस्था ही उत्तम असून ,शेती ही मुख्य उपजीविका आहे, या भागात भूजल, पीक संवर्धन, वृक्ष बागा व धार्मिक स्थळे आहेत, त्यामुळे भूसंपादन केल्यास, पर्यावरणीय समतोल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला गंभीर फटका बसेल, पर्यायी जमीन उपलब्ध होण्यासाठी शेजारच्या आसपासच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशी सपाट जमीन उपलब्ध आहे, त्यासाठी कुंभारवळण हे गाव वगळले तरी प्रकल्पावर कोणताही कार्यात्मक किंवा तांत्रिक परिणाम होणार नाही, कलम 4/2 पब्लिक परपोस या मर्यादे रिसीटी इयरलीयर अॅक्ट नुसार सार्वजनिक उद्देशासाठी केवळ मिनिमम अरेरीचा रिसर्च सेंटर एवढीच जमीन संपादन करावी लागते, कुंभारवळण वगळल्यास हे तत्व पाळले जाईल, आणि विस्थापन टळेल, कुंभारवळण गावाची शेती, वस्ती, धार्मिक स्थळे व पर्यावरणीय रचना विचारात घेऊन हे गाव प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामधून कायमस्वरूपी वगळण्यात यावे, यासंदर्भात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, यांनासुद्धा प्रत्यक्ष पाहणी अहवाल सादर करण्यासाठी विनंती ही केलेली आहे, अशा संदर्भातील समस्त कुंभारवळण शेतकरी संघर्ष समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिल्याची सविस्तर माहिती ही प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments