पुरंदर तालुक्यातील माळशिरसमध्ये कडकडीत बंद; तर अंत्यविधी वरून गावात प्रचंड तणाव सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: माळशिरस ता. पुरंदर येथील एका तरुणीवर अत्याचार करून, तिचा निर्गुण खून केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संताप जनक घटना घडल्याने, संपूर्ण परिसरामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे, या घटनेतील मुख्य आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी माळशिरस ग्रामस्थांनी शुक्रवारी दि. 3 रोजी गावात कडकडीत बंद पाळला शुक्रवारी सकाळपासूनच सर्व दुकाने आणि व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते, या भीषण घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण बनले असून, संतप्त ग्रामस्थांनी भैरवनाथ मंदिरमध्ये एकत्र येत एक मोठी विशेष ग्रामसभा घेतली या सभेत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बाहेरील व्यक्तींना गावातून हद्दपार करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला, माळशिरस येथे मागील काही दिवसापासून वास्तव्यास आलेल्या अनिकेत विष्णू जाधव या नराधमाने गावातील नीलम महिंद्र गायकवाड या तरुणीवर अत्याचार करून ,तिचा जीव घेतला यामुळे माळशिरस गावातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले होते, यावेळी ग्रामसभेमध्ये माऊली यादव, अरुण यादव, शरद यादव आणि राजेंद्र गद्रे यासह अनेक मान्यवरांनी आपली संतप्त भावना व्यक्त केल्या. आरोपीला फाशीच्या शिक्षेप्रमाणे अत्यंत कठोर शिक्षा करण्यात यावी ,याप्रमाणे बाहेरील व्यक्तींनी ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण केलेले आहे ते तातडीने काढण्याचा निर्णय घेण्यात आला, आरोपीच्या संपूर्ण कुटुंबावर कारवाई करून त्यांना सह आरोपी करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली असून, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी गावाला भेट देऊन, आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करेल ,अशी आश्वासन दिले, अंत्यविधी वरून गावात प्रचंड तणाव झाला दरम्यान: पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी संतप्त भावना व्यक्त करत आपल्या आरोपीच्या घरासमोरच अंत्यविधी करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता, यामुळे सासवड माळशिरस रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती आणि काही वेळ तणाव निर्माण झाला होता ,अखेर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर रात्री उशिरा गावातील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी पार पडले.गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी रात्रभर बंदोबस्त ठेवण्यात ठेवला होता, या प्रकरणातील गुन्हेगाराला फाशी व्हावी अशी तीव्र मागणी आता सर्व थरातून होत आहे, ग्रामस्थांचा हा निर्धार पाहून प्रशासनाने कडक कारवाई करण्याचे पाऊल उचललेले आहे.असे दिसून येत आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments