उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांच्या विरोधामध्ये होणार दंडात्मक कारवाई सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहरात नगरपरिषद मार्फत उघड्यावर कचरा पडू नये, म्हणून ठिक ठिकाणी आरोग्य विभागामार्फत पथके नेमण्यात आली आहेत, सदर पथके सोनोरी रोड, गणेश मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, पुना रोड, नारायणपूर रोड अशा विविध ठिकाणी नेमण्यात आली आहेत, तरी शहरातील काही नागरिक उघड्यावर कचरा टाकताना आढळत आहेत, या संबंधी वेळोवेळी नगर परिषदेमार्फत, सोशल मीडिया, जाहीर सूचना, फ्लेक्स, जाहीर दवंडी अशा विविध माध्यमातून उघड्यावर कचरा टाकणारे आणि एकल वापर प्लॅस्टिक विरोधात होणार दंडात्मक कारवाई च्या सूचना देण्यात येत आहेत, त्या अनुषंगाने नगरपालिकेने कार्यवाही सुरू केली आहे, सदर कार्यवाही दरम्यान, उघड्यावर कचरा टाकणारे व नगर परिषदेने गोविंद स्वीट, पालखी मैदान, अस्मिता वडेवाले, पुणे रोड, न्यू महाराष्ट्र बेकरी हिवरे रोड यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. नगरपरिषदेमार्फत सर्व सासवडकर नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की, कचरा इतरत्र व न टाकता, घंटागाडीतच टाकावा. एकल वापर प्लॅस्टिकचा वापर टाळावा, सार्वजनिक ठिकाणी खरेदीला जाताना कापडी पिशवीचा वापर करावा. सासवड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरपरिषद प्रशासन संचालनास( दि. 22) ऑगस्ट 2025 च्या पत्रानुसार, एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभाव अमलबजावणीच्या अनुषंगाने शहरात तपासणी मोहीम, राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने खालील विशिष्ट क्षेत्राची तपासणी करण्यात येत आहे.1) पहिला दिवस 25 ऑगस्ट, रस्त्यावरील विक्रेते, फुल विक्रेते, दुकाने स्थानिक बाजारपेठा. 2) दुसरा दिवस 26 ऑगस्ट बस स्थानक ,घाऊक बाजारपेठ, शॉपिंग मॉल, हॉटेल्स. 3) तिसरा दिवस 28 ऑगस्ट औद्योगिक क्षेत्र, चिकन सेंटर. 4) चौथा दिवस 29 ऑगस्ट प्लॅस्टिक विक्रेते. मुख्याधिकारी यांनी पुढे असेही सांगितले आहे की, स्वच्छतेचा बाबतीत सासवडकर नागरिक प्रथम प्राधान्य देतात परंतु, सुजाण नागरिक म्हणून सर्व शहरवासीयांनी यापुढे यावे 25 ऑगस्ट पासून, एकल वाफर प्लास्टिक बंदी विरोधात नगर परिषदेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे, नगरपरिषद उघड्यावर कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई पुढेही चालू ठेवणार आहे, असेही मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी ही प्रतिनिधीला माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments