दिवे येथे शेतक-यांसाठी नविन फळ बाजार सुरू ;पहिल्याच दिवशी सिताफळाची विक्रमी आवक ४५०० रू क्रेटला बाजारभाव .. सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील शेतक-यांसाठी भाजीपाल्या बरोबरच नविन फळ बाजार दिवे येथे सुरू करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी विविध फळांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. फळबाजाराचे ऊद्घाघाटन भाजपाचे नेत बाबाराजे जाधवराव व दिवे गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष ऊत्तमआबा झेंडे यांचे हस्ते झाले.सदर बाजारात शेतक-यांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून, सुमारे ५० पेक्षा जास्त खरेदीदारांनी यावेळी उच्चांकी बाजारभाव देत मालाची खरेदी केली. बाजारात पहिल्याच दिवशी झालेल्या फळांची आवक विक्रमी होती. यामध्ये सिताफळ ५०० क्रेट, पेरू २०० क्रेट,डाळींब १५० क्रेट, अंजीर १०० टब, यामध्ये सिताफळाला विक्रमी बाजार भाव मिळाला तो पुढीलप्रमाणे प्रति क्रेट ५०० ते ४५०० रुपये, डाळिंबाला ३००० ते ४००० रुपये, पेरुला १२०० ते १५०० रुपये आणि अंजिराला प्रति टब ६०० ते ७०० रुपये असा भाव मिळाला.या प्रसंगी बाबाराजे जाधवराव,उत्तम आबा झेंडे,गणपतराव शितकल, दिलीप आबा झेंडे,मा. सरपंच बापू सोपान टिळेकर,पोलीस पाटील बाळासाहेब झेंडे,माजी जि. प सदस्य संगीता ताई:" काळे, राजाभाऊ काळे,बापू जगताप दिवे गावचे सरपंच रुपेश राऊत, माजी सरपंच गुलाब झेंडे ,अमित झेंडे, सदस्य सुजाता जगदाळे, श्रद्धा काळे ,पूनम झेंडे झेंडेवाडी चे माजी सरपंच महादेव आप्पा झेंडे, समीर झेंडे ,अमर झेंडे ,शरद झेंडे आणि समस्त ग्रामस्थ दिवे पंचक्रोशी या कार्यक्रमाला उपस्थित होते. फोटोओळ: दिवे ता.पुरंदर येथे शेतक-यांसाठी नविन फळ बाजाराचे ऊद्घाघाटन करताना मान्यवर ....
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments