Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर चं विमानशेतकऱ्यांच्या जमिनीवर उभं राहणारं स्वप्न की राजकारण्यांचं आणि अधिकाऱ्यांच्या स्वार्थाचं विमानतळ?शेतकरी संघषॅ समिती सात गावातील विमानतळ बाधित शेतकरी सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: २०१६ साली पुरंदर येथे प्रस्तावित विमानतळाची घोषणा झाली आणि त्या क्षणापासून संपूर्ण परिसर अस्वस्थ झाला. विकासाच्या नावाखाली हजारो एकर सुपीक जमीन जाणार, ही भीती शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसली. याच भीतीतून अनेक आंदोलने उभी राहिली. ही आंदोलने केवळ विरोधासाठी नव्हती, तर आपल्या हक्कांसाठी, अस्तित्वासाठी होती.मात्र परिस्थिती इतकी टोकाला गेली की ड्रोन सर्वेच्या वेळी पोलिस बळाचा वापर करावा लागला. शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला, अनेकांची डोकी फुटली, रक्त सांडलं. प्रश्न असा उभा राहतो नेमकं असं काय घडलं? संवाद, समजूत आणि पारदर्शकता यांचा मार्ग का सोडला गेला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा लाठीचार्ज कोणाच्या सांगण्यावरून झाला?शेतकरी रस्त्यावर उतरले, पण निर्णय बंद दाराआड झाले. या सगळ्या घटनेनंतर फिल्डवर उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित झाली का? कोणाचं निलंबन का नाही झालं.?की सगळी किंमत नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनाच मोजावी लागणार का.?“पुरंदर चं विमान” इथेच तपासलं जात आहे. विकास हवा आहे, पण तो अन्यायाच्या, दडपशाहीच्या आणि रक्ताच्या मार्गाने नको. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं, जखमांना न्याय आणि निर्णयांना पारदर्शकता मिळाल्याशिवाय हा प्रकल्प स्वप्न न राहता वेदनेची आठवण ठरेल. विमानतळासाठी आत्तापर्यंत झालेल्या या सर्वसामान्य शेतकरी यांना सहमतीत न घेता, मंगळवार या दिवशी जो काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समवेत सात गावातील सर्वसामान्य शेतकरी यांना न घेता, जिल्हाधिकारी यांनी तीन वेळा जी मनमानी कारभार केलेला आहे, 96% विमानतळ सहमती झालेली अद्याप पर्यंत जिल्हाधिकारी यांनी माहिती दिलेली नाही ,तर आत्तापर्यंत स्वतःची अधिकारी हे तीन वेळा शाब्बासकी ही फक्त एजंटला हाताशी धरून करत आहेत ,एजंट हा सात गावातील शेतकऱ्यांचा मालक नाही, जिल्हाधिकारी यांनी कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी, एखतपुर, मुंजवडी, खानवडी, पारगाव येथील शेतकरी म्हणून यादीनुसार पाच गावातील सरपंच, शेतकरी गावकऱ्यांच्या तर्फे ठरवून दिलेल्या मध्ये मनमानी कारभार करून एजंटांची नावे ही स्वत :जिल्हाधिकारी यांनी ऍड केली आहेत, हे कशासाठी मंगळवार या दिवशी मुंबई येथे जी मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर विमानतळ मीटिंग आहे ना? त्यात अधिकारी हे सात गावातील विमानतळासाठी मालक झाले आहेत का? जर एजंटला हाताशी धरताच ना ?तर त्यांची जमीन घ्यावी, आमच्या विमानतळ बाधित शेतकऱ्यांची जमीन अजिबात देणार नाही ,असे ठणकावून सर्वसामान्य शेतकरी यांनी जिल्हाधिकारी यांना स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे. जिल्हाधिकारी यांचा कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी, एखतपुर, मुंजवडी, खानवडी, पारगाव येथील विमानतळ बाधित शेतकऱ्यांनी पाच जणांची यादी ही मनमानी कारभार करून जिल्हाधिकारी यांनी केलेली आहे, तर उद्या बैठकसाठी अगोदर जिल्हाधिकारी व नेमलेल्या अधिकाऱ्यांनी पहिले सातही गावातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सोबत पहिली चर्चा करावी मगच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मुंबई येथे बैठक लावावी, यासाठी जिल्हाधिकारी यांचा अधिकार सर्वसामान्य शेतकरी यांनी केलेला आहे अशी सर्व माहिती सात गावातील शेतकरी संघर्ष समितीने केलेली सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली. तसेच अधिकाऱ्यांनी गावाने दिलेल्या शेतकऱ्यांच्या नावात बदल केले उद्या मीटिंग ला ते त्यांचे वाढीव प्रतिनिधी दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवणार शेतकरी फक्त उपस्थिती साठी असणार.फसवणूक चालू आहे.विचार करा लोकांना दलाल म्हणनारेच खरे दलाल आहे.गावाने दिलेली नावे सोडून जर कोण तिथे असेल तर सगळ्यांनी मीटिंग वर बहिष्कार टाका ?नाहीतर मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट सांगा एक शेतकरी

Post a Comment

0 Comments