Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यात सासवड या ठिकाणी उपबाजारात ज्वारीला प्रतिक्विंटला 3100 दर; तर गहू प्रतिक्विंटला 3100 दर                    सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                          पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड (ता. पुरंदर) येथील उपबाजारामध्ये धान्याचे मोठ्या प्रमाणामध्ये आवक होत असते, बुधवार( दि. 27 ऑगस्ट) रोजी ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 3 हजार 100रु चा दर , तर  गहू प्रतिक्विंटला 3हजार 100चा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उपबाजारात वाघापूर, माळशिरस, गराडे, दिवे, परिचे, वाल्हे, राजुरी या सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी घेऊन, तांदूळ ,हरभरा असे धान्य विक्रीसाठी येत असतात, बुधवारी सासवड उप बाजारात एक नंबरचा  ज्वारीला कमाल 3 हजार 100 रुपये तर दोन नंबर प्रतीच्या ज्वारीला किमान 2 हजार 200 रुपये तर सरासरी 2 हजार 650 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, तर गहू कमाल 3 हजार 100 रुपये तर दोन नंबर प्रतीच्या गहू किमान 2 हजार 800 रुपये तर सरासरी 2 हजार 950 रुपये प्रतिक्विंटला_ असा दर मिळाला अशी समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी माहिती दिली. सासवडच्या उप बाजारातील धान्य आवक दर प्रतिक्विंटल पीक, किमान, कमाल, सरासरी दर ज्वारी 2200,3100, 2650. बाजरी 1900,3105,2552. गहू 2800,3100, 2950. तांदूळ 4800,5500,5150.   हरभरा 5511,5600, 5555. यावेळी सभापती संदिप फडतरे, उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, गणेश होले, देविदास कामठे, वामन कामठे, अनिल माने, अशोक निगडे, भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, लिपिक विकास कांबळे यांच्यासह व्यापारी आर. के टेडरचे रूपचंद कांडगे, आर. आर. ट्रेडरचे राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश वीरकर, आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments