सासवड येथील म्हाडा वसाहतीत सोयीसुविधांचा अभाव — रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड (ता. पुरंदर) येथील सर्वे क्र. 74/1 मधील म्हाडा वसाहतीमध्ये राहणारे नागरिक गंभीर समस्यांना सामोरे जात असून, म्हाडाने दिलेल्या घरांच्या गुणवत्तेबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे.म्हाडा "स्वस्त घर, स्वप्नातील घर" अशी जाहिरात करून घरे विकतो; मात्र प्रत्यक्षात या घरांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा गंभीर अभाव असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. फक्त इमारती उभ्या करून सदनिका विकल्या गेल्या आहेत; परंतु सुरक्षित परिसर, पाणीपुरवठा, वीज, पार्किंग, सोसायटी स्थापना, कार्यालयीन जागा व परिसर विकास याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे.रहिवाशांच्या प्रमुख तक्रारी:वसाहतीभोवती संरक्षक भिंतीचा अभाव.वीज व पाणीपुरवठ्याची अपुरी व्यवस्था.अंडरग्राउंड पाण्याच्या टाकीची सोय नाही.नियमानुसार पार्किंगची कमतरता.सोसायटी स्थापन करण्यासाठी कोणतीही मदत नाही, कार्यालयीन जागेचा अभाव.परिसर व सार्वजनिक सुविधा पूर्णपणे अपुऱ्या.रहिवाशांचे म्हणणे आहे की, घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे तर सुरक्षित व सोयीसुविधांनी सुसज्ज वसाहत असावी. मात्र म्हाडा "स्वस्त घर" नावाखाली फक्त बांधकाम विकत असून, नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करत आहे.या कारणामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या रहिवाशांच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत. "गरिबांच्या डोक्यावर स्वस्त घर लादले जात आहे, परंतु त्यात राहण्याजोग्या सुविधा नाहीत", अशी तीव्र नाराजी व्यक्त करून रहिवाशांनी म्हाडाकडे तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments