Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: गणेशोत्सवाला आज उत्साहात प्रारंभ झाला, सकाळच्या प्रहार घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली, तर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळाने वाजत, गाजत मिरवणुका काढल्या, सासवड शहरांमध्ये दिवसभर गर्दीने गजबजून गेला होता, गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला, पुढील दहा दिवस विविध धार्मिक, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन पुरंदर तालुक्यातील गावांमध्ये करण्यात आले आहे. सासवड शहराची बाजारपेठ आज गर्दीने गजबजून गेली होती, विशेष सासवड नगरपालिका शेजारी चौकात तर गर्दीच झाली होती, गणेश मूर्तीचे विक्रीचे स्टॉल जागोजागी मांडण्यात आले होते, सजावटीचे साहित्य, खरेदी करण्यासाठी बालचमुक आगरी होते, दरम्यान सकाळच्या वेळी घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली ,तर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळाने वाजत गाजत मिरवणुकीने जात श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे, पुरंदर तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या सासवडमध्ये तालुक्यातील गणेश भक्त आणि विविध मंडळांनी गणेश मूर्ती खरेदीसाठी गर्दी केली होती ,यासाठी गणेश पूजेसाठी आवश्यक असणारे साहित्य जसे की अगरबत्ती, कापूर, धूप, हळद-कुंकू, गुलाल, चंदन, मध, अत्तर, अभिषेकाचे साहित्य, हार फुले, मूर्तीसाठी आभूषणे आणि सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी भक्त सकाळपासूनच व्यस्त होते. याशिवाय लाईट यांच्या माळा रंगीबेरंगी पट्ट्या आणि इतर सजावटीच्या वस्तूंची ही खरेदी केली जात होती, घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना, दुपारनंतर पूर्ण झाली तर मंडळांच्या मूर्तीची स्थापना रात्री उशिरापर्यंत सुरू होती, प्रताप कुंभार, हरिदास कुंभार यांच्या गणपतीच्या स्टॉल मधून, गणपती घेताना विजय क्षीरसागर, विराज क्षीरसागर, अमोल शिरसागर, एडवोकेट स्वप्निल होले, व त्यांचे सहकारी मित्र, पत्रकार बापू मुळीक मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त हा बुधवारी असला तरी काही मंडळांनी मंगळवारीच मूर्तीची मिरवणूक काढून, त्या ठिकाणी सासवड शहरात ढोल ताशाच्या दनाटांमध्ये स्वागत करण्यात आले, तालुक्याच्या ग्रामीण भागातील रात्री उशिरापर्यंत मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश भक्तांनी उत्साह पूर्ण वातावरणात बाप्पाचे स्वागत केले आहे.

Post a Comment

0 Comments