Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपालिकेच्या बेनझीर शेख यांचा पदोन्नती बद्दल सत्कार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगरपालिकेत सहाय्यक कर निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या, बेनझीर मोहम्मद शेख यांची पदोन्नती व ब वर्ग नगरपालिकेत निवड झाली आहे ,यापूर्वी हिंगणघाट येथे काही काळ त्यांनी काम केले असून, गेली वर्षभर नगरपालिकेत काम करत आहेत, त्यांच्या निवडीबद्दल नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी तसेच जावेद मुल्ला बांधकाम विभाग व संकेत नंदावंशी पाणीपुरवठा विभाग यांना सुद्धा पदोन्नती मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. पालिकेच्या कर विभागात काम करणारे तसेच बांधकाम विभागातील कर्मचारी व पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी आदी सासवड नगरपालिकेतील कर्मचारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments