वडिलोपार्जित जमिनीच्या मोजणीचा खर्च आता थेट २०० रुपयावर सरकारचा महत्वपूर्ण निर्णय सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : आता वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहीशाची मोजणी करायला शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागणार नसल्याने, कारण राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे ,आधी काय होतं, जमिनीची मोजणी करायला हजार रुपयांपासून थेट 14 हजारापर्यंत खर्च यायचा, त्यामुळे शेतकऱ्यांचा खिसा अक्षरशः रिकामा होत होता, पण आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे, प्रति पोट हिसा फक्त दोनशे रुपये देऊन मोजणी करता येणार आहे, हा नवीन निर्णय राज्यभर लागू झाला असून, संबंधित जिल्ह्याच्या भूमी अभिलेख विभागाला याची माहिती देण्यात आली आहे, आता कोणी जमिन मोजणीस अर्ज केला तर त्याला केवळ फक्त दोनशे रुपये भरावे लागतील, महाभुमिअभिलेखच्या वेबसाईटवरही नवीन दर अपडेट झालेले आहेत, त्यात एकत्र कुटुंब, पोट हिस्सा मोजणी हा नवीन पर्यायी जोडलेला आहे, ई मोजणी फर्जंद 2.0 या संगणक प्रणाली मध्येही बदल करण्यात आली असून, संपूर्ण प्रक्रिया आता आधीपेक्षा पारदर्शक आणि सोपी होणार आहे ,कुटुंबात जमिनीच्या वाटणीवरून, कायम वाद होत होते, शिवाय मोजणीच्या खर्चामुळे आणखी त्रास वाढायचा, पण या निर्णयामुळे कुटुंबातील सदस्यावर आर्थिक बोजा पडणार नाही, जमाबंद आयुक्त आणि भूमी अभिलेख विभागाच्या संचालकांनी या संदर्भात अधिकृत पत्र जारी केले असून, यापूर्वी मोजणी दोन प्रकारे होत होती "साधी आणि जलद जलद मोजणीसाठी तर जास्त शुल्क लागत होते ,पण आता हा संपूर्ण खर्च मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला असून, शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments