Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड कापूरहोळ रस्त्यावर भिवडी येथे दुचाकी व टँकरची धडक; तर भीषण अपघातात दोन जण जागीच ठार सासवड प्रतिनिधी: सासवड कापुरहोल रस्त्यावर भिवडी (ता. पुरंदर )गावच्या हद्दीत हॉटेल रुद्राक्ष समोर मंगळवारी दि. 22 सकाळी 12:00 वाजताच्या सुमारास अपघातामध्ये दुचाकी वरील तरुण आणि तरुणी यांचा जागीचा मृत्यू झाला. दुचाकी आणि टँकर यांच्यात समोरासमोर झालेल्या या धडकेमध्ये दुचाकीचा अक्षरशा: चुराडा झाला. नंदू रत्नाकर होले (वय 22, रा. खानवडी ता. पुरंदर) आणि अपूर्वा रवींद्र कुंभारकर (वय 23 रा. कुंभारवळण ता. पुरंदर) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत सुमित रत्नाकर होले (रा. खानवडी) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सासवड पोलिसांनी टँकर चालक हरिबा भिवा टोणे( वय 41 रा. लोणी काळभोर ता. हवेली) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 281, 125 (अ),125( ब), 106 (1), 324( 4) नुसार गुन्हा दाखल करून अटक त्याला केली आहे. नंदू होले आणि अपूर्वा कुंभारकर हे दोघे (एम. एच. 12 एक्सव्ही 94 42) या दुचाकीवरून सासवड येथून नारायणपूरकडे जात होते, त्यावेळी कापूरहोळ कडून सासवड कडे येणाऱ्या टँकरने (एम.एच. १२ आरएन 78 43) त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. यात नंदू आणि अपूर्वा यांचा जागीच मृत्यू झाला, माहिती मिळताच सासवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, पंचनामा करीत मृतदेह सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments