Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील कऱ्हा नदीवर बांधलेल्या के. टी बंधाऱ्यांची जबाबदारी कोणतेही जलसंधारण खाते घेत नाहीण सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवड येथील कऱ्हा नदीवर बांधलेल्या के. टीममध्ये बंधाऱ्यांची जबाबदारी ही त्यांच्या कार्यालयाशी संबंधित नाही असे सांगत असताना के. टी बंधाऱ्यांची जबाबदारी घेत नसल्याबद्दल तक्रार ,सासवड नगरपालिका हद्दीतील बंधारे हे उपविभागीय जलसंधारण विभाग यांनीच बांधले आहेत , त्याच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष चौकशी व माहिती घेतली असता ,सासवड कार्य क्षेत्रात येणारे बंधारे हे दुरावस्थेत आहेत, गळती सुरू आहे, ३१ऑक्टोबर पूर्वी ते ढापे टाकून अडवले पाहिजेत याबाबत चर्चाही झाली होती.तक्रारीवर संबंधित मृदु व जलसंधारण खात्याचे अधिकारी पाहणीसाठी येऊनही गेले. परंतु त्यानंतर कार्यालयाने संपर्क न ठेवल्याने, लेखी तक्रार दिली. तक्रारीनंतरही ढापे टाकण्यात आले नाहीत.शेवटी ही जबाबदारी कोणत्या खात्याची आहे ? सर्वच जलसंधारण विभाग या बांधलेल्या बंधाऱ्यांची जबाबदारी का घेत नाहीत ? त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, यासाठी माहिती अधिकारात माहिती विचारली असता .मृदु व जलसंधारण विभाग उपविभागीय जलसंधारण उपविभागाने कानावर हात ठेवले आहेत .आमचा बांधलेल्या बंधाऱ्यांचा संबंध नाही आणि आमच्या विभागाशी संबंधित नाही असे उत्तर आले आहे .मृदु व जलसंधारण उपविभाग यांचीच बंधाऱ्यांची जबाबदारी असल्याचे खालील विभागांनी त्यांना कळवले आहे.१) वैशाली जंगले , जन माहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी,मंत्रालय मुंबई२) सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी मृदु व जलसंधारण विभाग,येरवडा पुणे.३) वि.सावंत ,सहाय्यक अधीक्षक अभियंता,पुणे पाटबंधारे मंडळ ,पुणे ११.अशा प्रकारे जलसंधारण खात्यानीही ही जबाबदारी मृदु व जलसंधारण उपविभाग यांचीच असल्याचे कळवूनही उप विभागीय जलसंधारण अधिकारी जबाबदारी घ्यायला तयार नाहीत.हे बंधारे बांधले कोणी ?या बंधाऱ्यांच्या गळतीची,दुरुस्तीची जबाबदारी कोणाची ? बंधारे आजतागायत सासवड नगरपालिकेकडे हासतांतरीत का केले गेले नाहीत ? दोषी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात आली नाही? सर्वजण एकमेकावर जबाबदारी का ढकलत आहेत ?जलसंधारण विभागाच्या अशा कारभाराने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे .माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या कायद्याच्या आधारे माहिती कशी मिळत नाही व कशी माहिती टाळली जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे .सासवड मधील बंधाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे विनंती सोबत संबंधित कागदपत्रे जोडली आहेत. अशी माहिती डॉ. उदयकुमार वसंतराव जगताप यांनी ही सवॅ माहिती प्रतिनिधीला दिली आहे.

Post a Comment

0 Comments