Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड सुपा रोडवरील पारगाव येथील राठी फार्म हाऊस या ठिकाणी होत असलेल्या पुलाच्या ठिकाणी दुर्दैवी अपघातामध्ये एक युवक ठार; यासाठी राजपथ इन्फ्रा कंपनीचे काम निकृष्ट पद्धतीचे सासवड प्रतिनिधी: सासवड सुपा रोडवरील पारगाव येथील राठी फार्म हाऊस या ठिकाणी तयार होत असलेल्या, पुलावर एक प्रकारचा दुर्दैवी अपघातामध्ये एक युवक जागीच ठार झाला. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारामध्ये राठी फार्म हाऊस या ठिकाणी रस्त्यावर दुर्दैवी अपघात घडून आला. या अपघातामध्ये रियाज आलम नजीम उल्हास शेख (वय -24 वर्ष रा. काष्टी तालुका श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) या युवकाची या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. जेजुरी पोलीस स्टेशनच्या माहितीनुसार रियाज आलम हा पारगाव मेमाणे येथे वेल्डिंगचे काम करत असल्याने, तो सकाळी मोटर सायकल क्रमांक (एपी २९ एच ७४१८) वरून पारगाव हून सासवड कडे जात असताना, राठी फार्म शेजारी नवीन पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या नळ्याजवळील पाण्यात मोटार सायकल्ससह पडला, यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे, त्याचा मृत्यू झाला. त्या अपघाताची माहिती त्याचा भाऊ सिराज आलम नजीम उल्ला शेख, यास रियाज आलम च्या मित्रामार्फत माहिती मिळाली. त्यानंतर तो त्या ठिकाणी घटनास्थळी, पोलीस आणि ॲम्बुलन्स त्या ठिकाणी दाखल झाली. ग्रामस्थांच्या मदतीमुळे रियाज अलमला तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयांमध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला तपासले असता, उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेची नोंद जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.या अपघातामुळे परिसरामध्ये हळहल व्यक्त होत आहे. तरीसुद्धा सासवड सुपा पारगाव पिसर्वे या ठिकाणच्या रोडचे काम चाललेले आहे, त्या ठिकाणी राजपथ इन्फ्रा कंपनीने पारगाव या ठिकाणी चाललेल्या पुलाच्या ठिकाणी राजपथ कंपनीने कोणत्याही सेवा, सुविधा दिलेल्या नाहीत, तर गेली दोन महिन्यांमध्ये या रोडचे काम करत असताना, राजपथ कंपनीचे अधिकारी सेवा सुविधा पुरवण्यासाठी निष्काळजीपणा, हलगर्जीपणा मुळे अशा या अपघातालाच सुरुवात झाली असून, यापुढे किती जणांचा बळी घेणार? हे या राजपथ इन्फ्रा कंपनीने जाहीर करावे, कारण या ठिकाणी रोडचे काम करत असताना, कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत, सर्वसामान्यांच्या या तक्रारी आहेत. याची वाच्यता करण्यासाठी त्यांच्याकडे गेले असता ते कुठल्याही प्रकारची दाद देत नाहीत, मग यावर शासन काय निर्णय घेणार, हे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सध्या चर्चा चालू आहे. या घटनेची माहिती सर्व जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये दाखल अमलदार, पोलीस हवालदार योगेश चितारे यांनी नोंद करून घेतली, तर जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार विठ्ठल कदम हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments