Hot Posts

6/recent/ticker-posts

आषाढ वद्य अमावस्येनिमित्त श्रीनाथांच्या मंदिरात कोडित याठिकाणी भाविकांची गर्दी सासवड प्रतिनिधी: गुरुवार दि. २४जुलै रोजी आषाढ अमावस्येनिमित्त भाविकांनी कोडित येथे श्रीनाथांच्या मंदिरात भाविकांची गर्दी पहावयास मिळाली. पहाटे ४ वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी १० वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम, दिवसभर सुरु होता. दुपारी १२ वाजता धुपारती होऊन, गाभारा तासभर बंद करण्यात आला. दुपारी १.१५ मिनिटांनी गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला. आजच्या महाप्रसादाचे आयोजन समस्त गावकरी महसकोबावाडी कोडित यांचेमार्फत करण्यात आले. यावेळी देवस्थान ट्रस्टमार्फत स्वच्छ पाणी, दर्शनबारी, जादा कर्मचारी यांची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान कोडित येथील रुढी, परंपरानुसार सवॅसवी माहिती गावकरी मंडळी कोडित येथील यांनी प्रतिनिधी ला माहिती दिली.

Post a Comment

0 Comments