Hot Posts

6/recent/ticker-posts

“उत्सवातून सेवा – रायगडावर पैलवान ग्रुप बारामती कडून स्वच्छता व वृक्षारोपण” सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: देशाला घडवण्याचे खरे सामर्थ्य युवक वर्गातच असते, तरुणाचा प्रत्यक्ष सहभाग हा देशाला प्रगतीपथावर न्यायला भाग पडतो व समाजात बदल घडवतो असाच बदल करायचा ठरवला तो काही तरुणांनी एकत्र येऊन, पैलवान ग्रुप एमआयडीसी बारामती येथील युवकांनी मा.अजितदादा प्रतिष्ठान स्थापन करून , किल्ला स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. खरे तर किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे महाराष्ट्राला महाराजांच्या किल्ल्यांचा इतिहास आहे पर्यटनाच्या अनुषंगाने 12 किल्ल्यांचाही समावेश जागतिक वारसा स्थळ यादीत झाला आहे हे ध्यानात ठेवून किल्ल्यांची स्वच्छता करून किल्ले संवर्धन करणे तसेच आपल्या महाराष्ट्राचे वैभव जतन करून आबादी ठेवण्यासाठी हे तरुण धडपडत आहेत याचबरोबर माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो व झाडे तो आपल्याला झाडे पुरवतात झाडांचे प्रमाण कमी होत चाललेले आहे, त्यामुळे निसर्गाची मानवी हानी लक्षात घेऊन , वृक्षारोपण मोहीमही ते राबवत आहेत. कामातून वेळ काढत समाजाला प्राधान्य देऊन इतिहासाचे निसर्गाचे ऋण फेडण्याचे काम ते करत आहेत. महाराजांनी स्वराज्याचे तोरण ज्या राजगडावर बांधलं त्याच राजगड किल्ल्यापासून अजितदादा प्रतिष्ठान आयोजित 14 सप्टेंबर रोजी सकाळी मोहिमेस सुरुवात झाली यावेळी स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान चे अध्यक्ष संतोष जगताप यांनी सर्व तरुणांचे सासवड मध्ये स्वागत केले व मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच सर्व युवकांचे ते करत असलेल्या कामाबद्दल कौतुक केले यावेळी मा.अजितदादा प्रतिष्ठाण संस्थापक (अध्यक्ष) ओंकार कृष्णाजी माहाडिक, माऊली पाटोळे, अमित भोईटे , रोहन शिंदे ,स्वप्नील खरात,सुमित इनामदार, पंकज मुटेकर व 200 तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments