पुरंदर तालुक्यात शिवरुद्र वाद्य पथकाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड (ता. पुरंदर) येथे आचार्य अत्रे भवन या ठिकाणी शिवरुद्र वाद्यपथक सासवड यांच्यावतीने ससून सर्वोच्चपचार रुग्णालय पुणे यांच्या सौजन्याने, रक्तदान शिबिराचे आयोजन 10 ते 4 या वेळेमध्ये करण्यात आले होते, यासाठी 60 बॉटलचे रक्तदात्यांनी आपले रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान असल्याचे, दुसऱ्याला अडीअडचणीच्या वेळी मदत होणार असल्याच्या कारणावरून, रक्तदान उत्साहात संपन्न करण्यात आले. सन 2009 ची स्थापना असून, या मध्ये 16 वर्ष हा शिवरुद्र वाद्य पथक कामकाज करीत असून, कोरोना काळात रुग्णांना वैद्यकीय मदत, सांगली, कोल्हापूर येथे पूर आला असता, जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या, होतकरु मुलांना, पथकातील गरजू होतकरूंना शैक्षणिक मदत, साफसफाई, आरोग्याबाबत सुविधा आदी उपक्रम राबवले आहेत, यासाठी ससून रुग्णालयाचे डॉ. देसले शरद, डॉ. अंजली राहणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली. यासाठी शिवरुद्र वाद्यपदक सासवड संस्थापक अध्यक्ष राजन (भैया )जगताप यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments