श्री क्षेत्र वीर यात्रेसाठी श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे ढोल ताशांच्या गजरामध्ये श्री शेत्र कोडीत वरून श्री शेत्र वीर कडे शाही असे प्रस्थान सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: माघ शुद्ध पौर्णिमेला रविवारी दि.1 रोजी दुपारी 12:30 च्या सुमारामध्ये आरती होऊन, श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे श्री क्षेत्र कोडीत ता. पुरंदर येथील भक्त तुळाजी बुवा मंदिरापासून वीर तालुका पुरंदर येथील नाथ मस्कोबा, माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्याचे प्रस्थान ठेवण्यात आले, याप्रसंगी भाविकांनी फुलांची उधळण करीत 'सवाई सर्जाच चांगभलं' 'नाथ साहेबांचं चांगभलं' च्या गजरामध्ये भाविकांच्या उपस्थितीत वीर यात्रेसाठी श्रीनाथ म्हस्कोबा देवांच्या पालखी काठीचे प्रस्थान ठेवण्यात आले, कोडीत येथील देऊळ वाड्यामध्ये शनिवारी पहाटे उत्सव मूर्तींना अभिषेक घालण्यात आला, त्यानंतर सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारांमध्ये ढोल ताशांच्या पारंपारिक वाद्याच्या गजरांमध्ये मानांच्या काठी, छत्री, आपदागिरी, शौर्य ढाळत, देऊळ वाड्यातून जवळ असणाऱ्या तुळाजीबुवा मंदिर येथे रात्री दहा वाजता पालखी काठी विसावली, त्यानंतर विर येथील बारा दिवसांच्या यात्रे संबंधी नियोजनाची बैठक झाली, यावेळी कोडित ग्रामस्थ, सालकरी, मानकरी, श्री देवस्थान म्हस्कोबा महाराज ट्रस्टचे आजी, माजी पदाधिकारी आदी उपस्थित होते, पहाटे पाच वाजता उत्सव मूर्तींना महारुद्र अभिषेक घालून, पालखीत विराजमान करण्यात आले, त्यानंतर भाविकांनी उत्सव मूर्तीचे दर्शन घेतले, सकाळपासून मंदिरात पालखीच्या दर्शनासाठी रांग लागली होती, श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे दर्शन घेऊन, भाविकांचा आणि वीर कडे पारंपरिक वाटेने निघाली होते, यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, नीरा मार्केट कमिटीचे सभापती संदीप फडतरे, साकेत जगताप, अमोल जगताप, भैय्यासाहेब खैरे,गीतांजली ढोणे पदाधिकारी बहुसंख्येने आदी उपस्थित होते. दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी तुतारी वाजली आणि मानकऱ्यांनी श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीला खांदा लावला, ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये सालकरी, मानकरी ग्रामस्थ आणि हजारो भाविकांचे उपस्थितीमध्ये श्रीनाथाच्या पालखीचे विर कडे प्रस्थान झाले या पालखी पुढे मानाची काठी पालखी समवेत दागीनदार, अब्दागिरी, ढाळत भाविकांच्या उपस्थितीमध्ये अक्षता झेलित, धीम्या गतीने पालखीने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली आणखी नदीपलीकडे गेल्यावर नागदरी याठिकाणी पारंपारिक मेंढ्यांचे रिंगण, वाद्याच्या गजरांमध्ये पार पडले. पिंपळे ते वीर अशा पालखी मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची पालखी भिवडी, सुपे, पिंपळे, पांगारे घाट मार्गे परिंचे गावावरून पालखी राऊतवाडी येथे विसावली. सायंकाळी पालखी वीर येथे पोहोचल्यानंतर सर्व मानकऱ्यांच्या वतीने वीर मध्ये पालखी काठीचे स्वागत केले जाते, रात्री बारा वाजता श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व माता जोगेश्वरी यांचा शाही विवाह संपन्न झाला. आजपासून वीर येथील बारा दिवसांच्या यात्रेला प्रारंभ झालेला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments