Hot Posts

6/recent/ticker-posts
Showing posts with the label .थ.मShow All
पुरंदर तालुक्यातील वीर येथे देवाला सोन्याचा साज (अलंकारिक पोशाख) माघ वद्य अमावस्येनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर वीर येथे भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी  सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                       रविवार व महाशिवरात्र एकत्र आल्याने भाविकांची मोठी गर्दी मंदिरात दर्शनासाठी होती. शिवरात्रीला मंदिराची पाकाळनी (प्रक्षाळपूजा) करण्यात आली होती. पहाटे धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला सकाळी ६ वाजता गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासूनच देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी १० वाजता देवाला दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या, देऊळवाड्यात दगडी कासवावर, सालकरी, गोसावी मंडळीचा गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर चालू होता.दुपारी १२ वाजता धुपारती  होऊन मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद होता.१.३० वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला झाला.आज सिनाची अमावस्या असल्याने, दुपारी १.३० वाजता देवाला सुवर्ण अलंकारिक पोशाख करण्यात आला होता. देवाचे साजरे रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.   महाप्रसादाचे आयोजन समस्त हेंद्रे व गिरमे परिवार यांचेमार्फत करण्यात आले होते. भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, होमगार्ड, जादाचे कर्मचारी, परिसर स्वच्छता, यांची व्यवस्था करण्यात आल्याचे श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त  मोहन रावसाहेब धुमाळ यांनी सांगितले. यावेळी सर्व विश्वस्त मंडळ,सल्लागार व ग्रामस्थ उपस्थित होते.
Load More That is All