पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी विविध उपक्रमांनी रमजान ईद उत्साहात साजरी; ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज व दुआ सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहरांतील रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली, या ठिकाणी ईदगाह मैदानावर सकाळी सामुदायिक नमाज पठण, खुदबा आणि विश्वाच्या कल्याणासाठी अखेरच्या क्षणी ची दुवा मौलाना शमशाद आलम यांच्या अधिपत्याखाली पार पडली. या कार्यक्रमासाठी रफिक बागवान, हसन तांबोळी, इलाही बागवान, पापा बागवान, आरिफ आतार, शाकीर काजी, एडवोकेट अशफाक बागवान, रमजान आतार ,मुन्ना बागवान, जुबेर काजी,नासीर आतार,राजु तांबोळी, इसाकभाई आतार, अर्सलबाई बागवान, शकील बागवान, हरून बागवान आदी उपस्थित होते. आर्थिक गुन्हे शाखेचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने, पोलीस निरीक्षक कुमार कदम व शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत ताकवले यांनी यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सासवड पोलिसांनी सर्व मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन, ईद च्या शुभेच्छा दिल्या, येथील दर्गा मशीद मध्ये देखील जैनुल अबो दिल यांनी नमाज पठने केले ,हाजी हासनबाई तांबोळी, बुरानबाई इनामदार, हरून बागवान ,इब्राहिम भाई सय्यद, शमशुद्दीन आतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र तांदूळकर, अर्चना पाटील, रुपेश भगत, संदिप टिळेकर यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments