पुरंदर तालुक्यातील पीर साहेबांच्या यात्रेनिमित्त पिसे येथील पीर यात्रेस सुरुवात सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील हिंदू मुस्लिम भाविकांच्या ऐकायचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या पिसे येथील तालुका पुरंदर या ठिकाणी पीर साहेब हजरत दावल मलिक पीर दर्गा शरीफ यात्रे निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून व राज्यातून आलेले हिंदू व मुस्लिम भाविकांनी सोमवार दि. 23 मार्च रोजी संदलचा कार्यक्रम होणार असून, भाविकांनी पारंपारिक पद्धतीने मुळीक मानकरी यांची काठी, संध्याकाळी आठ वाजता कै. राजाराम गेनबा मुळीक यांना काठी उचलण्याचा मान परंपरेनुसार असल्यामुळे, त्यांचे पुत्र सामाजिक कार्यकर्ते शेतकरी संतोष राजाराम मुळीक हे काठी उचलतात पारंपारिक वाद्याच्या गजरामध्ये संदलची मिरवणूक गावकरी काढत असून, ती काठी मुळीक परिवाराची देवाची काठी त्या ठिकाणी पीर साहेबांच्या मंदिरामध्ये विसावली जाते, तर नंतर नऊ वा सकाळपासून सोमवार या दिवशी या परिसरातील हिंदू मुस्लिम भाविकांनी देवाला अर्पण करण्यात येणाऱ्या नवसाच्या फुलाची चादर, तसेच मलिदा, नारळाचे तोरणहार, गोडभाताच्या नैवेद्याची सांज वाजत गाजत मिरवणूक काढून देवास अर्पण करण्यात येते, रात्री साडेदहा वाजता किरण गाजरे निर्मित आर्केस्ट्रा रंगीला 5 हा कार्यक्रम होणार आहे, मंगळवारी दि. 24 रोजी देवदर्शन होऊन दुपारी बारा वाजता पिराच्या मंदिरामध्ये बकरी मुस्लिम समाजाकडून कापून संध्याकाळी नैवद्य हा रात्री काठी सय्यद परिवाराची दोन काठी वाजत गाजत रात्री साडेसात वाजता निघून पिराच्या मंदिरामध्ये विसावते त्याचा सुद्धा मान हा सामाजिक कार्यकर्ते संतोष राजाराम मुळीक हे दोनही काठी उचलतात व नाचवतात प्रामुख्याने याविषयी सविस्तर माहिती माजी उपसरपंच शांताराम मुळीक, महादेव मुळीक , इब्राहिम सय्यद ,बशीर सय्यद यांनी ही माहिती दिली. रात्री अकरा नंतर गावात छबीने, ढोल लेझीम यांचे सामने रंगतात, बुधवार दि. 25 मार्च रोजी विश्वासराव पहेलवान नांदवळकर निर्मित लोकशाहीर साहेबराव नांदवळकर वसंत नांदवळकर सह रवींद्र पिंगळे लोकनाट्य तमाशा सकाळी नऊ वाजता सुरू होणार असून, सायंकाळी चार वाजता जंगी असा कुस्ती आखाडा जोमदार पद्धतीने रंगणार आहे, तर रात्री आठ वाजता श्रीनाथ म्हस्कोबाच्या मंदिरामध्ये गावच्या यात्रेच्या सर्व हिशोब तपासणी आठ वाजता मंदिरामध्ये पार पडणार आहे, तर रात्री नऊ वाजता खास महिलासाठी पुन्हा एकदा लोकशाहीर साहेबराव नांदवळकर वसंत नांदवळकर सह रवींद्र पिंगळे यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा कार्यक्रम होणार आहे ,अशी माहिती व्यावसायिक संतोष हरिभाऊ मुळीक यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments